Nov 30, 2021
माहितीपूर्ण

कथा समीक्षा

Read Later
कथा समीक्षा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
कथा समीक्षा

कथेचे नाव - स्वाहा
लेखक - नारायण धारप
साकेत प्रकाशन
प्रकाशन - २००१
पृष्ठ संख्या - २४०

सुरूवातीपासूनच कथेत गूढाच वलय निर्माण झाल आहे. एक वयस्क जोडपं अत्यंत सावधपणे एका बंगल्याला भेट देतं. काही तपासणी करतं. ती करताना प्रत्येक क्षण ते कसल्याशा तणावाखाली, दडपणाखाली असल्याचे जाणवते. मग आठवडाभर तिथे राहून ते निघून जातात.
श्रीधर नावाचा एक मध्यमवर्गीय तरूण एका छोट्याश्या ब्लॉकमध्ये एकटा राहत असतो. त्याची थोरली बहीण विनीता जी नवऱ्यासोबत परदेशात राहत असते, ती सात वर्षांनंतर भारतात येते. त्यांना कामानिमित्त पाच सहा महिने इथे राहायचं असल्यामुळे ते तोच बंगला भाड्याने घेतात. हळूहळू विनीताला व तिचा मुलगा सुनीलला बंगल्यात काही विचित्र, भयानक अनुभव येतात. पुढे सुनीलचा अचानक अपघाती मृत्यू होतो. विनीता व तिचे पतीही रहस्यमय रित्या बंगल्यातून गायब होतात.
कामासाठी काही काळ परगावी गेलेल्या श्रीधरला परतल्यावर इथली परिस्थिती कळते. त्यांच्या गायब होण्याच मूळ त्या बंगल्यातच असल्याचे लक्षात येताच तो बंगल्यातील रहस्याचा तपास करण्याचा प्रयत्न करतो. पुढे त्यांची ओळख होते, त्याच बंगल्यात राहायला आलेल्या कुटुंबातील अरूणा नावाच्या तरूणीशी. तिलाही बंगल्यात काही विचित्र, भीतीदायक अनुभव येतात. त्यांची ओळख वाढते, मैत्री होते‌. हळूहळू अरूणा व श्रीधरच्या मनात एकमेकांबद्दल नाजूक भावना उमलत जातात. तर दुसरीकडे बंगल्यातील एक एका रहस्याचा उलगडा होत जातो.

वैशिष्ट्ये :

• एखादी पछाडलेली वास्तू. तिथे राहणाऱ्या लोकांना येणारे अनुभव, अशा प्रकारची टिपीकल कथा आपल्याला अनेक हॉरर मूव्हीजमध्ये बघायला मिळते. पण अशा टिपीकल कथानकालाही धारपांनी आपल्या दर्जेदार लेखनशैलीने उत्कंठावर्धक आणि रोमांचकारी बनवले आहे. वाचक कथेत गुंग होऊन जातो. काही प्रसंग खरोखरच अंगावर काटा उभा करतात.
श्रीधर व अरूणा यांच्यात निर्माण होणारा लव्ह अॅंगलही मोजक्या शब्दात ; पण सुंदर पद्धतीने वर्णन केला आहे. सूड, भय, प्रेम अशा विविध भावनांच मिश्रण कथेत वाचायला मिळते.

• पात्रांची वा साध्या घटनांची अनावश्यक वर्णने हा धारपांच्या इतर काही कथांमध्ये असणारा दोष यात आढळत नाही. प्रत्येक पात्रांची त्यांच्या महत्वापुरती माहिती दिली आहे. संपूर्ण कथा बंगल्यातील भयानक अनुभव व श्रीधरचा तपास या महत्त्वाच्या घटनांभोवतीच फिरते. साध्या घटनांचे निरर्थक डिटेल्स टाळले आहेत.

• कथा कुठेही कंटाळवाणी वाटत नाही.

•वातावरण निर्मिती नेहमीप्रमाणे बेस्ट.

* उणीवा :

• लुचाई, ४४० चंदनवाडी इ. सारखा इफेक्ट येत नाही. नेमक्या मोक्यांच्या क्षणी, जिथे सर्वाधिक भयप्रद घटना घडण्याची अपेक्षा असते, तिथे मात्र वाचकांची प्रचंड निराशा होते.

• श्रीधर व अरूणा यांची थोडी बेसिक माहिती द्यायला हवी होती, असं वाटतं.

• काही अंदाज श्रीधर कशाच्या आधारावर काढतो ते समजत नाही. उदा. - मुंग्यांचे बंगल्यातील दुष्ट शक्तीच हस्तक असणे. आणि त्यांना मारण्यासाठी वेळ खर्च करणं.

• शेवटही समाधानकारक होत नाही. कथानक साधं असूनही फिल्मी वाटत नाही. शेवट मात्र तसा वाटतो.

एकूण, काही उणीवा सोडल्यास ही खास धारप टच असलेली कादंबरी भयकथा प्रेमींनी एकदा तरी नक्कीच वाचावी.

माझे रेटिंग - ६.५ / १०

महत्त्वाची माहिती पुरवल्याबद्दल \" अजिंक्य विश्वास सरांचे \" मन:पूर्वक आभार.

@ प्रथमेश काटे
मराठी कथा ( प्रेम, भय, गूढ, विनोदी ) व लेख - फेसबुक ग्रुप

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Prathmesh Kate

Writer

Like to writing