प्रेम बंध (भाग ५) अंतिम

प्रेमाचे बंधन



प्रेम बंध (भाग ५) अंतिम


अधेमधे एखाद्या दिवशी शशांक आईला जाऊन भेटून यायचा. आता शशांकमधे झालेला बदल आईलाही जाणवत होता. नेहमी नाही तरी दोन चारवेळा शशांक आईला भेटायला जाताना रेखाला घेऊन गेला होता. आईने शशांकच्या मनातले ओळखले आणि त्याला रेखाशी लग्न करण्याचा सल्ला दिला. आपल्या एकुलत्या एक मुलाला आनंदी झालेले पाहून ती माऊली ही सुखावली. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू जमा झाले. पुढे आठच दिवसांनी के अलावा सेंटर मधून शशांकला फोन आला. आईला सिव्हील हार्ट अटॅक आला होता. तिला दवाखान्यात एडमीट करण्यात आले होते. शशांक दवाखान्यात पोचला तेव्हा आईचा श्वासोश्वास चालू होता. शशांकने तिच्या हातावर थोपटले. तिने एक क्षणभर डोळे उघडले. शशांककडे एकवार पाहिले आणि डोळे मिटले ते कायमचे. शशांकच्या आईला शाल्मली ची काळजी नव्हती. ती आपल्या संसारात सुखी होती. पण शशांकच्या काळजीने तिला चैन पडत नसे. पण रेखा शशांकच्या आयुष्यात आलेली कळल्यानंतर त्यांची काळजी मिटली आणि त्यांनी समाधानाने डोळे मिटले. इतके वर्ष शशांकने आईला आणि आईने शशांकला साथ दिली. दोघेही एकमेकांशी खूप जवळ होते. शशांकसाठी त्याची आई सर्वस्व होती. त्याचा जवळचा दुआ निखळला. शशांक रेखाजवळ खूप रडला. रेखालाही वाईट वाटले. नेहमीप्रमाणे ऋतुजा तिच्या मैत्रिणी बरोबर बिझी होती. ती शशांकच्या आईला बघायला देखील आली नव्हती. त्या गेल्यावर मात्र मैत्रिणी समोर रडण्याचे नाटक केले.


वर्तमान


गेले कित्येक दिवस शशांक बाबांचे गेलेले दुकान परत मिळवण्यासाठी धडपड करत होता. ते दुकान घेऊन तो आईला आनंद देणार होता. पण आई त्याआधीच खूप लांब निघून गेली होती. आई गेल्यानंतर शशांकने त्या दुकानाचा व्यवहार पूर्ण केला. आई होती तोपर्यंत त्याने घेतलेले कर्ज मंजूर झाले नव्हते. शेवटी माणूस नशीबावरच येतो. आईच्या नशीबात ते दुकान बघायचे नव्हते. ते दुकान घेतल्यावर शशांकला आई व बाबा दोघांचीही खूप आठवण झाली. त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. पण आज नेमकी रेखा ऑफिसमधे आली नव्हती. शेवटी न राहवून त्याने तिला फोन केला. तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून ती दवाखान्यात गेली होती. " मी येऊ का दवाखान्यात? " शशांकने प्रेमाने विचारले. रेखा नको म्हणाली, पण संध्याकाळी नक्की भेटायचे ठरले. रेखाला शंका वाटत होती तेच झाले. रेखा प्रेग्नंट होती. काय करावे तिला सुचत नव्हते. एकदा वाटायचे अबाॅरशन करून घ्यावे. एकदा वाटे मातृत्वाचे सुख असे हरवू नये.

संध्याकाळी शशांक आणि ती नेहमीप्रमाणे भेटले व लागले ड्राईव्हवर गेले. रेखाची बातमी ऐकून शशांकला खूप आनंद झाला. \"कुठल्याही परिस्थितीत अबाॅरशन करायचे नाही. " त्याने रेखाला सांगितले व धीर दिला. आता दोघांनी लग्न करायचे ठरवले. त्या दोघांच्या प्रेमाचा अंकूर रेखाच्या पोटात वाढत होता. दोघांनाही आई बाबा होण्याचे वेध लागले होते. वयाच्या एका टप्प्यावर आयुष्यात सर्वाथाने समाधान लाभावे असे सर्वांनाच वाटत असते. लेखाच्या आयुष्यात येण्याने शशांक च्या आणि शशांक मुळे रेखाच्या आयुष्यात समाधानाचे हे क्षण आले होते. फक्त या सगळ्यात त्यांना मोठा अडथळा होता ऋतुजाचा. ऋतुजा शी घटस्फोट घ्यायचा हे तर नक्कीच होते. पण ऋतुजा सहजासहजी घटस्फोट देईल असे शशांकला वाटत नव्हते.

रेखाची बातमी फायनल झाल्यानंतर शशांकने ऋतुजाला त्याला घटस्फोट हवा आहे म्हणून स्पष्ट सांगितले. ते ऐकल्यावर ऋतुजा ला आपण काय गमावतो आहोत याची जाणीव झाली. ऋतुजाने खूप तमाशा केला. रडली, आरडाओरडा केला. शशांकला तिने आत्महत्येची धमकी दिली. तिने माहेरी जाऊन सर्व काही सांगितले पण तिच्या भाऊ भावजयीने अंग काढून घेतले. व तिच्या आईलाही सांगितले की " तू देखील ऋतुजाच्या भानगडीत पडायचे नाही. " आईही भाऊ भावजयीच्या बाजुनेच आहे म्हंटल्यावर ऋतुजा परत घरी आली. शशांक ची तिने माफी मागितली. शशांकने ऋतुजाला सांगितले, " आता याचा काही उपयोग नाही. आता माझ्यासाठी रेखा आणि आमचे होणारे बाळच सर्वकाही आहे. माझ्या आयुष्यात चार सुखाचे क्षण आले आहेत ते मी उपभोगणार आहे. तू मुकाट्याने घटस्फोट दिलास तर मी काही रक्कम एकरकमी देईन त्याच्या व्याजावर तू जगू शकशील. पण तू जर घटस्फोट दिला नाहीस तर मी तुला एक पैसाही देणार नाही. " शशांकच्या ह्या बोलल्यानंतर ऋतुजा घटस्फोट द्यायला तयार झाली. थोडे तरी पैसे आपल्यालाआपल्याला मिळतील या आशेवर तिने घटस्फोटाच्या कागदावर सह्या केल्या.

दरम्यानच्या काळात शशांकने रेखाला नोकरीचा राजिनामा द्यायला लावला. व तिला वडीलांच्या घेतलेल्या दुकानात लहान मुलांच्या कपड्यांचे दुकान सुरू करून दिले. दुकानाचे नाव "शारद" ( शरद नाही शारद" ) असे वडीलांच्या नावावरूनच ठेवले. रेखाच्या दुकानाला चांगला रिसपाॅन्स मिळत होता. रोज चांगली उलाढाल होत होती. आता रेखाला आठ महिने पूर्ण झाले होते. शशांकने तिला सक्तीने तिला विश्रांती घ्यायला लावली होती.

ऋतुजाशी घटस्फोट झाल्यानंतर लगेचच शशांकने आणि रेखाने कोर्टात जाऊन लग्न केले. व देवळात चार मित्र व शशांकची बहीण शाल्मली यांच्या उपस्थितीत थोडे विधी केले. रेखाच्या माहेरी कोणाला हे मान्य नव्हते, त्यामुळे तिच्याकडचे कोणीच लग्नाला उपस्थित नव्हते. रेखा आता सौ. रेखा होऊन शशांकच्या घरात गृहलक्ष्मीच्या पावलाने आली. तिने आपल्या घराचा नूर पालटून टाकला. घर छान सजवले. रोज छान चविष्ट स्वयंपाक करून शशांक ची रसना तृप्त केली. शशांक आता लवकरच घरी येऊ लागला. दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला. दोघे आसुसलेले जीव प्रेमात नाहून निघत होते.

पूर्ण दिवस भरल्यावर रेखाची नाॅर्मल डिलीवरी होऊन तिला मुलगा झाला. शशांक आणि रेखाला आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. दोघांचा प्रेम बंध अधिक घट्ट झाला.


समाप्त

©️ सौ. हर्षाची प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all