तुझ्या आठवणींचे बंध.

Memories/Long Poem


तुझं असं पंधरा पंधरा दिवस
सुट्टीवर जाणं मला पटत नाही...
असच निघून जायच असतं तर
येतोसच कशाला...?

नाही आलास तरी चालेल...
उगाच पंधरा दिवस येतो
म्हणून दिखावा कशाला...?

खरच तू येऊच नको...
मीही आता तुझी अशी चकोरासारखी
वाट पाहत बसणार नाही...
त्याला जमत असेल तुझी वाट पाहणं,
मला मात्र जमत नाही..
आणि जमणारही नाही...

जा जा...तू..........
कायमच्या सुट्टीवर निघून जा...
जी गवसेल तिला बिलगून जा....
म्हणजे माझी काळजी मिटेल...
आणि काळजी मिटली की
श्वासही मिटून जातील....
तुझ्या सहवासाचे ,
तुझ्या आठवणींचे बंध सख्या
सरणावरती सुटून जातील...
सरणावरती सुटून जातील...!!

-कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे