बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 44

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 44 (काय....खरच काढु....मेघना एवढस तोंड करुन बोलते..... हो....मानस आता मेघना

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 44

(काय....खरच काढु....मेघना एवढस तोंड करुन बोलते.....

हो....मानस आता मेघनाची मज्जा घेत बोलतो......

बर.....मेघना उठाबश्या काढु लागते.........एकखाद दुसरी उठाबशी काढली असेल......मेघनाने तर मानस मोठयाने हसु लागतो......ये वेडाबाई ये इकडे मी मस्कर करत होतो........)

आता पुढे...

म्हणजे तुझा राग गेला......मेघना

नाही अजुन.......तुझी पनिशमेन्ट बाकि आहे अजुन.......मानस

कोणती पनिशमेन्ट..मेघना मानसकडे पाहत विचारते............

मग मानस गालावर बोट दाखवत हसत बोलतो.......

तु वेडा आहेस काय.......इथे........? कोणी तरी पाहिल तर........मेघना

गार्डनमध्ये कोणीच नाहीये........आणि आपल्याकडे कोणाच लक्ष पण नाहीये......दे......तुझी पनिशमेन्ट आहे ती.......दयाव तर लागणार........मानस

काय रे मानस......इथे कस देवु......अस म्हणत मेघना उठुन थोड बाजुला जाते........

मानस मग तिच्यामागे जातो.....तिला आपल्या बाजुला करुन त्याच्या हाताचा विळखा घालतो......हो इथेच.....

मानस काय करतोयस सोड ना कोणीतरी येईल......मेघना मानसचा हात काढण्याचा प्रयत्न करत असते.......

कोणी नाही येत......दे पटकण........मानस हसत बोलतो............

आता मेघनाकडे काही ऑप्शनच नसतो........ती डोळ बंद करते व मानसच्या गालावर किस करते......व लाजुन मानसला मिठी मारते.......

आत्ता थोडा गेला माझा राग........मानस हसत मेघनाची मस्करी करत बोलतो........

मेघना मानसच्या मिठितुन थोड बाजुला होत.......थोडा गेला म्हणजे..........

म्हणजे ही पनिशमेन्ट तु माझ्या बाजुला बसली नाहीस म्हणुन होती.......आता तु माझ्यावर हसलीस ना त्याची पनीशमेन्ट.....मिळायला नको........मानस मेघनाला डोळा मारत बोलतो.....

मानस तु एकच पनीशमेन्ट बोलेलास.......मेघना

हो पण तु हसलीस ना माझ्यावर मग त्याची पनीशमेन्ट मिळायला नको का.......मानस मेघनाला आपल्या जवळ घेत बोलतो.........

बर........कोणती पनीशमेन्ट.........मेघना

मानस........आपल्या ओठावर बोट ठेवत ही पनीशमेन्ट......हसत बोलतो..........

मानस फटके खाशील.......काय चावटपणा चाललाय तुझा......मेघना

हा चावटपणा आहे.........मानस

हो मग काय.....मेघना

बर चावटपणा तर चावटपणा......पण तुझी पनीशमेन्ट आहे ती......मानस

मानस वेडा झालास का तु.......अस बोलत मेघना थोड बाजुला एका झाडाच्याखाली जाऊन बसते.......

मानस तिच्या मागे जातो......आणि तिच्या बाजुला जाऊन बसतो.......अरे वा बर झाल इथे आलीस आता कोणीच नाही पाहणार.......मानस हसत बोलतो......

मानस......दूसर ‍काही तरी सांग ना........मेघना

नाही मला हेच हव आहे........मानस

मला नाही जमणार......मेघना अस म्हणत उठत असते......तर मानस तिला जोरात मागे खेचतो आणि मेघना मानसच्या अंगावर पडते.......आणि पडताना नकळत......मेघनाचे ओठ मानसच्या ओठांना स्पर्शुन जातात.........त्या स्पर्शाने दोघेही मोहरुन जातात.......मेघना तशीच मानच्या अंगावर असते.......मानस मेघनाच्या डोळयात एकटक पाहत असतो.......तो स्पर्श त्याला जाणवत असतो.......आणि त्याच्याही नकळत तो मेघनाच्या ओठावर आपले ओठ ठेवतो........थोडयावेळाने मेघना लाजुन बाजुला होते.......

दोन मिनिट दोघांनाही काय बोलाव कळेना.........मेघना दुसरीकडे तोड करुन बसली होती...

मेघना तुझी पनीशमेन्ट मी पुर्ण केली.....अस म्हणत मानस हसु लागतो.....

मानस मार खाशील हा......मेघना

ते नव्हे......एक विचारु का.......मानस

हो विचार.......मेघना

तु नेहची हीच लिप्स्टिक वापरतेस का...मानस

हो.....म्हणजे दुसरी पण वापरते....पण जास्त करुन हीच वापरते.......का रे.......मेघना

हीच लावत जा.......हयाची टेस्ट ना मस्त आहे......मानस मेघनाला डोळा मारत बोलतो.....

मेघनाच्या नजरेसमोर थोडयावेळापुर्वीचा प्रसंग येतो......गप्प रे मानस.......मेघना लाजुन बोलते....

दुसऱ्या लिपस्टिकची पण टेस्ट बघायला हवी.....मानस हसत बोलतो.....

तु ना आता मार खाशील हा........खुप अगावपणा चाललाय तुझा......मेघना

अरे अगावपणा काय........कोणती टेस्ट चांगली आहे ते पहायला नको का........मानस मेघनाला डोळा मारत हसत  बोलतो.......

तु ना आता.......अस म्हणत मेघना मानसला मारु लागते......

अग हो हो..........जिव तो केवढा आणि किती मारतेयस.....मानस

मानस........गप्प बस....चल आता जाऊया.....श्वेता व सुरज वाट पाहत असतील कॉलेजवर.....मेघना

बसुया ना थोडावेळ.........खुप मस्त वाटतय.......मानस

हो का.......माझ्या बाबांना सांग जा.....तुमच्या मेघनासोबत खुप मस्त वाटत आहे इथे बसायला.....तीला यायला वेळ होईल घरी.......मेघना मानसकडे पाहुन बोलते..

अस आहे होय.......बर जरा सासरेबुवाचा नंबर देतेस का......बोलुन घेतो त्यांच्याशी......आणि सासुबाईंचा पण दे त्यांना पण आत्ताच सांगतो......नंतर आणि म्हणशील बाबांना सांगितलास आईला कोण सांगणार....हो ना.......मग आत्ताच दोघांना सांगतो.....नंतर उगाच डिस्टर्ब नको......मानस हसत मेघनाची मस्करी करत बोलत असतो.....

माझ्या बाबाच्या समोर एकदा उभा राहुन दाखव....मग नंतर हे बोल हा......मेघना

ओ.......अस आहे.........बर......मग कधी येवु सांग तुझ्या घरी त्यांच्या समोर उभा रहायला.....मानस हसत बोलतो

मानस बास झाली मक्सरी.......चल आता खरच वेळ झाला आहे रे.....मेघना घडयाळात पाहत बोलते.......

बर चल निघुया........मानस

मेघना परत गाडीवर मानस पासुन लांबच बसलेली असते.....मेघना आत्ता पण अशी लांबच बसणार आहेस का........मानस

वेडाच आहेस......अस म्हणत मेघना मानसच्या जवळ बसते.......

ये हुई ना बात........मानस

बर चला आता.......मेघना.....

***

अरे यार हे दोघे कधी येणार.....किती वेळ झाला........सुरज

अरे हो किती चिडशील........असे पहिल्यांदाच एकत्र गेले आहेत मग वेळ लागणारच ना.......श्वेता

अग पण आपण किती वेळ वाट पहायची........सुरज वैतागुन बोलतो

किती वैतागशील........तु प्रेमात पडालास ना तुला कळेल.....एवढा वेळ का लागतो ते......श्वेता सुरजला चिडवत बोलते...

आमच्या प्रेमात कोण पडणार......सुरज

का पडणार नाहीत......दिसायला हॅन्डसम आहेस.....अभ्यासात पण हुशार आहेस....घरच पण तुझ्या मस्त आहे....मग का कोणी प्रेमात पडणार नाही...श्वेता

खरच कोण प्रेमात पडेल माझ्या.....सुरज

कोण कोणाच्या प्रेमात पडणार आहे........मानस व मेघना येत बोलतात...

सुरजच्या.......श्वेता

कोण पडल आहे......मेघना

अग कोण पडल नाहीये.........कोण पडेल का.....अस विचारत होता........श्वेता

***

क्रमश:

पुढचा भाग 15/10/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all