बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 41

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 41 (तु अजुन काय करतेयस.........बाबा मेघनाच्या रुममध्ये येत बोलतात ते ब?

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 41

(तु अजुन काय करतेयस.........बाबा मेघनाच्या रुममध्ये येत बोलतात

ते बाबा मी स्टडी करत होते..........एक्झाम जवळ आल्या आहेत ना.......मेघना

अस होय.......पण तुला त्रास होईल ना जागरणाचा..........माधवराव

नाही बाबा आता झोपते की.......मेघना)

आता पुढे....

बर झोप आता.....माधवराव

हो बाबा......गुड नाईट बाबा........मेघना

गुड नाईट बाळा.......माधवराव

बाबा गेल्यानंतर मेघना पटकण दारवाजा बंद करते.......एवढया वेळात मानसचे मेसेज वर मेसेज येत होते.......त्याला काही कळेनाच ही एकदमच का शांत झाली.......

मेघना मोबाईल घेवुन त्याला मेसेज करणार तोपर्यत त्याचाच परत मेसेज आला.......

झोपलीस का.........मानस

अरे नाही........बाबा आले होते.......त्यामुळे तुला रिप्लाय देता आला नाही.....मेघना

ओ........काही बोलले नाहीत ना......मानस

अरे नाही.......एवढा वेळ काय करतेयस विचारत होते........मेघना

बर......झोप आता उदया कॉलेजमध्ये भेटु.......मानस

हो......गुड नाईट..........मेघना

गुड नाईट माय लव्ह.......मानस

मेघना एक स्माईलीची इमोजी सेन्ड करते व झोपी जाते.......

****

 ये आई झाला का नाष्टा मला वेळ होतोय........मेघना

हो ग झाला आहे..........लवकर उठायच नाही आणि वेळ होतोय म्हणायच का........सुमनताई मेघनाला ओरडत होत्या.......

अग ती रात्री आभ्यास करत बसली होती उशीरपर्यत त्यामुळे उठायला उशीर झाला असेल तिला.......माधवराव रुमच्या बाहेर येत बोलतात.......

अग  बाई हो का.....मला कळलच नाही.....काल मला लवकरच झोप लागली.....सुमनताई

ये आवर ना ग.....नाहीतर माझ लेक्चर चुकेल......मेघना

हो ग.......हे घे खा.......सुमनताई

बर सुमन मी निघतो मला आज लवकर जायच आहे आणि मला आज यायला वेळ होईल.....माधवराव

हो ...........सुमनताई

बाबा तुम्ही नाष्टा नाही करणार......मेघना

मी केव्हाच केलाय नाष्टा....माधवराव

ओके बाबा........मेघना

माधवराव गेल्यावर मेघना आज ती जेवायला जाणार आहे हे सागांयच ठवरते......माधवराव गेल्यावर मेघना आईजवळ येते......

ये आई.......मेघना

बोला काय बोलायच आहे....सुमनताई

तुला कस कळल मला काही तरी बोलायच आहे.........मेघना

तु बाबा जाण्याची वाटत पाहत होतीस ना तेव्हाच कळल काही तरी बोलायच असणार हिला......सुमनताई

ये आई तुला कस कळत ग सगळ......मेघना

मी आई आहे बाळा तुझी.....मला नाही कळणार तर कोणाला कळणार...सुमनताई

थॅक्स आई मेघना आईला मिठी मारत बोलते............

बास आता मस्का लावयचा.....बोला काय बोलायच आहे...........सुमनताई

ते आई........माझे सगळे फ्रेन्डना आज जेवायला जाऊया म्हणत आहेत...मग मी जाऊ जेवायला त्यांच्या सोबत.......मेघना

अग पण बाबा......सुमनताई

आई तु सांग ना ग बाबा ना काही तरी.......आणि तसही ते वेळाने येणार आहेत ना आज.......तोपर्यत मी येईन ना..........आणि आम्ही काय रात्री जेवायला जात नाहीये दुपारीच जाणार आहोत......मेघना

बर जा....पण लवकर ये बाई.......उगाच माझ्या जिवाला घोर लागुन राहतो........सुमनताई

हो ग आई लवकर येईन.....थॅक्स आई......मेघना आई ला मिठी मारते........बर चल आई मी जाते.......बाय...

हो.......सावकाश जा........सुमनताई

***

इकडे मानस मेघनाची वाट पाहत असतो.......तिचे बाबा काल काही बोलले नसतील ना.....काय झाल असेल रात्री......व्यवस्थित बोलता पण आल नाही.....आणि ही मेघना पण लवकर येत नाहीये.....मानस आपला एकटाच बडबडत असतो.....तेवढयात मेघना स्कुटीवरुन येताना दिसते.....

ती गाडी पार्क करेपर्यत हयाला रहावेना तो पार्किग मध्ये जातो....मेघना बाबा काही बोलले नाहीत ना.......मानस

अरे काहीच नाही.....खुप वेळ झालाय झोप आता म्हणाले आणि गेले.........मेघना

नक्की ना.........मानस

अरे हो.........पण बाबा जेव्हा आले ना तेव्हा एवढी घाबरले होते काय कराव कळेनाच.....मग बॅगेतील एक बुक काढुन वाचत होते अस सांगितल......मेघना

काळजी घेत जा यार.......मानस

हो अरे........आज पासुन ना मी लाईट ऑफच करुन बोलत जाईन तुझ्याशी.......मेघना

हो चालेल.......बर आईला सांगितलीस ना....की आज वेळ होईल म्हणुन......मानस

हो अरे सांगितले..........पण लवकर ये म्हणाली आहे बाबा येण्याच्या आधी.....मेघना

हो चालेल......लवकर येवु आपण........चला जाऊया श्वेता व सुरज आपली वाट पाहत असतील......मानस

हो जाऊया......मेघना

****

मानस आणि मेघना कसे काय आले नाहीत अजुन........आज वेळ झालाय ना दोघांना......सुरज

अरे आता असाच वेळ होणार दोघांना.......तु ना वेडाच आहेस कस कळत नाही तुला काय माहीत......श्वेता

कळायला मी काय कोणाच्या प्रेमात पडलोय का......सुरज

हो का.......अस पण असत होय.......मग मी काय कोणाच्या प्रेमात आहे होय.......श्वेता

काय माहीत असलीस तरी मला सांगणार आहेस होय.....सुरज

ये गप्प......मार खाशील.......पहिली गोष्ट असा कोणीच नाहीये.......आणि असता तर तुला सांगितले असतेच........कळल.......श्वेता थोड चिडुन बोलते

अरे हो..........मी मस्करी करतोय.......लगेच चिडायची काही गरज नाहीये.........सुरज

तु ना आता.......अस म्हणत श्वेता सुरजला फटके मारु लागते......

अरे काय चाललच तुमच.........एक मिनिट पण पटत नाही  हया दोघांच.....मेघना व मानस त्याच्या जवळ येत बोलतात.......

 बग ना काही पण बोलत असतो.....श्वेता

आता गप्प बसा थोडावेळ.......मानस

बर ऐका गाईज.....आई जा म्हणाली जेवायला.....पण लवकर याव लागेल हा.......मेघना

खरच......श्वेता

हो ग........मेघना

आपण खुप धम्माल करु.....श्वेता

***

क्रमश:

पुढचा भाग 9/10/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all