बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 38

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 38 (ते सर्व ऐकुन मेघना खुप खुश होते.....ती आय लव्ह हर वाली दुसरी तिसरी

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 38

(ते सर्व ऐकुन मेघना खुप खुश होते.....ती आय लव्ह हर वाली दुसरी तिसरी कोणी नसुन मीच आहे हयाचा तिला खुप आनंद झाला.......एका क्षणी तिच्या मनात आल त्याच्या हातात हात दयावा आणि बोलाव मानस मी पण खुप प्रेम करते रे तुझ्यावर......नाही राहु शकणार तुझ्याशिवाय......पण तिच्या बाबाचा चेहरा समोर आला आणि हे सार वाटणार तिथेच थांबल......ती मानस पासुन थोड बाजुला होवुन शांत बाहेर कुठे तरी पाहत राहीली..............तिला फक्त आता तिचे बाबा दिसत होते.........)

आता पुढे....

मेघना तुझा मानस तुझ्यावरच प्रेम करतो ग......ती आय लव्ह हर वाली तुच आहेस......तुझा मानस आता तुला मिळतोय तो तुझा होतोय तर तु आत्ता का माघार घेतेयस....किती दिवस फक्त बाबांचा विचार करणार ते काय म्हणतील.....त्यांना काय वाटेल.....फक्त त्यांचाच विचार.........तुला काय वाटेल हयाचा पण विचार कर ना........मानस सोबत आयुष्य तुला काढायच आहे तुला तो आवडतो तुही त्याच्यावर प्रेम करतेस मग आता का माघार घेतेयस...मेघना अस नको ग करु........तुला कळतय का हा तुझा मानस आहे.......तुझा मानस मेघना..........मेघना मानस व बाबा हया दोघांत कनफ्युज होती.....तिला काय कराव कळत नव्हत.......ति स्वत:शीच बोलत होती...

मेघना.......मानस सारखा मुलगा तुला नाही ग मिळणार किती केअरिंग आहे...तुझी किती काळजी घेतो......त्या गुंडापासुन पण त्याने तुला कस वाचवल.......मग एवढ सगळ असताना सुध्दा.....तुला मानस की बाबा हा प्रश्न पडतो.......तुला बाबांच्या इज्जतीची काळजी आहे मान्य आहे......पण तु बाबांना समजुन सांगु शकतेस ना.....त्यांना मानस कसा आहे हे कळल तर ते नक्कीच हो म्हणतील......हो मेघना ते नक्कीच हो म्हणतील.......तु मानसला होकार दे मेघना.........

मेघना काहीच बोलत नाही म्हटल्यावर मानसचा चेहरा पडतो.......तो मेघना जवळ येतो......मेघना......काय झाल......तु काहीच बोलत नाहीयेस.......तु तुझ्या बाबांचा विचार करतेयस का......नको ग करु त्याचा विचार...आत्ता तुला काय वाटत ते ऐक ना... बाबांना आपण नंतर तयार करु ना... ते नाही बोलणार नाहीत......फक्त आत्ता तुझ्या मनातल सांग........मानस खुप वेळ तिच्याशी बोलतो पण मेघना काहीच उत्तर देईना.....ओके मेघना तु काही बोलत नाहीयेस म्हणजे मी तुला नाही आवडत हो ना......मी तुला फोर्स नाही करणार......तु विसरुन जा की मी तुझ्या बद्दल असा विचार करतो.....आपण पुर्वीसारखेच मित्र राहु......सॉरी मेघना........अस म्हणुन मानस जायला वळतो......तो अजुन दारापर्यत पोहचला नाही तोपर्यत

मेघना............मानस.........म्हणुन ओरडते.........मेघनाच्या आवाजाने मानस पाठीमागे वळतो...मानस मागे वळल्यावर मेघना धावत मानसकडे जाते व त्याला मिठी मारते.........आय लव्ह यु मानस......आय रियअली लव्ह यु..........नाही राहु शकणार तुझ्याशीवाय....मेघनाच्या या बोलण्याने मानसला काय करु आणि काय नको अस झाल.......मेघनाने होकार दिल्यावर तो ही मेघनाला घट्ट मिठी मारतो...आय लव्ह यु मेघना......

थोडावेळ एकमेकांच्या मिठीत राहील्यावर थोडयावेळाने भानावर येतात......व बाजुला होतात.....मेघना लाजुन मानसकडे पाहतच नसते........ती खाली मान घालुन थांबलेली असते.....

मेघना वर बघ ना...........मेघना लाजतच मानेनेच नाही म्हणते......प्लीज यार एकदा बग ना माझ्याकडे.....मेघना नाहीच म्हणत असते........तिला मानसकडे पाहताना लाजल्यासारख होत होत.........साहजीकच आहे ना इतके दिवस एकमेकांना चांगले मित्र म्हणत होते आणि आता एक वेगळच नात.......मग मानसच तिच्या हनुवटीला पकडुन तिचा चेहरा वरती करतो......पण मेघना लाजुन डोळे बंद करते.......काय यार मेघना एकदा बघ ना ग.....प्लीज......प्लीज.......मानस खुपच मागे लागल्यावर मेघना डोळे उघडुन मानसकडे पाहते.......त्याच्या डोळयात एकटक पाहु लागते..........मानसच अशा पाहण्याने ती परत लाजते.....आणि मानसला मिठी मारते......मानसही मग मेघनाला आपल्या मिठीत घेतो.....व किती तर वेळ ते तसेच मिठीत होते......

मेघना......अग ऐक तर......मानस

हममम.....बोल.....मेघना

असच रहायच आहे का......मानस थोड हसत बोलतो........

मग मेनाच्या लक्षात येत की आपण खुप वेळ झाला त्याला मिठी मारली आहे.......मानस अस बोल्यावर ती मानस पासुन थोडी दुर होते......आणि हसते

चला तुमच्यासाठी एवढी तयारी केलेय मग हे सगळ खाणार कोण....मानस

मेघना हसत हमम म्हणते........मानस खुर्ची थोडी मागे करुन मेघनाला बसवतो व नंतर तो बसतो....मेघनासाठी कोल्ड्रिंक स्नॅक्स आणि बरच काही.......हे खात गप्पा मारत एन्जॉय करतात....खावुन झाल्यावर मानस  मेघनाजवळ जातो........आणि आपला हात पुढे करतो..........मेघनाला काही कळतच नाही...ती खुणवुनच काय अस विचारते......मग मानसही खुणवुनच डान्स करुया अस सांगतो......मेघना लाजतच मानसच्या हातात हात देते....आणि दोघे डान्स करु लागतात....

डान्स करुन झाल्यावर दोघे एका पायरीवर बसले बोलत बसले......एकमेकांच्या खुशीत एकमेकांचा सहवास अनुभवत बसले होते.....

मेघना एक विचारु...........मानस

हो विचार ना.....मेघना

तु माझ्यावर प्रेम करत होतीस.......मग बोलली का नाहीस.....मानस

मला वाटल ती आय लव्ह हरवाली दुसरी कोण तरी आहे.....तु तिच्यावर प्रेम करतोस अस वाटत होत.....आणि बाबांच पण टेन्शन होतच ना........मेघना

पण आता कळल ना....की ती तुच आहेस..........मानस

हो..........मेघना थोड लाजत बोलते.....

मेघना तुला मला ते सगळ सुख दयायच आहे जे तुला आता पर्यत मिळाल नाही......तो मोकळेपणा दयायचा आहे......तो विश्वास दयायचा आहे.....ते प्रेम दयायच आहे...जे तुला आजपर्यत मिळाल नाहीये.....आय प्रॉमिस मेघना मी तुला कधीच दु:ख नाही देणार......कधीच तुझ्या डोळयात पाणी नाही येवु देणार....आणि तुझ्या बाबांना आपण समजुन सांगु ते नक्की तयार होतील......आपण दोघे मिळुन त्यांना तयार करु....मानस

मानसच हे सगळ बोलण ऐकुन मेघनाच्या डोळयात पाणी येत..ती मानसला आणखीन मिठी मारते.....आय लव्ह यु मानस.....मेघना

ओय वेडाबाई.....मी आत्ताच बोललो ना तुझ्या डोळयात पाणी येवु देणार नाही.....आणि लगेच रडु पण लागलीस......काय ग मेघना.........मानस एवढुस तोंड करुन बोलतो.......

अरे मी रडत नाहीये.......हे आनंदाश्रु आहेत......मेघना

अस पण असत होय.......मानस

हो.......मेघना

बर......लव्ह यु टु मेघना........अस बोलत आपली असलेली मिठी अणखीन घट्ट करतो.......इतक्यात श्वेताचा फोन येतो.......

श्वेताचा फोन आहे.......थांब काय म्हणत आहे बघतो..........हॅलो...........बोल श्वेता.......मानस

काय झाल मेघना काय म्हणाली.......हो म्हणाली ना......श्वेता थोड काळजीत बोलते.....

श्वेता ते.........ते मेघना........मेघनाने.........अस म्हणुन मानस शांत होतो........

मानस काय झाल सांग ना.......मेघनाने काय.......श्वेता

तुम्ही याल का इकडे.......मला आता काय बोलाव कळत नाहीये......प्लीज याना तुम्ही.........मानस

हो हो......आम्ही आलोच पाच मिनिटात........श्वेता

अग काय झाल काय म्हणाला मानस.......सुरज

अरे काहीच सांगितल नाही त्याने.....पण मुड त्याचा ‍सॅड वाटत होता........श्वेता

मेघना नाही म्हणाली असेल का ग.........म्हणुन अस बोलत असेल..........सुरज

हो बहुतेक असच आहे वाटत.......खुपच सॅड वाटला तो.....आपल्याला त्याने बोलावल आहे चल जाऊया पटकण........श्वेता

हो हो चल पटकण......सुरज

थोडयावेळात श्वेता व सुरज तिथे पोहचतात.......पाहतात तर काय मेघना आणि मानस दोन टोकाला बसले होते........

काही तरी झालय काय झाल असेल...असे का बसले आहेत काहीच कळत नाहीये यार......श्वेता

हो ना........दोघांचे चेहरे बघ ना कसे झालेत.........सुरज

चल जाऊन विचारुया.......मानस मेघना काय झालय.......असे का बसला आहात.........श्वेता

बोल ना बडी काय झालय.........सुरज

श्वेता सुरज ते मेघनाने.........मला.........होकार दिला.....मानस सॅडवाला चेहरा करतच बोलला.......

अरे बडी असुदे ना.......अस होणारच ना......नाही म्हणाली तर एवढ वाईट वाटुन नको घेवुस.....सुरज त्याच्याच विचारात बोलुन जातो.......

काय.................मानस............खरच.......ये बावळट तो काय म्हणाला बग आधी....काहीही बोलतोस.....ऐकत जा ना आधी.......श्वेता

हो.........मानस

ओहो मेघना......श्वेता मेघनाकडे पाहु लागली तशी मेघना गोड लाजली व श्वेताला मिठी मारली.....

ओहो........मग मेघना.......आता तुला मेघना म्हणुन हाक मारायची काय वहिनी म्हणुन......सुरज मेघनाला चिडवु लागला.....

ये सुरज गप्प ना रे.........मेघना

किती गोड लाजतेयस यार तु......श्वेता

***

क्रमश:

पुढचा भाग 3/10/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all