बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 35

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 35 (ओय तु कुठे हरवलास......मानस काही नाही असच.........मानस मानस तु तुझ्या ??

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 35

(ओय तु कुठे हरवलास......मानस

काही नाही असच.........मानस

मानस तु तुझ्या फॅमिली बद्दल काहीच बोलला नाहीस.....तुझे आई बाबा कुठे असतात........आणि कोण कोण असत तुझ्या घरी.....मेघना

मेघना अस विचारल्यावर मानसचा चेहरा पडतो...........)

आता पुढे...

काय झाल.......चेहरा का उतरला तुझा.......मेघना

मेघना ते.........ते......माझे आई बाबा नाहीयेत........आणि माझ्या घरी फक्त माझे आजोबा असतात.....ते पण आता आजारी असतात.......वय झालय त्यांच..........मानस तोंड एवढुस करत बोलतो.......

सॉरी मला माहित नव्हत.......मेघनाला खुप वाईट वाटत.....

अग इट्स ओके........तुला कुठे माहीत होत.......मानस

पण तुझे आई बाबा......कसे काय.............मेघना

त्यांचा ॲक्सिडेन्ट झाला.......आणि जागेवरच..........एवढ बोलुन मानस थांबतो.......त्याच्या डोळयात पाणी आलेल असत......

थोडावेळ दोघे शांत होतात.......मेघनाला आता काय बोलाव कळेनाच.......किती एकटा आहे हा.........केवढ दु:ख सहन केलय हयाने..........आणि मी माझ्या दु:खाला कवटाळुन बसलेय....एवढ एकटा असुन पण किती आनंदात असतो........सगळयांना खुश ठेवत असतो......मानससाठी मेघनाच्याही डोळयात पाणी येत.........

ओय काय झाल......मानस

काही नाही......असच डोळयात पाणी आल.........मेघना

वेडीच आहेस.......मानस

मेघना माझे आजोबा आहेत ना.......खुप मस्त आहेत.....मी ना तुला त्यांना एकदा भेटवेन...तुला पण ते आवडतील.......मानस

हो नक्कीच आवडेल.......मेघना

बर चला झोपुया आता......उदया आणि परत लवकर उठायच आहे ना.......मानस स्वत:चे दु:ख बाजुला ठेवुन बोलतो...

हो चालेल......चल जाऊ........मेघना

****

सकाळी सगळे लवकर तयार झाले.........

चला यार वेळ होईल........हया मुलींना एवढा का वेळ लागतो काही कळतच नाही दोन तास झाले आवरत आहेत......सुरज वैतागुन बोलत असतो.....

अरे येतील थांब ना...........मानस

काय येतील थांब ना......किती वेळ झाला आपण इथे थांबलोय..........हया बघा आल्या......सुरज श्वेता व मेघाना आल्यावर थोड वैतागुनच बोलतो

ये काय झाल....आता आम्ही काय केलो.....श्वेता

काय केला काय.....किती वेळ दोन तास झाले आम्ही इथ बाहेर थांबलोय........सुरज

मग तुम्हाला कोण बाहेर येवुन थांबायला सांगितल होत का.........आमच आवरल्यावर यायचा होता बाहेर........तुम्हालाच गडबड होती त्याला आम्ही काय करु.........श्वेता नाक उडवत बोलते.....

बर....म्हणजे आमचीच चुक आहे तर.........सुरज

हो मग काय........श्वेता

सुरज कोपऱ्यापर्यत हात जोडत........धन्य आहात आपण......

आता पाया पण पडतोस का........श्वेता त्याची मस्करी करत बोलते

आता फटके खाशील....पाया पड म्हणे तुच पड माझ्या पाया.....एवढा वेळ तुमची वाट पाहत थांबलोय म्हणुन..........सुरज

हो का........गप्प बस...पाया पड म्हणे.......श्वेता

अरे बास.......परत तुमच सुरु झाल का......मानस

कधी हया दोघांच पटणार आहे काय माहीत......सतत भांडत असतात.......मेघना

बर चला वेळ होईल घरी पोहचायला.......मानस

हो चला चला......सगळे एकदमच बोलतात......

सगळे गाडीत जाऊन बसतात.....पण मेघना थोडी मागे राहीली होती........ते पाहुन मानस तिच्याजवळ आला........मेघना काय झाल....चल ना........

जायलाच नको वाटत आहे...........किती छान क्षण घालवलेत इथे आपण.....मेघना

हो ग पण जायला तर हवच ना.........मानस

हो ते तर आहेच........चल जाऊया......मेघना

****

बर चला पटकन जेवुन घेवुया....... सगळे एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबतात......थोडावेळ जेवण आटपुन.......परत प्रवासाला लागतात......

बघता बघता सगळे श्वेताच्या घरासमोर येवुन थांबतात.......प्रवासात मानस सोडुन सगळयांचा डोळा लागला होता.......

अरे उठा आपण पोहचलोय..........मानस

पोचलोय म्हटल्यावर सगळे पटकण उठतात.......

अरेच्या आपण इतक्यात पोहचलो पण......सुरज

हो मग काय आपण अफ्सरांचा डान्स पाहत होता ना तेव्हाच पोहचलोय आपण......मानस सुरजची मस्करी करत हसत बोलतो....

तसे सगळेच हसायला लागतात........

बर चला आत जाऊया आई बाबा वाट पाहत असतील आपली........श्वेता

सगळे आत जातात......

अरे आला तुम्ही.......या या....बसा..श्वेताची बहिण सगळयांना पाणी आणुन देते....

मग कसा झाला प्रवास...तुमची ट्रीप......श्वेताचे बाबा.....

बाबा खुप मस्त......प्रोजेक्टच्या निमित्ताने आमची ट्रीपच झाली....श्वेता

हो काका मस्त झाला प्रवास......मानस

बर तुम्ही पहिला फ्रेश होवुन या.....तोपर्यत तुमच्यासाठी नाष्टा आणते.....श्वेताची आई

अहो काकु नाष्टा वगेरे कशाला आता घरीच जायच आहे.....उगाच तुम्हाला त्रास कशाला....मेघना

अग त्रास कसला.....श्वेताने फोन करुन सांगितल होत......त्यामुळे तुम्ही केव्हा याल हया अंदाजाने मी नाष्टा बनवला आहे.......श्वेताची आई

बर...आम्ही फ्रेश होवुन येतो.........श्वेता

सगळे फ्रेश होवुन नाष्टा करतात व जायला निघतात.....

मेघना तुला घरी सोडु का.....मानस

अरे नको जाईन मी स्कुटी इथेच ठेवली होती ना त्यावेळी......जाईन मी......मेघना

नक्की ना......मानस

हो अरे......मेघना

बर चला आम्ही पण निघतो.....मानस

सगळे एकमेकांना बाय करुन उदया भेटु म्हणुन आपल्या आपल्या घरी जातात.....

मेघना दाराची बेल वाजवते..........सुमनताई दार उघडतात......मेघना आलीस तु....ये सुमनताई मेघनाच्या हातातील सामान घेत बोलतात........

मेघना येवुन हॉलमध्येच बसते.....

मग प्रवास कसा झाला.......काही त्रास झाला नाहीये ना....सुमनताई

नाही ग आई त्रास कुठला...........मस्त झाला प्रवास......मेघना

बर तु आवरुन घे मी तुझ्यासाठी कॉफी आणते......सुमनताई

बर चालेल........बाबा आले नाहीत का ग अजुन......मेघना

येतील एवढयात........सुमनताई

***

क्रमश:

पुढचा भाग 27/09/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all