बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 34

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 34 (हो तुझ्या ओरडत नाहीयेत का.........सुरज तुझ्या एवढ तर नक्कीच नाही....श

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 34

(हो तुझ्या ओरडत नाहीयेत का.........सुरज

तुझ्या एवढ तर नक्कीच नाही....श्वेता सुरजला चिडवत बोलते....

तु मार खाशील हा आता....गप्प बस नाही तर.........सुरज

ये बास तुम्ही परत सुरु नका होवु....मेघना)

आता पुढे....

होय चला आजुबाजुची लोक बघायला लागतील.....मानस पण त्यांची मस्करी करतो.....

बर चला फ्रेश होऊन जेवण करुन घेवुया......मेघना

सामान घेतलाय ना सगळ......मानस

अरे......मी माझी बॅग गाडीतच विसरलेय........थांब मी घेवुन येते.........मेघना

नाही नको तुम्ही जा पुढे मी आणतो बॅग........मानस

अरे कशाला आणते ना मी..........मेघना

आणतो बोललो ना.......जा तुम्ही........मानस

बर....जातो आम्ही........चल श्वेता........मेघना

थोडयावेळात फ्रेश होऊन जेवण आटपत.......मस्त होत ना जेवण........मानस

हो खरच मस्त होत.......मेघना

बर आता झोपुया का......मला ना खुप झोप आली आहे..........आणि परत सकाळी लवकर पण उठायच आहे.....सुरज

तुम्ही जा न मला थोडावेळ इथे थांबायच आहे.........मेघना

ए मेघना एकटीच कुठे थांबतेस...चल ना यार झोपायला......श्वेता

अग एकटी कुठे केवढे लोग आहेत बग इथे........थोडावेळच ग........परत असा वेळ नाही भेटणार मला........तुम्ही जा ना मी येईन थोडया वेळात........मेघना

गाईज मला पण झोप आलीच नाहीये मी थांबतो मेघना सोबत........मानस

बर चालेल मग मी जातो........सुरज

ये मेघना मला पण खुप झोप आलेय ग मी पण जाते......श्वेता

हो ग जा झोप जा मी येते थोडया वेळात..........मेघना

सुरज व श्वेता गेल्यानंतर मानस व मेघना तिथेच हॉटेलच्या गार्डनमध्ये गप्पा मारत बसतात......

मानस किती शांत वाटतय ना.........मेघना

हो ना खरच खुप शांत वाटतय........आणि प्रसन्न पण वाटतय.........मानस

परत असा वेळ मला कधी भेटणार आहे काय माहीत........उदया पासुन परत सगळ तेच......तेच ते मनात भिती घेवुन रहायच.....काही हव असेल काही करायच असेल तर बाबा काय म्हणतील हा विचार करायचा...कोणत्या शेजाऱ्याशी बोलायच म्हटल की परत तेच संशयान बघन.....जास्त कोणाशी बोलायच नाही कोणाशी ओळखी करायच्या नाहीत......मुलांशी तर नाहीच नाही............मेघना हे सांगताना तिच्या डोळयात पाणी आल........

ये मेघना प्लीज यार रडु नकोस ना........मानस

अरे रडत नाहीये.........वाईट वाटत फक्त.......माझ्या आयुष्यात अस का असेल हयाच.....का मी तुमच्या सारख बिनधास्त राहु शकत नाही.......का मी जेव्हा मनात येईल तेव्हा बाहेर जाऊ शकत नाही.......का मी कोणाशी मनमोकळे पणाने बोलु शकत नाही........हयाच वाईट वाटत.......मी रडत नाही अरे.......फक्त माझ्या नशिबाचा राग येतो मला........आणि माझी किव येते.......कारण मी हे सगळ सहन करतेय.......मेघना

मेघना फक्त काही दिवस दे मला.......तुझ्या आयुष्यातील हा सगळा एकटेपणा ही भिती......सगळ दुर करेन.....तुला एवढ खुश ठेवेन ना ज्याची तु कल्पना पण केली नसशील.......तुला जस हव तस तुला आयुष्य देईन मी........मानस मेघनाकडे पाहत मनातल्या मनात बोलत होता........पण थोड भानावर येवुन.....अग नको विचार करुस तु जास्त.......आम्ही सांगितलय ना तुला तस कर......घरी बाबांना हव तस रहा आणि आमच्या सोबत असलीस की तुला हव तस रहा........मानस

हो..........बर माझ गाराण जाऊदे तु तुझ सांग ना.....तुझ्या आय लव्ह हर वाली बद्दल सांग ना......मेघना आपले डोळे पुसत बोलते......

परत आय लव्ह हर वाली आलीच का मध्ये.........मानस मेघनाकडे बघत हसत बोलतो........

अरे...मी तुला चिडवत नाहीये.....ती ‍ कशी आहे......तुला ती केव्हा भेटली...........तु कधी तिच्या प्रेमात पडलास.....हे विचारतेय.......मेघना

ती ना खरच इतकी मस्त आहे ना......की माझ्याकडे शब्दच नाहीयेत तिच्यासाठी......खुप वेगळी आहे बाकीच्या मुलींपेक्षा..कोणी पण पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडेल अशी आहे.......सगळयांना खुप समजुन घेते.....कोणाला पण सहज जिव लावते......खुप निरागस आहे.......मानस तिच कौतुक करत थकत नसतो...तो भान हरपुन तिच कौतुक करत असतो......

ओ एवढी मस्त आहे......भेटायला पाहिजे तिला......मेघना

हो नक्कीच भेटवेन तुला......तुलाच कस तुला भेटवु ग.....मानस मनातल्या मनात बोलला.........

बर तुम्ही कधी भेटला.....आणि तु तिच्या प्रेमात कधी पडलास......मेघना

पहिल्यांदा तिला पाहिलो ना तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो.......मानस

पण भेटली कुठे..........मेघना

आपल्या कॉलेज मध्ये......ती जात होती आणि मी समोरुन येत होतो......तेव्हा दोघांची धडक झाली......आणि माझे नोट्स...बुक खाली पडले........ती तेव्हा ते उचलुन देत होती.......पण चेहऱ्यावर तिचे केस आले होते त्यामुळे दिसतच नव्हती......आणि एका क्षणाला तिने केस बाजुला केले आणि मी तिच्याकडे पाहतच राहिलो........ती माझ्या हातात माझे बुक व नोट्स ठेवुन निघुन गेली हयाच सुध्दा भान राहिल नव्हत मला.......मानस

एकमेकांना धडक झाली होती ऐकल्यावर मेघनाला कॉलेजचा पहिला दिवस आठवला.....माझी पण एका मुलाला धडक झाली होती......मानस माझ्या बद्दलच बोलत आहे का......नाही नाही अस सेम होवुच शकत ना.......काही पण काय मेघना.......तुला मानस आवडायला लागलाय म्हणुन तुला अस वाटत असेल.....पण मानसला दुसरच कोणी तर आवडत.......त्यामुळे असा विचार नको करुस......

पण खरच ति मुलगी मी असते आणि मानसने मला प्रपोज केल असत तर मी हो बोलले असते का......हो नक्कीच बोलले असते......असा मुलगा मला मिळणारच नाही.........पण बाबांच काय.......ते कधीच तयार होणार नाहीत.......पण मानस इतका चांगला आहे त्याचा स्वभाव बघुन बाबा तयार पण होतील की......मी तयार केल असत त्यांना...काही पण करुन.....मेघना पण तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करतोय...नको जास्त विचार करुस त्याचा.......

ओय कुठे हरवलीस.........मानस

आ.......काही नाही........तु बोल ना......मेघना

नाही काही तरी विचार करत होतीस........सांग काय........मानस

अरे अस काही नाही.....असच शांत बसले होते........मेघना

बर मला सांगायच नसेल तर राहुदे.......मी काय फोर्स नाही करणार तुला......मानस थोड नाराज होत बोलतो.........

अरे अस काही नाही.......सांगण्यासारख एवढ विशेष काही नाहीये.........मेघना

ते मी ठरवेन की विशेष आहे की नाही........मानस

बर बाबा सांगते...........मेघना

हा सांग......मानस आनंदात बोलतो.....

अरे काही नाही.....तु आय लव्ह हर वाली बद्दल बोलत होतास ना......त्यावेळी असच मनात आल की आपल्या आयुष्यात पण असा क्षण येईल का......माझ्यावर पण अस कोण प्रेम करेल का......मला असा प्रेम करणारा भेटेल का........हाच विचार करत होते........पण अस होईल अस मला वाटत नाही....म्हणुन म्हणाले काही विशेष नाहीये.......

ये गप्प बस विशेष नाही म्हणे.........नक्कीच कोणी तरी असेल तुझ्यावर प्रेम करणारा.....खुप प्रेम करणारा....आणि ज्या दिवशी भेटेल ना....तेव्हा त्यावेळी सगळीकडे रोशनाई करेल......फुलांच्या पाकळयांचा वर्षाव करेल......फुलांच्या पाकळयांच्या पायघडया घालेल....तो क्षण तुझ्यासाठी खुप मेमोरेबल करेल तो.....आयुष्यभर तो क्षण तु विसरणार नाहीस.....मग तेव्हा माझे शब्द आठवतील तुला.....मानस

अरे हो हो.......एवढ सुंदर क्षण माझ्या आयुष्यात.......अस म्हणत मेघना हसते........

हसु नकोस नक्की येईल बग......आणि जास्त दिवस पण लागणार नाहीत.........मानस

फक्त थोड दिवस मेघना............हे सगळे तुझ्यासाठी करणार आहे.......एकदा आपण घरी गेलो ना की....दोन तिन दिवसातच तुला सगळ सांगेन अता मला एकही क्षण वाया घालवायचा नाहीये........मानस मनातल्या मनात बोलत असतो....

ओय तु कुठे हरवलास......मानस

काही नाही असच.........मानस

मानस तु तुझ्या फॅमिली बद्दल काहीच बोलला नाहीस.....तुझे आई बाबा कुठे असतात........आणि कोण कोण असत तुझ्या घरी.....मेघना

मेघना अस विचारल्यावर मानसचा चेहरा पडतो...........

***

क्रमश:

पुढचा भाग 25/09/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all