बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 32

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 32 (कोल्हापुरपासून १५ किलोमीटरच्या अंतरावर हातकणंगले जवळ रामलि??

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 32

(कोल्हापुरपासून १५ किलोमीटरच्या अंतरावर हातकणंगले जवळ रामलिंग, धुळोबी ही देवस्थाने आहेत. रामलिंग मंदिर ही एक कोरीव गुंफा असून पुरातन देवस्थान आहे. आतील बाजूस शिवलिंग व गणपती मुर्ती आहेत. देवालयाच्या बाहेरील बाजूस हेमाडपंथी शिल्प आहे. कन्नड भाषेतील शिलालेख असून थोड्या अंतरावर धुळोबा देवस्थान आहे. याच परिसरात डोंगरमाथ्यावर अल्लमप्रभूचे देवस्थान मध्ययुगीन बांधणीचे आहे.

देवाच दर्शन घेवुन परत सगळे पुढच्या पॉइन्टला निघतात........)

आता पुढे....

खिद्रापूरचे कोपेश्वर

शिरोळ तालुक्यात कर्नाटक-महाराष्ट्र सिमेवर कृष्णा नदीच्या काठी खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर आहे. प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे हे मंदिर आहे. कोल्हापूरपासून ७० किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर बारा राशींचे बारा खांब आहेत. अत्यंत कोरीव नक्षीदार खांब, हत्ती, रामायण, महाभारतातील प्रसंग, राशिचिन्हे, प्राणी यांची कलाकुसर मंदिरावर आहे. पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक म्हणून मंदिराला घोषित केला आहे.

किती सुंदर आहे हे मंदीर...........मेघना

हो ना मस्तच आहे........श्वेता

चला दर्शन घेवुया.........मानस

दर्शन घेवुन आजुबाजुला असलेल्या लोकांना थोडी माहीती विचारुन सगळे पुढच्या पॉईन्टला जातात.....

|| श्री क्षेत्र नृसिंहवाडी || -

पंचगंगा नदीतीर । प्रख्यात असे पुराणांतर

कृष्णा, शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी

पाच नावे आहेत थोर ।

सांगेन एका एकचित्ते । सरस्वती पंचगंगा थिरकते । संहार।।

असा नृसिंहवाडी क्षेत्राचा थोर महिमा. श्रीगुरूंनी येथे बारा वर्षे वास्तव्य केले. कृष्णेच्या प्रशस्त पात्रावरच्या एक्कावन्न पायऱ्यांच्या घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर व मनोहारी शिलामंदिर आहे. येथेच श्री नृसिंहसरस्वतींनी स्थापन केलेल्या दत्त पादुका विराजमान आहेत. चौसष्ट योगिणींच्या आग्रहावरून स्वामींनी येथे वालुकामय पाषाणांच्या या पादुकांची स्थापना केली, असा गुरूचरित्रात उल्लेख आहे. या पादुका अभिषेकाने झिजत नाहीत. कृष्णेच्या तीरावर बसलेले मनोहारी पादुका मंदिर छोटे आहे. शिळेचे मागचे चारखांब भिंतीत सामावले आहेत. येथेच श्रीगुरूंची अन्नपूर्णा जान्हवी आहे. दोन्ही बाजूला कोपऱ्यात दगडी तुळशीवृंदावने आहेत. डावीकडे छोटेसे राममंदिर आहे. या मंदिराजवळ ओळीने आठ ओवऱ्या आहेत. दत्तपादुकांस-

मोरचा घाट संत श्री एकनाथ महाराजांनी बांधला आहे. प्रत्येक बारा वर्षांनी जेव्हा गुरू कन्या राशीत प्रवेश करतो. तेव्हा सह्याद्री पर्वतावरील गंगा कुंडातून जलप्रवाह

निघतो. तो गंगेचा समजला जातो. हा प्रवाह कृष्णा नदीला मिळतो. गंगा आणि कृष्णेची जणू ही भेटच असते.याच काळात नृसिंहवाडी येथे श्राद्ध, तर्पण, गंगा पूजन आदी धार्मिक विधी होतात.

पहाटे पाच वाजताच येथे श्रींची काकड आरती सुरू होते. त्यानंतर षोडशोचार पूजा, रूद्रावर्तन, पुरुषसुक्त, श्री सुक्तांच्या मंत्र घोषात भाविक श्रींस जलाभिषेक करतात. पादुका पुसून गंध-फुले वाहून त्यावर लाल वस्त्र परिधान केले जाते. मंदिर परिसरात रामचंद्रयोगी स्मारक, नारायण स्वामी, श्रींची उत्सव मूर्ती, श्रीकृष्णानंद स्वामी, गोपाळस्वामी, मौनी स्वामी, ब्रह्मानंद स्वामी, वासुदेवानंद सरस्वती स्वामी अशा महापुरुषांच्या समाध्या आहेत.

सगळे नरसोबाच्यावाडी मध्ये येतात........प्रवेशद्वारतुन आत जात आजुबाजुचा परिसर पाहत असतात.....आजुबाजुला खाण्याच्या पदार्थाचे.....कपडयांचे....घरगुती वस्तुचे...लहान मुलांच्या खेळण्याचे....असे बरेच स्टॉल मांडलेले होते...हे सगळ पाहत आत येतात.........स्टॉलमधुन नारळ अगरबत्ती साखर फुले...वगेरे घेवुन दर्शनाला जातात........थोडयावेळात दर्शन करुन बाजुलाच असलेल्या पायऱ्यावर जाऊन बसतात......

छान झाल ना दर्शन.......मानस

हो ना मस्त झाल.......श्वेता

किती मस्त वाटतय ना इथे एवढी गर्दी असुन सुध्दा मनाला शांतता वाटत आहे......मेघना

हो ना.....मस्त वाटत आहे.....श्वेता

गाईज तुम्ही बसा इथे मी आलोच पाच मिनिटात......मानस

तु कुठे जातोयस.........मेघना

अग इथेच जातोय.... आलो पाच मिनिटात.....मानस

बर चालेल ये लवकर......मेघना

हो आलोच.......मानस

मेघना श्वेता व सुरज तिथेच गप्पा मारत बसलेले असतात......खुप वेळ होतो पण मानस येतच नसतो.....

अरे हा मानस काय करायला गेलाय.....किती वेळ झाला.....सुरज

अरे हो ना....कुठे गेलाय काय माहीत......फोन करुन बघ ना.....श्वेता

अग केला होता पण उचलतच नाहीये.........सुरज

थांब मी बघुन येते......मेघना......

बर आम्ही येवु का......श्वेता

अग नको त्याला मी हया बाजुला जाताना पाहील आहे बघते तिथे आहे का.........असला तर फोन करते तुम्हाला.......मेघना

हो चालेल.......सुरज

मेघनाने मानसला घाटाच्या दिशेने जाताना पाहील होत.....ती त्याला शोधत जाते.......तर थोडया अंतरावर तिला मानस दिसतो.......घाटावरच बसला होता......मेघना त्याच्याजवळ जाते.......मानस दुरवर कुठे तरी पाहत शांत बसला होता......बहुतेक कोणत्या तरी विचारात होता......मेघना त्याच्या बाजुला जाऊन बसते पण त्याच लक्षच नसत......थोडा वेळ मेघना वाट पाहते पण हा त्याच्याच विचारात......

ओय......मेघना त्याच्या समोर चुटकी वाजवत बोलते.........तसा मानस भानावर येतो.....

अरे तु इथे कशी काय.......आणि केव्हा आलीस.....मला कळलच नाही....मानस

तु लगेच येतो म्हणुन गेलास पण खुप वेळ झाला आलाच नाहीस ना...मग पहायला आले तुला...आणि मी येवुन खुप वेळ झाला पण तुझ लक्षच नव्हत.....वाट पाहीली आता बघशील पण तु आपल्याच विचारात......मग काय शेवटी मीच तुला भानावर आणल.....

सॉरी यार खरच लक्ष नव्हत.......मानस

हो का.....एवढा कशाचा विचार करत होतास........मेघना

तुझाच की......आणि कोणाचा करु.....मानस मनातल्या मनात बोलत असतो.......

ओय परत कुठे हरवलास.....मेघना

अग विचार अस नाही....नदी तिच्या  आजुबाजुचा असलेला परिसर पाहत होतो........किती सुंदर आहे बग ना.....शांत वाहणारी नदी तिच्या भोवताली असणारी हिरवळ......आजुबाजुला असलेली शेती आणि त्यात घाम गाळणारे शेतकरी...किती मनमोहक सौदर्य आहे ना........आणि बग ना किती शांत वाटत आहे.....अस वाटतय इथेच बसुन रहाव........मानस

हो का.......हेच कारण आहे ना........कि दुसर काही....मेघना मानसला चिडवत बोलते.......

हो हेच कारण आहे..............आणि दुसर काय.........काय  म्हणायच आहे तुला......मानस

मला वाटल आय लव्ह हर वालीचा  विचार करत बसला होतास की काय.........मेघना हसत मानसला चिडवत बोलते......

ये मेघना काय यार तु जान्हवीने काय सांगितलय तुला.........काल पासुन अस नुसत कोडयातच बोलतेयस........सांग ना काय सांगत होती जान्हवी.......मानस

अरे मी तुला कुठे काय म्हणत होते......जान्हवीने तर तुझ नाव  घेतल पण नाहीये पण तुच पॅनिक होतोयस.......म्हणजे कोणी तरी असल्याशिवाय तर तु पॅनिक होणार नाहीस ना.........मला जान्हवीने काय तर सांगितले असेल अस वाटतय तुला.....हो ना.......मेघना मानसची फिरकी घेत बोलते.......

ए अस काही नाहीये.....मी पॅनिक वगेरे होत नाहीये.......मानस

हो का.......मग आय लव्ह हर वाली म्हटल्यावर असा का कावरा बावरा होतोस.........कोणी तरी नक्की आहे...............मेघना

तुलाच अस वाटत........ मी कुठे कावरा बावरा होतोय........मानस दुसरीकडे पाहत मेघनापासुन नजर चोरत बोलतो.....

हो का...मग असा माझ्या पासुन नजर का चोरत आहेस.......कोणी तरी आहे हो ना......मेघना

मेघना गप्प ग अस काही नाही............अरे यार ही तर मागेच लागली आहे जान्हवीने नेमक काय सांगितल आहे काय माहीत हीला......मेघनाला कळल तर नसेल ना की मी हिलाच आय लव्ह हर बोलत होतो ते........मानस मनातल्या मनात बोलतो....

हो का.......चेहरा बघितलायस का तुझा.......तुझ्या चेहऱ्याकडे पाहील्यावर कोणी पण सांगेल की तु कोणाच्या तरी प्रेमात आहेस.........मानस तिच नाव सांगेल या आशेने ति त्याला बोलत असते....

आता हिला सांगितल्याशिवाय ही गप्प बसणार नाहीये.......पण आता कस सांगु.....मला अस तिला प्रपोज करायच नाहीये.........पण काय करु........मानस

अरे परत हरवलास..........काय वेड लावलय त्या आय लव्ह हर वालीने.....साईडला आपली एक मैत्रिण बसली आहे हे पण विसरायला लावतेय ती........मेघना

बास ना मेघना किती चिडवशील........मानस

हो का.....राहील... नाही चिडवत.....मला वाटल चिडवल्यावर तर तिच नाव सांगशील पण तुला सांगायच नसेल तर काहीच हरकत नाही.......मेघना एवढस तोंड करुन बोलते.......

***

क्रमश:

पुढचा भाग 21/09/2020 ला पोस्ट केला जाईल..

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all