बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 19

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 19 (पण काय खायच..........श्वेता आधी चल तर........मानस बर.....चला....श्वेता सगळे ए

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 19

(पण काय खायच..........श्वेता

आधी चल तर........मानस

बर.....चला....श्वेता

सगळे एके ठिकाणी जातात......तिथे बोर्डवर लिहल होत.......चुलिवरचा झुणका व भाकरी मिळेल.....)

आता पुढे...

ही स्पेशल डिश आहे का इथली........मेघना

स्पेशल म्हणायला काही हरकत नाही........इथ सगळेजण हे रोज खातात......पण इथली स्पेशल डीश तांबडा व पांढरा रस्सा आहे.......मग आपण सगळेजणच नॉनव्हेज खातो अस नाही ना म्हणुन ही झुणका भाकरी......छान असते म्हणे.....मानस

सगळे बोलत बसले होते तोपर्यत सगळयाच्या समोर प्लेटा येतात........

चुलिवरची भाकरी.....लाल चटणीचा झुणका त्यावर टाकलेली कोथींबीर त्यामुळे झुणका आणखीण खावासा वाटत होता.......मिरचीचा ठेचा.....शेंगदाण्याची चटणी.......कांदा...तोंडी लावयला आब्यांच लोणच.....भरली वांगी.....वाटीच्या आकार उठुन ताटाच्या बाजुला लावलेला भात.....आणि कट्टाची आमटी......(सुटल ना तोंडाला पाणी.....अहो जेवण आहेच तस....झुणका भाकरीची गोष्टच वेगळी आहे....)

वॉव यार हे दिसायलाच किती भारी दिसत आहे.......हयाची टेस्ट किती मस्त असेल..........मेघना

चला करुया सुरुवात........अस मानस म्हणेपर्यत सुजय जेवायला सुरुवात करतो..........

अरे सावकाश........ठसका लागेल.....मानस

खुप भुक लागलेय यार आणि हे जेवण दिसायलाच इतक छान दिसत आहे मग खायचा मोह आवरतो होय....सुरज

बर चला करुया सगळे सुरुवात......मानस

सगळे जेवायला लागतात.......

मस्तच..........खरच अप्रतीम आहे जेवण......आस जेवण मी कधी जेवलेच नाहीये.......मेघना

हो ना खरच खुप मस्त आहे जेवण.......श्वेता

आवडल ना तुम्हाला......हयातच सगळ आल.......मानस

हो खुप आवडल.......सगळे एकदम बोलतात......

बर आवरा पटपट पुढे जायच आहे ना......मानस

हो........थोडयावेळात जेवण आटपुन सगळे पुढच्या पॉईन्टला निघतात......

टाऊन हॉल म्युझियम

कोल्हापूर शहरात नवगॉथिक वास्तूकलेचा उत्कृष्ठ नमुना असलेले टाऊन हॉल हे वस्तूसंग्रहालय आहे. या ठिकाणी सातवाहनकालिन अनेक वस्तू आहेत. ग्रीक देवता, योद्धे, जुनी शस्त्रास्त्रे, दुर्मिळ शिल्पाकृती, चंदन आणि हस्तीदंताच्या कोरीव कलाकृती आहेत . बोटॅनिकल गार्डन, अनेक दुर्मिळ वृक्ष येथे आहेत.

खुप छान आहे रे हे म्युझियम.........मेघना

हो ना.......श्वेता

किती दुर्मिळ वस्तु पहायला मिळत आहेत इथे.........खरच मस्त आहे.....मेघना

टाऊन हॉल म्युझियम बघीतल्या नंतर सगळे पुढच्या पॉइन्टला जातात.....म्हणजेच भवानी मंडपाकडे जातात.......

भवानी मंडप हे एक कोल्हपूरची प्रतिष्टा आहे ह्याच्यामध्ये असलेल्या भव्य व जुन्या इमारती इतिहासाच प्रतिक आहेत.  ह्याच्या मध्यामध्ये कोल्हपूरची कुलस्वामिनी तुळजा भवानीचे मंदीर आहे येथेच शाहुमहाराज स्मारक ऊभारण्यात आले आहे. आणि  आठवण म्हणून स्मारका मध्ये शाहुमहाराजांनी शिकार केलेले वाघ व बैल ठेवले आहेत.त्यांच्या   ऊजव्या बाजूला रंगीत मासे व छोट शिव मंदीर आहे जे एक इतिहासकालीन मुर्तीमंत आहे!

किती छान कला कृती आहे ना....खरच किती ऐतिहासिक आहे ना सगळ इथे.......मेघना

हो खुप ऐतिहासीक गोष्टी पहायला मिळतात इथे.......आणि हे सगळ बघता बघता खुप वेळ होतो कधी सात वाजले कळचल नाही.......

बर आता रंकाळा तलावावर जाऊया का......जाऊ पर्यत आठ वाजतील.....मानस

हो चालेल ना......श्वेता व मेघना

बर चालेल.....बाकीच राहीलेले जे पॉईन्ट असतील ते उदया पहायला जाऊ......मानस

ओके आता जाऊया का....सुरज

हो रे जाऊया ना....हयाला तर सगळयाची गडबडच......श्वेता सुरजवर वैतागत बोलते...

बर चला आता नाहीतर परत हयांच भांडण ऐकाव लागेल....मेघना हसत म्हणते....व सगळे तलावाकडे निघतात......

रंकाळा तलाव कोल्हापूर शहरातील तळे आहे. यास कोल्हापूरची रंकाळा चौपाटी म्हणूनही संबोधले जाते ते कोल्हापूरचे एक प्रेक्षणीय ठिकाण आहे या रमणीय ठिकाणी संध्याकाळी खुप गर्दी असते. इथे भेलपुरी, रगडा पॅटीस, डोसा आंबोळी, शेवपुरी, चायनिज.....असे खुप पदार्थ मिळतात.....

सगळे रंकाळा तलावावर पोहचतात.....किती गर्दी असते इथे.......श्वेता

हो खुप गर्दी असते इथे म्हणुन तर हयाचा चौपाटी म्हणतात ना.......मानस

चला ना तलाव पाहुया....अंधार झाला आहे पण लायटिंगमुळे थोडफार तर दिसलेच ...मेघना

हो चला......सगळे तलाव पहायला जातात......संध्याकाळची वेळ असल्यामुळे गार वारे सुटले होते....तो गार वारा सुध्दा खुप उल्हादायी वाटत होता..........

किती सुंदर दिसत आहे......खुपच मस्त...........एवढी गर्दी असुन सुध्दा तलावाकडे पाहताना शांत वाटत आहे ना.......मेघना

मानसच सगळ लक्ष मेघनाकडे असत.......तो तिलाच पाहत असतो....एवढया संध्याकाळी सुध्दा तिच ते सौंदर्य खुप खुलुन दिसत होत........मेघनाला अस मन मोकळे पणाने वावरताना मानसला खुप छान वाटल.....आता ही आपल्यात मिक्स होतेय हे पाहुन त्याला खुप छान वाटत..........आता ही आपल्यात मिक्स होत आहे आता मी माझ्या मनातील तिच्या विषयीच्या फिलिंग्स तिला सांगु शकतो........मानस मनातल्या मनात विचार करत असतो....... तेवढयात सुरज त्याला ए मानस चला ना यार आता थोड खाऊन घेवुया........तसा मानस भानावर येतो........

हो हो चला चला.....मानस

खुपवेळ तलावाच निरिक्षण केल्यानंतर..सगळे भेलपुरी रगडा पॅटीस अशा पदार्थावर ताव मारयला जातात.....

खाऊन झाल्यावर थोडा वेळ फेरफटका मारुन झाल्यावर सगळे शांत एका ठिकाणी गप्पा मारत बसतात....

ए मानस आता आपण रहायच कुठे हॉटेल की आणखीण कुठे........श्वेता

इथे माझ्या मित्राचे पाहुणे आहेत.....ते प्रवाश्यांसाठी खोल्या रेन्टवर देतात.......तिथे जाणार आहोत.....मी हॉटेलच बुक करणार होतो.....पण तोच म्हणाला माझे पाहुणे आहेत तिथ जा....मी सांगतो त्यांना.........मानस

मग तु त्यांना सांगितला आहेस का........मेघना

हो मघाशीच सांगितलो आहे.......वेळ झाला तरी चालेल म्हणाले मला कॉल करा आल्यावर मी येईन असे म्हणाले........मानस

ओके........चालेल.......श्वेता

आता निघुया का मग दहा वाजलेत........मेघना

काय..? दहा वाजले.........मानस

अरे हो........कळलच नाही ना किती वेळ झालाय ते.......मेघना

हो ना...चला चला निघुया उगाच त्यांना तर कशाला त्रास दयायचा ना....परत आपल्याला पण उदया लवकर जायच आहेच ना.........मानस

हो चला.........मेघना

सगळेजण मानसच्या मित्राच्या पाहुण्याणकडे जातात.......मानस त्याच्या घराजवळ आल्यावर त्याना कॉल करतो........ते कॉल केल्यावर बाहेर हयांना आणायला येतात

आलात का तुम्ही......या या....प्रमोदने सांगितल होत मला तुम्ही खास आहात म्हणुन

आहो काका खास वगेरे काही नाही........हा प्रमोद पण काहीही सांगत असतो..........मानस

तस कस तुम्ही प्रमोदचे मित्रमंडळी आहात म्हणजे खासच झालात ना......प्रमोदचे पाहुणे

तुम्ही रंकाळयावरुन भरपुर खाऊन आला असाल माहीतेय पण तरीही तुमच्यासाठी मुगडाळीची खिचडी केलो आहे.....हातपाय धुवन खाऊन घ्याया.......प्रमोदचे पाहुणे

अहो काका हयाची काहीच गरज नव्हती उगाच त्रास घेतलात.......मानस

***

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all