बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 18

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 18 (कुठे मॅचिंग एअरिंग आणलो हेच करत बसाल तिथे.........सुरज त्यांना चिड??

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 18

(कुठे मॅचिंग एअरिंग आणलो हेच करत बसाल तिथे.........सुरज त्यांना चिडवत म्हणाला........

ए गप्प रे तु...... तुला काय माहित आम्हा मुलींची किती काय तयारी करायची असते........श्वेता सुरजवर चिडुन......

काय तर करा....पण उदया वेळेवर या म्हणजे झाल......चार दिवसात परत यायच आहे आपल्याला महिनाभरासाठी जायच नाहीये आपण.........सुरज)

आता पुढे......

हो का.........आमच आम्ही बघतो घे ते.......श्वेता चिडत म्हणाली..

बर चला निघुया का राहीलेल उदया भांडा........मानस

तसे सगळे हासायला लागले.........

बर चला खरच थोडीफार तयारी करायला हवी..........ओके बाय गाईज...मेघना

मेघना घरी येवुन थोडीफार पॅकिंग करत होती....

हे घे मेघना हे घेवुन जा सोबत.......सुमनताई

आई हे काय.......अग थोड खाण्याचे पदार्थ आहेत..........सुमनताई

ए आई खायला काय ग मी काय लहान आहे का आता......मेघना

अग भुक वगेरे लागली तर खायला बर ना...........सुमनताई

अग आई भुक लागलीच तर हॉटेल वगेरे असतात ना..काय ग ‍तु पण......मेघना

असुदे तुझ हॉटेल....घेवुन जा......अस म्हणत सुमनताई तिच्या बॅगेत ठेवतात.......

बर जाते घेवुन......मेघना

बाकीची झाली ना तयारी......सुमनताई

हो झाली सगळी तयारी.......मेघना

*****

सगळे श्वेताच्या घरी येणार होते...मेघना केव्हाची येवुन थांबली होती......मेघना व श्वेता मानस व सुरजची वाट पहात होते......पण ते काही केल्या लवकर येतच नव्हते........

श्वेता व मेघना फोन करत होत्या तर ते पण उचलत नव्हते.......दोघीही आता वैतागल्या

तेवढयात ते दोघे आले.......चला आवरलय ना तुमच........सुरज

काय किती वेळ किती उशीर झाल आम्ही वाट बघतोय........दहाला सांगितला होता घडयाळ बग जरा किती वाजलेत.........श्वेता चिडुन म्हणाली........

अग थोड ऐकशील का.....मानस

हमममम....बोला.....श्वेता

अग आम्ही वेळेतच निघालो पण गाडीच बंद पडली.......त्यामुळे वेळ झाला.....मानस

मग किती वेळ झाला फोन करतोय आम्ही निदान उचलुन सांगायच तर....मेघना

अग हो ते दुरुस्त करायच्या नादात मोबाईल गाडीतच राहीला त्यामुळे ऐकायलाच आल नाही.....मानस

मग नंरत तर बघुन करायच ना......मेघना

अग खरच लक्षात नाही आल वेळ झालाय म्हणुन आम्ही तसच आलो पुढे......मानस

हमममम....मेघना

निघायच्या आधीच बंद पडली.....चार पाच दिवस कस होणार मग....श्वेता

ए काही नाही होत गप्प....लगेच तर्क वितर्क काढु नकोस......सुरज

बर जाऊदे निघायच का आता.......मानस

हो चला......आई बाबा आम्ही निघतो आता..श्वेता तिच्या आई बाबांना सांगते.....

हो निघा सावकाश जा.....आणि काळजी घ्या.....श्वेताची आई

हो ग आई चल बाय जातो आम्ही......श्वेता

फायनली निघालो आपण.....श्वेता

हो ना यार.......सुरज

हो ना काय हो ना.......तुमच्यामुळेच वेळ झालाय...श्वेता

तु आता परत सुरु होऊ नकोस हा.....सुरज

ए गप्प बसा आता सुरुवातच भांडत नको.......मेघना

हमममम..श्वेता

बर मानस पहिला कोठे जायच आहे..........मेघना

अग कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात.....मानस.....

बर....मेघना

खुप मान्यता आहे कोल्हापुरच्या महालक्ष्मीची.......साडेतीन पिठापैकी एक आहे....मानस

तुला एवढ कस काय माहीत......अग  सर्च केल होत थोङ......मानस

ओके......मेघना

थोडयावेळात सगळे महालक्ष्मीच्या मंदिरात पोहचतात......

पर्यटनाला निघालेला पर्यटक कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढे मार्गस्थ होत नाही. हेमाडपंथी वास्तूरचनेचे काळ्या दगडातील मंदिर आहे. नगारखाना, प्रवेशद्वारे, दरवाजावरील घंटा, दगडी चौथरे आणि त्या वरील कोरीव काम प्रेक्षणीय आहे. किरणोत्सव हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

किती सुंदर आहे ना ग मंदिर.....मेघना

हो खरच खुप सुंदर आहे......चला पटकण दर्शन घेवुया.....श्वेता

हो चला......देवीच दर्शन घेवुन सगळे बाहेर येतात.......

किती मस्त वाटत होत ना....किती सुंदर रुप होत देवीच.........मेघना

हो ना खुपच सुंदर........मानस

थोडावेळ मंदिर पाहुन तेथिल लोंकांना मंदिराची माहीती विचारुन पुढच्या ठिकाणाला भेट दयायला जातात.......

वॉव कसल मस्त आहे ना हे म्युझियम.......किती दुमिर्ळ सगळ बघायला मिळतय नाही......खरच खुपच मस्त....मेघना

हो ना.....किती महिती मिळतेय बघ ना.....मानस

 न्यू पॅलेस म्युझियम

न्यू पॅलेस म्युझियम कोल्हापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे. काळ्या कातीव दगडांनी बांधलेली ही वास्तू कोल्हापुरचे वैभव आहे. येथील छत्रपती शहाजी म्युझियम हे खास आकर्षण आहे. राजघराण्यातील वापरातील वस्तू, शाहू महाराजांची दुर्मिळ छायाचित्रे, युद्धात वापरली जाणारी शस्त्रे, शिकार केलेले प्राणी, दुर्मिळ पत्रव्यवहार, राजप्रासाद घड्याळाचा मनोरा हे या वास्तूचे वैशिष्ट्य आहे.

आणिखीण एक म्यझियम आहे आता तिकडे पण जाउया......मानस

हो चालेल ना.....श्वेता

ए ऐका ना आधी आपण काही तरी खाऊया का मला खुप भुक लागली आहे.....सुरज

लागली का भुक तरी म्हटल आजुन कसा काय हा बोलला नाही.......श्वेता

ए गप्प ग तु गाडीत बसुन नुसत खात आलेय आणि मला सांगतेय......सुरज

हो का.....मग तुला कोण नको म्हणत होत का.....खा म्हणतच होते की पण नखरे तुच करत होतास.....श्वेता

बर असुदे बास आता परत तुम्ही दोघे सुरु नको होऊ........मेघना

बर आपण आता काही तरी खाऊन घेवुया....मग पुढील म्युझियम बघता येईल......आणि संध्याकाळी मग रंकाळा तलाव पहायला जाऊया........चालेल ना......मानस

हो चालेल काय पळेल..........रंकाळा तलावावर तर खुप छान पानी-पुरी आणि बरेच चांगले चांगले पदार्थ असतात म्हणे.......सुरज

तसे सगळे हसायला लागले.....हयाला खान्याशिवाय काही सुचतच नाही बग.....श्वेता

बर चला जेवुन घेऊया.....मानस

पण काय खायच..........श्वेता

आधी चल तर........मानस

बर.....चला....श्वेता

सगळे एके ठिकाणी जातात......तिथे बोर्डवर लिहल होत.......चुलिवरचा झुणका व भाकरी मिळेल.....

***

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all