बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 17

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 17 (अहो श्वेताच्या मित्र-मैत्रिण मिळुन केले आहेत.....ती श्वेताच्या ?

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 17

(अहो श्वेताच्या मित्र-मैत्रिण मिळुन केले आहेत.....ती श्वेताच्या साईडला मुलगी आहे ना तीन हे केल आहे......श्वेताची आई मेघनाकेडे बोट करुन दाखवतात.....

छान आहे ना.......कोणाची मुलगी आहे..........एक बाई त्यांना विचारते.....)

आता पुढे......

अग एवढी माहीती घेतेयस काय सुन करायचा विचार आहे की काय......दुसरी बाई हसत म्हणाली......

अग तस नाही....छान वाटली म्हणुन विचारले ग......बर बर...........

मी आलेच हा मेघना.....श्वेताला कोण तरी बोलवत होत म्हणुन ती जाते......

मानस गिफ्ट घेवुन ये ना देवुया........मेघना

हो आणतो थांब....चल सुरज आणुया......मानस

दोघे गिफ्ट घेवुन येतात.......तेवढयात श्वेता येते........

हे काय........काही नाही असच दि साठी गिफ्ट आणल आहे........मानस

तुम्हाला कोण अगाउपणा करायला सांगितला होता......तसच या म्हणुन सांगितले होते ना......श्वेता

ये गप्प तू......आम्ही तुला नाही दी ला घेवुन आलोय.......सुरज

हो ग श्वेता त्यात काय एवढ तुझी दी आमची पण दी च आहे ना.....मग तिच्यासाठी एखादी गोष्ट आणली तर काय झाल.....मेघना

बर काही तरी करा......तुम्ही काय माझ ऐकणार आहात का.........श्वेता

हा आता कस.......चल देवुन येवुया दी ला.......मानस

बर चला........श्वेता

गिफ्ट देवुन फोटो काढतात.........व खाली येवुन परत गप्पा मारत थांबतात.......

थोडयावेळात सगळे पाहुणे गेले.......बाकीची थोडीफार आवराआवर करुन मेघना मानस व सुजय जायला निघाले.......

श्वेता उदया येणार आहेस ना ग कॉलेजला.......मेघना

हो ग उदया येणार आहे की.........श्वेता

बर चालेल निघतो आम्ही......उदया भेटू........मेघना

******

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कॉलेजला येतात.......सगळे लेक्चर करुन कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसलेले असतात.......

गाईज ऐका......दंगा मस्ती खुप झाली.... प्रोजेक्टच आता बघुया का......मानस

हो रे....हया सगळयांत प्रोजेक्टच डोक्यातुनच गेल बग.......श्वेता

केव्हा जायच सांगा त्यानुसार मला बाबांना सांगायला हव....मेघना

ऑलरेडी आठ दिवस गेलेत आपले......उदया लगेच काय निघता येणार नाही.......परवा दिवशी जाऊया......चार पाच दिवसात जाऊन येवु व मग बाकीच्या दिवसात पेपरवर्क  करता येईल.....मानस

ओके चालेल मग परवा दिवशी फिक्स निघायच ना........मेघना

हो तुम्हाला कोणाला काही अडचण नाहीये ना मग निघुया......मानस

*********

बाबा ते प्रोजेक्टसाठी परवा दिवशी जायच आहे.........मेघना

बर.....किती दिवस जाणार आहात........माधवराव

पाच सहा दिवस.........मेघना थोड घाबरतच बोलते......

बर जा तु पण मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या.......माधवराव

हो बाबा........मेघना

मेघना तिच्या रुममध्ये येते.....व श्वेताला फोन करते.......

श्वेता ऐक ना मी सांगितले बाबा ना......बाबा जा म्हणाले.....त्यांना एक दिवस जास्त सांगितले ग परत तिथे जाऊन काही तरी कारणामुळे एखादा दिवस वाढला तर..........मेघना

बर केलीस.........चालेल मग तयारी कर सगळी....श्वेता

ऐक ना तु मानस ला सांगशील ना.......मेघना

तुच सांग ना मग.........माझ थोड काम आहे ग..........श्वेता

अग पण माझ्याकडे त्यांचा नंबर नाहीये ग.....मेघना

मी करते की तुला नंबर सेन्ङ..........श्वेता

बर कर मग करते मी.........मेघना

श्वेताचा फोन झाल्यावर मेघना मानसला फोन करते......

हॅलो........मेघना

हा बोल ना मेघना.....मानस

तुला कस कळाल की मीच बोलतेय.......मेघना

अग ते ते......मानसला काय बोलाव कळेना आता आपली चोरी पकडली जाते की काय अस वाटायला लागल त्याला.........अग ते

अग ते ते काय सांग ना तुला कस कळाल की मीच बोलतेय........मेघना

काय तु पण एवढा आवाज ओळखत नाही होय तुझा..........काय यार तु पण........मानस काय सुचेल ते बोलुन मोकळा झाला

ओहो अस आहे होय.......मेघना

हो.........तु का फोन केली होतीस आणि माझा नंबर तुझ्याकडे कस काय........मानस

अरे श्वेताकडुन घेतला नंबर......आणि बाबा जा म्हणालेत ते सांगायला फोन केला........परत तुला पुढच प्लॅनिंग करायला बर ना म्हणुन.........मेघना

ओके ओके........फायनली जायच मग.......मानस

काय..........मेघना

अग म्हणजे प्रोजेक्टसाठी जायच मग अस म्हणालो......मानस

बर.........बर मग ठेवते फोन.......बाय उदया भेटु.........मेघना

हो बाय.......मानस फोन ठेवत सुटकेचा निश्वास सोडतो..........वाचलो यार.........मला वाटल आज माझी चोरी पकडली जाते की काय..........मानस ने श्वेताच्या फोनमधुन मेघनाचा नंबर घेतला होता आणि हे मेघना व श्वेताला ही माहीत नव्हत............

*****

अरे किती उशीर केव्हाची आम्ही वाट बघतोय तुमची......श्वेता मानस व सुरज वर वैतागत म्हणाली.......

सॉरी सॉरी यार वेळ झाला..........मानस

ये सॉरी काय बोलतोयस आपण काय मज्जा करायला गेलोलो काय.......सुरज

अरे हो पण आपल्याला वेळ तर झालाच ना.......मानस

हो काय पण आपण उदयाच सगळ बघायला गेलो होतो ना..........आणि तु श्वेता एवढ चिडायला काय झाल थोडा वेळ थांबला म्हणुन काय झाल..........सुरज

अरे हो केवढा चिडतोयस.......बोलुन गेले मी त्यात काय एवढ..........श्वेता पण सुरजवर चिडुन बोलते......

अरे बास बास.......किती लहान मुलांसारखे भांडताय.........उदयाच काही बघुया का की भांडतच बसुया...मेघना

हममममम.....बोला.....श्वेता व सुरज

बर ऐका आम्ही गाडीच वगेरे......कोठे कोठे जायच ते सगळे फायनल करुन आलोय....उदया सकाळी निघुया आपण..........मानस

ओके पण किती वाजता जायच.......मेघना

दहाला निघुया की......मानस

ओके चालेल.............मेघना

बर मेघना आपण जाऊया की मग उदयाची तयारी पण करायला हवी ना.....श्वेता

हो ग निघुया.......तयारी तर करायला हवी ना........मेघना

हया मुलींच कस होणार काय माहीत.......आपण प्रोजेक्टच्या कामासाठी जातोय ट्रीपसाठी जात नाहीये तयारी करायला........नाही तर तुमच ते कुठे नेलपॉलिश आणलो कुठे मॅचिंग एअरिंग आणलो हेच करत बसाल तिथे.........सुरज त्यांना चिडवत म्हणाला........

ए गप्प रे तु...... तुला काय माहित आम्हा मुलींची किती काय तयारी करायची असते........श्वेता सुरजवर चिडुन......

काय तर करा....पण उदया वेळेवर या म्हणजे झाल......चार दिवसात परत यायच आहे आपल्याला महिनाभरासाठी जायच नाहीये आपण.........सुरज

***

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all