Oct 31, 2020
प्रेम

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 36

Read Later
बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 36

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 36

 

(नाही ग आई त्रास कुठला...........मस्त झाला प्रवास......मेघना

बर तु आवरुन घे मी तुझ्यासाठी कॉफी आणते......सुमनताई

बर चालेल........बाबा आले नाहीत का ग अजुन......मेघना

येतील एवढयात........सुमनताई)

 

आता पुढे....

 

बर मी आलेच फ्रेश होवुन.......मेघना

 

हो चालेल......सुमनताई

 

मेघना फ्रेश होवुन बाहेर येते सुमनताई तिला कॉफी आणतात........हे घे........... मग कशी झाली ट्रीप......सुमनताई मेघनाच्या शेजारी बसत बोलतात.....

 

आई खुप मस्त झाली........अशी ट्रीप मी कधी केलीच नाही.......मेघना आनंदात सांगते.....

 

हो का......काय काय पाहीला....सुमनताई

 

मेघना तिने हया चार-पाच दिवसात काय काय पाहील काय काय दंगा मस्ती केली हे सगळ सांगत असते........तिला एकदम जान्हवी आठवते..........ये आई ऐक ना......एकदा ना आम्हाला निघायला वेळ झाला होता ग त्यामुळे आम्हाला हॉटेलच मिळत नव्हत........खुप ठिकाणी पाहील........मेघना

 

मग काय केला तुम्ही.........सुमनताई

 

अग आम्ही कोणाला तरी विचारायच म्हणुन थांबलो होतो.....तेव्हा ना एक आज्जी आल्या त्यांनी आमच बोलण ऐकल होत........मग ना त्या आमच्यापाशी आल्या आणि आम्हाला त्यांच्या घरी घेवुन गेल्या..खुप छान पाहुणचार केला त्यांनी...........मेघना

 

हो का......भल होवो त्या आज्जीच......अशा परिस्थित त्यांनी मदत केली........सुमनताई

 

हो ग......ए महत्वाच तर सांगायच राहीलच की........मेघना

 

काय ग.....सुमनताई

 

अग त्यांची एक नात आहे.......सात-आठ वर्षाची असेल.......इतकी गोड आहे ना.....दोन दिवसात तिने इतका लळा लावलाय ना......तिला सोडुन येवुच वाटत नव्हत......मेघना

 

लहान मुल गोड असतातच ग......सुमनताई

 

हो ग आई......पण ना तिची आई नाहीये.......मेघना एवढस तोंड करुन सांगते...

 

बिचारी......पण बाबा असतील ना....सुमनताई

 

हो आहेत की पण वर्षातुन एकदा दोनदा येतात....बाहेर असतात म्हणे नोकरीसाठी.....तिची आज्जीच तिला सांभाळते.....मेघना

 

कस राहत असेल ग ती मुलगी आई-बापाशिवाय...सुमनताई

 

तिची आज्जीच तिच सर्वकाही आहे......आई तिन ना मला तिची आई सारखी आहे अस बोलली....तेव्हा तर एवढ रडायला आल ना.....मेघना डोळयात पाणी आणत बोलते.....

 

अग तिला तुझ्यामध्ये तिची आई दिसली असेल....म्हणुन अस म्हणाली असेल.....सुमनताई

 

हो ग आई........तिने मला एक गिफ्ट दिल आहे......ती स्वत: काढलेल चित्र....त्या चित्रात ना आई... मी आणि ती आहे........आता ते रुममध्ये आहे मी तुला नंतर दाखवते.......मेघना

 

बर चालेल.......सुमनताई

 

ज्योतिबा मंदिरातला झालेला प्रकार सांगु का आईला.......नाही नको आत्ता नको.....नंतर सांगुया आल्या आल्या तिला टेन्शन नको........मेघना मनातल्या मनात विचार करत होती......

 

अग कुठे हरवलीस......सुमनताई

 

काही नाही.....जान्हवीची आठवन आली......मेघना

 

तिच नाव जान्हवी आहे होय.........सुमनताई

 

हो.....मेघना

 

दोघी अशाच गप्पा मारत बसलेल्या असतात....इतक्यात माधवराव तिथे येतात.....माधवरावांना पाहुन मेघनाचा चेहराच पडतो.....आता काय काय विचारात हयाच मेघनाला टेन्शन येवु लागल........

 

माधवराव सोफ्यावर बसत....केव्हा आलीस........

 

बाब तासभर झाला असेल.......मेघना थोड घाबरतच बोलत होती....

 

कसा झाला प्रवास............काही त्रास वगेरे झाला नाही ना...माधवराव

 

छान झाला प्रवास...........काही त्रास नाही झाला.........मेघना

 

प्रोजेक्ट काम कस झाल.......माधवराव

 

छान झाल बाबा.....खुप माहीती मिळाली.....मेघना

 

बर........पण सांगितल होत तसच वागलीस ना......माधवराव

 

माधवरांवाच्या हया प्रश्नाने मेघना जास्तच अपसेट झाली.....हो बाबा तुम्ही सांगितल होत तसच केलेय....मेघना एवढस तोंड करुन बोलते.....

 

हममम.........बर मी आवरतो....मला चहा दे.......माधवराव उठत बोलतात....

 

माधवराव आत गेल्यावर.......सुमनताई मेघनाची समजुत काढतात......

 

अग मेघना नको जास्त विचार करु........सुमनताई

 

कसा विचार करु नाको आई......मी नेहमी हयांना हव तस वागते.....तरी ही हे माझ्यावर नेहमी संशय घेतात......अशी काय एवढी मोठी चुक केलीय मी........मी मुलगी म्हणुन जन्माला आले हे चुकल माझ.......मेघना डोळयात पाणी आणुन बोलत होती.......

 

मुलगी म्हणुन जन्माला आलीस हेच तर चुकल तुझ.........सुमनताई हळु आवाजात स्वत:शीच बोलतात....

 

काय म्हणालीस.........मेघना

 

काही नाही.........तुला काही हव आहे का खायला.......सुमनताई

 

नाही नको श्वेताच्या घरी खाल्लय मी......मी जाते रुममध्ये.....मेघना

 

मेघना गेल्यावर सुमनताईच्या डोळयात पाणी येत........मला माफ कर बाळ मी तुझ्यासाठी काहीच करु शकत नाही......तुझ्या बाबांना नाही ग समजवु शकत ते ऐकणारच नाहीत.........आणि कसे ऐकतील.....भुतकाळच तसा आहे.....सुमनताई स्वत:शी बोलत असतात.......पण भानावर येवुन माधवरांवाना चहा करायला जातात.......

 

****

 

जेवण आटपुन मेघना तिच्या रुममध्ये बसलेली असते......

 

मेघना झोपली नाहीस अजुन......सुमनताई

 

झोपच येत नाहीये ग.......मेघना

 

बर.....अग मघाशी जान्हवीच व तुझ चित्र दाखवतो म्हणालीस ना......सुमनताई

 

अग हो की.......थांब हा मी दाखवते.......अस म्हणत मेघना बॅगेतुन ते चित्र काढते.....हे बग आई........मेघना ते  चित्र दाखवत बोलते......

 

अग किती सुंदर काढलय हिने........अगदी हुबेहुब वाटत आहे की.........दिसायला पण किती गोड आहे ग ही........आणि हे काय लिहलय........ माझ्या आईसारखी गोड मेघना ताई.....सुमनताई

 

बग ग ना ग आई  तिने मला तिच्या आईचीच जागा दिली ग......मेघना

 

हो ग......खरच किती निरागस आहे ना ही......सुनताई

 

थोडावेळ आशाच गप्पा झाल्यानंतर मेघना जोतिबा मंदिरात घडलेला प्रकार सांगते.....

अग मेघना मग त्यावेळी का सांगितल नाहीस तु.......सुमनताई

 

कशी सांगु आई...मी सांगितल असत तर.......बाबा मला तेथुन घेवुनच आले असते......

निदाण मला तर सांगाचस ना ग......सुमनताई

 

हो ग आई......पण काही झाल नाही मानस ने वाचवल मला.......खरच तो नसता ना तर आज माझ काय झाल असत हयाची कल्पनाच करु शकत नाही..........मेघना

 

हो ग बाई मानस वेळेवर आला नसता तर अनर्थ झाला असता........पण मेघना हे तुझ्या बाबांना नको सांगुस........सुमनताई

 

अग पण आई...........मेघना

 

सांगितल ना.......नको सांगुस.........सुमनताईनां हे सांगितल्यावर तिचे बाबा कसे वागतील हया भितीनेच त्यांना हे सगळ तिच्या बाबांना सांगायच नव्हत.....त्यांना जर हे कळाल तर मी कल्पनाच करु शकत नाही मेघना........सुमनताई आपल्याच  विचारात मनातल्या मनात बोलत होत्या....

 

बर........नाही सांगत......मेघना

 

बर झोप आता.......वेळ झालाय......सुमनताई

 

हो........मेघना

 

***

 

क्रमश:

 

पुढचा भाग 29/09/2020 ला पोस्ट केला जाईल..

 

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

 

 

Circle Image

Swati