बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 52

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 52 (सुरजला अस अचानक जाताना.......मेघनाला वाटत तीच्या बोलण्याचा राग आ??

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 52

(सुरजला अस अचानक जाताना.......मेघनाला वाटत तीच्या बोलण्याचा राग आला वाटत... ती मानसला खुणवुन सांगते...

मानस डोळयानेच खुणवुन काही नाही अस सांगतो.....

हा एकदमच का गेला.....श्वेता

अग काही तर काम असेल त्याच.......मेघना)

आता पुढे....

मग सांगायच ना काम आहे म्हणुन.......अस न सांगता जातात का.........श्वेता

अग काही तरी महत्वाच काम असेल........येईल ना.......मेघना

बर........श्वेता

तिघे गप्पा मारत बसले होते.....तेवढयात सुरज तिथे येतो......

अरे काय कुठे गेला होतास सांगायच तर ना......श्वेता

तेच तर सांगायच आहे......सुरज

म्हणजे.........आणि मागे काय लपवला आहेस.....श्वेता

सुरज गुडघ्यावर खाली बसतो..........

सुरज खाली का बसतोयस.........श्वेता

सुरजच श्वेताच्या बोलण्याकडे लक्षच नसत........तो तिच्याकडे पाहतच असतो.....

हळुच मागे लपवुन ठेवलेले गुलाब फुल तो श्वेताच्या समोर पकडतो......श्वेताला कळेनाच हा अस का करतोय......

सुरज काय करतोयस..........श्वेता

श्वेता...........मी तुझ्याबरोबर सारखा भांडत असतो ना.......हया पुढेही भांडायच आहे........पण प्रेमाने.....तु रुसलीस की मनावायच आहे.....तुला सारख चिडवायच आहे..पण प्रेमाने.....तुझ सुंदर दिसण डोळयात साठवायच आहे.....तुझ्या पासुन लपवुन नाही तर तुझ्या डोळयात डोळे घालुन तुला पाहत रहायच आहे.....मला कळलच नाही कधी तुझ्या बद्दल मी असा विचार करायला लागलो....तुझ भांडण आवडु लागल तुझ दिसण आवडु लागल कधी कळल नाही......कळल नाही हे वेड मन तुझ कधी झाल..........कधी तुझ्या प्रेमात पडल........श्वेता I Love You......सुरज श्वेताच्या डोळयात एकटक बघत हे सगळ बोलत असतो......

सुरजच अस अचानक प्रपोज करण्यामुळे......सगळयांना धक्का बसतो...मानस मेघना सुध्दा एकटक त्यांच्याकडे पाहत होते.....आता त्यांना श्वेता काय बोलते हा विचार करत होते.....

पण श्वेता सुरजच्या अशा अचानक प्रपोज करण्यामुळे भान हरपली होती.......ती काहीच बोलत नव्हती...

श्वेता.....कुठे हरवलीस.....सुरज तुला काही तरी विचारतोय.......सांग ना त्याला तुला काय वाटत त्याच्या बद्दल.........मेघना श्वेताला भानावर आणत बोलते.....

आ........काय म्हणालीस..........श्वेता

अग.......सुरज तुला काही तरी विचारतोय......मेघना

सुरज अस अचानक........म्हणजे मी.......तु कस.......श्वेताला काय बोलायच कळेना ती काहीही बोलत होती.........

अग ये काय बोलतेयस.......बोल ना व्यवस्थित.......काय चाललय तुझ.......मेघना

हो बोलते ना.....अस म्हणत श्वेता सुरजकडे पाहते.......सुरज तु उभा रहा ना असा खाली नको बसु......प्लीज उभा रहा.........आजुबाजुचे सगळे पाहत आहेत...प्लीज यार उभा रहा.....श्वेता

श्वेता बोलल्यावर सुरज उभा राहतो........

श्वेता डोळे बंद करते........एक मोठा श्वास घेते.....सुरज तु वाईट वाटुन घेवु नकोस.....पण मला विचार करायला थोडा वेळ हवाय.....तु अस अचानक विचारल्यामुळे मी खुप गोंधळलेय...मला थोडा वेळ दे......श्वेता एका दमात बोलुन जाते......

श्वेता अस म्हटल्यावर सुरजचा मुड थोडा ऑफ होतो......पण मेघनाने त्याला हयाची कल्पना आधीच दिली होती.....त्यामुळे त्याला हयाचा अंदाज होताच.......

तुला हवा तेवढा वेळ घे......माझी काहीच हरकत नाही.......सुरज

थॅक्स सुरज.....श्वेता

आता दोघांना काय बोलाव कळेना........दोघे शांतच उभा होते.....मानस व मेघनाला त्यांचा ऑक्वडनेस लक्षात येतो.....

ओय काय........असे का शांत झालात......चला एकएक कप कॉफी घेवुया.....मानस

हो चालेल..........चालेल ना श्वेता.....सुरज....मेघना

दोघेही मेघनाकडे पाहत हो म्हणतात......

सगळे कॉफी प्यायला बसतात......मानस जाऊन कॉफी घेवुन येतो......

घ्या घ्या कॉफी घ्या..........मानस

सगळे कॉफी घेत असतात......सुरज कॉफी घेत एकटक श्वेताला पाहत असतो.....श्वेता सहज सुरजकडे पाहयला जाते तर तो तिच्याकडेच पाहतोय....सुरज अस पाहताना पाहुन तिला कस तर वाटत ती लगेच दुसरीकडे पाहते.....पण थोडावेळाने का होईना परत सारख लक्ष जातच होत जेव्हा जेव्हा ती बघेल तेव्हा तेव्हा सुरज तिच्याकडे पाहतच होता......

आता तीला जास्तच कस तर वाटु लागल.......सुरजच अस पाहण ती पहिल्यांदाच पाहत होती......

मेघना मी निघते........थोड काम आहे.....श्वेता

अग........लगेच थांब ना थोडा वेळ.........मेघना

अग नाही थोड काम आहे........मी निघते......श्वेता

बर चालेल.....मी पण येतेच ना मग.....मेघना

मग आम्ही बसुन काय करु.........मानस

तुम्ही बघा आम्ही निघतो.....मेघना अस म्हणुन मानस ला सुरजशी बोल म्हणुन खुणवुन सांगते.....

मानस पण खुणवनच हो म्हणुन सांगतो.....

श्वेता व मेघना पार्किंगमध्ये येतात........श्वेता हया सगळयाचा विचार करत असते......आणि तिला मेघना बोललेल आठवत........

ये थांब थांब........चार दिवसापुर्वी तु म्हणत होतीस ना.......कि सुरजने तुला प्रपोज केल तर..........बोलत होतीस हो ना.......म्हणजे तुला हे माहीत होत........हो ना.....श्वेता

अग हो माहीत होत म्हणुन तर तुला विचारत होते.......मेघना

मग सांगितली का नाहीस.........श्वेता

अग सुरजने सांगु नको म्हणुन सांगितल होत......म्हणुन नाही ग सांगितले.........मेघना

बर.......श्वेता

मग काय उत्तर देणार सुरजला......मेघना

आता मला नाही ग सांगता येणार.......थोडा वेळ तर हवा ना........श्वेता

हो ते पण आहेच.....तुझ्यासमोर अचानक आल आहे ना हे सगळ....त्यामुळे थोडावेळ तर हवाच......मेघना

हो.....बर निघुया.....श्वेता

हो चालेल........मेघना

मानस पण सुरजला समजावत होता........

सुरज नको रे काळजी करु........हो म्हणेल ती........मानस

आणि नाही म्हणाली तर.......सुरज

तु निगेटीव्ह का विचार करतोयस.........पॉजेटिव्ह विचार कर ना...........मानस

हो रे पण थोड टेन्शन येणारच ना......सुरज

ते तर आहेच सोड मला त्याचा अनुभव आहेच......मानस

हा मग........तेच म्हणतोय ना मी.........सुरज

बर........ती सांगेल तु नको काळली करु.........मानस

हो.....सुरज

प्रपोज छान केलास हा पण.......आवडल मला......मानस

हो का.......सुरज

हो......आता निघायच का.....मानस

हो चालेल निघुया........सुरज

दोघे पार्किंगमध्ये येवुन आपाल्या बाईक घेवुन घरी जातात.....

***

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all