बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 47

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 47 (डब्यात एकच भजी राहीली होती.......आणि श्वेता व सुरज एकदमच ती उचलायल

बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 47

(डब्यात एकच भजी राहीली होती.......आणि श्वेता व सुरज एकदमच ती उचलायला हात पुढे करतात.....

ये सुजर मी घेणार आहे ही भजी.....मगाच पासुन तुच जास्त खाल्ली आहेस.......श्वेता

हे नाही हा मी खाणार आहे....सुरज.....)

आता पुढे.....

दोघांच थोडावेळ मी खाणार मी खाणार सुरु असत........बर तुला खायची आहे ना.......हे घे.....सुरज श्वेताला ती भजी देत बोलतो.......

मेघनाला ते खटकत.....ती मानसला खुणवुन दाखवते....मानसलाही ते खटकत......आपल्यातला एकही घास न देणारा आज स्वत:हुन श्वेताला देत होता........त्यावेळी मानस व मेघना काहीच बोलत नाहीत....

थोडावेळ दंगा मस्ती करत भजी व चहा एन्जॉय करतात......

बर गाईज ऐका ना......मी माझ जे प्रोजेक्टच काम होत ते कप्लिट केल आहे.....हे घ्या....श्वेता प्रॉजेक्टचे पेपर मानसच्या हातात देत बोलते...

अरे वा तु कप्लिट पण केलीस......मेघना

अग हो.....दीच्या लग्नाची तयारी पण करायची आहे ना...मग पटपट करुन घेतले........श्वेता

बर....माझ पण अलमोस्ट झालच आहे.....दोन दिवसात होईल पुर्ण.....मेघना

अरे तुम्ही दोघीं काय फास्टच आहात की....सुरज

म्हणजे.....मानस

अरे माझ अजुन काहीच सुरुवात नाहीये.......सुरज

काय........?......सगळे एकदम ओरडतात......

ये येवढ ओरडायला काय झाल......सुरज

काय झाल काय विचारतोय.......आठ दिवस राहिलेत प्रोजेक्टच पेपर सबिमीट करायला.....आणि तु अजुन काहीच झाल नाही म्हणतोयस.....मानस

अरे हो करतो ना मी....सुरज

करतो ना काय.....कधी होणार ते सगळ.......मानस वैतागत बोलला...

अरे हो रे करतो चार दिवसात........सुरज

चार दिवसात करायलाच लागणार आहे कळल काय.......मानस

हो रे.......सुरज

बर गाईज ऐका ना.....दीच्या लग्नाला आठच दिवस राहिलेत.....त्यामुळे मी आता लग्न होऊपर्यत कॉलेजला येणार नाहीये...श्वेता

कधी पासुन येणार नाहीयेस तु....मेघना

उदया पासुन येणार नाहीये.....श्वेता

बर चालेल......मेघना

पण तुम्हाला लग्नाला यायच आहे....आणि तयारीला पण...श्वेता

हो ग....नक्कीच येणार.....मेघना

बर मग मी येवु का.....मला खरेदीला जायच आहे.....सगळे वाट वाहत असतील...श्वेता

हो चालेल.......ये तु.........मानस

ओके बाय गाईज......श्वेता

बाय.....सगळे एकदम बोलतात......

श्वेता आठ दिवस येणार नाही म्हटल्यावर सुरजचा चेहराच पडतो......

मानस माझ प्रोजेक्टच काम खुप राहिल आहे...मग मी एक काम करु का......सुरज

काय......मानस

आठ दिवस मी कॉलेजलाच येत नाही.....ते पुर्ण करुन येतो कॉलेजला...सुरज

सुरज अस बोलल्यावर मानस व मेघना एकमेकांकडे पाहतात.......पण जास्त काही न बोलता.....ते सुरज हो बोलतात

बर चालेल पण लवकर पुर्ण कर....ओके......मानस

हो चालेल.....मग मी निघतो ओके.......बाय......सुरज

हो बाय........मेघना व मानस

बग मी बोलले होते ना तुला........आता तर माझ पटल ना...मेघना

काय पटल.....काही पण असत तुझ.....मानस

अरे.....आता तु स्वत:च पाहिलास ना...कधी आपल्यातला एक ही घास खायला न देणारा सुरज चक्क श्वेता तु खा म्हणाला भजी......आणि आता तर श्वेता आठ दिवस कॉलेजला येणार नाही म्हटल्यावर तो पण आठ दिवस येत नाहीये कॉलेजला........मेघना

अग काय मेघना तु पण....असच श्वेता खुप मागे लागली होती ना मी खाणार म्हणुन खा म्हणाला असेल........आणि प्रोजेक्टच काम त्याच काहीच पुर्ण नाहीये.......आणि मी ओरडलो ना  त्याला म्हणुन तो तस बोलला असेल......मानस

तस नाहीये रे मानस......ऐक ना माझ थोङ.......मेघना

तु सोड हा विषय.....आपल्याला आठ दिवस एकांत मिळणार आहे त्यांचा  विचार कर ना.......मानस मेघनाला डोळा मारत बोलतो.....

तु सुधारणार नाहीस.....मेघना मानसला फटका मारत बोलते.....चल आता लेक्चरला.....मेघना

****

बघता बघता कधी पाच-सहा दिवस होतात ते कळलच नाही......हया पाच सहा दिवसात मानस व मेघनाला छान वेळ मिळाला एकमेकांना समजुन घ्यायला.........

ये मानस सुरज अजुन आला नाहीये आज लास्ट डेट आहे प्रोजेक्टच पेपर जमा करायचे......मेघना

अग येईल मी फोन केला होता आलोच म्हणाला मला.....मानस

अरे हा बग..आलाच....मेघना

अरे किती वेळ.....मानस

सॉरी सॉरी.....ट्राफिक लागल रे त्यामुळे वेळ झाला.......सुरज

बर पेपर दे पटकण सबमिट करायचे आहेत....मानस

हो घे......सुरज

सगळे पेपर व्यवस्थित सेट करुन मॅडमांच्याकडे जमा करायला जातात.....

तुम्ही प्रोजेक्टमध्ये किती जण आहात.....फडणीस मॅडम

आम्ही चार जण आहोत मॅडम...मानस

मग तुम्ही तिघेच आहात......मग मी प्रोजेक्टच पेपर नाही जमा करु शकत.....जमा करताना सगळेजण असावे लागतात.....फडणीस मॅडम

मॅडम श्वेताच्या बहिणच उदया लग्न आहे त्यामुळे.....ती येवु शकत नाहीये.....मेघना

लग्न उदया आहे ना...मग फक्त पेपर सबमिट करण्यापुरत येवु शकते ना ती...सगळेजण आल्याशिवाय मी पेपर जमा नाही करु शकत.......तुम्ही येवु शकता....फडणिस मॅडम.

सगळे बाहेर येतात......मानस आता काय करायच.....मेघना

काय करणार श्वेताला बोलावायलाच हव त्याशिवाय पर्यायच नाहीये.....थांब मी तिला फोन करतो...मानस

ओय कोणला फोन करताय..........श्वेता

अरे तु इथे कशी काय.........मेघना

मला सुरजने फोन केला होता ते पेपर सबमिट करुन घेत नाहीयेत म्हणुन.....मग काय आले......श्वेता

अरे हयाने काहिच कस बोलला नाही......मानस

अरे आता पाच मिनिटापुर्वी फोन केला होता.....मी लकीली थोडया खरेदीसाठी इथेच बाजुच्या मार्केटमध्ये होते त्यामुळे लवकर आले.....श्वेता

बर झाल....चला पहिला सबमिट करुया......मेघना

सगळे जाऊन पेपर सबमिट करुन येतात.......

फायनली यार.....पेपर तर सबमिट झाले...मेघना

हो ना.........सुरज

बर गाईज उदया तुम्ही लवकर या हा लग्नाला.......आता मी निघते आई वाट पाहतेय माझी...श्वेता

***

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all