बंध प्रेमाच्या सहवासाचे....भाग 21

(हा चांगली गोष्ट आहे.......बर तुझ्या आईशी बोल.......माधवराव मेघना तिच्या आईशी बोलत बोलत पुढे जात असते ब

(हा चांगली गोष्ट आहे.......बर तुझ्या आईशी बोल.......माधवराव

मेघना तिच्या आईशी बोलत बोलत पुढे जात असते बोलण्याच्या नादात ती खुप पूढे निघुन जाते......

तिथेच बाजुला काही मुलं बसलेली.....आणि ती मेघनाला खुप घानेरडया नजरेने पाहत होती...पण मेघनाच हयाच्याकडे लक्षच नव्हत ती आपल्या बोलण्याच्या नादाच असते....)

आता पुढे.....

खुप वेळ झाला ही मेघना आजुन कशी काय आली नाहीये...मानसला आता तिची काळजी वाटू लागली....

हो रे बग ना किती वेळ झाला.....एवढ काय बोलत आहेत तिचे बाबा...काय माहित...श्वेता

तुम्ही थांबा इथेच मी बघुन येतो.......मानस ती कुठे आहे ते पहायला जातो......

मंदिरात सगळीकडे बघतो पण ती कुठेच दिसत नाही....बहुतेक इथे खुप आवाज आहे त्यामुळे बाहेर गेली असावी.......बाहेर जाऊन बघतो......मानस

मेघना आईशी बोलुन झाल्यावर मेघना जायला मागे वळते........ती मुल तिच्या मागे येवुन थांबलेली असतात.....

ती त्यांना बघुन खुप घाबरते.....तिला दोन मिनिट काय कराव सुचेनाच........ती थोड बाजुच्या साईडने जाऊ लागली तर त्यातील एक मुलगा तिचा रस्ता अडवतो....

अहो काय करताय जाऊ दया मला.......अस म्हणत मेघना दुसऱ्या साईडने जाऊ लागली.......परत त्यातील दुसरा मुलगा तिचा परत रस्ता अडवतो.....अस एक एक करत....सगळे तिच्या भोवती गोल करुन तिची छेड काढु लागले......मेघना आता जोर जोरात ओरडत होती....‍ ती रडायला लागली पण ती बोलत खुप आउट साईडला आली होती त्यामुळे तिचा आवाज मंदिरापर्यत जातच नव्हता.......

प्लिज सोडा मला......काय करताय तुम्ही.........कोणी आहे का.......वाचवा.......मेघना जोरजोराने ओरडत होती पण आजुबाजुला कोणीच नव्हत......मेघनाला जास्तच रडायला येवु लागल.....

तु किती पण ओरड इथे कोणीच नाही येणार............प्लिज जाऊदया ना मला.. मेघना त्यांना विणवन्या करत होती पण त्या निर्लज मुलांच्यावर काहीच परिणाम होत नव्हता.....

मेघना...........एकदम तिला आवाज येतो........पाहते तर मानस समोर उभा असतो......

मानस.........मानस...प्लिज वाचव मला........मेघना

मेघना तु रडू नकोस मी आहे ना........मानस

ए हिरो तु काय करणार आहेस......आम्ही कितीजण आहोत बग...तु एकटा काय करणार.......

काय करणार ते सांगतो ना आता तुम्हाला.........मानसला बाजुलाच एक बांबु पडलेला दिसतो.....तो ते उचलतो व त्या मुलांना त्याने मारायला लागतो.......

ती मुल मानसला पण मारयचा प्रयत्न करत असतात पण मानस खुप चिडलेला असतो.........तो त्या पाच जणांना पण ऐकत नव्हात.......त्याचा तो अवतार बघून ती मुल तिथुन पळुन जातात......

मेघना तु ठिक आहेस ना त्यांनी काही केल नाही ना तुला......मानस मेघनाला विचारत असतो....पण मेघना खुप घाबरलेली असले......ती पटकण येवुन मानसला मिठी मारते......

मानसला दोन मिनिट काहीच कळेना...........पण तिला सावरण जास्त गरजेच होत......मग मानस तिला थोड धीर देत बोलतो........मेघना अग काही झाल नाहीये हे बग ती मुल गेली......शांत हो बघु.......पण मेघना खुप हुंदके देत रडत होती........मग मानस तिला रडु देतो........निदाण रडली तर तिची भिती तर थोडी कमी होईल.........थोडयावेळाने मेघना शांत होते......तेव्हा तिच्या लक्षात येते...कि ती मानसच्या मिठीत आहे.........लक्षात आल्या आल्या ती बाजुला होते.....

मेघना तु ठिक आहेस ना...........मानस

हो आहे.......मेघना

मानस तीला आपला रुमाल काढुन देतो......मेघना तिचे डोळे पुसते...

अरे काय यार आधी ही मेघना गायब झाली आणि हा मानस तिला बघायला गेलाय तर हा ही गायब.......श्वेता

चल आपण बघुन येवु काय चालच हयांच.........सुरज

मानस मेघनाला शांत करायचा प्रयत्न करत असतो......मेघना खुप घाबरलेली असते त्यामुळे ती रडत होती......

श्वेता व सुरज शोधत बाहेर येतात....त्यांना थोडया अंतरावर मानस व मेघना दिसतात....ते तिकडे येतात

ए काय यार केव्हाची आम्ही वाट पाहतोय........अस म्हणत श्वेता पुढे येते........श्वेताला पाहुन मेघना तिला मिठी मारते......आणि मोठयाने रडायला लागते..........

अग काय झाल का रडतेयस तु........काय झाल काही तरी सांग ना......बर तु शांत हो शांत हो पाहु.......पण मेघना काही केल्या रडायची थांबतच नव्हती........

मानस काय झालय एवढी का रडतेय ही........तुमच भांडण झालय का......काही तरी सांगा यार टेन्शन येत आहे आता......श्वेता

हो मानस तु तर सांग काय झालय........सुरज पण काळजीने विचारतो........

मग मानस झालेला सगळा प्रकार सांगतो.......

काय.......? मेघना शांत हो ग......ती मुल गेली ग...आम्ही आलोय ना आता काही नाही होणार.......श्वेता

मेघना थोड शांत होत बाजुला होते......

बर आपण थोडा वेळ कुठे तरी बसुया का........मेघनाला पण थोड बर वाटेल.....श्वेता

हो हो बसुया.....इथे एक हॉटेल आहे बाजुला तिथे जाऊया....मानस

सगळे हॉटेलमध्ये जातात मानस मेघनाला पाणी देतो......मेघना पाणी घेते पण शांतच असते.....काहीच बोलत नाही.......

मेघनाला अस पाहुन मानसला खुप वाईट वाटत....तो तिथुन उठुन बाहेर येतो.......मानसला अस जाताना पाहुन सुरजही त्याच्या मागे जातो.....

मानस स्वत:वर राग काढत असतो....मी तिच्या सोबत गेलो असतो तर हे झालच नसत.....अस म्हणुन त्याने जोरात आपला हात भिंतीवर मारला......एवढया जोरात की त्याच्या हाताला लागल......

मानस काय करतोय तु....वेडा आहेस का.......हाताला केवढ लागल बग ते........सुरज

सुरज मी जर मेघना सोबत गेला असतो तर हे झालच नसत....मानस

मानस तु स्वत:ला का दोष देतोयस..आपल्याला हे माहीत असत तर आपण मेघनाला एकटीला जाऊ  दिल असत का...तु उगाच सगळ स्वत:वर नको घेवुस.........चल आत चल थोडा चहा घे चल शांत वाटेल......सुरज

दोघे आत येतात......सुरज सगळयांना चहा घेवुन येतो.......

हे घे मेघना चहा घे..........मानस तु पण घे........सुरज

सुरज नकोय मला तुम्ही घ्या.......मेघना रडवेला चेहरा करत बोलते.......

मेघना थोडासाच तर आहे घे ना तुला बर वाटेल.....श्वेता

खरच नको मला....मेघना

मेघना आमच्यासाठी प्लीज........मानस......

बर घेते.......मेघना

चहा घेतल्यानंतर थोडा वेळ तिथेच बसतात.......मेघना सुध्दा आता थोडी शांत झाली होती...

मेघना बाकिचे पॉईन्ट आपण उदया पाहुया का.....तुलाही थोड बर वाटेल......मानस

हो असच करुया.....मेघनाला बर वाटेल.......श्वेता

अरे नाही नको....जाऊया आपण पुढचे पॉईट बघायला.........मेघना

अग पण......श्वेता

मी ठिक आहे........नका काळजी करु तुम्ही.........मेघना

नक्की जाऊया ना.......तुला नको वाटल तर सांग आपण थांबु .......मानस

हो सांगेन आता जाऊया चला......मेघना

सगळे पुढच्या पॉईन्टला जातात......

विशाळगड, पारगड

कोल्हापुरपासून ९० किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. शाहूवाडी तालुक्यात हा किल्ला असून गडाच्या चोहोबाजूने मोठे खंदक आहेत. गडावर चार दरवाजा, तळे, वृंदावने, टकमक कडा, रामचंद्र निळकंठ यांचा जुना राजवाडा, हजरत रेहान मलिक दर्गाह, पाताळनगरी आदी ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. निसर्गाची उधळण असलेला पारगडा किल्ला चंदगड ते तिलारी मार्गावर आहे. चिरेबंदी पायऱ्या, डोंगरदऱ्या, हिरवीगर्द झाडी, निरव शांतता या परिसराचे वैशिष्ट्य आहे.

सगळे विशाळगडावर पोहचतात......विशाळगड निरखुन पाहत असतात......विशाळगडाची माहीती घेत असतात.....पण मेघनाच कशातच लक्ष नव्हत ती शांत शांतच होती...

***

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all