बंध प्रेमाच्या सहवासाचे......भाग -3

बंध प्रेमाच्या सहवासाचे......भाग 3 (थॅक्स आई..... आई.... बाबा आले नाहीत अजुन........ मेघना अग त्यांना आज याय??

बंध प्रेमाच्या सहवासाचे......भाग 3

(थॅक्स आई..... आई.... बाबा आले नाहीत अजुन........ मेघना

अग त्यांना आज यायला वेळ होणार आहे.....तु यायच्या आधीच त्याचा फोन आलेला.....जेवणापर्यत येतो म्हणालेत....

बर चालेल...मग मी पण जेवायलाच बाहेर येईन....)

आता पुढे.......

हो चालेल मी पण जेवणाच बघते आता.......तुला काही हव असेल तर सांग मी बनवते......सुमनताई

काही नको आई तुला हव ते बनव...चालेल मला........

मेघना स्टडी करत असते......त्या झेरॉक्स मधील एका पेजच झेरॉक्स व्यवस्थित प्रिंन्ट झालेल नसत.....अरे हे काय आता......मी स्टडी कशी करु.......आणि गडबडीत मी श्वेताचा नंबर पण घ्यायला विसरले.........

बर जाऊदे हा टॉपीक उदया करते......आज पुढचा टॉपीक करते.......आणि उदया कॉलेजमध्ये गेल्यावर श्वेता कडुन घेईन परत नोट्स...

थोडयावेळात......दाराची बेल वाजते.....सुमनताई दार उघडतात......

आलात तुम्ही....खुप दमलेले दिसताय........सुमनताई

हो आज खुप काम होत.......माधवराव

बर तुम्ही फ्रेश होवुन या.....जेवण तयारच आहे.....सुमनताई

बर चालेल........मेघना काय करतेय......माधवराव

 परवा तीची टेस्ट आहे...स्टडी करतेय......सुमनताई

बर बर...मी आलोच फ्रेश होवुन...... माधवराव

मेघना....जेवायला ये ग बाबा आलेत बग..... सुमनताई

हो आई आलेच........

मी मदत करते आई तूला.....मी जेवण गरम करते.....तु ताट लावुन घे डायनिंग टेबलवर.... मेघना

हो चालेल.... सुमनताई

मेघना जेवण गरम करुन टेबलवर आणुन ठेवते....तोपर्यत माधवराव फ्रेश होवुन येतात.......

सगळे एकत्र जेवायला बसतात.....

मेघना कसा होता कॉलेजला पहिला दिवस.........

छान होता बाबा.....मेघना

टेस्ट आहे ना तुझी........झाली का तयारी....माधवराव

हो बाबा बऱ्यापैकी झाली आहे......बाकीची उदया करेन.......मेघना

बर......माधवराव

सगळे जेवन आवरुन झोपायला जातात......

दुसऱ्या दिवशी मेघना आवरुन कॉलेजला पोहचते.......

कॉलेजमध्ये आल्यावर मेघना श्वेताला शोधत असते.....पण तिला कुठे दिसतच नाही....

तेवढयात तिला समोरुन मानस येताना दिसतो........ती त्याला हाक देते....मानस......

तसा मानस लगेच तिच्याजवळ येतो.........

मेघना तु बोलवलीस........मानस

हो अरे......तु श्वेताला कुठे पाहील आहेस का.....केव्हा पासुन शोधतेय तिला......

आज श्वेता कॉलेजला आली नाही......तिच काही तरी काम होत.....मानस

काय........? आता मी नोट्स कसे घेवु तिच्याकडुन....

मानस मला तिचा फोन नंबर देशील का.....?

हो देतो ना.....हे घे हा नंबर आहे बग...मानस

मेघना श्वेताचा नंबर घेते......

काही झालय का मेघना.......

अरे ते मी काल नोट्सचे झेरॉक्स काढले होते ना......त्यातील एक पेज ची प्रिन्ट व्यवस्थित आली नाहीये......मग परत श्वेता कडुन नोट्स घेवुन झेरॉक्स काढणार होते.......

एवढच होय....मग त्यासाठी श्वेताच कशाला हवी माझ्याकडे आहेत की नोट्स मी देतो की तुला...म्हणजे तुला चालेल ना....?

हो का नाही चालनार......दे मग तु... मी लगेच झेरॉक्स काढुन आणते....

तु कशाला जातेस.....थांब मी आणुन देतो....

अरे नको जाईन की मी.....

देतो मी.......फक्त कोणत पेज आहे ते सांग मी 5 मिनिटात आणतो.......

बर...

मेघना त्याला कोणत पेज आहे ते सांगते व मानस झेरॉक्स मारुन आणायला जातो.....

मानस पटकन जाऊन झेरॉक्स मारुन आणतो.......कारण देशमुख सरांच लेक्चर असत.....

हे घे मेघना आणले काढुन झेरॉक्स.......थॅक्स मानस......

ऑलवेज वेलकम मेघना........

बघता बघता सगळे लेक्चर संपतात...

सगळे घरी जायला निघतात.....मेघनाही जात असते तेवढयात मानस तिथे येतो........

मेघना उदयासाठी बेस्ट लक.......

ओ...थॅक्स मानस. तुलाही बेस्ट लक....

थॅक्स्‍  मेघना..........मानस

मेघना घरी जाते......आणि राहीलेला स्टडी करत असते.......तेवढयात तिच्या लक्षात येत की श्वेताला फोन करुया.....आज आली नाही.....उदया तर येणार आहे का ते बघते.......

हॅलो श्वेता........मेघना.

हा बोलतेय.......आपण कोण...श्वेता

अग मी मेघना बोलतेय........मेघना

हा बोल ना मेघना....तुला कसा काय माझा नंबर मिळाला......श्वेता

मानसकडुन घेतला नंबर........मेघना

ओके ओके.....हा बोल ना काय म्हणत होतीस......श्वेता

अग आज कॉलेजला आली नाहीस ना म्हणुन कॉल केला......मेघना

हो ग थोड काम होत त्यामुळे नाही आले.......श्वेता

बर........उदया येणार आहेस ना.........टेस्ट आहे उदया लक्षात आहे ना...मेघना

हो ग आहे लक्षात......येणार आहे उदया.......श्वेता

स्टडी झाला का.......मेघना

हो करत आहे बग..तुझा.......श्वेता

मी पण करत आहे स्टडी........मेघना

बर उदया भेटु........बाय....श्वेता

ओके बाय.......मेघना

दुसऱ्या दिवशी मेघना लवकर आवरुन कॉलेज मध्ये येते........क्लासमध्ये येवुन ती थोड वाचन करत असते......

ये मेघना लवकर आली आहेस.......श्वेता

हो ग आले लवकर.....परत टेस्टला उशीर व्हायला नको.....मेघना

डिसकशन करुया का थोङ..........श्वेता

हो चालेल ना......मेघना

दोंघी टेस्टच डिसकशन करत असतात......

हे काय करताय........मानस व सुरज त्याच्याजवळ येत बोलतात

एवढ कशाला टेन्शन घेताय....सुरज

अरे टेन्शन घेत नाहीये फक्त डिसकशन करत आहोत......श्वेता

मेघना झाला का स्टडी......मानस

हो झालाय थोडाफार...तुझा झालाच असेल ना......मेघना

हो अलमोस्ट झालायच....मानस

तेवढयात देशमुख सर आले अस म्हणत काही मुल मुली क्लास मध्ये येतात....

मग मानस व सुरज आपल्या बॅन्च वर जावुन बसतात.....

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all