बंध प्रेमाच्या सहवासाचे...भाग 14

बंध प्रेमाच्या सहवासाचे......भाग 14 (अरे हो की माझ घडयाळाकडे लक्षच नाही.........तुम्ही आवरुन या तुम्हाल

बंध प्रेमाच्या सहवासाचे......भाग 14

(अरे हो की माझ घडयाळाकडे लक्षच नाही.........तुम्ही आवरुन या तुम्हाला चहा करते तोपर्यत.....सुमनताई

बर आलो आवरुन........मेघना कुठे दिसेना......माधवराव

आ......आहे की तिच्या रुममध्ये........सुमनताई थोडया दचकुन बोलतात....

बर.......माधवराव)

आता पुढे......

बाबा आले वाटत.........पण मानसला त्यांनी पाहिल नसेल ना.......मी आत आल्यावर दोन मिनिटातच बाबा आलेत.....मेघनाला टेन्शन आल...पण आता हयाचा विचार करुन काय फायदा आपण त्याला फोन करुन विचारुच शकत नाही........मेघना

मेघना चहा घे ये.......सुमनताई बाहेरुन आवाज देतात..........

हो आले आई...........मेघना

बाहेर गेल्यावर तर समजेलच बाबांच्या बोलण्यावरुन.....मेघना बाहेर जाते व आई कडुन चहा घेवुन डायनिंग टेबल येवुन बसते......तिच सगळ लक्ष माधवराव काय बोलतात का हयाच्याकडे होत......

दहा पधंरा मिनिट झाल तरी माधवराव काही बोलले नाहीत.......बहुतेक बाबांनी पाहील नाही वाटत मानसला....‍थॅग गॉङ......वाचले...

दुसऱ्या दिवशी मेघना डायरेक्ट श्वेताच्या घरी पोहचते.....मानस व सुरज आधीच आले होते......

अरे माझ्या आधीच आला आहात की........मेघना

अरे हो डेकोरेशनच काम व्हायला नको का.....सुरज

हो का......लेक्चरला एवढया गडबडीने जातोस काय.........मेघना त्याला चिडवत म्हणाली.......

सुरज तोंड वाकड करत......असुदे घे.........

बर चला करुया ना पुढच डेकोरेशन..........मानस

हो हो चला करुया........मेघना

सगळे बाकिची राहीलेले डेकोरेशन करु लागले........मेघना मानस व सुरजला कस करायच ते सांगत होती......

अचानक मेघनाच्या लक्षात येत की आपण गिफ्ट तर आणलच नाही.........ती आजुबाजुला बघते श्वेता आहे का ते.....कारण तिला कळल तर ती गिफ्ट आणु देणार नाही........ती कुठे दिसत नाही ते बघुन मेघना मानस जवळ जाते......

मानस ऐक ना.......आपण हया डेकोरेशनच्या गडबडीत श्वेताच्या दी साठी गिफ्टच घेतल नाही....मेघना

अरे हो की लक्षातच राहील नाही.......मग आता कधी आणायच...डेकोरेशनला व्हायला अजुन वेळ लागणार आणि तुला पण संध्याकाळी लवकर जाव लागणार ना........मानस

थोड डेकोरेशनच साहित्य आणाव लागणार आहे त्यावेळी आणुया ना.....मेघना

हो चालेल मग लगेच जाऊया का......परत राहुन जायला नको......साहित्य पण नाही म्हणुन डेकोरेशनच काम पण रहायला नको........मानस

बर चालेल मग चल पटकन जाऊन येवुया......मेघना

हो जाऊया.....श्वेताला एकदा सांगुया की.......मानस

हो थांब मी आले सांगुन........मेघना

श्वेता तिच्या रुममध्ये बाकिची तयारी करत होती......मेघना तिच्या रुममध्ये जाते.......

श्वेता ऐक ना डेकोरेशनच थोड सामान आणाव लागणार आहे......मग मी आणि मानस जाऊन पटकन घेवुन येतो........मेघना

बर चालेल.....मी यायला हव का ग.....श्वेता

अग नको कशाला आम्ही आणतो की जाऊन.......तु बाकिची तयारी कर.....आम्ही थोडयावेळात जाऊन येतो.....मेघना

बर चालेल........श्वेता

मेघना श्वेताला सांगुन खाली येते.....मानस मी सांगितले श्वेताला चल निघुया......मेघना

ए सुरज आम्ही थोड सामान आणायला जातोय तु ते राहीलेल काम कर आम्ही आलोच........मानस

बर पटकन या......सुरज

मानस व मेघना दोघे निघतात.........

सुरज राहीलेल काम त्याला जमेल तस करत होता..........थोडयावेळात मानस व मेघना येतात....

सुरज काही तरी करत होता.........मानस व मेघना त्याच्याकडे बघुन हसायला लागले.......

मेघना हसत सुरज काय करतोयस तु......

बग ना यार हया लायटिंगच्या माळांची एकमेकात गुंतागुंत झाली आहे....केव्हा पासुन सोडवत आहे पण सुटतच नाही.......सुरज वैतागत बोलला

तसे मेघना आणि मानस परत मोठयाने हसु लागले........

ए काय तुम्ही हसताय काय मला......करा मग तुम्हीच...मी जातो बाहेर.......सुरज चिडुन बाहेर जात असतो....

ए बास नोटंकी.........चल बाकीच काम करुया वेळ खुप कमी आहे......तु ते बाकीच कर मी लायटिंगच बघते.....मेघना

बर चालेल...सुरज

मेघना लायटिंगच्या माळांची गुंतागुंत सोडवत होती...........पण तिला एकटीला ते सुटतच नव्हती......

काय झाल मेघना सुटत नाहीये का गुंता.....मानस

हो रे सुटतच नाहीये.......सुरजने आणखीनच गुंता वाढवुन ठेवलाय.......मेघना

थांब दोघे मिळुन सोडवुया.........मानस

बर चालेल......मेघना

दोघे मिळुन गुंता सोडवतात..........हुश्श्श्श्शश्श्श्श्‍ झाल एकदाच......मेघना

बर मी बाकीच काम करु का की काही मदत हवी आहे तुला.......मानस

अरे नाही आता माझ मी करते....तु कर तुझ काम.......मेघना

बर.........मानस

मेघना छोटी शिडी घेवुन त्याच्यावर चढुन लायटिंगच्या माळा लावत होती.....त्यातील लायटिंगची माळ तिच्या पायात येते..ती बाजुला करणार इतक्यात तिचा तोल जातो....आणि शिडी वरुन खाली पडणार इतक्यात मानस तिला अलगद पकडतो........

मेघनाने डोळे घट्ट मिठले होते..तिला वाटल ती आता खाली पडणार.......दोन मिनिटांनी ती डोळे उघडते..........तर तिला मानसने  पकडलेले असते......मानसला इतक्या जवळ बघुन तिला ऑक्वड वाटत.....ति पटकन त्याच्या पासुन बाजुला होते......

सॉरी ते तोल गेला त्यामुळे..............मेघना अर्धवटच बोलुन थांबते.......

अग सॉरी काय तु काय मुद्दाम केली आहेस का......इट्स ओके.....मानस

हमम......मेघना

बर चल आवरुया नाहीतर काम होणार नाही आज......उदया एन्गेजमेंन्ट आहे लक्षात आहे ना........मानस

हो हो चल आवरुया..........मेघना

मानस त्याच काम करत असतो पण त्याला मेघना खाली पडताना तिला पकडलेल आठवत असत.........किती घाबरली होती..........पण तितकीच निरागस वाटत होती........मानस मनातल्या मनात बोलत होता..... 

तो मेघनाच्या विचारातच काम करत होता......आणि त्या विचारात त्याने पडदे उलट सुलट करुन ठेवलेले असतात............

मेघना मानसच काम आवरलय का बघायला येते...........मानस.... काय करतोयस तु..........मेघना एकदम ओरडते.......मेघनाच्या आवाजाने मानस भानावर येतो........

अग काय झाल.... का ओरडतेयस..........मानस

का ओरडतेयस काय.....खाली बग जरा........मेघना

अरे यार.... हे काय केल मी............मानस

काय यार तु परत काम वाढवुन ठेवलास...कुठे लक्ष होत तुझ.........मेघना

सॉरी  यार........मानस

***

क्रमश:

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all