बंध प्रेमाच्या सहवासाचे.....भाग 4

बंध प्रेमाच्या सहवासाचे......भाग 4 (हो झालाय थोडाफार...तुझा झालाच असेल ना......मेघना हो अलमोस्ट झालाय?

बंध प्रेमाच्या सहवासाचे......भाग 4

(हो झालाय थोडाफार...तुझा झालाच असेल ना......मेघना

हो अलमोस्ट झालायच..मानस

तेवढयात देशमुख सर आले अस म्हणत काही मुल मुली क्लास मध्ये येतात....

मग मानस व सुरज आपल्या बॅन्च वर जावुन बसतात.....)

आता पुढे......

गुड मॉर्निग स्टुडंन्टस्.....देशमुख सर

गुड मॉर्निंग सर....सगळे स्टुडंन्ट उभे राहातात

टेस्टची तयारी केली आहे ना सर्वानी.........देशमुख सर

ज्यांची स्टडी झालेली असते ते उत्सहाने हो म्हणतात.....व ज्यांची स्टडी झालेली नाही ते तोंड पाडुन हो म्हणतात......

बर टेस्टला सुरु करयच का........देशमुख सर

हो सर......स्टुडन्टस्

टेस्ट 30 मिनिटाची असेल....व 50 मार्क असतली.....सगळेजण एका बॅन्चवर एकएक असे बसुन घ्या...देशमुख सर

सगळे एकएक असे बसुन घेतात.......देशमुख सर टेस्ट पेपर वाटतात व टेस्टला सुरवात होते....

30 मिनिटात टेस्ट संपते.......सर पेपर गोळा करतात.....उदया मार्क सांगितले जातील......देशमुख सर

सगळयाना सुचना देवुन सर क्लासमधुन बाहेर जातात......

मग सगळयाची चर्चा सुरु होते कसा गेला पेपर किती मार्क पडतील......

मानस व सुरज श्वेता व मेघना जवळ येतात......

कसा गेला पेपर तुम्हाला....मानस

छान गेला...श्वेता व मेघना

बर कॅन्टिनला जाउया का......?सुरज

हो चालेल......चल मेघना.......श्वेता

अग नको तुम्ही जाऊन या......मेघना

का तुला का यायच नाहीये लेक्चर तर झाले आहेत.....श्वेता

मेघना आम्ही आहोत म्हणुन अस म्हणतेयस का.....मानस

अरे अस काही नाही....तुम्ही पुढे जा आणि ऑर्डर करा आम्ही येतो 5 मिनिटात...श्वेता

बर चालेल.....मानस

मानस व सुरज गेल्यावर श्वेता मेघनाशी बोलते......

मेघना काय झालय......का नाही म्हणतेयस........श्वेता

श्वेता मी या आधी अस मुलांच्या सोबत एवढ फ्रि वागले नाहीये ग त्यामुळे कम्फर्टेबल वाटत नाहीये.....मेघना

अग वेडे...ही मुल चांगली आहेत ग....मी चांगल ‍ ओळखते ह्यांना.....श्वेता

हो ग श्वेता पण थोडा वेळ ऑक्वर्ड वाटणारच ना.....मेघना

हो  ग पण तु अस टाळाटाळ केलीस तर तुला कम्फटेबल वाटणार का...श्वेता

हो ते पण आहेच.....मेघना

तु मनात अस काही आणु नको निवांत चल......श्वेता

बर चल जाऊया........मेघना

ये हुयी ना बात......श्वेता हसत बोलते...

दोघी कॅन्टीन मध्ये जातात........

आला तुम्ही आता एवढयात कॉफी येईल......मानस

मेघनाला बघुन त्याला खुप छान वाटत........कारण त्याला वाटत होत की ती येणार नाही

कॉफी घेत छान गप्पा मारतात......व नंतर पुढच्या लेक्चरला जातात......

लेक्चर संपल्यावर सगळे घरी जायला निघतात.... सगळयांना उदयाच्या मार्क टेन्शन होत.......

मेघनालाही टेन्शन आल होत.......कारण तिचीही स्टडी एवढी झालेली नसते.....त्यामुळे मेघना अपसेट असते.....

अग मेघना नको एवढ टेन्शंन घेवुस....श्वेता

टेन्शन येत श्वेता......मानस

कोण बोलतय बघा......तुला कसल टेन्शन तु तर टॉपर आहेस.....तुझे स्कोर काय आउट ऑफ असतील.....श्वेता

ए अस काही नाहीये......टॉपर असलो तर काय टेन्शन येत नाही होय...मानस

जाउदे ते उदयाच उदया बघु........श्वेता....

बर बाय गाईज.......उदया भेटु........मेघना

ओके बाय......श्वेता मानस सुरज.......सगळे एकदम बाय बोलतात

मेघना घरी येते.......तिचा मुड ऑफ असतो......

काय झाल मेघना टेस्ट अवघड गेलेय का......सुमनताई

अवघड अशी नाही पण गेलेय बरी.....मेघना

अग चांगले मार्क पडतील बग तुला.......तुझ नेहमीचच आहे.....आधी घाबरतेस आणि नंतर स्कोर सर्वाच्या पेक्षा जास्त असतो.....

हममम.......पण हयावेळी तस नाहीये ना आई 1 महिना लेट आहे ना......मेघना

बर नको टेन्शन घेवुस....चल जेव चल.......सुमनताई

दुसऱ्या दिवशी सगळे लवकर येतात......कारण सगळयांनाच ‍किती मार्क पडतील हयाच टेन्शन होत.......आणि त्यापेक्षा जास्त सर मार्क कमी पडल्यावर काय पनिशमेंन्ट देतील हयाच टेंन्शन जास्त होत

मेघनाही श्वेताजवळ येवुन बसते........श्वेता तुला टेन्शन आल नाही का ग.....मेघना

अग टेन्शंन घेवुन काय होणार आहे......जे होणार आहे तेच होणार....मग टेन्शन घेवुन कशाला मुड ऑफ करायच.........

येस राईट.....मानस व सुरज त्याच्या जवळ येत बोलतात......

मेघना  तु अजुन त्याच विचारात आहेस.....नको टेन्शन घेवुस.........मानस

मानस तस नाही पण थोड टेन्शन तर येणारच ना......मेघना

सगळयांच डिसकशन चालु असत तेवढयात देशमुख सर क्लासमध्ये येतात.......तसे सगळे आपापल्या बॅन्चवर जाऊन उभे राहतात.....

गुड मॉर्निग सर........

गुड मॉर्निग ऑल ऑफ यू.........हॅव अ सिट......सगळयांना मार्क ऐकायची गडबड झाली असेल......पण जास्त वेळ  न घालवता सगळयांचे मार्क सांगतो.....पहिला टॉपर कोण आहे ते सांगतो व नंतर सगळयांचे मार्क सांगेन..देशमुख सर

सर टॉपर काय मानसच असणार....एक मुलगा मध्येच बोलतो....

तसे सर हासायला लागले.........हयावेळी टॉपर दोन आहेत......दोघांना सेम मार्क पडले आहेत......देशमुख सर

दोन टॉपर आहेत ऐकल्यावर सगळे कुजबुज करायला लागले......

दुसरा टॉपर कोण असेल.....आजपर्यत मानसशी कोणीच बरोबरी केली नाही......कोण असेल हा...असे सगळी कुजबुज सुरु होती......

शांत रहा....सगळयांना ते नाव ऐकायच असेल.....हो ना..देशमुख सर

हो सर कोण आहे दुसरा टॉपर........स्टुडंन्ट सगळे एकदम ओरडतात

पहिला टॉपर आपला मानस मोहीते आहे.......देशमुख सर

सर ते आम्हाला सगळयांना माहीतच आहे......पण दुसरा टॉपर कोण आहे.......ते सांगा ना...स्टुडंन्ट ओरडत होते.....

बर बर सांगतो ऐका.....दुसरा टॉपर एक मुलगी आहे.......देशमुख सर

मुलगी बोलल्यावर मुलींच्यामध्ये चर्चा सुरु झाली...कोण असेल ती.....वगेरे

मुलींनो शांत रहा.....देशमुख सर

आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा.आवडल्यास लाईक व शेअर करा आणि हो....तुमची प्रतिक्रिया खुप मोलाची आहे त्यामुळे कमेन्ट्स करायला विसरु नका.....

🎭 Series Post

View all