आपल्या बोलण्याने काय होते !!!

Bolnayane
कल्पना काकू आणि अवनी काकू ह्या सगळ्यात लहान जावा होत्या शैला ताईच्या दोघी मनापासून कधीच चांगले चिंतत नसत शैलाचे, आणि तिच्या मुलीचे जानवीचे. नाते टिकवायचे म्हणून टिकवायचे असे काहीतरी होते.

खरे तर कल्पना आणि अवनी ह्या दोघी चुलत बहिणी जावा आणि शैला ही म्हणूनच एकटी पाडली जात.

शैलाचे पती मोठा अधिकारी, यांचे ही चांगल्या कॉलेज मध्ये प्राध्यापक होते, चंगळ होती पैस्याची ,ह्या ही नौकरीला, फक्त शैला ही गृहिणी होती. सुगरण होती ती,आणि ह्या फक्त थोडे इकडचा तांब्या तिकडे केला की झाले ह्यांचे काम .मग मोकळ्या नवऱ्यासोबत रात्रीची सैर करायला, फिरायला, walking करायला.

त्या दोघींना मोठी जावं सगळ्यांच्या पुढे पुढे करणारी वाटत होती, सगळ्यांना मुठीत ठेवणारी जादूगार वाटत होती, म्हणून की काय त्या तिचे कधी ऐकत नसत.तिला चार चौघात कशी फजिती होईल हे प्रकरर्षाने बघत. पण होई सगळे उलटेच ,तिची फजिती होण्या ऐवजी तिचे नावच निघत इतर नात्यांमध्ये.त्यात ह्या दोघी उलट बदनाम होत.

मोठी ही माणुसकीला खूप चांगली आणि छोट्या नेहमी कामचुकार म्हणून प्रसिद्ध होत होत्या, मोठीला नातेवाईक आवर्जून त्यांच्या परिवारातील आपली एक समजून बोलवत असत,आणि ह्या दोघींला टाळत.

कल्पना आणि अवनी ह्या प्रत्येक गोष्टीत शैलाला मूर्खांत काढत, जुन्या विचारसरणीची,शिकून काही उपयोग नाही,अजून ही घर आणि आपला संसार सांभाळणारी म्हणून तिला हित कळत नाही असे समजत होत्या त्या.
पण ती मात्र त्या दोघींकडे दुर्लक्ष करत.तिला वाद नको पण अती जवळीक ही नको होती त्यांची,ती कायमच आपल्या माणसांचे हित बघण्यात स्वारस्य दाखवत, मग त्यात ह्या दोघी असो वा त्यांचा परिवार तिने कधीच माघार नाही घेतली, कोणी किती वाईट वागतो ती तिचा चांगुलपणा सोडत नसे.

ह्या दोघी जितके तिचे तिच्या मुलांचे वाईट चिंतत तितके तिचे चांगलेहोतच जात.

शैलाची मुलगी रेवा आता मोठी झाली होती,तिला शिक्षण झाल्या नंतर काका आणि वडील व इतर नातेवाईक तिच्या आईच्या गुणी स्वभावामुळे चांगले स्थळे सुचवत असे.
तर त्यात ह्या दोघी काही ना काही कारण काढून ते स्थळ नकार देत, शेवटी वाईट करतात करता एक अधिकार असलेल्या मुलाचे स्थळ आले आणि तो भले ही अधिकार होता पण घरचा गरीब होता, मग काय काकूंना वाटले, हिला असलेच स्थळ बघून दिले तर हुंडा ही वाचेल आणि मोठे लग्न ही .मुलगा गरीब जरी असला तरी मुलीच्या आई वडिलांना पसंत होता, आणि म्हणूनच त्या दोघी जावांचा निर्णयाला मन दिला. त्या खुश होत्या की तिला असा गरीब नवरा मिळाला, पण त्यांच्या नवर्यांना त्याचे हे कारस्थान माहीत झाले.

त्यांचे कारस्थन त्यांनी हणून पडायचे ठरवले.

आपल्या पुतनीचे चांगले व्हावे,आपल्याला मुलगी नाही ही खंत ही असल्यामुळे,व आपल्या बायकांच्या विचारला मन दिला म्हणून ही आणि त्यांचे कारस्थान हाणून पडायचे ह्या हेतून त्या दोघा काकांनी आपल्या लाडक्या पुतनीच्या नावाने 5 -5 लाख रुपये टाकले होते.?

तिला ह्या पैस्यांचा खूप आधार झाला होता, त्या उलट लग्न रजिस्टर कोरोनामुळे करणे भाग होते,त्यात reception करणे ही टाळले,हा सगळा खर्च वाचून तिच्या नवीन घरासाठी ही बरेच पैसे वाचले होते, नवऱ्या कडील मंडळींनी ही नव दाम्पत्याला घर घेण्यासाठी काही मदत केली होती.आता तिला तिचे घर होते, आणि ती ह्याच्या सगळ्यात सक्षम ही झाली होती.

तिच्या घरात आता सासू सासरे सगळे सोबत रहायला ही आले होते, घरातील आधीच गरिबी आणि गरीब परिस्थिती हटली होती.

कल्पना आणि अवणीने जे व्हावे असे योजिले होते ते काहीच घडलेले दिसत नसल्याने त्यांच्या आनंदावर विरजण फिरले होते. त्यांना आपलीच पुतणी गरिबीत राहील असे जे वाटले होते तसे घडले नव्हते.

त्या दोघींच्या नवऱ्यानी त्यांना आणि त्यांच्या शब्दांना खोटे पाडले होते, वहिनीच्या आणि दादांच्या आनंदावर त्यांची वाईट नजर पडू दिली नव्हती.?