Feb 24, 2024
रहस्य

डिकीतला सस्पेन्स

Read Later
डिकीतला सस्पेन्स

                                    डिकीतला सस्पेन्स   रात्रीचे अकरा वाजले होते. लातूर सोलापूर मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. ग्राम पंचायतीच्या निवडणुकीचा काळ होता, आणि एका  लाल रंगाच्या कार मध्ये कॅश घेऊन चालले आहेत अशी खबर होती. आता पर्यन्त पांच कार चेक करून झाल्या होत्या. रहदारी चालूच होती पण लाल कार नव्हती त्यामुळे पोलिस जरा आळसावून बसले होते. अशातच एक लाल कार येतांना दिसली. पोलिसांनी कार थांबवली.साहेब, कार चेक करायची आहे. आपण जरा बाहेर येता का ?का काय झालं ? दिनेश ने विचारलं.चेकिंग होऊ द्या मग सांगतो आम्ही.ओके. करा चेक.कारचं चेकिंग झालं.बॅग मध्ये काय आहे. उघडा ती.दिनेश नि बॅग उघडली.आता डिकी उघडा. डिकी उघडल्या गेली.साहेब, इकडे या. डिकीत लाश आहे.अं ? काय म्हणतोस काय ? लाश आहे ?हो साहेब, एका मुलीची आहे.साहेब आणि दिनेश दोघेही धावले. डिकीत एका मुलीचा मृतदेह कोंबला होता. पाहून दिनेशला भोवळच आली. कसा बसा कारच्या आधाराने तो उभा राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पण शेवटी पडला, आणि त्यांची शुद्धच हरपली. वेळेकरांनी जवळच्या बाटलीतलं पाणी शिंपडलं. दिनेश ला शुद्ध आली. तो सावरून बसला.साहेब, ही मुलगी, हा काय प्रकार आहे ?ते तुम्ही सांगायचं. कोण आहे ही मुलगी, आणि हिला का मारलं ?साहेब मी ह्या मुलीला ओळखत पण नाही. मी एकटाच नागपुरहून  सोलापूरला जातो आहे.हूं, वेळेकर अजून दोघांना बोलवा आणि मुलीला बाहेर काढा. बॉडी identify करता येण्या सारखं काही मिळतंय का बघा.साहेब, ओळख पटण्या साठी काहीही मिळालं नाही. पण साहेब बॉडीवर  जखमेच्या कुठल्याही खुणा नाहीयेत.ठीक आहे बॉडी पोस्ट माऱ्टेम ला पाठवा. आणि नाकाबंदीचं काम PSI कडे सोपवून इंस्पेक्टर धनशेखर दिनेशला घेऊन पोलिस स्टेशनला  निघाले. पोचल्यावर दिनेशची चौकशी सुरू झाली.हं आता बोला साहेब, तुम्ही कोण, कुठे राहता, कुठून कुठे जात होता, काय काम होतं ? सगळं नीट सांगा.साहेब मी दिनेश घारपुरे. राहणार पुणे. एका खाजगी कंपनीत सीनियर मॅनेजर आहे. नागपूरला मित्रांच्या मुलांचं लग्न होतं म्हणून नागपूर गेलो होतो. इथे सोलापूरला माझ्या दुसऱ्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे म्हणून नागपूर वरून डायरेक्ट सोलापूरला चाललो होतो. मध्येच ही भानगड झाली.नागपूरला कोणाकडे गेला होता ?माझा कॉलेजचा मित्र आहे. सुधाकर केळापुरे, त्यांच्या मुलाचं लग्न होतं.इथे सोलापूरला कोणाकडे ?इथे माझा बालमित्र आहे वैशाख साठे, त्यांच्या मुलीचं लग्न आहे त्या साठी सोलापूरला चाललो आहे.वैशाख साठे म्हणजे साठे वकील ?हो.त्यांचा फोन नंबर असेलच तुमच्याकडे. बोलणं होतं का त्यांच्याशी ?हो. पण तुम्ही असं का विचारता आहात ?त्यांना विचारून खात्री करायला.नको साहेब आज नको. मला इथे रात्रभर अडकवा, पण त्यांना फोन नका करू.का ? ते ओळख देणार नाही अशी भीती वाटते ?नाही. उद्या त्यांच्या मुलीचं लग्न आहे. आत्ता रात्रीचे दोन वाजले आहेत, अश्या वेळेला जर फोन गेला तर तिथे फार विचित्र परिस्थिति निर्माण होईल. कदाचित मुलाकडचे लोक लग्न कॅन्सल पण करतील. मुलीच्या बापाच्या मित्रांच्या कार मध्ये एका मुलीचा मृतदेह सापडतो ही गोष्ट परिस्थितीला काय वळण देईल हे सांगता येणार नाही. साहेब, साठे वकिलांना तुम्हीपण ओळखता, त्यांच्यावर असा दुर्धर प्रसंग यावा असं  तुम्हाला वाटतं का ? साहेब, बिदाई झाल्यावर मुलगी सासरी गेल्यावर उद्या संध्याकाळी फोन करा. तो पर्यन्त मला इथे अडकवा. मला चालेल.हूं. तुम्ही म्हणता ते पटतंय. ओके. आपण थांबू. पण तुम्हाला कुठेही जाता येणार नाही ही लक्षात घ्या.चालेल.धनशेखर वेळेकरांना म्हणाले या माणसाला त्रास देऊ नका हा माणूस विनाकारण अडकलेला दिसतोय. तुम्हाला काय वाटतं ?बरोबर आहे साहेब, माणूस तसा सज्जन दिसतो आहे. पण साहेब सज्जन दिसणारी माणसं सुद्धा अतिशय हुषारीने गुन्हा करतात असा आपला अनुभव आहे.बरोबर आहे तुमचं म्हणण, उद्या सकाळी त्याला बोलतं करायचा प्रयत्न करू. चला बराच उशीर झाला आहे.दुसऱ्या दिवशी सकाळीच धनशेखर वेळेकरांना म्हणाले की हॉस्पिटल मध्ये जा आणि हाताचे ठसे घेतले आहेत का बघा. त्या पोरीनी आधार कार्ड घेतलं असेल तर ओळख पटेल. In the meantime मी दिनेशशी बोलतो.हूं. घारपुरे तुम्ही नागपूरहून सोलापूरला स्वत:च ड्राइव करत आलात.? इतका लांबचा पल्ला होता तर ड्रायव्हर का नाही घेतला ?मला long drive ची सवय आहे आणि आवड पण आहे.रूट काय घेतला ?नागपूर, वर्धा,यवतमाळ ,नांदेड आणि लातूर मार्गे सोलापूर.कुठे कुठे थांबला होता ?वर्ध्याला चहा, यवतमाळला जेवण, नांदेडला  चहा नाश्ता आणि लातूरच्या बाहेर धाब्यावर जेवण बस.ह्या सगळ्या प्रवासात काही संशयास्पद हालचाल तुमच्या मोटारीच्या आसपास दिसली होती का ?काही कल्पना नाही साहेब, एवढ कोण लक्ष ठेवतो ? माझं पण नव्हतं.ठीक आहे. जरा शांतपणे एकेक ठिकाण आठवा जिथे तुम्ही थांबला होता. विचार करा. आणि साहेब आपल्या टेबल वर आले. बाकीची कामं हातावेगळी करत असतांना वेळेकर आले.साहेब, आधार वरून मुलीची ओळख पटली. नीलाक्षी माने नाव आहे. मुलगी पुसदची आहे. तिचा फोन नंबर पण मिळाला. फोन केला पण कोणी उचलत नाहीये. पुसद पोलिसांना कळवलं आहे.गुड. सर्विस प्रोवायडरला लोकेशन विचारा. बघूया कोणाजवळ आहे तिचा फोन.दुसऱ्या दिवशी सकाळी धनशेखरांनी साठे वकिलांना फोन लावला. आणि लगेच पोलिस स्टेशनला येऊ शकाल का म्हणून विचारणा केली.साठे साहेब दुपारी आले. आल्यावर धनशेखरांनी विचारपूस सुरू केली.साहेब, तुम्ही दिनेश घारपुरे यांना ओळखता ?हो, माझा मित्र आहे आणि तो लग्नाला येणार होता पण बहुधा गाडीचा काही प्रॉब्लेम झाला असावा म्हणून येऊ शकला नाही, असं वाटतंय. पण तुम्ही हे का विचारता आहात ? काही बरं वाईट ?नाही तुम्ही समजता आहात तसं काही नाही. हा माणूस सध्या आमच्या कस्टडीत आहे.ओँ , का ?यांच्या गाडीच्या डिकी मध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला.अहो, शक्यच नाही. तुमची काहीतरी चूक होते आहे.वेळेकर दिनेशला घेऊन या. दिनेश नी वैशाखला सर्व सांगितलं. वैशाख जरा विचारात पडला. कोणी तरी दिनेशला अडकवलं हे त्यांच्या लक्षात आलं. दिनेशला वेळेकर घेऊन गेले. वैशाख धनशेखरांना म्हणालासाहेब माझा मित्र असा नाहीये. मी त्याला लहानपणापासून ओळखतो आहे. तो कसा यात अडकला हे कळत नाही. पण हा नक्कीच गुन्हेगार नाही. त्याला डांबून ठेवून काहीच हातात लागणार नाही.वेळेकर आत आले, साहेब, पुसद पोलिसांकडून अपडेट आलंय. त्यांनी नीलाक्षी मानेच घर शोधून काढलय. घराला कुलूप होतं. घराभोवती फिरल्यावर त्यांना एका खोलीतून काही आवाज ऐकू आला म्हणून ते कुलूप तोडून आत शिरले. नीलाचे आई,वडिल हात पाय बांधलेल्या अवस्थेत होते. तोंडात बोळा कोंबला होता. त्यांनी सांगितलं की परवा रात्री चार माणसं घरात घुसली  आणि नीलाला उचलून घेऊन गेले.पहा, साहेब, ही परवा पुसदला घडलेली घटना आहे. माझा मित्र परवा लग्नघरी होता आणि तेही नागपूरला. तो उगाच यात फसला आहे. वैशाख बोलला.मग काय त्याला सोडून देऊ ?मला तरी अस वाटतंय. मी त्यांची गॅरंटी घ्यायला तयार आहे.ठीक आहे, वेळेकर दिनेशला घेऊन या.घारपुरे तुम्हाला साठे साहेबांच्या विनंतीवरून सोडतो आहे. पण जेंव्हा आम्हाला गरज लागेल तेंव्हा इथे हजर व्हायचं. आणि सध्यातरी पुणे सोडून बाहेर जाऊ नका.ठीक आहे साहेब.ओके साठे साहेब, घेऊन जा यांना. पण तुम्ही गॅरंटी घेतली आहे हे  लक्षात असू द्या.पुसद पोलिसांनी नीलांच्या आई,वडिलांना परिस्थितीची कल्पना दिली. त्यांच्या दु:खाला पारावार नव्हता. पोस्ट माऱ्टेम झाल्यावर बॉडी पुसदला पाठवण्यात आली. केस पुसदला ट्रान्सफर करण्यात आली. आता पुसद पोलिस तपास करणार होते. तस दिनेशला कळवण्यात आलं. अन्त्य संस्कार आटपल्यावर दोन तीन दिवसांनी इंस्पेक्टर शेंडे मान्यांच्या घरी गेले.हे सगळं कसं घडलं ?चार माणसं घरात दरवाजा तोडून घुसली. आम्हाला काही कळायच्या आत आम्हाला बांधलं आणि नीलाक्षीला उचलून निघून गेली.कसे दिसत होते ? म्हणजे ऊंची, रंग वगैरे ?चेहऱ्यावर गमछा गुंडाळला होता साहेब. पण हिंदीत बोलत होते.पुसदचे लोक जशी हिन्दी बोलतात तशी, की वेगळी बोली बोलत होते ?वेगळी होती. पण ते फारसे बोललेच नाही त्यामुळे नेमकं सांगता येणार नाही.कोणी तुमच्या वाइटावर होतं का ? नीलाक्षी ने किंवा तुम्ही कोणाला दुखावलं होतं ? कोणी सूड घेण्याचा प्रयत्न करू शकतो का ? नीलांचे कोणाशी प्रेमसंबंध होते का ?नाही साहेब, नीलाक्षी साधी सरळ मुलगी होती. पण एक जण तिच्या मागे लागला होता लग्न कर म्हणून.मग ?नीलांक्षी नी त्याला स्पष्ट शब्दांत नाही म्हंटलं होतं. पण तो पिच्छा सोडत नव्हता. त्यामुळे आताशा ती फार अस्वस्थ झाली होती.काय नाव त्याचं, कुठे राहतो ? काय करतो ?वायरमन आहे. हरीश नाव आहे. जवळच्याच इंदिरा नगर मध्ये राहतो.इंदिरा नगर म्हणजे ते फुकट नगर ?हो साहेब.ठीक आहे. काही प्रगती झाली की तुम्हाला काळवुच. अस म्हणून शेंडे तिथून निघाले.पोलिस स्टेशनला आल्यावर शिपायानी सांगितलं की पुण्याहून पोस्ट माऱ्टेम चा रीपोर्ट आला आहे. शेंडे साहेबांनी रीपोर्ट वाचला. आपल्या असिस्टेंट कडे वळून म्हणालेकरपे वाचा हा रीपोर्ट.साहेब, रिपोर्ट तर भयंकर आहे. गॅंग रेप झालाय. आणि साहेब, रेप केल्यावर मुलीने तोंड उघडू नये म्हणून मग तिला मारून टाकलं.करपे, नीट वाचा. नुसता गॅंग रेप नाहीये, आधी खून आणि मग मृतदेहावर रेप. पोलिसांच्या आयुष्यात काय काय बघायला मिळतं बघा. भयंकर आहे हे सगळं. आता हे नीलाक्षी च्या आई वडिलांना कसं सांगायचं ? काय वाटेल त्यांना ? आपल्या पोरीची एवढी विटंबना त्यांना सहन होईल का ?साहेब, काय साधायचं  असेल त्या बादमाशांना ?करपे मला अस वाटत की त्यांच्या प्लॅनिंग मध्ये खून नसावा. खून चुकून झाला असावा आणि मग घाबरून मृतदेहाची विल्हेवाट लावली. हे लोक सराईत नसावेत. सराईत बादमाशांकडून अशी चूक होत नाही.पण साहेब, माने कुटुंब काही श्रीमंत नाही की ज्यांच्या कडून मोठी रक्कम उकळता येईल. मग अपहरण कशा साठी ?नीलाक्षी गोरी, आणि दिसायला चांगलीच होती. कदाचित रेड लाइट एरिया मधून तर सुपारी दिली नसेल कोणी तरी ?हो साहेब, असच असेल. म्हणूनच खंडणीची मागणी झाली नाही. नाहीतर पळवल्यानंतर पांच सहा तासांतच मान्यांना फोन यायला हवा होता.आपल्याला त्या हरिशला ताब्यात घेतलं पाहिजे. कदाचित त्याचा हात असू शकेल. तुम्ही एक काम करा, त्या रेड एरिया मधून अशी काही सुपारी दिल्या गेली होती का याचा शोध घ्या. आपल खबरी नेटवर्क अॅक्टिवेट करा. आणि तुम्ही निघा आणि हरिशला घेऊन या. मी जाऊन माने कुटुंबाला अपडेट देतो.माने कुटुंबावर जणू काही आकाशच कोसळलं. दोघंही जरा शांत झाल्यावर शेंडे म्हणाले कीनीलाक्षी चे पण हात पाय बांधले होते होते का ?हो साहेब आणि तोंडात बोळा पण कोंबला होता.शेंडे पोलिस स्टेशन ला आले. करपे पण आले होते.हूं करपे काय अपडेट ?साहेब, हरीष एकटाच इथे राहात होता. तो खोलीवर नाहीये. आजूबाजूला चौकशी केली पण कोणालाच काही माहीत नव्हतं. पण एकानी सांगितलं की कोणी काशीनाथ, त्याचा जवळचा मित्र आहे त्याला माहीत असेल म्हणून. तो पण खोलीवर नव्हता. तिथे आपला सांगोळे बसला आहे. काशीनाथ आल्यावर त्याला सांगोळे इथे घेऊन येईल.ठीक आहे. सोलापूर पोलिसांना अपडेट द्या. आणि त्यांना या बाबतीत आणखी काही कळलं असेल तर विचारा.सांगोळे काशीनाथला घेऊन आला.काशीनाथ तू हरीष ला ओळखतो. ?हो. साहेब.तो कुठे आहे ?काय झालं साहेब ? काय केल त्यांनी ?फालतू प्रश्न विचारू नकोस. तो कुठे आहे ते सांग.गोंदियाला गेला आहे साहेब. त्याचं घर आहे गोंदियाला.कशाकरता गेला आहे ?त्याचं लग्न ठरलं आहे अस म्हणत होता साहेब.कोणाशी ? केंव्हा आहे लग्न ?कोणाशी ते नाही सांगितलं. गुपित आहे म्हणत होता.म्हणजे ?मला एवढंच माहीत आहे.तू का नाही गेलास तुझ्या मित्राच्या लग्नाला ?त्यांनी मना केलं. तू येऊ नको म्हणाला.त्याचे अजून कोण कोण मित्र आहेत ?नाही अजून कोणी मित्र असा नाहीये.करपे, गोंदिया पोलिसांना फोन करा आणि काय परिस्थिति आहे त्यांची माहिती काढायला सांगा. हरीश ची फक्त माहिती काढा म्हणावं. त्याला हात लाऊ नका. त्याचं जर खरंच लग्न असेल तर त्यात बाधा नको. आणि ते रेड लाइट एरिया मधून काय सिग्नल येतो ते लवकर बघा.दोन दिवस काही न घडता गेले. शेंडे अस्वस्थ झाले होते. कुठून काहीच मागमूस लागत नव्हता. पण थोड्याच वेळात गोंदिया पोलिसांकडून अपडेट आलं. हरीश च खरंच लग्न होतं. मांडव पडला होता. आणि लग्नाची धामधूम चालली होती. म्हणजे हरीश चा यात काही संबंध नव्हता. एखाद्या मुलीला लग्नाचं विचारणं हा काही गुन्हा नव्हता. मग आता काय ? रेड एरिया मधूनही काही बातमी नव्हती. करपे स्वत: जावून बरीच चौकशी करून आले पण हातात काही लागलं नाही. शेंडे, डेड एंड ला पोचले होते. ते पुन्हा मान्यांच्या कडे जाऊन अजून काही माहिती मिळते का ते बघून आले. पण प्रगती होण्यासारखं काही मिळालं नाही. माने कुटुंब सर्वच बाबतीत अनभिज्ञ होते. नीलाक्षी च्या मित्र, मैत्रिणी, कॉलेज सगळीकडे तपास करून झाला. काही संशयास्पद मिळालं नाही. नीलाक्षी एक सर्व साधारण नाकासमोर चालणारी मुलगी होती, या पलीकडे काही कळलं नाही. फाइल जवळ जवळ बंद झाली होती.साधारण वर्ष उलटलं. कसलीच प्रगती झाली नव्हती. केस जवळ जवळ बंद झाली होती. एकदा सकाळी सकाळीच शेंडे, करपे एका केस च्या संदर्भात तपासासाठी जवळच्याच गावांमध्ये गेले होते. यायला संध्याकाळ झाली होती. दिवसभरात चहा प्यायला सुद्धा फुरसत मिळाली नव्हती. भूक पण लागली होती. करपे म्हणाले साहेब पाणीपुरी खाऊ चहा पिऊ तेवढ बरं वाटेल. समोरच्याच रामभरोसे पाणीपुरी च्या गाडीवर दोघेही थांबले. या दोघांना येतांना पाहून रामभरोसे दचकला. तरी चेहऱ्यावर उसन अवसान तो म्हणालाआइये सहाब, क्या बनावू आपके लीये ?पानी पुरी दो. शेंडे म्हणाले. शेंडे साहेबांच्या नजरेतून त्याचं दचकणं सुटलं नाही. पूर्ण वेळ ते त्यांच्याकडे आपल्या भेदक नजरेने बघत होते. रामभरोसे त्यामुळे अस्वस्थ झालेला दिसला. वरतून साहेब म्हणाले की पानी पुरी इतनी बढ़िया थी की तुम्हारे साथ एक सेल्फ़ी हो जाए, आणि तो नको नको म्हणत असतांना सुद्धा सेल्फी काढली. चहा पिऊन झाल्यावर जीप मध्ये बसल्यावर शेंडे साहेब म्हणाले करपे तुम्ही बघितलं का तो रामभरोसे आपल्याला बघून जाम टरकला होता.साहेब, पोलिस आपल्या कडेच येतांना बघितल्यावर सगळेच घाबरतात.नाही करपे हे नेहमीच घाबरणं वाटत नाहीये. काहीतरी गडबड आहे. नक्कीच दाल मे कुछ काला है.पोलिस स्टेशन वर आल्यावर शेंड्यानी गंगाधर ला बोलावलं. त्यांच्या मोबाइल वर सेल्फी सेंड केली आणि म्हणाले कीया फोटोत जो माणूस आहे त्यांच्यावर लक्ष ठेवा. 24 तास. हा रामभरोसे पणीपुरिवाला आहे. सिग्नल च्या चौकात बसतो. साध्या  कपड्यात जा.काही वेगळं घडलं तर ताबडतोब कळवा.तो गेल्यावर करपे म्हणाले “ साहेब असं काय घडलं की तुम्ही त्यांच्यावर नजर ठेवायला सांगितलं ?”पाणी पुरी खात असतांनाच माझं त्याच्याकडे बारीक लक्ष्य होतं त्यांच्या हालचालीत सहज पणा नव्हता. आपल्याकडे बघत होता आणि अस्वस्थ होत होता. मी एक लॉन्ग शॉट मारतो आहे. काही गडबड असेल तर कळेलच. बघूया.आठ वाजण्याच्या सुमारास गंगाधरचा फोन आला.साहेब, तुमच्या माणसाने गाडी बंद केली. आणि तो जायला निघाला आहे.आता आठ वाजता ? पाणीपुरीच्या गाड्या साधारण अकरा वाजता बंद होतात. तुम्ही त्यांच्या मागावर रहा आणि मला अपडेट देत रहा.साडे आठ ला गंगाधरचा पुन्हा फोन आला.रामभरोसे घरी आहे आणि त्याच्या कडे कोणीतरी गावावरून आलेला दिसतो आहे. हँड बॅग घेऊन आहे.ठीक आहे तिथेच थांबा. नरेश तुम्हाला अकरा वाजता रीलीव करेल.दहाच मिनिटांत पुन्हा गंगाधरचा फोन.साहेब, रामभरोसे पण बॅग घेऊन निघाला आहे आणि दोघेही जण एसटी स्टँडच्या दिशेने चालले आहेत.ठीक आहे तुम्ही त्यांची पाठ सोडू नका. आम्ही स्टँडवर पोचतोच.स्टँडवर पोचल्यावर रामभरोसेला शेड मध्ये उभी असलेली पोलिस पार्टी दिसली. तो त्याच्या दोस्ताला म्हणालाआत मध्ये पोलिस आहेत. आपण या समोरच्याच बस मध्ये चढू. तू बॅग अशी धर की चेहरा दिसला नाही पाहिजे.पण शेंड्यांच्या तीक्ष्ण नजरेने सर्व टिपलं होतं. त्यांनी खूण केली आणि पोलिस बस मध्ये शिरले. पोलिस स्टेशन मध्ये त्यांना आणल्यावर शेंडे साहेबांनी सूत्रे हातात घेतली.रामभरोसे, इतनी जलदी मे कहाँ जा रहे थे ?साहब, कहीं जाना मना हैं क्या ?अरे नहीं नहीं, ऐसेही पूछा, शामको मिले थे तब तो कोई जल्दी नहीं थी इसलिए.हमने कुछ नहीं किया हैं। आप क्यूँ हमारे पीछे पड़े हैं ?बस, इतना बतादो की कहाँ जा रहे थे और क्या काम था, फिर तुम्हारी छुट्टी कर देंगे.  साहब, गाँव जाना पड़ रहा हैं, कुछ खेती का लफड़ा हो गया हैं.मेरा दोस्त नायब तहसीलदार हैं दारव्हा मे, तुम चाहो तो मैं चिट्ठी देता हूँ तुम्हारा काम शायद बन जाएगा.रामभरोसे ट्रॅप मध्ये अलगद अडकला.साहब मेरा खेत सुल्तानपुरमे हैं. दारव्हा का तहसीलदार क्या करेगा ?खेत सुल्तानपुरमे हैं तो तुम दारव्हा क्यूँ जा रहे थे ?मैं दारव्हा जा रहा था ?  हाँ वो ऐसा हैं की हमारा एक दोस्त वहाँ रहता हैं उसको साथ मे लेना था.क्यूँ ? ऐसी क्या खास बात हैं ?वो सुल्तानपुरके पटवारी को जानता हैं, हो सकता हैं मामला फिट हो जाए.अच्छा, ऐसी बात हैं क्या ? ठीक हैं तुम जा सकते हो.ठीक हैं साहब हम चलते हैं, पहेलेही काफी देर हो चुकी हैं.रामभरोसे, मैं सोच रहा था की हमारी वजहसे तुम लोगोंको काफी परेशानी उठानी पड़ी हैं और बहुत लेट भी हुआ हैं, इसलिए हम तुमको दारव्हा छोड़ देते हैं. हमारी गाड़ी मे चलोगे तो जल्दी पहुँच जाओगे. और लगे हाथ तुम्हारे दोस्त से भी मिलना हो जाएगा. करपे गाड़ी निकालो. हम दारव्हा जा रहे हैं. क्या नाम बताया था तुमने, तुम्हारे दोस्त का ?साहब आप क्यूँ तकलीफ उठा रहे हो, हम चले जाएंगे.साहेबांनी गंगाधरला खूण केली. त्यांनी हातातला दंडा टेबलावर ठेवला.नाव सांग.साहब नाम जानकर क्या करोगे ? हम सिदे साधे लोंग हैं. जाने दीजिए हमे.साहेबांनी आता दंडा हातात घेतला आणि उठून उभे राहिले.नाव सांगहनुमानसिंगपत्ता ?माहीत नाही साहेब.साहेबांनी दंडा टेबल वर आपटला आणि म्हणालेपत्ता सांग लास्ट चान्ससाहेब घर माहीत आहे, पत्ता नाही.ठीक आहे. चल. गाडी तयार आहे. आपण निघू.आता रामभरोसेच्या  दोस्ताला कंठ फुटला. तो रामभरोसेला म्हणालारामभरोसे, लगता हैं हम फस गए हैं. कुछ लें देके निपटालों यार. उसीमे हमारी भलाई हैं.सांगोळे मधेच बोलले.रामभरोसे तुझ्यापेक्षा तुझा हा दोस्तच शहाणा आहे. एकदम लायनीवरआला. मांडवली करायचीय ? बोल काय म्हणतोस ? आमचे साहेब तसे दयाळू आहेत. तुला त्रास होणार नाही.रामभरोसे नी थोडा विचार केला त्याला राग आला होता. त्याच्या दोस्तानी माती खाल्ली होती. पण आता काही उपयोग नव्हता. ते आता पुरते अडकले होते. आता मांडवली करणं हा एकच उपाय समोर दिसत होता.साहब हम छोटे लोग हैं. शादी के लिए पचास हजार जमा किया था, वो आप ले लीजिए.“मामला बताओ उसके बादही बात करेंगे.” सांगोळेच बोलला.साहेब, नीलाक्षी मला खूप आवडली होती. तिच्याशी मला लग्न करायचं होतं.नीलाक्षीचं नाव ऐकलं आणि सगळे सावध झाले. आत्ता पर्यन्त त्यांची अशी समजूत होती की छोट्या मोठ्या चोरीची भानगड असेल म्हणून. पण आता अनपेक्षित पणे प्रकरणाला  गंभीर वळण लागलं होतं. सगळे सावरून बसले.मी तिला लग्नाबद्दल विचारणार होतो पण मला कळलं की हरीश ने तिला मागणी घातली आहे. साहेब, मी वाईट माणूस नाहीये. आपण दुसऱ्याचा आदर करतो. साहेब मग मी नीलाक्षीचा  विचार मनातून काढून टाकला. पण दोन तीन दिवसांनी हरीश भेटला आणि म्हणाला की नीलाक्षीने फायनल नकार दिला आहे. आणि आता तो गावी जाणार आहे. त्यांच्या घरच्यांनी एका दुसऱ्या मुलीशी त्याचं लग्न ठरवलं आहे तिच्याशीच करणार आहे.मग ?मग मी नीलाक्षीला विचारलं. पण तिने नाही म्हंटलं आणि वर माझी औकातपण काढली. मला खूप राग आला साहेब, तुम्हीच सांगा साहेब, औकात काढल्यावर कोणालाही राग येईल.बरोबर आहे. तुझ्या जागी मी असतो तर मला पण  राग आला असता, मग तू काय केलस ?हा माझा दोस्त सालन सिंग यांनी सुचवलं की आपण तिला किडनॅप करू आणि सुलतानपूरला घेऊन जाऊ. तिथे गेल्यावर तिच्याशी शादी कर. एकदा लग्न झाल्यावर मुली कुठे जात नाहीत. मग मी आमचा दूसरा दोस्त हनुमान याला बोलावून प्लॅन सांगितला. त्याला पण पटलं. मग त्यांनी त्याचा एक दोस्त आहे विकी नावाचा, त्याची व्हॅन आहे. त्याला पण सामील करून घेतलं. आणि मग आम्ही पक्का प्लॅन बनवला. मग ठरलेल्या दिवशी तिला किडनॅप केलं. एवढ बोलून रामभरोसे थांबला.फिर, क्या हुवा ? लड़किका खून क्यूँ किया ?हमने नहीं मारा साहब, वो अपनेसेही मर गई.रामभरोसे खोटं बोलू नको. तुम्हाला जर यातून सुटायचं असेल तर पूर्ण खरं खरं सांग. काही लपवा छपवी केलीस तर तुलाच महागात पडेल.तिच्या तोंडात बोळा कोंबला होता साहेब, आणि तशीच तिला व्हॅन च्या मागच्या जागेत झोपवलं होतं. जीव गुदमरून ती केंव्हा मेली ते कळलंच नाही. मध्ये एका निर्जन ठिकाणी दोन मिनिटांसाठी थांबलो होतो तेंव्हा तिच्याकडे बघितलं तेंव्हा कळलं की ती या जगात नाहीये. आम्ही सगळेच घाबरलो होतो साहेब, आमच्यात भांडणं झाली. पण विकीने आम्हा सगळ्यांना शांत केलं. आणि म्हणाला की जे झालं ते झालं आता यातून सुटायचा मार्ग शोधावा लागेल त्याचा विचार करू.मग काय प्लॅन ठरला ?काहीच नाही साहेब, आम्ही असेच चाललो होतो. यवतमाळला आल्यावर एका धाब्यावर विकीला आयडिया सुचली आणि आम्ही एका गाडीमध्ये तिला टाकून दिलं. मग तसंच नागपूरला जाऊन सुलतानपूरची वाट  धरली साहेब.कोणाच्या गाडी मधे टाकलं ? काय नंबर ची  गाड़ी होती ?वो पता नाही साहब, जो गाड़ीकी की डिकी खुल गई, उसमे झटसे डिकी मे बॉडी डाल दी और हम वहाँसे निकाल गए.  मग ?मग काही नाही साहेब, सात आठ महिन्यांनंतर सर्व शांत आहे असं पाहून वापस पुसदला आलो.तुम्ही त्या मुलीवर ती मेल्यानंतर बलात्कार केला तो कुठे ?वो एक बहुत बडा पाप किया साहब हमने असं म्हणून रामभरोसे रडायलाच लागला.पोलिसांनी चौघांना अटक केली सर्व पुरावे, काबुली जबाब जमा केले, विकिची व्हॅन जब्त केली, आणि त्यांच्यावर खून, बलात्कार आणि अपहरणाचा खटला दाखल केला.********दिलीप भिडे पुणेमो :9284623729[email protected]माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187धन्यवाद.                            


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired

//