Mar 01, 2024
प्रेम

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 13

Read Later
बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 13

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 13


आधीच्या भागात आपण पाहिले की,


स्वानंद अभिराजच्या घरी गेला, त्याने त्याला ऑफिसला न येण्याबद्दल विचारलं. पण अभिराज काही बोलायला तयार नव्हता. आता मात्र स्वानंद गप्प राहिला नाही तो सगळं काही बोलून गेला. रक्षित बद्दल, कनिका बद्दल, सगळ्यांबद्दल बोलला आणि अभिराजला समजावलं आणि तिथून निघून गेला. काही वेळाने अभिराज बाहेर जाऊन आला आणि अभिज्ञासमोर उभा राहून तिची माफी मागितली आणि तिला प्रॉमिस केलं की यानंतर त्याच्याकडून अशी कुठलीही चूक होणार नाही. तिच्याकडून प्रॉमिस घेतलं की ती नेहमी आनंदात राहील. 

आता पुढे,


दोन-तीन दिवसानंतर कनिकाचा पुन्हा फोन आला. अभिराज नव्हता म्हणून अभिज्ञाने फोन उचलला.

“बोल कनिका, का फोन केलास?” अभिज्ञा

“दादा कुठे आहे.” कनिका

“तो घरी नाहीये, बाहेर गेलाय.”

कनिका विचार करून,

“बाहेर गेला पण त्याचा फोन घरी कसा?”
“तो घरी फोन ठेवून गेलाय, थोड्यावेळात येतो असं सांगितलं आणि निघाला. बोल काय काम होतं तुला?”

“नाही, मला दादाशीच बोलायचं होतं.” 

“कशाबद्दल?”

“ते मी तुला का सांगू?”

“हे बघ कनिका, तु तुझ्या दादाला भडकावण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझा दादा तुझं ऑफिस जॉईन करणार नाहीये, त्यामुळे उगाच वारंवार फोन करून त्याला त्रास देऊ नकोस. त्याचं ठरलंय तो तिकडे येणार नाहीये. तो दुसरीकडे जॉब शोधतोय त्यामुळे तुही त्याला जास्त फोर्स करू नकोस आणि त्याच्यासाठी काही कष्टही घेऊ नकोस.” असं म्हणून अभिज्ञाने फोन ठेवला.


अभिराज घरी आल्यानंतर अभिज्ञाने त्याला सगळं काही सांगितलं.
“जॉब बद्दल काय विचार केला आहेस? नवीन शोधणार आहेस की तेच जॉईन करतोयस?”


“मी माझ्याच ऑफिसमध्ये जॉईन होईल.आता मला कुणाबद्दलही काही गैरसमज नाही. सो उद्याच मी ऑफिसला जातो, तसं मी आज  सरांना फोन करून सांगेल.”

“बेस्ट ऑफ लक, तू बोल त्यांच्याशी.”

दुसऱ्या दिवशी सकाळी अभिराज ऑफिसला जाण्यासाठी रेडी झाला. अभिज्ञाने त्याला टिफिन बनवून दिला.
अभिराज ऑफिसला पोहोचला, त्याने त्याच्या डेस्कवर त्याची बॅग ठेवली. त्याच्या कलिगला रक्षितसरांबद्दल विचारलं, त्याने सांगितलं की सर आलेत. तसा अभिराज केबिनकडे जायला निघाला. तो केबिनचं दार उघडून मे आय कम इन बोलणार होता तितक्यात त्याच्या कानावर काही शब्द पडले आणि तो तिथेच थबकला.


“हे बघ कनिका तू काहीही कर पण तू त्याच्या मनात माझ्याबद्दल आणि अभिज्ञाबद्दल तुला जितकं काही वाईट सांगता येईल तितकं वाईट सांग.” काही क्षण थांबून पुन्हा बोलला 
“मिळतील तुला जेवढे हवे तेवढे मिळतील, फक्त माझा प्लॅन सक्सेस होऊ दे. त्यानंतर तू पैशातच खेळणार आहेस पण कनिका माझं काम लवकरात लवकर व्हायला हवं, चल ठेवतो.”

हे ऐकल्यानंतर अभिराजचे पाय मागे सरकले, तो तिथूनच पलटला आणि विचार करत करत त्याच्या डेक्सवर जाऊन बसला. बराच वेळ तो त्याच्या विचारात होता.

काही वेळाने स्वानंदने अभिराजला आवाज दिला. 
“अभ्या कोणत्या विचारात आहेस? हॅलो. अभ्या..” स्वानंदने त्याला जोर जोरात हलवलं. तेव्हा तो भानावर आला.

“काय रे कोणत्या विचारात होतास आत जा, सरांनी तुला बोलावलं.” स्वानंद

“नाही नको मी घरी जातोय.”

“घरी काय? आत्ताच आलास ना तू ऑफिसला आणि सरांशी भेट न घेता जातो आहेस, आधी त्यांना कळव की तू जॉईन करणार आहेस. त्यांना तसं कळवायला हवं ना?”

“नाही नको, मला घरी जायला हवं. माझं घरी जाणं जास्त गरजेचं आहे. तो त्याच्याच विचारात बोलला आणि जायला निघाला.

स्वानंदला तर काहीच कळलं नाही हा असा का वागतोय. अभिराज त्याच्याच विचारात कसातरी घरी पोहोचला.

घरी येतात अभिज्ञाचे प्रश्न सुरू झाले.

“अभि इतक्या लवकर कसा आलास? काय रे ऑफिसला गेला होतास ना? इतक्या लवकर कसा आलास? रक्षित सर काही बोलले का तुला? त्यांनी तुला कामावर नाही ठेवलं का? काही प्रॉब्लेम झालाय का? बोल ना की तुझ्याजागी कोणी दुसरा अपॉइंट केलाय? अभि काहीतरी बोलणारे.”


अभिराज काही न ऐकल्यासारखा त्याचाच विचारात सोफ्यावर बसला. अभिज्ञा त्याच्या बाजूला जाऊन बसली.
अभिज्ञाने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकण्याचा आणि बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता.

अभिज्ञा किचनमध्ये गेली, त्याच्यासाठी पाणी आणलं.

“अभि आधी तू पाणी पी, अभि पाणी पी.”

अभिज्ञाने त्याला जोरात हलवल आणि त्याच्या हातात ग्लास दिला. तो कसातरी पाणी प्यायला.

“सांगशील का मला काय झालं?”

“कनिका..” तो बोलता बोलता थांबला.
“कनिका? तिचं काय? तिने काय केलं आता? काय झालं बोल ना? काय केलं तिने? हे बघ तू जे काही झाले ते मला सांग. मी तुला सांगते कनिकाचा मला काही विश्वास वाटत नाही. ती नक्कीच काहीतरी गडबड करतेय. बोल काय झालंय?”


ऑफिसमध्ये रक्षित जे काही बोलला, अभिराजाने ऑफिसमध्ये जे काही ऐकलं. ते सगळं अभिज्ञाला सांगितलं.

“बघ, मी बोलले होते ना तुला काहीतरी गडबड आहे. कनिका असं कसं करू शकते आणि कनिकाचा आणि रक्षितचा काय संबंध? ते एकमेकांना कसं काय ओळखतात? हे बघ अभि हे वाटतं तेवढं सोप्प प्रकरण नाहीये. तुला याच्या खोलवर जाऊन माहिती काढावी लागेल. आपल्या दोघांमध्ये दुरावा आणून तिला काय मिळणार आहे?”


“तिला नाही त्याला.”

“म्हणजे त्याला तू हवी असेल तर.”

“अभि इट्स नॉट पॉसिबल, तुला माहिती आहे माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. बाकी कुणावरही नाही. उद्या देव जरी सांगेन मला की अभिराजला सोडून त्याच्याकडे जा तरी मी नाही जाणार. कारण आय लव यू, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”

तिने त्याचा हात हातात घेतला.
“अभि कोणी कितीही प्रयत्न केला ना तरी आपल्या दोघांना दूर नाही करता येणार कोणाला. मी तुझ्यासोबत होते, आहे आणि समोरही राहील. तुझा माझा विश्वास आहे ना?”

अभिराजने होकारार्थी मान हलवली.
“बस मग आता मला काहीही नको, तू माझ्यासोबत आहेस ना मग मला कशाचीही भीती नाही आणि आता तू कशाचा विचार करू नकोस. आता जातोयस ना ऑफिसला?”

“नाही ग आता नाही, मूड होत नाही आहे माझा. उद्यापासून जाईल मी.”


“बघ तू तुला जे सोयीस्कर वाटतं,  बरं मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते.”

अभिज्ञा किचन मध्ये गेली. तितक्यात त्याला स्वानंदचा फोन आला.

“काय रे असा काय निघून गेलास?बॉस विचारत होता तुला?” स्वानंद

“काय सांगितलंस तू?”

“काही नाही मी सांगितलं त्याला घरून फोन आला, काहीतरी इमर्जन्सी होती म्हणून तो निघून गेला.”

“थँक्स थँक्स नंद्या, डोन्ट वरी मी उद्यापासून येणार आहे. जर त्यांनी तुला विचारलं तर सांग.”

“ओके ओके टेक केअर बाय.”

संध्याकाळी अभिराज आणि अभिज्ञा बाहेर फिरायला गेले. चौपाटीवर दोघेही गप्पा मारत बसले होते.

“अभि कितीतरी दिवसानंतर आपण असे बाहेर आलो आहोत ना, मला खूप छान वाटतंय. आजचं वातावरण खूप छान आहे ना? ही गुलाबी थंडी, हा थंडगार वारा, आकाशातले चांदणे खूप प्रसन्न वाटतंय मला.”

“हो ग आज बऱ्याच दिवसानंतर मलाही थोडं मोकळ वाटतय. खरतर इतके दिवस मी स्ट्रेस मध्येच होतो. मलाच माझं कळत नव्हतं काय सुरू होतं ते, पण आज खरच मला थोडं रिलॅक्स वाटतय. आपण एक काम करूया छान बाहेर तुझ्या आवडीचा काहीतरी खाऊया आणि मगच घरी जाऊया. उगाच घरी जाऊन तुला दगदग नको.”

अभिज्ञाने स्माईल केली.
अभिराजाने अभिज्ञाचा हात हातात घेतला.
“आय लव यू अभिज्ञा, आय रियली लव यू.”

“लव यु टू अभि.” तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि हळूच डोळे मिटले.

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//