बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 9

Abhidnya abhiraj love bond

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 9


आधीच्या भागात आपण पाहिले की,


अभिज्ञा आणि अभिराज रक्षितने दिलेल्या आऊट हाऊसमध्ये राहायला गेले. दिवसभर दोघांनी सामानाची ठेवण केली, त्यानंतर अभिराजने बाहेरून जेवणाचं पार्सल आणलं. दोघे गप्पा मारत जेवले. खूप महिन्यानंतर ते दोघे असे एकांतात एकमेकाच्या सहवासात बसले होते.

दुसऱ्या दिवशी अभिराजने रक्षितला जेवायला सांगितलं. ऑफिसचं काम निपटवून रक्षित अभिराजच्या घरी गेला. अभिज्ञाने दरवाजा उघडला, समोर  रक्षित उभा दिसला. ती त्याच्याकडे बघतच राहिली.


आता पुढे,

अभिज्ञाची नजर त्याच्याकडे होती रक्षितने मात्र नजर चुकवत खाली मान घातली. मागेहुन अभिराज आला. अभिज्ञाला असं त्याच्याकडे बघुन त्याने विचारलं.
“तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का?”

त्याच्या बोलण्यावर अभिज्ञाने लगेच तिची नजर खाली करून ती बाजूला सरकली.

“सर या ना प्लीज, आत या.” अभिराजने त्याला आत बोलावलं. रक्षित आत येऊन बसला 
अभिज्ञाने त्याला पाणी आणून दिलं.


“तर मी ओळख करून देतो शी इज माय वाईफ अभिज्ञा.”
आणि अभिज्ञा हे माझे बॉस रक्षित सर” अभिज्ञा कडे बघून अभिराजने सांगितले.

अभिराज आणि रक्षित गप्पा मारत बसले तोवर अभिज्ञाने जेवण गरम केलं. दोघांच्या गप्पा आणि जेवण झाले. अभिज्ञाचा चेहरा पडलेला होता. अभिराजला हे सगळं जाणवत होतं पण रक्षित समोर काय बोलायचं म्हणून तो गप्प होता. जेवण झाल्यानंतर रक्षित जायला निघाला.
अभिज्ञा समोर न येता दारातून त्याच्याकडे बघत होती. मनात चलबिचल सुरू होती आणि प्रश्न डोळ्यासमोर गिरक्या घालत होते. त्याने एक नजर तिच्यावर टाकली आणि तो निघून गेला.
रक्षित गेल्यानंतर अभिराज बालकनित जाऊन बसला. अभिज्ञाने सगळ आवरलं आणि ती रूममध्ये गेली.

पाठीमागेहुन अभिराज आला,


काय झालं अभिज्ञा? रक्षित सर आलेले तुला आवडलं नाही का?” अभिराजने तिच्या गळ्यात हात घातला.

“नाही असं काही नाही.” अभिज्ञाने नजर चुकवली.

“असं का विचारतोस तू?” त्याच्या कडे वळून बोलली.

“नाही मी बराच वेळ झाला तुला बघतोय तुझा चेहरा पडलेला आहे, आणि हे सगळ रक्षित आल्यानंतर पासून होतंय. तू रक्षितला ओळखतेस का? अभिराजच्या या प्रश्नावर अभिज्ञा थोडी भांबावली.

“नाही मला त्याला बघितल्यासारखं वाटतंय पण आठवत नाहीये.”

“तुला बरं वाटत नाही आहे का?” 

“बरं वाटतंय पण मला आराम करायचा आहे.”

“तू झोप.” अभिराज तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला.
अभिज्ञा झोपल्यानंतर अभिराज बराच वेळ विचार करत बसलेला होता. 


‘खरंच अभिज्ञा रक्षितला ओळखत असेल का? दोघेही एकमेकांकडे असे बघत होते, दोघे कधीतरी भेटले असतील का?’
अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले. विचार करता करता तोही झोपला. 

सकाळी अभिज्ञा उठली तेव्हा अभिराज सोफ्यावर बसलेल्या स्थितीतच झोपला दिसला. तिने मनोमन विचार केला,
‘हा असा का इथे झोपला असेल, रात्री उठून इकडे आला की इकडेच होता. काय झालं असेल?’ ती विचार करत असताना त्याला जाग आली.


त्याच्याकडे बघून लगेच
“गुडमॉर्निंग अभि तू इथे असा का झोपलास? सकाळी सकाळी आलास की रात्रीपासून आहेस?” 

“काही नाही ग झोप लागत नव्हती म्हणून थोडा वेळ फिरलो आणि इथे बसलो तर झोप लागली.”

“चल पटकन फ्रेश ही, मी कॉफी बनवते.”

“चालेल..” असं म्हणून अभिराज फ्रेश व्हायला गेला.

अभिज्ञाने गरमगरम कॉफी बनवली, दोघांनी कॉफी घेतली त्यानंतर अभिराज तयार होऊ ऑफिसला जायला निघाला.

“अभि मी पटकन तयार होते आपण सोबतच निघूया ना.”

“नाही ग ऑफिसमध्ये मला एक अर्जंट काम आहे, मला लवकर जावं लागेल. तू ये ना तुझ्या गाडीने.”


“त्यापेक्षा तू मला तुझ्या बाईकने घेऊन चल ना प्लिज.”

“तुझी स्कुटी आहे ना, त्याने जा ना.”
“ ती स्टार्ट होत नाहीये.”

अभिराज  त्रासल्या सारख करून,

“ठीक आहे मी पाच मिनिट थांबतो त्यावर मी थांबणार नाही.” असं म्हणून दारातच उभा राहिला.

अभिज्ञाला वाटलं पाच मिनिटाच्या वर झाले तर हा चिडेल म्हणून तिने पटपट आवरासावर करायला सुरुवात केली आणि ते करत असताना अचानक तिचा पाय घसरला आणि  डोक्याच्या भाराने ती पडली. तिच्या डोक्याला गॅसच्या ओटा लागला.

पडताक्षणी अभिज्ञा किंचाळली, तसा अभिराज किचनमध्ये धावत धावत गेला. बघतो तर काय अभिज्ञा खाली बेशुद्ध पडलेली होती. डोक्यातून रक्त वाहत होतं.


अभिराजने हातातली बॅग ठेवली आणि लगेच स्वानंदला फोन केला.

“हॅलो नंद्या लवकर घरी ये.”

“काय झालं अभ्या.”

“हे बघ मी तुला सगळं नंतर सांगतो पण तुझी कार घेऊन ये लवकर आपल्या हॉस्पिटलला जायचं आहे.” 
हॉस्पिटलचं नाव ऐकताच त्याने
“ओके ओके अस म्हटलं.

त्याने फोन ठेवला. काही वेळाने स्वानंद आला. दोघांनी मिळून अभिज्ञाला पकडलं आणि कारमध्ये बसवलं. स्वानंदने कार स्पीड मध्ये काढली. काही वेळात हॉस्पिटलला पोहोचले.

डॉक्टरने ट्रीटमेंट सुरू केली, डोक्याला स्टीचेस लावले. अभिज्ञा सहा महिन्याची प्रेग्नेंट असल्यामुळे तिला जास्त हाय पावरचे इंजेक्शन देता आले नाही. डॉक्टरांनी सांगितले तिला रिकव्हरी करायला थोडा वेळ लागेल, अभिराज तिच्या जवळच बसून होता. एकही क्षण त्याने तिला नजरेआड होऊ दिल नाही.
…..............

ऑफिसमध्ये अभिराज दिसला नाही म्हणून रक्षितने स्वानंदला केबिनमध्ये बोलावलं.
“सर तुम्ही बोलवलं का?”

“हो, अभिराज आज आला नाही का?”

“नाही सर.”

“का? त्याने कळवलंय का तसं ऑफिसमध्ये?”

“नाही सर, खर तर मी ही आज उशिरा आलो आणि अभिराज कदाचित पुढचे आठ दिवस येणार नाही.”

“का? काय झालं?”
“त्याच्या पत्नीचा छोटासा अक्सिडेंट झालाय घरीच.” 
हे ऐकताच रक्षित उभा झाला.
“काय?”त्याला आश्चर्य वाटलं.

“काय झालं नेमकं?”

स्वानंदने घडलेला सगळा प्रकार सांगितला.”

“ओह माय गॉड. आता कशी आहे ती?”
“आऊट ऑफ डेंजर आहे पण रिकव्हरी वेळ लागेल असं सांगितलंय डॉक्टरने.”
“ओके काही गरज वाटली तर निःसंकोचपणे सांग म्हणावं अभिराजल.”

“हो सर.”
“यु मे लिव.”

ऑफिस संपल्यानंतर स्वानंद हॉस्पिटलमध्ये गेला.

“कशी आहे आता अभिज्ञा?”
“बरी आहे,पण थोडा विकनेस वाटतोय.”

“अभ्या तू घरी जा आणि फ्रेश हो, मी थांबतो तोपर्यंत इथे.”

“नाही स्वानंद मी कुठेही जाणार नाही आहे.”
“अरे पण मी थांबतो ना, तू फ्रेश हो आणि ये. तुलाही थोडं बरं वाटेलं आणि तुझा प्रसन्न चेहरा बघून तिलाही बरं वाटेल.”
स्वानंदने समजावलं तेव्हा अभिराज घरी गेला.

स्वानंद पेपर वाचत बसला होता. अभिज्ञाला जाग आली.
“पाणी..पाणी.. अभि कुठे आहेस तू.”


स्वानंदच्या लक्षात येताच त्याने लगेच तिला पाणी दिलं. 
तिने त्याच्याकडे बघितलं आणि पाणी प्यायली.

“अभि कुठे आहे?”

“तो घरी गेलाय.”

“असा कसा घरी गेला? मला एकटीला टाकून.”

“अभिज्ञा रिलॅक्स मीच त्याला म्हटलं फ्रेश होऊन ये थोडं बर वाटेल. आणि मी आहे ना तुला काही लागलं तर. डोन्ट वरी तो येईलच इतक्यात.”

अभिज्ञाने पुन्हा डोळे बंद केले, काही क्षणात तिला झोप लागली. बराच वेळानंतर अभिराज आला.

“स्वानंद मी आलोय, आता तू निघ. तू ही आराम कर , तू ही ऑफिसमधून थकून आला आहेस.”

“तू काही खाल्लंस का?”

“नाही मी कँटीन मधून बोलावतो काही. तू जा आता.”
“ओके बाय, काही लागलं तर लगेच फोन कर.”

“हो करतो.”
स्वानंद तिथून गेला. अभिज्ञा झोपलेली बघून अभिराज कँटीन मध्ये गेला.
........................

इकडे अभिज्ञाला जाग आली.


“अभि..अभि..अभि कुठे आहेस?”
अभिज्ञा आवाज द्यायला लागली. तिथे कुणीही नव्हतं. नर्स पण नव्हती. 


“कुणी आहे का तिकडे? मला पाणी हवंय.” अभिज्ञाने पुन्हा आवाज दिला. पण कुणीच आलं नाही. तिने बाजूला टेबलकडे बघितलं ,पाण्याची बॉटल होती.

अभिज्ञाने हात पुरवण्याचा प्रयत्न केला पण तिचा हात परत नव्हता. तिने अजून थोडा प्रयत्न केला आणि तिचा तोल गेला. पण लगेचच तिला कुणीतरी पकडलं.

क्रमशः

🎭 Series Post

View all