Feb 24, 2024
प्रेम

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 8

Read Later
बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 8

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 8

आधीच्या भागात आपण पाहिलं की,


अभिज्ञा, अभिराज, स्वानंद आणि उर्वी सगळे फिरायला गेले.

तिथून परत आल्यानंतर अभिराज रक्षित सोबत फ्लॅट बद्दल बोलला. रक्षितकडे त्याच्या बंगल्याच्या बाजूला आऊट हाऊस होता. तो त्याने अभिराजला देण्याचा निर्णय घेतला. त्याने अभिराजला सामान पॅक करायला सांगितल.

अभिराजने अभिज्ञाला फोन करून सगळं सांगितलं आणि पॅकिंग करायला सांगितली. अभिज्ञा खूप आनंदी झाली, आता तिला अभिराज बरोबर राहता येणार. या विचाराने तिचा चेहरा खुलला.

आता पुढे,

दुसऱ्या दिवशी सकाळी अभिराज ऑफिसला गेला. रक्षितने त्याला केबिनमध्ये बोलावून घेतलं. रक्षितने अभिराजला आऊट हाऊसची चाबी दिली. ड्रायव्हरला सांगून त्याच्या गाडीने तिथे सोडायला सांगितलं.


अभिराज आधी अभिज्ञाकडे गेला, तिला तिथून घेऊन दोघेही आऊट हाऊसला गेले. रक्षितच्या बंगल्याच्या थोड्या अंतरावर ते आऊट हाऊस होतं.


खूप सुंदर वातावरण होतं. आतमध्ये  किचन, हॉल, एक बेडरूम, बालकणी, एक छोटसं गार्डन इतकं सुंदर होतं. तिथे उतरता क्षणी अभिज्ञाला खूप मस्त वाटलं. खूप सुंदर वातावरण होतं. अभिज्ञाला अगदी मोकळं झाल्यासारखं वाटलं.


दोघेही आत गेले, ड्रायवरने सगळं सामान आणून दिलं. अभिज्ञा- अभिराजला जास्त काही सामान आणण्याची गरज पडली नाही.

गेल्यागेल्या बंगल्यातल्या शेफने दोघांसाठी कॉफी बनवून आणली. दोघ गार्डन मध्ये बसून छानपैकी कॉफी प्यायले. त्यानंतर दोघांनी मिळून सामान लावलं.

 

“ये तेरा घर ये मेरा घर
किसी को देखना हो गर
तो पहले आ के मांग ले
तेरी नजर मेरी नजर...
ये तेरा घर ये मेरा घर
किसी को देख ना हो गर
तो पहले आ के मांग ले
तेरी नजर मेरी नजर..”


संध्याकाळी दोघेही खूप थकलेले होते.
“अभि तू बाहेरून काहीतरी पार्सल आण. मला आता काही करता येणार नाही. आधीच थकल्यासारखं होतंय.” अभिज्ञाने फर्मान टाकलं.

“ओके..काय खाणार आहेस तू?” अभिराजने लाडात येऊन विचारलं.


“हम्म, तुला जे आवडतं ना  ते आण.” अभिज्ञा


“ये असं नाही ह, तुझं नेहमीचंच आहे. अग मी तुला विचारतोय की तुला काय हवंय, तुला आता खायला काय आवडेल. तू तुझं सांग...माझ्या आवडीचं नंतर  बघू.” अभिराज थोडा वैतागून बोलला.


“ओके.” असं म्हणून अभिज्ञाने तिला जे जे आवडतं ते ते सगळं सांगितलं.

काही वेळाने अभिराज पार्सल आणायला गेला, तोपर्यंत अभिज्ञा फ्रेश झाली आणि हॉलमध्ये येऊन बसली.

आता कुठे तिला थोडं रिलॅक्स वाटत होतं. दिवसभराच्या दगदगीमुळे तिचं डोकं जड झालं होतं. सोफ्यावर येऊन बसली, टीव्ही लावला. टीव्हीवर गाणे लावले आणि छान गाणे ऐकत तिने डोळे मिटले.


काही वेळाने अभिराज पार्सल घेऊन आला. अभिज्ञाने गरमागरम त्याला वाढलं आणि स्वतःही घेतलं. दोघांनीही जेवण केलं आणि बाल्कनीत जाऊन बसले. बाल्कनीतून सगळच खूप सुंदर दिसत होतं. आकाशात चांदण्या, तो चंद्र.. जणू ताऱ्यांची मैफिल होती.
 
बऱ्याच महिन्यानंतर दोघे असे छान आरामात बसलेले होते. अभिराजने अभिज्ञाचा हात हातात घेतला. दुसरा हात तिच्या खांद्यावर ठेवला.

 

“किती महिन्यानंतर आज आपण असे बसलेले आहोत, किती छान वाटतंय ना.” अभिराज

“हो ना, मला आता खूप रिलॅक्स वाटतंय, अभि थँक यु सो मच तू मला इथे घेऊन आलास. खरंच मला खूप खूप खूप छान वाटतंय. मी शब्दात सांगू शकत नाही की किती आनंद झाला मला.” बोलता बोलता अभिज्ञाने तिचं डोकं अभिराजच्या खांद्याला टेकवलं. त्याने हळूच तिच्या गालावरून हात फिरवला.


“थँक्स तर मला तुला म्हणावं लागेल. तु जर टोकाची भूमिका घेतली नसती तर आज आपल्या आयुष्यात हा दिवस आला नसता. तुझ्यामुळे सर्व शक्य झाले आहे, कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी त्याच्या मागे लागतो त्याला ते सगळे उगीच वाटते पण उगीच नसतं तर त्यामागे ही काही कारण असू शकतं याची जाणीव मला झाली. सो थँक यु सो मच.” असं म्हणून अभिराजने अभिज्ञाच्या माथ्याचं चुंबन घेतलं.

“अभि बाळाने किक मारली तो पण बहुतेक आनंदी झालाय.”

दोघांनीही पोटावर हात ठेवला.


“अभिज्ञा चल आत जाऊ, थंड वारा सुटलाय. उगाच तुला आणि बाळाला त्रास नको.” असं म्हणून अभिराज अभिज्ञाला घेऊन गेला.


अभिराजने ए सी लावली आणि दोघेही ब्लॅंकेट च्या आत शीरले. अभिराजने अभिज्ञाच्या पोटावरून हात फिरवला.

“काय म्हणतो माझं बाळ, गोड गोडुला.” अभिराज

“झोपलाय तो, त्याला झोपू दे उगाच त्रास देऊ नकोस.” अभिज्ञा

“काय ग मला असं करतेस? मी कधी खेळणार?” अभिराजने ब्लॅंकेट मधून तोंड बाहेर काढलं आणि पटकन बाहेर निघून गेला. ती पण त्याच्या मागे मागे गेली.

“काय झालं अभि? असा का चिडतोस?” त्याने तिला लगेच आपल्या मिठीत घेतलं.

“बोल ना का असा बाहेर आलास? अभिज्ञा

“हे करण्यासाठी बाहेर आलोय.” अभिराज


“म्हणजे.”

“म्हणजे काय मला तुला मिठीत घ्यायचं होतं.” अभिराज

“किती नौटंकी आहेस तू. तुला माहित आहे ना छोट्या छोट्या गोष्टींनी मला टेन्शन येतं मग अशी नाटकं करत जाऊ नकोस रे.”


“सॉरी ग, आज किती महिन्यानंतर अशी सोबत आहेस ना. मला तुला दूर करावसं वाटत नाहीये. तुला मिठीत घेऊन असच बसून रहावस वाटतंय.”

“अभि तुला आठवते आपली पहिली भेट?”

“हो आठवते ना, पावसात चिंब भिजलेली तू.. त्यात पावसांच्या सरींनी लपलेले तुझे अश्रू. गालावर आलेल्या ओल्या बटा. तुला तसं भिजलेल बघून, तू किती त्रासात आहेस हे जाणवलं, तुला मदत करावी म्हणून तुझ्या जवळ येऊन बोललो, मदत केली पण त्यानंतर मी तुझ्याशी वाईट वागलो ना, त्याचा खरंतर मला खूप त्रास झाला पण मला तुला फसवायचं वगैरे काही नव्हतं.” अभिराजने खाली मान घातली.

“अभि जुन्या गोष्टी आत्ता विसर. आता आपण सोबत आहोत ना हे महत्त्वाचं.” अभिज्ञा

“ हो, आता आपण सोबत आहोत, आपलं प्रेम आहे एकमेकांवर, तुझ्या पोटात माझं बाळ वाढतंय, आणखी अजून काय हवं?” अभिराज


“हो ना खरं आहे, इतके महिने मी तुझ्याशिवाय काढले, ते दिवस खूप कठीण होते रे पण तू येशील याच आशेवर मी होते आणि खरच तू परत आलास. ये हो मला तुला काही विचारायचं होतं विचारू का?”

“हा बोल ना.”

“तुझ्या कंपनीतर्फे तुला फ्लॅट देणार होते ना पण हे तर..”

“हो, याबद्दल मी उद्या सरांशी बोलणार आहे. हे तर मलाही काही कळलं नाही कारण त्यांनी मला तसं काही सांगितलंच नाही. पण तरी मी उद्या बोलून सगळं फायनल करून घेईल तू टेन्शन घेऊ नको आणि आता आपण कुठेही जाणार नाही. आपण एखाद्या वेळी त्यांना जेवायला बोलवूया का आपल्याकडे, तुला चालणार असेल तर?” अभिराज

“चालेल मला काही प्रॉब्लेम नाही. तुझा बॉस तू कधीही बोलवू शकतो. त्यांनी आपली इतकी मदत केली आपण त्यांच्यासाठी एवढं तर करू शकतो ना.”


दोघांच्या गप्पा झाल्या आणि त्यानंतर दोघे झोपले.

दुसऱ्या दिवशी सकाळी अभिराज पटापट आवरून ऑफिसला गेला. अभिज्ञाने सुट्टी टाकलेली होती. त्यामुळे ती रिलॅक्स होती. अभिराज ऑफिसला गेल्यानंतर तो रक्षितशी बोलला, त्याने त्याला सगळं समजावून सांगितलं.

त्यानंतर अभिराजने रक्षितला त्याच्या घरी जेवणासाठी इन्व्हाईट केलं. रक्षित नाही नाही म्हणत होता पण अभिराजने खूप आग्रह केला म्हणून रक्षित तयार झाला.


दिवसभराचे काम आटपून अभिराज घरी गेला.

रक्षित येणार म्हणून त्याने सगळी तयारी करून ठेवलेली.

अभिज्ञाने पण त्याच्यासाठी छान छान पदार्थ तयार केले होते. दोघे छान तयार होऊन बसले आणि काही वेळात दाराची बेल वाजली. उत्सुकता म्हणून अभिज्ञाने दार उघडला.

“वेलकम सर, वेलकम अवर स्वीट होम.” असे म्हणून तिने रक्षितकडे बघितलं आणि ती बघतंच राहिली.

क्रमश:

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//