बोचणारा पाऊस...पर्व 2 रे भाग 6
आधीच्या भागात आपण पाहिले की,
अभिराजच्या ऑफिसमध्ये नवीन बॉसची एन्ट्री झाली. त्याचे नवीन सर खूप छान होते. अभि सकाळी अभिज्ञाला न सांगताच निघाला म्हणून अभिज्ञा दिवसभर त्याच्या काळजीत होती. संध्याकाळी तिचे बोलणे झाले तेव्हा त्याने सगळ स्पष्टीकरण दिलं.
आता तिला त्याच्याकडे जाण्याची, त्याच्या सोबत राहण्याची इच्छा व्हायची. तिला त्याच्या सहवासाची गरज वाटू लागली. अभिराजने सांगितले की तो लवकरच राहण्याची व्यवस्था करेल. अभिज्ञा तिच्या बाळाशी बोलायला लागली.
आता पुढे,
दुसर्या दिवशी सकाळी अभिराज आणि स्वानंद ऑफिसला गेले.
अभिराज त्याच्याच विचारात होता, ‘आज तरी सरांशी बोलू का? सर काय म्हणतील? माझी मदत करतील का? कि रागावतील? की अजून काही होईल?’ असे अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले. आज सॅटर्डे असल्यामुळे हाफ डे होता अभिराजचा वेळ कामातच गेला आणि त्याचं सरांशी बोलण राहून गेलं. रक्षित लवकर घरी गेला, त्याच्यामुळे अभिराज त्याच्याशी बोलू शकला नाही. त्याला खूप वाईट वाटलं.
त्याने ठरवलं की
‘या सॅटर्डे आणि संडे दोन दिवस तर आपण अभिज्ञाला देऊया. तिला जे जे हवे ते करूया’ असा विचार करून तो ऑफिस मधून डायरेक्ट अभिज्ञाच्या घरी गेला.
पण तिथे उर्वी होती.
“अभिज्ञा कुठे आहे?” अभिराजने विचारले.
“ती हॉस्पिटलला गेली आहे.”
“का? तिला बरं नाहीये का? काय झालं? मला फोन करायचा ना, मी आलो असतो तिला घ्यायला.”
“तिला काहीही झालेलं नाही आहे, हॉस्पिटलला मंथली चेक-अपला गेलेली आहे. उगाच तुला खूप काळजी आहे असं दाखवू नकोस.”
“उर्वी तू अशी वाकड्यात का शिरतेस ग?”
“कारण माझा स्वभाव आहे वाकड्यात शिरण्याचा.” असे म्हणून ती आत गेली.
अभिराज अभिज्ञाची वाट बघत सोफ्यावर बसला. अर्ध्या तासाने अभिज्ञा घरी आली.
अभिराजला तिथे बघुन,
“अरे अभि तू कधी आलास?”
“बराच वेळ झाला.”
“मला फोन करायचा ना.”
“नाही ग म्हटलं तू बिझी असशील म्हणून काही फोन केला नाही आणि काय ग मला का सांगितलं नाहीस? मी तुला नेलं असतं ना. अशी एकटी का गेलीस?”
“इट्स ओके, अरे जवळच होतं ते म्हणून मी गेले. उर्वी म्हणाली मला मी सोबत येते पण मीच नाही बोलले. तुम्ही काळजी करू नका.मी मॅनेज करू शकते.”
“पण तुझ्या मैत्रिणीला राग आलेला आहे, तू एकटी गेलीस मी तुझ्या सोबत नाही हे बघून तिला भयंकर राग आलेला आहे.”
“उर्वीकडे लक्ष देऊ नकोस रे तिचा स्वभावच आहे तसा. बाहेरुन जरी कडक दिसत असली तरी आतून अगदी मऊ आहे. तिचं बोलणं मनावर घेत जाऊ नकोस. तू बस मी कॉफी करून आणते.”
“तू दमून आलीस ना, बस ना थोडा वेळ.”
तितक्यात उर्वी किचनमधून बाहेर आली,
“तुम्ही दोघेही बसा, मी कॉफी करून आणली आहे.”
“थँक्स..” अभिज्ञा
“आता यावेळी इथे कसा काय तू?” अभिज्ञा
“आज हाफ डे होता ना आणि उद्या संडे तर मी विचार करत होतो की आपण दोघे कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया का? तुला जिथे आवडेल तिथे.” अभिराज
“असा अचानक, अभिराज काय झालं? काय घडले आहे का?”
“नाही ग मला खूप अपराधी वाटतं की मी तुला वेळ देऊ शकत नाही. तुझ्या सोबत राहू शकत नाही. आता उद्या सुट्टी आहे ना आपण दिवसभर फिरूया. तुला जे हवं ते करूया.”
“गेलो असतो पण डॉक्टरांनी मला बाहेर जायला सक्त ताकीद दिली आहे. जास्त ट्रॅव्हल करायचं नाही असं सांगून ठेवल आहे. त्यामुळे आपल्याला नाही जाता येणार. पण इथे कुठे तरी जवळ जाऊ शकतो आपण.”
अभिराजचा चेहरा पडला. ते बघून अभिज्ञाला हसायला आलं.
“जाऊयात आपण असा चेहरा पाडून बसू नकोस.”
तसा अभिराज आनंदी झाला.
“आपण एक काम करूया का? माझ्या एका मित्राचा फार्महाऊस आहे आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे. बाजूला शेत आहे, शेतात वेगवेगळी फुलांची झाडे आहेत. खूप सुंदर आणि रमणीय आहे. जाऊया का? तुला आवडेल का बघायला?”
“चालेल जाऊयात.”
“चल मग बॅग पॅक कर आणि हो उर्वीला उद्या सुट्टी आहे ना तिला पण सोबत घेऊया. मी स्वानंदला पण घेतो सोबत.”
उर्वीची जाण्याची इच्छा नव्हती पण अभिज्ञाने तिला खूप आग्रह केला म्हणून उर्वी तयार झाली. दोघींनीही बॅग पॅक केल्या.
अभिराजने त्याच्या मित्राकडून गाडी आणलेली होती. ते सगळे गाडीने निघाले. वाटेतून अभिराजने स्वानंदला फोन केला.
“अरे नंद्या लवकरात लवकर बॅगमध्ये दोन-चार कपडे भर आणि तिथून निघून खाली उभा रहा, मी तुला घ्यायला येतोय आपल्याला बाहेर जायचे आहे फार्महाऊसवर. मी, अभिज्ञा, उर्वी आणि तू.”
“ये काय यार? मी मस्त आराम करणार होतो, दिवसभर पलंगावर लोळणार होतो आणि तू हे मधातच काय काढलंस?”
“नंदया काळजी करू नकोस, तिथेही आराम मिळेल तुला आणि तू मला माझ्या सोबत हवायस. सो पटकन तयार हो, इंजोय करूया मस्त.”
“ओके ओके.”
स्वानंदला घेऊन चौघेही निघाले, अर्धा एक तासानंतर गाडी एका मोठ्या फार्महाऊस समोर येऊन थांबली. खूप सुंदर फार्महाउस होता. त्याच्या आजूबाजूला सगळी फुलांची झाडे होती. अशोकाचे मोठे मोठे झाड होते.
बाजूला शेत होते आणि त्या शेतात फळांचे, फुलांचे आणि भाज्यांचे मळे लावलेले होते. पोहोचल्या पोहोचल्या सगळ्यात आधी सगळे फ्रेश झाले.
त्यानंतर त्यांनी सोबत आणलेला चहा घेतला आणि मग पायवाटेने फिरायला निघाले. अंधार पडत आल्यामुळे ते जास्त दूर गेले नाहीत जवळच थोडावेळ फिरले. बाजूच्या बागेत जाऊन बसले. गप्पा गोष्टी झाल्या आणि पुन्हा परतले. मस्तपैकी त्यांनी जेवण बनवलं आणि जेवण करून झोपले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अभिराजला जाग आली तेव्हा अभिज्ञा त्याला खोलीत दिसली नाही, त्याने आजूबाजूला बघितलं. फार्म हाऊस वर कुठेच अभिज्ञा नव्हती. स्वानंद आणि उर्वी दोघांनीही शोधल त्यांनाही नाही दिसली.
ते शेतात शोधायला निघाले, काही वेळाने अभिज्ञा शेतात झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर झुलत असताना दिसली. सगळ्यांच्या जीवात जीव आला, सगळे धावत धावत तिच्याकडे गेले.
उर्वीला तर अगदी रागच आला होता, दिसल्यावर तिला खूप चीड आली. तिने तिच्या जवळ जाऊन आधी झोपाळा थांबवला, तिला खाली उतरवून
“अभिज्ञा तू वेडी आहेस का? किती वेळ झाला तुला शोधतोय आम्ही आणि तू इथे येऊन झोपाळा झुलतेस? अगं वेडी आहेस का?इथून पडली असतीस तर? तू एकटी नाहीयेस आता, तू काय करतेस हे? तुझ्या उदरात एकजीव वाढतोय हे विसरू नकोस. तू झाडावरून पडली तर कितीला पडेल ते? काही विचार करत नाहीस आणि लहान मुली सारखी हुंदडते आहेस” असं म्हणून तिने अभिज्ञाला मिठी मारली.
“सॉरी उर्वी मी यानंतर असं नाही करणार, खरच सॉरी.”दोघी एकमेकींकडे बघून हसल्या आणि वाद तिथेच संपवला.
पुन्हा सगळे फार्महाऊस वर येऊन फ्रेश झाले. नाश्ता केला आणि तिथून दहा किलोमीटरवर असलेल्या एका मंदिरात दर्शनासाठी निघाले. रस्ता दहा किलोमीटरचा होता पण एकेरी वाट होती आणि तो ही पहाडी रस्ता होता. तिथून दोन गाड्या आल्या तर प्रॉब्लेम येईल असा रस्ता होता. एकदम निरुंद होता.
“अभि तू गाडी जरा हळू चालव ह प्लिज.” अभिज्ञा
“हो ग काळजी करू नकोस.” अभिराज अगदी हळू गाडी चालवत होता. थोड्या दूर गेल्यानंतर समोरुन गाडी आली. यांची गाडी लेफ्ट साईडला पहाडीच्या बाजूला होती आणि तिकडून येणारी गाडी किनारीवर होती. अभिराजने गाडी थांबवली. समोरच्या गाडीने गाडी काढण्याचा प्रयत्न केला पण चक्का किनारी वरून घसरल्यामुळे ती गाडी खाली पडली. हे बघून अभिज्ञा खूप जोरात किंचाळली.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा