Feb 24, 2024
प्रेम

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 5

Read Later
बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 5

बोचणारा पाऊस...पर्व 2 रे भाग 5


आधीच्या भागात आपण पाहिले की,


अभिज्ञा अभिराजला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिथे त्याच्यावर उपचार झाले, नंतर पुन्हा हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं. रात्र खूप झाली म्हणून अभिज्ञा त्याला तिच्याकडे घेऊन गेली.

तो सकाळीच तिथून निघाला. ऑफिसला पोहोचला. सगळ्यांना नवीन बॉसला बघण्याची उत्सुकता होती. काही क्षणात एक मोठी गाडी ऑफिससमोर येऊन थांबली.

आता पुढे,

 

गाडीतून एक रुबाबदार, उंचापुरा, धडधाकट शरीरयष्टी, रंग गोरा, डोळे निळे, चाफेकळी नाक, कानात बाली, हातात मोठा कडा, सूट वर टाय लावलेला असा छान हँडसम दिसणारा व्यक्ती उतरला. जशी जशी त्याची पावले ऑफिसकडे येत होती तसे सगळ्यांच्या मनात धाकधूक निर्माण होत होती. सगळ्यांचं हृदय धडधडत होतं. ती व्यक्ती कशी असेल, कशी दिसत असेल हाच विचार सगळ्यांच्या मनात घोळत होता. जशी मेन डोअर मधून ती व्यक्ती आत आली, सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. एक दोन व्यक्तीनी नवीन सरांना बुके दिला. त्या व्यक्तीच्या मागोमाग पुन्हा एक व्यक्ती आला. त्याने नवीन सरांचं इंट्रोडक्शन करून दिलं.

“नमस्कार हे आपले नवीन सर आहेत.

रक्षित सरपोतदार.. आणि मी त्यांचा सेक्रेटरी किशोरीलाल महाजनी.”

सगळ्यांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या. त्यानंतर रक्षित त्याच्या केबिनमध्ये निघून गेला, मागोमाग महाजनी सुद्धा निघून गेले.

काही वेळाने रक्षितने रामदासकडून सगळ्यांची इंट्रोडक्शन फाईल मागवली. सगळ्यांची माहिती वाचली त्यानंतर त्याने त्याच्या कामाला सुरुवात केली.

अभिराजला एका फाईलवर सही हवी होती म्हणून तो केबिन कडे जायला निघाला. त्याने दाराला नॉक केलं.

“मे आय कम इन सर?”

“एस कम.”

“हॅलो सर मी अभिराज..” तो समोर काही बोलणार इतक्यात रक्षित बोलला.

“हो मला माहित आहे. मी सगळ्यांचे फाईल रीड केले आहेत. प्लीज हॅव अ सीट.”


“नो सर थँक्यू.”

“इट्स ओके, प्लिज हॅव अ सीट.”

अभिराज त्याच्यासमोर बसला.

“सो मिस्टर अभिराज कसं चाललंय तुमचं काम?”

“सर छान चाललंय,  अ.. सर सही हवी होती.”

“हो करतो ना सही.”


रक्षितने फाईल चाळल्या आणि सह्या केल्या. अभिराज केबिनमधून बाहेर आला.

स्वानंदच्या डेस्ककडे जाऊन

“नंद्या काय सॉलिड आहे रे बॉस. पहिल्याच दिवशी मला बसायला सांगितलं आणि माझ्याशी नीट बोलला.”

“अभ्या इतका खुश होऊ नको, पहिला दिवस आहे चांगला वागणारच तो. नंतर हळूहळू रंग दाखवेल.”

“नाही रे मला नाही वाटला तो असा.”

“वाट बघ.”
अभिराज त्याच्या डेस्क वर जाऊन बसला.

सगळ्यांनी आपापलं काम केलं त्यानंतर अभिराज विचार करू लागला.

‘नवीन फ्लॅट बद्दल सरांशी बोलायचं का? पण आजच सर जॉईन झाले ते खरंच असं काही करतील का माझ्यासाठी.’ तो मनातल्या मनात विचार करू लागला.

 

सगळे आपलं काम संपवून घरी गेले. स्वानंद त्याचं काम करत होता आणि अभिराज त्याच्या विचारात गुंतलेला होता. तितक्यात रक्षित बाहेर आला.

स्वानंदकडे जवळ जाऊन

“काम व्हायचं तुमचं?”

“सर आता होईल दहा मिनिटात. हे काम झालं की मी निघतो.”
“ओके कॅरी ऑन.”

त्यानंतर रक्षित अभिराजकडे जवळ गेला.

“एक्सक्यूज मी.”
अभिराजने काहीच उत्तर दिलं नाही, तो त्याच्याचं विचारात होता.

“हॅलो.. अभिराज.” रक्षितने त्याला  पुन्हा आवाज दिला. तरी त्याने काहीच उत्तर दिलं नाही. रक्षितने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

“अभिराज काय झालं? कधीचा आवाज येतोय?”
अभिराज विचारातून बाहेर आला.

“सॉरी सॉरी सर, माझं लक्षच नाही तुम्ही कधी आलात ईकडे. आय एम रिअली वेरी सॉरी सर. काही काम होतं का? मला बोलवायचं मी आलो असतो.”

“काम डाऊन मिस्टर अभिराज, घरी जाण्याची वेळ झाली आहे. तुम्ही असे विचारात गुंतलेले बसले होतात म्हणून तुम्हाला विचारायला आलो. एनी प्रॉब्लेम?”

 

“नाही सर, नो प्रॉब्लेम. मी आणि स्वानंद सोबतच निघतो ना. आम्ही सोबतच राहतो एकाच फ्लॅटवर. सो मी त्याच्यासाठी थांबलेलो होतो.”

“ओके सी यु टुमारो.” रक्षित तिथून जायला निघाला.

स्वानंदने काम संपवलं आणि दोघेही बोलत बोलत बाहेर निघाले.

 

“नंद्या आज बोलणार होतो रे सरांसोबत, पण पहिलाच दिवस होता एकदम पहिल्याच दिवशी कसं बोलणार म्हणून मी काही बोललो नाही. मला सध्या तरी फ्लॅट मिळाला ना तरी काही हरकत नाही. नंतर मी माझं मॅनेज करेल. आता मी बाहेर एकदम तेवढा रेंज देऊन नाही राहू शकत रे. अभिज्ञाच्या डिलीव्हरीसाठी मला काहीतरी सेविंग करून ठेवावी लागेल ना.”


“हे बघ कंपनीकडून सहसा फ्लॅट मिळत नाही, पण मी ऐकले की आपल्या कंपनीकडून काही लोकांना मदत म्हणून कमी रेंटने फ्लॅट देतात. जर तू ट्राय केलं तर कदाचित तुझं काम होईल. कारण आपल्या नवीन ब्रांच मध्ये असं झालंय. मला थोडी माहिती मिळाली त्याबद्दल, तरी तू बोलून बघ. काही होईल का बघूया उद्या विचार तू. चल निघूया.” स्वानंदने बाइक काढली आणि दोघे निघाले.


अभिराज घरी गेल्या गेल्या त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलला

“अभिराज सकाळपासून तुला फोन करतेय, फोन का उचलत नाहीस? काहीच रिप्लाय देत नाहीये, सकाळी माझ्याशी न बोलता निघून गेला आणि आता फोनही उचलला नाही. काय कुठे आहेस तू? कसा आहेस तू?”

“अभिज्ञा शांत हो, माझा फोन सायलेंटवर होता आणि सकाळी मी घरी निघालो कारण आज नवीन बॉस येणार होता. सो तू काही काळजी करू नकोस. मी बरा आहे आत्ताच घरी आलोय आणि आता फ्रेश होतोय.”

“काय रे एक फोन तरी करून सांगायचं नाही का? दिवसभर तुझ्याच विचारत होते मी.”

“सॉरी यार मी फोन सायलेंटवर ठेवला होता आणि फोनकडे माझं लक्षचं नव्हतं. सो सॉरी डियर.”

“इट्स ओके अभिराज, अभि आता मला तुझ्याकडे यायचं रे, मला तुझ्याजवळ राहायचंय. आई होण्याचा अनुभव मला तुझ्यासोबत शेअर करायचा आहे. ते क्षण, ती चाहूल सगळ सगळ मला तुझ्यासोबत राहून एन्जॉय करायचं आहे. कधी येणार आहेस तू मला घ्यायला?” बोलता बोलता अभिज्ञा भावुक झाली.

तसा अभिराज सायलेंट झाला.

 

“सॉरी अभिज्ञा पण मी तुला तिकडून लवकरात लवकर घेऊन येईल. तू त्याची काळजी करू नकोस. एक दोन ठिकाणी फ्लॅट बघितलेत मी, तुला तर माहिती आहे ना माझा जास्त पगार नाही. तेवढे मी अफोर्ड करू शकत नाही. म्हणून मी विचार करतोय की कंपनीच्या फ्लॅटमध्ये जर कमी रेंट मध्ये काम होईल तर बघतो. काही हेल्दी इशू लोकांसाठी फ्लॅट ठेवतात. त्यात मला नाही मिळणार पण मी ट्राय करतो. आजच मी नवीन सरांशी बोलणार होतो पण हा त्यांचा पहिला दिवस होता ना. एकदम कसं बोलायचं म्हणून नाही बोललो.”
“कसा आहे रे तुझा नवीन बॉस?”

 

“मस्त आहे, आज मी त्याच्या केबिनमध्ये गेलो ना अगदी फ्री बोलला तो माझ्याशी. असं वाटलंच नाही कि तो नवीन आहे छान वाटला.”

“अभि तू तुझ्या जॉब मध्ये सर्टिफाइड आहेस ना?”

“हो ग माझं सगळं व्यवस्थित चाललंय. तु तुझी काळजी घे आणि माझा जास्त विचार करू नकोस. मी असा घोड्यावर येईल आणि तुला घेऊन जाईल तुझ्या नकळत् तुला कळणार देखील नाही.” अस म्हणून अभिराज हसायला लागला.

अभिने तिचा मूड चांगला व्हावा म्हणून हा जोक मारला.

“काय रे तू पण, चल मी ठेवते आता फोन बाय.”

“बाय गुड नाईट स्वीट ड्रीम.”

“अभिज्ञा आत सोफ्यावर जाऊन बसली. पोटावरून हात फिरवत ती बाळाशी बोलू लागली.

“बाळा आता आपल्याला जास्त वाट बघावी लागणार नाहीये. तुझा बाबा आता आपल्याला लवकर इथून घेऊन जाणार आहे.”


तिला बाळाची हालचाल जाणवली.

 

“अच्छा कळलं तर माझ्या बाळाला.” असं म्हणून तिने अभिराजचा फोटो तिच्या पोटाला लावला. तशी तिला बाळाची पुन्हा हालचाल जाणवली.

 

क्रमश:

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//