Feb 26, 2024
प्रेम

बोचणारा पाऊस... पर्व 2 रे भाग 4

Read Later
बोचणारा पाऊस... पर्व 2 रे भाग 4

बोचणारा पाऊस...पर्व 2 रे भाग 4


आधीच्या भागात आपण बघितले की,

 

स्वानंद आणि अभिराज त्याच्या बॉसशी फ्लॅट बद्दल बोलणार होते. पण त्यांचा बॉस आलेलाच नव्हता. अभिराज अभिज्ञाला भेटायला जाणार होता. तो तिला भेटायला निघाला आणि वाटेत त्याचा एक्सीडेंट झाला. तो कसाबसा उठून पुन्हा निघाला. तिथे जाऊन पोहोचला. अभिराजला उशीर झालेला बघून अभिज्ञा रागावली, पण लगेच तिला त्याच्या पायातला रक्त दिसलं आणि तिचा राग गेला.

आता पुढे,


दोघेही हॉटेलमध्ये गेले, अभिराजने लगेच चेअर सरकवून तिला हळूच बसवले. तिच्या पोटावरून हात फिरवत त्याने त्याचे कान तिच्या पोटाला लावले. बाळाची काही हालचाल जाणवत आहे का? हे त्याला बघायचं होत. अभिज्ञाच्या चेहऱ्यावर स्माईल आली.

“अभि आता आपण हॉस्पिटलला जाऊया. तू उगाच स्वतःला त्रास देऊ नकोस.” अभिज्ञाला त्याची काळजी वाटू लागली.

“मी ठीक आहे ग.” अभिराज

“काही ठीक नाही, आता पट्टी बांधली म्हणून थोडं रक्त बाहेर येणं बंद झालं. बघ ना कसा दिसतोय तुझा पाय? आपण एक काम करूया इथे फक्त कॉफी घेऊया आणि हॉस्पिटलला जाऊया. माझ्या जेवनाची तू काळजी करू नकोस.” अभिज्ञा
अभिराजने कॉफी ऑर्डर केली, ती येईपर्यंत दोघे बोलत बसले. दोघांनी कॉफी घेतली आणि हॉस्पिटलसाठी निघाले.

हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरने ड्रेसिंग करून दिलं आणि काही मेडिसिन लिहून दिले. त्यानंतर दोघेही पुन्हा हॉटेलमध्ये गेले. जेवणाची ऑर्डर दिली.

 

“अभिज्ञा मी आज तुला सोबत घेऊन जाणार होतो पण माझं काम झालच नाही. पण पक्का प्रॉमिस येत्या आठ दिवसात आपलं काम नक्की होईल म्हणजे मी नवीन घराची सोय करतो त्यानुसार मग मी तुला घेऊन जाईल. खरं तर मला तुझ्याविना राहवत नाही पण तुझा हट्टच आहे तर काही हरकत नाही.”

दोघांचं बोलणं सुरू असताना अभिराजच्या मोबाईलवर कनिकाचा फोन आला.

 

“हेलो..”
“हेलो दादू, कनिका बोलतेय.”


“कनिका तू? बोल ना मला कसा काय फोन केलास?”

“मी तुला फोन करू शकत नाही का? मी तुझी लहान बहीण आहे ना?”

 

“तसं नाही ग, इतक्या दिवसात तुला माझी कधी आठवण आली नाही म्हणून विचारलं.”

 

“नाही रे दादू, मी तुला कधीच विसरले नव्हते. पण माझा मोबाईल आईच्या ताब्यात होता. ती मला कुणाशी बोलू देत नाही आत्ताही मी तुला लपून फोन करते आहे. आई बाहेर शेजारी गेली आहे ना. अभिज्ञा तुझ्या सोबतच आहे का?”

 

“नाही, ती माझ्यासोबत नाही आहे. ती तिच्या मैत्रिणीकडे राहते. मी माझ्या मित्राकडे असतो आणि विचार अजून तुला काय विचारायचं?”

 

“दादू का बोलतोस रे असा? माझी काय चूक आहे? माझ्यावर का रागावतो आहेस?”


“कनिका मी तुझ्यावर रागवत नाहीये, मी खरंच आता खूप थकलोय आपण बोलूया कधीतरी.” असं म्हणून त्याने फोन ठेवला.

 

“काय झालं अभि? हे काय करतोयस तू आणि तिच्यावर का रागवलास? तिची तरी काय चूक आहे?” अभिज्ञा

 

“अभिज्ञा सॉरी गं, पण मला आता कुणाशी बोलण्याची खरच इच्छा होत नाही. ती आई असो वा घरचे कुणी असू दे. त्या सगळ्यांचा मला राग यायला लागला.” अभिराज

 

“नको बोलू पण इतका लहान जीव करून राहू नकोस आणि ती तुझी लहान बहीण आहे.  तिच्याशी असं नाही बोलायचं. 

आता तुला नाही बोलायचं नाही तर ठीक आहे पण जेव्हा तुझा मूड चांगला राहील ना आणि तुला बोलावसं वाटेल तेव्हा तिला कॉल कर आणि बोल तिच्याशी. आता डीस मूड झाला असेल तिचाही.” अभिज्ञा

 

त्यांच्या टेबलवर जेवण आलं.  आज अभिराजने सगळं जेवण अभिज्ञाच्या आवडीचं बोलवलं होतं.

अभिराजने अभिज्ञाला घास भरवला. तिचे डोळे पाणावले. कितीतरी महिन्यानंतर असा दिवस, असा क्षण तिच्या डोळ्यासमोर होता. तिला अगदी भरून आलं.

तिने पण अभिराजला एक घास भरवला. दोघेही भावुक झाले होते. स्वताला सावरत दोघांनी जेवण संपवल. आणि तिथून निघाले.


“अभिराज तू इतक्या रात्री जाऊ नकोस. तू उर्वीकडे चल, तिथेच आजची रात्र रहा आज उद्या सकाळी निघ वाटल तर.” अभिज्ञा

“नाही ग, मला निघावे लागेल. उद्या ऑफिस आहे आणि उद्या ऑफिसमध्ये नवीन बॉस येणार आहे.” अभिराज

“तर काय झालं? तू सकाळी निघना लवकर. इतक्या रात्री जाऊ नकोस. आधीच तुझ्या पायाला लागले आहे.प्लिज आता जाऊ नकोस.
अभिज्ञा खूप आग्रह केला म्हणून अभिराज तिच्या मैत्रिणीकडे गेला.

दारावरची बेल वाजली, उर्वीने दार उघडला. अभिराज कडे बघून तिने मान फिरवली.

अभिज्ञा आत गेली. 

“अभिराज तू बस, मी तुला उशी चादर वगैरे आणून देते.”

“अभिज्ञा इट्स ओके, मी इथे सोफ्यावर झोपतो. काही नाही दिलस तरी चालेल.”

“इट्स ओके अरे तू बस मी आणते.”

तिने अभिराजसाठी उशी चादर आणून दिली. आणि ती फ्रेश व्हायला गेली.

अभिराजने पायातील शूज काढून ठेवले आणि तो सोफ्यावर लेटला. काही क्षणात त्याला झोप लागली. अभिज्ञा फ्रेश होऊन आली बघितलं तर अभिराज झोपलेला होता. 

ती हळूच त्याच्या बाजूला जाऊन बसली. त्याला असं झोपलेले बघून तिला त्याच्यावर प्रेम यायला लागलं. तिने हळूच त्याच्या केसावरून हात फिरवला. त्याच्या गालावर तिचे हात रेंगाळायला लागले. त्याचा हात तिने हातात घेतला आणि तिने हाताचं चुंबन घेतलं.

अभिराज गाढ झोपेत होता, अभिज्ञा त्याच्याजवळ येऊन बसली तरी त्याला कळलं नव्हतं. अभिज्ञा रात्रभर त्याच्या जवळ बसून होती, बसल्या बसल्या तिला झोप लागलेली होती. अर्ध्यारात्री अभिराजला जाग आली. त्याने बघितलं अभिज्ञा अशी बसूनच झोपली आहे. त्याने लगेच तिला उचलून सोफ्यावर झोपवलं. आणि तो तिच्या बाजुला खाली झोपला.


सकाळी अभिज्ञाला जाग आली. तिने आजूबाजूला बघितलं, तिला अभिराज दिसला नाही, ती अस्वस्थ झाली.


“अभि..अभि..अभिराज कुठे आहेस तू?” अभिज्ञाने सगळीकडे बघितलं.

“का त्याला हाका मारते आहेस? तो तुझी हाक ऐकायला इथे असायला हवा ना.” उर्वी

“म्हणजे?”
“म्हणजे तो गेलाय.”

“मला न सांगता?”

“तू गाढ झोपली होती, त्याला तुला उठवायची इच्छा झाली नाही. तो उठला, फ्रेश झाला आणि गेला.”

अभिज्ञाने लगेच त्याला कॉल केला पण अभिराजने कॉल रिसिव्ह केला नाही. ती पुन्हा अस्वस्थ झाली. 

“हा फोन का उचलत नाही.?
“अभिज्ञा वारंवार फोन करू नकोस त्याला, बाईकवर असेल तो.”

“उर्वी तो माझ्याशी बोलून गेला नाही ना म्हणून मला अस्वस्थ वाटतंय.”

“अग पोहोचला की करेल तो फोन. तू फ्रेश हो, मी कॉफी बनवली आहे.”

अभिज्ञा फ्रेश झाली, मोबाईल बघत कॉफी घेतली.
पुन्हा त्याला कॉल केला पण काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही.
ती तयार झाली आणि ऑफिसला गेली.

अभिराज स्वानंदकडे पोहोचला. फ्रेश झाला.
“अभ्या नाश्ता ठेवलाय करून घे, मी निघतोय.”
“अरे थांबना, सोबतचं जाऊ.”

“नाही उशीर होईल. मी ऐकलंय नवीन बॉस खूप कडक आहे,त्याला थोडाही उशीर झालेला चालत नाही. दोघेही सोबत गेलो तर प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून मी आधी निघतो.


“ओके चल बाय, तू निघ. मी आलोच.”


स्वानंद ऑफिसला गेला, मागोमाग अभिराज गेला.
धावतच तो ऑफीसच्या आत गेला.

डेस्कजवळ जाऊन अभिराजने धापा टाकल्या, मोकळा श्वास घेतला आणि बसला.

“साहेब बसू नका, मोठे साहेब येणार आहेत आता.” रामदास लगेच सांगत आला.

“रामदास एक कॉफी आणना प्लिज.”

“आता?”

“हो प्लिज.”


“साहेबांना असं कॉफी पिताना दिसलातं ना तर ते तुम्हाला नोकरीवरून हाकलून देतील. कामाच्या वेळी त्यांना असलं काही चालत नाही. मी नंतर ब्रेक मध्ये आणतो.”


त्यांचं बोलणं सुरू असताना एक मोठी लांबलचक गाडी ऑफीस समोर येऊन थांबली.


एक उंचपुरा व्यक्ती आता आला.

सगळे त्याचा चेहरा बघायला उत्सुक होते.

क्रमशः

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//