बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 23

Abhidnya abhiraj love bond

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 23
आधीच्या भागात आपण पाहिले की,
अभिराज अभिज्ञाला शेतावर फिरायला घेऊन गेला. तिथे दोघांनी खूप एन्जॉय केलं. फिरता फिरता संध्याकाळ झाली, ते घरी यायला निघाले. त्यात अभिज्ञाला काजवे दिसले, अभिज्ञाने हातात घेऊन बघितलं तिला खूप आनंद झाला. ते परत यायला निघाले. अभिज्ञाला सुळसुळ आवाज आला, ती तिथेच थांबली मागे वळून बघितलं तर तिथे अभिराज नव्हता, तिने आवाज दिला. 

“अभिराज..अभिराज..कुठे आहेस तू?”

आता पुढे,

तिने चार-पाचदा हाक देऊनही अभिराजचा आवाज येत नव्हता. अभिज्ञा घाबरली, तिने चारही बाजूंनी नजर फिरवली. अभिराज कुठेच कोणीच दिसत नव्हता. ती चालत चालत थोडा समोर गेली. पुन्हा तसाच आवाज यायला लागला. आता मात्र अभिज्ञाला धडकी भरल्यासारखं झालं. ती भयंकर घाबरली, तिने पुन्हा अभिराजला आवाज द्यायला सुरुवात केली.

“अभि अभि कुठे आहेस तू? हे बघ अभि आता थोड्या वेळात जर तू समोर आला नाहीस ना तर... घाबरून जीव जाईल रे माझा.  श्वास वाढतोय माझा. तू आता गंम्मत करू नकोस माझ्याशी अभिराज.” पुन्हा अभिराजचा आवाज आला नाही अभिज्ञा पुन्हा त्या विहिरीजवळ गेली.

“हे बघ अभी आता जर पाच मिनिटाच्या आत तू माझ्यासमोर आला नाहीस तर मी या विहिरीत उडी मारेल.” असं म्हणताचं अभिराजने मागेहून तिला आवाज दिला.

“अभिज्ञा स्टॉप इट यार, काय करतेस? अगं मी गंमत करत होतो. तू तर एकदम घाबरलीस.”

“गंमत, ही गंमत करायची वेळ आहे का अभि? मी किती घाबरले होते. एक तर अंधार आहे, आजूबाजूला काहीच नाही त्यात तू मला एकटं सोडलं, आता यानंतर असं केलंस ना तर याद राख कायमची सोडून जाईल मी तुला, कधीच परत भेटणार नाही.” असं म्हणत अभिज्ञा घराकडे जायला निघाली.

अभि तिच्या मागे मागे गेला, 
“अभिज्ञा आय एम सॉरी, आय एम एक्सट्रीमली सॉरी. थांब ना प्लिज प्लिज प्लिज मला तुला दुखवायचं नव्हतं. मी सहज गंमत म्हणून केलं प्लिज सॉरी..” तो धावत धावत जाऊन तिच्यासमोर उभा राहिला. खाली गुडघ्यावर बसून कान पकडून तिच्यासमोर बसला,
“सॉरी यानंतर नाही करणार प्लिज, आता तरी स्माईल दे प्लिज.” काही वेळाने अभिज्ञा हसली.

“तू ऐकणार नाहीस ना.” असं म्हणत तिने त्याला उठवलं आणि त्याला बिलगली.

काही वेळाने दोघेही घरी गेले.

“काय रे पोरांनो आलात का फिरून?”

“हो आजी खूप मजा आली.”

“जा हात पाय धुऊन घ्या, जेवायचं करून ठेवलंय.”

“आजी मला आता भूक नाहीये, मी आता नाही जेवणार.” अभिज्ञा

“का ग पोरी भुक का नाही लागली.”

“दुपारी खूप जेवली मी, मला जेवण खूप आवडलं होतं. पण आत्ता नको मी काही वेळाने जेवेल.”
अभिराजकडे बघत,

तुला जेवायचं असेल तर तू जेव. मी हात पाय धुऊन आले. दोघे फ्रेश झाले. अभिराजने जेवण केलं, अभिज्ञा मात्र बाहेर अंगणात खाटेवर जाऊन बसली. वरती आकाशात चंद्र आणि चांदण्यांना बघत ती बराच वेळ गाणं गुणगुणत बसली होती.

अभिराजने जेवण केलं आणि तो तिच्याजवळ बाहेर येऊन बसला.

“अभिज्ञा तुला ना अस आनंदात बघून मला खूप बरं वाटतंय. तुझ्या चेहऱ्यावर बघ किती आनंद दिसतोय. तुझा चेहरा किती खूलला आहे.”

“मला तुला असं बघून खरंच खूप खूप आनंद होतोय.”

“हे सगळं तुझ्यामुळे घडलंय अभि, तू मला इकडे घेऊन आलास ना म्हणून सो थँक्स टू यू माय डियर हबी.” दोघांनी हातात हात घेतले आणि वर आकाशात बघून गाणं गुणगुणू लागले.

....................

रक्षीतला कळलं की अभिज्ञा आणि अभिराज दोघेही इथे नाहीयेत, ते बाहेर गेलेले आहेत. त्याने कनिकाला फोन लावला.

“हॅलो कनिका..”

“हा बोलो बॉस.”
“तुझे दादा वहिनी कुठे आहेत?”

“दादा वहिनी.. असतील ते त्यांच्याच घरी..”

“ते तिथे नाहीयेत, कुठेतरी बाहेर फिरायला गेलेत आणि ते कुठे गेले हे मला आत्ताच्या आत्ता कळायला हवं.”

“नाही पण रक्षित खरंच मला माहिती नाही रे, तू सांगतोस म्हणून मला कळतंय.”

“का? तुझं लक्ष कुठे असतं? मी तुला सांगितलं ना ते कुठे जातात, काय करतात सगळ्यांची माहिती तुला असायला हवी मग तू का लक्ष दिलं नाहीस.”

“अरे पण दादा काल-परवाच होता, मी स्वतः घरी जाऊन आली होती.”

“मग आता तो गेला तरी तुला कळलं कसं नाही.”

“वेट.. वेट. मी त्याला फोन करते त्याला आणि तुला कळवते.”

“हो आणि तो तुला सगळं सरळ सरळ सांगणार आहे.”

“अरे का नाही सांगणार.”

“कनिका खरंच तो तुला सांगणार आहे का?” रक्षितला आता खूप राग आलेला होता.

“हे बघ कनिका मला आजच्या आज कळायला हवं की तुझा दादा वहिनी कुठे गेले आहेत नाहीतर.” असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला.

‘शीट यार काय किटकिट करतो हा माणूस. उगाच मी याच्याशी मैत्री केली. नको ते काम करायला लागते. आता मला कंटाळा आलाय या सगळ्यांचा आणि दादा वहिनी त्यांचे किती ते बॉंडिंग, किती ते प्रेम, उतू गेल्यासारखं. या जगात असं कोणी असतं का? इतकं प्रेम करणारे एकमेकांना जपणारं. यांची गाठ स्वर्गातच बांधली गेलेली असणार. पण आता मला कसं कळणार हे कुठे गेलेत.
आई.. आईला विचारते, आईला नक्कीच माहिती असेल पण ती मला नाही सांगणार ती त्याच्याच बाजूने बोलेल आणि मला काही सांगणार नाही.’ कनिका मनातल्या मनात विचार करत होती.
‘आता कोणाला विचारू? काकू... काकूला जाऊन विचारते, तिला माहिती असेल.’
ती तिच्या काकूच्या रूममध्ये गेली,

“काकू काय करतेस?”

“काही नाही ग, बोल आज इकडे कशी आलीस माझ्या रूममध्ये?”

“काकू काही नाही सहजच, कपडे घडी करताय मी तुम्हाला मदत करते.”

“अगं नको नको करते मी, तुझं काम काय आहे ते बोल.” 
“म्हणजे माझं काम राहील तेव्हाच मी तुमच्या खोलीत येणार नाहीतर येणार नाही असं काही आहे का?”

“कनिका लबाडे मला सगळं कळतंय, तुझं काय काम आहे ते बोल.”
दोघीही हसल्या..
“काकू दादा कुठे गेलाय तुला माहिती आहे का?”

“नाही ग, का ग?”

“दादा वहिनी कुठेतरी फिरायला गेलेत पण कुठे गेलेत ना मला कळत नाहीये.”
“पण तू का एवढा विचार करतेस?”
“अग नाही, कळलं असतं तर मी त्यांना अजून नियर बायचे लोकेशन सांगितले असते, त्यांना अजून छान फिरता आले असते बाकी काही नाही.”

“जाऊदे ग, तुला काय करायचे ते कुठे गेले असतील आणि तुझ्या वहिणीला तर प्रेग्नंट आहे ना तरी?”

“काय आहे ना ऍक्च्युली तिला बरं वाटावं म्हणून दादा घेऊन गेला.”

काकूने डोक्यावर हात ठेवला,

“भयंकर आहे तुझे दादा वहिनी, जा तू काम कर.”

कनिका त्यांच्या रूम मधून बाहेर आली, तिने रक्षितला फोन केला.

“हा कनिका बोल काही कळलं का?”

“नाही कुठूनच काही कळत नाहीये, मी दादाला फोन लावला नाही कारण तो मला काही सांगणार नाही, घरी काकूला विचारले पण तिला काही माहिती नाही. आईला विचारलं असतं पण ती मला काही सांगणार नाही, तरी मी प्रयत्न करते उद्या सकाळ पर्यंत सांगते.”

“कनिका सकाळ पर्यंतच.. फक्त सकाळपर्यंत तुझ्याकडे वेळ आहे, त्यानंतर मी माझ्या परीने शोध लावेल आणि त्या ठिकाणी पोहोचेन सुद्धा. त्यामुळे लक्षात ठेव फक्त सकाळ.” असं म्हणून त्याने फोन ठेवला.

कनिका विचारात पडली,
‘कुठे गेला असेल हा? कुणाला काही सांगितलं असेल का? आईला माहित असेल का?’ ती तिच्याच विचारात गुंतून गेली. 
क्रमश:

🎭 Series Post

View all