Feb 26, 2024
प्रेम

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 20

Read Later
बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 20

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 20


आधीच्या भागात आपण पाहिले की,


अभिराजने अभिज्ञासाठी सरप्राईज पार्टी प्लॅन केली होती. अभिज्ञाचे जुने मित्र मैत्रिणी पण आले होते.


सगळे हॉटेलमध्ये गेले, सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं. रात्री सगळे घरी गेले, उर्वी अभिज्ञाकडे तिने मुक्काम केला. सकाळी अभिराजने लग्नावरून तिला चिडवलं. तिला न विचारता तिचा मोबाईल बघितला म्हणून  तिला राग आला.

आता पुढे,

“अग थांब उर्वी कुठे चालली आहे?” अभिज्ञाने तिला थांबवलं.

“खरं खरं सांग कोण मुलगा आहे तो?”

“अग खरचं कोणीही नाहीये.”
“सांग पटकन.”

“एक मुलगा आहे, मला तो आवडतो पण त्याला मी आवडते की नाही माहित नाही.”

“सकाळी सकाळी तुला आय लव यु चा मेसेज टाकला ना?”
“हो तो बोलतो खरं आय लव यू, आय मिस यु पण तो खरंच माझ्यावर प्रेम करतो की नाही मला माहित नाही.”

“हे कसं शक्य आहे? तो तुला आय लव यु बोलतो म्हणजे त्याचे तुझ्यावर प्रेम आहे. सगळ्या गोष्टी तर क्लिअर आहे मग प्रॉब्लेम कुठे आहे.”

“प्रॉब्लेम असा काही नाहीये पण आम्ही समोरचा अजून असं काही विचार केलेला नाहीये. ऍक्च्युली माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे पण आता प्रॉब्लेम असा आहे की.” उर्वी बोलता बोलता थांबली.

“काय झालं उर्वी? काय प्रॉब्लेम आहे?”

“अग आधी मला त्याच्याविषयी पूर्णपणे माहिती नव्हती. पण आता मला सगळी माहिती मिळालेली आहे. ऍक्च्युली तो रक्षितचा लहान भाऊ रणजीत आहे.”

“काय? काय बोलतेस तू?”

“अगं हो मी खरच बोलत आहे, मला हे सगळं माहित नव्हतं पण त्या दिवशी मी त्याचा पॅन कार्ड बघितला आणि मला त्यावरून सगळं कळलं. मला त्याची फाईल सापडलेली त्या फाईल मध्ये त्याची सगळी माहिती होती आणि म्हणून त्या दिवसापासून मी जरा विचारात पडलो मी ज्या व्यक्तीवर प्रेम करते तो खरच चांगला असेल का गं कारण राक्षितच असा वागतोय तर त्याचा भाऊही असा असेल तर? अभिज्ञा आता मला खरंच भीती वाटायला लागली ग, मी चुकीच्या व्यक्तीवर तर प्रेम केले नाही ना? पण मी त्याच्यावर खूप प्रेम करते मला त्याच्याशी लग्न करायचं, त्याच्यासोबत राहायचं आणि आता जर हे सगळं शक्य नसेल तर..? मला काहीच कळत नाहीये मी काय करू? कोणाशी बोलू? काहीच कळत नाहीये.”

“मी तुला एक सांगू का?”

“हा बोल.”

“हे बघ जोपर्यंत तुला खात्री होत नाही की त्याचे तुझ्यावर प्रेम आहे आणि तू त्याच्याशी लग्न करू नको. तोपर्यंत तू काहीही पुढचं पाऊल उचलू नकोस. तू आधी खात्री करून घे त्याच्या प्रेमाची..तो तुझ्याशी लग्न करेल का? त्याला तुझ्या सोबत संसार करायचा आहे का? हे सगळे झाल्याशिवाय तू समोर जाऊ नकोस.”

“मलाही असंच वाटतं.”

“अच्छा मी निघते मला ऑफिसला जायचंय.” असं म्हणून उर्वी तिथून निघून गेली.
 
अभिराज मला आश्चर्य वाटतंय मला अजून पर्यंत रक्षितच्या भावाबद्दल कसं काय माहिती नव्हतं. आर्यनच्या बोलण्यातून कधी उल्लेख निघाला नाही, त्याने कधी सांगितलंही नाही. तो रक्षितचा लहान भाऊ आहे मला आश्चर्यच वाटते. इथे काही गडबड तर नसेल ना? तिथे उर्वीला फसवण्याचा काही प्लान तर नसेल? काय चाललय आपल्या आयुष्यात काहीच कळत नाहीये. बिचारी उर्वी आपल्यामुळे तिला त्रास होतोय.” अभिज्ञा विचार करत होती.

“होईल ग सगळं नीट तू टेन्शन घेऊ नकोस.”

“चल आज आपल्याला दवाखान्यात जायचंय, सोनोग्राफी करायची ना?”

“हो मी तयार होते, तू आवरून घे तोपर्यंत.”

दोघेही तयार होऊन हॉस्पिटलला गेले. अभिज्ञा सोनोग्राफी सांगितलेली म्हणून मनोमन खूप आनंदी झाली होती. आज तिला बाळाची हालचाल बघायला मिळणार होती, रोज जाणवत होती पण आज तिला प्रत्यक्ष बघायला मिळणार होती. त्यामुळे ती जास्तच खुश होती. दोघे वेटिंगरूम मध्ये बसलेले होते.
अभिराज अभिज्ञाकडे बराच वेळ बघत होता.

“काय झालं अभि असा का बघतोयस?”

“तुझा चेहऱ्यावरचा आनंद बघतोय, अगदी मनोमन हसत आहेस.”

“हो खरच मी आज खूप आनंदात आहे, आज मला बाळाची हालचाल बघायला मिळणार आहे. बाळ बघायला मिळणार म्हणून मला खूप आनंद होतोय.”

हॉस्पिटलला गर्दी असल्यामुळे अभिज्ञाला जरा जास्तच वेळ बसावं लागणार होतं पण तरी तो वेळ ती कंटाळा न करता आनंदाने घालवत होती आणि अभिराज तिच्यासोबत असताना तिला कधीच कंटाळा येत नव्हता. ती मोबाईल मध्ये बेबीजचे फोटो बघत बसली होती. डॉक्टरच्या केबिन मधून एक बाई बाहेर आली, तिच्या डोळ्यात अश्रू होते. तिला बघून अभिज्ञा पटकन उठली. तिच्या मागे मागे गेली. ती समोरच्या बेंचवर जाऊन बसली. अभिज्ञा तिच्या बाजूला जाऊन बसली.

“एक्सक्युज मी, मी काही बोलू शकते का?”
तिने फक्त हो मान हलवली.

“काय झालं का रडताय तुम्ही?”

“माझं बाळ..” ती पुन्हा रडायला लागली.

“काय झालं बाळाला?”

“मला सहावा महिना सुरू आहे, माझा पोट खूप दुखत होतं म्हणून मी चेकअपला आले होते डॉक्टर आणि मला सोनोग्राफी करायला सांगितली आणि आता सोनोग्राफी मध्ये..” ती बोलता बोलता थांबली आणि रडायला लागली.

“काय सोनोग्राफीमध्ये काय?”

“सोनोग्राफीमध्ये दिसतय की माझं बाळ अपंग आहे.”

“काय?” अभिज्ञाला धक्काच बसला.

“हो त्याच्या हाताची आणि पायाची वाढ झालेली नाही आणि समोर होईल की नाही याची काही शक्यता नाही. आता मी काय करू मला खरंच कळत नाहीये. मी घरी जाऊन काय सांगू कसं सांगू मला काहीच कळत नाहीये. डॉक्टरने सांगितलं की अबोर्शन करावा लागेल. मला माझं बाळ गमवायचं नाहीये. पण अशा बाळाला जन्म देणं म्हणजे समाज नाही स्वीकारणार. घरचे नाही स्वीकारणार. मला भीती वाटते माझं मातृत्व संपत की काय? मी काय करू मला काहीच कळत नाहीये.” ती रडत रडत बोलू लागली.

“काळजी करू नका, सगळं होईल नीट.” अभिज्ञाला समोर काय बोलावं कळेना. तिची इतकी वाईट अवस्था बघून अभिज्ञा घाबरली. तिला शॉक बसल्यासारखा झाला. ती काही न बोलता चालत चालत समोर आली.

अभिराजचं लक्ष गेलं.
“काय ग कुठे गेली होती? अभिज्ञा काय झालं?”
अभिज्ञा काही न बोलता तिच्या जागेवर बसली.
तिला तीन चारदा विचारलं पण ती फक्त शांत बसून होती.
“त्या बाईचं बाळ..”

“काय झालं?”
“तिने सोनोग्राफी केली ना त्यात तिला कळलं की तिचं बाळ.. तिच्या बाळाची वाढ झालेली नाही. डॉक्टरांनी तिला अबोर्शन करायला सांगितले. तिला कळत नाहीये काय करावे? घरी काय सांगावे? तिला तिच्या मातृत्व संपण्याची भीती वाटते आधी माझ्यासोबत तर असं काही घडणार नाही ना.

“अभिज्ञा प्लिज स्टॉप, काय बोलतेस तू. मनात आलं तसं काही विचार करू नकोस. अग अशा केसेस होतात, प्रत्येकासोबत नाही घडत आणि तू निगेटिव्ह विचार का करतेस? आपण निगेटिव्ह विचार नाही करायचा आपल्यासोबत छान होईल. असंच विचार करायचा आणि आपलं सगळं सगळं छान व्यवस्थितच होणार आहे तू असा का विचार करतेस? कधी कधी असं होतं पण ह्या रेअर केसेस आहेत. प्रत्येकासोबतच नाही होत असं आणि तू आधी शांत हो. हे घे पाणी घे, आता रिलॅक्स हो कुठलेही विचार करायचे नाही आणि निगेटिव्ह विचार तर अजिबात करायचा नाही. तुला बरं वाटत नाहीये का? मी डॉक्टरांशी बोलू का आधी? आपल्याला चेक करायला किती वेळ लागेल. ओके तू बस मी विचारून येतो. अभिराज जाऊन विचारून आला.

“अभिज्ञा अजून पंधरा मिनिट आपल्याला बसावं लागेल ओके, तू रिलॅक्स राहा कुठले विचार करू नकोस.”

अभि बोलला खरा पण विचारांना थांबवता येत नाही. अभिज्ञाचे विचार चक्र सुरू होते. 

क्रमश:

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//