बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 19

Abhidnya abhiraj love bond

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 19
आधीच्या भागात आपण पाहिले की,
कनिका रक्षितला भेटायला हॉटेलमध्ये गेलेली होती, त्याच रूम नंबर मध्ये अभिराज तिच्या मागे मागे गेला. दोघांनी लपवाछपवी केली आणि दोघेही तिथून पळून गेले.

अभिराज कनिकाच्या घरी गेला पण ती घरी भेटली नव्हती. अभिराज घरी आला.


आता पुढे,

अभिराज आणि अभिज्ञा दोघेही रात्री जेवण करून छान बाहेर अंगणात चेअर लावून बसले. दोघेही शांत बसलेले होते.

“अभि असा शांत का बसलास? बोल ना काहीतरी. प्लिज टेन्शन घेऊ नको रे होईल सगळं ठीक. तुझ्या चेहऱ्यावर बघ ना किती टेन्शन दिसतंय.”

“टेन्शन नाही ग पण इतक्यात जे काही घडतंय ना, हे खूप विचित्र वाटतंय. विश्वास बसत नाहीये ज्या लोकांना आपण आपलं मानलं ती लोकं आपल्याशी असे वागत आहेत. रक्षितचं सोड तो तर दूरचाच आहे पण कनिका ती तर माझी सखी बहिण आहे ना? मग ती असं का वागत असेल? काय कारण आहे यामागे हेच मला जाणून घ्यायचं. ती आधी अशी नव्हती. किती प्रेम करायची माझ्यावर. आता माझ्या विरोधात कटकारस्थान करत आहे. तेही बाहेरच्या व्यक्तीला सोबत घेऊन. मला खरंच खूप वाईट वाटतंय की मी अशा बहिणीचा भाऊ आहे.”

“अभि सोड ना जाऊ दे. उगाच आपण का त्यांचा इतका विचार करतोय. जे होईल ते होईल बघून घेऊया. अच्छा मला सांग उद्या काय डेट आहे?”

“एकोणवीस, का ग? काय झालं?उद्या काही आहे का?”

“विसरलास ना तू?”

“नाही ग विसरलो असं नाही. आठवतोय की मी काय विसरतोय ते.”

“मला वाटलं नव्हतं की तू असं काही करशील, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू चक्क विसरलास? असा कसा विसरू शकतो तू?”


“अगं हो हो पण मी काय विसरलो ते तर आठवू दे.”

“काही नाही जाऊदे, मी बोलणारच नाही आता तुझ्याशी.” असं म्हणत अभिज्ञा आत उठून गेली.
अभि बराच वेळ विचार करत राहिला. मी काय विसरलो,? बराच वेळ विचार केल्यानंतर तो जाऊन झोपला.
अभिज्ञा झोपलेली नव्हती ती झोपण्याचं नाटक करत होती. तिला बघायचं होतं अभिराजला आठवतं का पण तो तसाच येऊन झोपला. आणि तिला खूप जास्त राग आला. तीही तशीच झोपून गेली.

अभिज्ञा सकाळी उठली तेव्हा घरात अभिराज तिला दिसला नाही. तिने सगळीकडे शोधलं, अभि कुठेच नव्हता. तिला खूप काळजी वाटायला लागली.

‘हा सकाळी सकाळी कुठे गेला? मला न सांगता गेला. सांगायला हवं होतं ना.’ असं विचार करून तिने सगळीकडे शोधलं.
त्याला कॉल केला पण त्याचा मोबाईल घरीच होता. बराच वेळ ती वाट बघत बसली होती. बसल्या बसल्या अगदी तिचा डोळाही लागला. थोड्यावेळाने कुणीतरी दार ठोकला.
अभिज्ञा बघायला गेली तर समोर ऊर्वी, स्वानंद आणि अभिज्ञाचे जुने मित्र, मैत्रिणी सगळे दारात उभे होते.

तिने दार उघडतात 
“हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू डियर अभिज्ञा, हॅपी बर्थडे टू यू” त्या सगळ्यांचा आवाज ऐकून अभिज्ञा अगदी भारावून गेली.

तिचा विश्वास बसत नव्हता, काही सेकंदात सगळे बाजूला झाले आणि मधात एक मोठा गुलदस्ता होता. तो गुलदस्ता हळूच बाजूला केला आणि समोर चेहरा बघितला तर अभि उभा होता. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ती त्याला जाऊन बिलगली.

अभिराजने अभिज्ञासाठी सरप्राईज पार्टी प्लॅन केली होती. ज्याची तिला अगदी कल्पनाही नव्हती.
सगळे आत आले, अभिज्ञाला पटकन फ्रेश व्हायला सांगितलं. अभिज्ञा छान तयार होऊन आली. सगळ्यांनी तिच्यासाठी छान गिफ्ट आणि केक आणला होता.

केक कटिंग झाली आणि सगळे बाहेर फिरायला गेले. दिवसभराचं फिरून सगळे हॉटेलमध्ये गेले.
अभिराजने हॉटेलमध्ये सगळी पार्टीची तयारी करून ठेवलेली होती. बलून डेकोरेशन, म्युझिक सगळं तिच्या आवडीचं केलेलं होतं.
सगळं छान चाललं होतं, सगळे एन्जॉय करत होते. अचानक अभिज्ञा शांत झाली.

“काय ग अभिज्ञा काय होतंय? दुखतंय का तुला? तुला बरं वाटत नाहीये का?”

“बाळाने किक मारली.”
“काय?”

“बाळाने किक मारली.” हे ऐकताच अभिराजने त्याचे कान अभिज्ञाच्या पोटावर लावले. त्यालाही बाळाची हालचाल जाणवत होती.

त्याने तिच्या पोटावर हात ठेवला, आतून चाललेली हालचाल त्याने त्याच्या हाताच्या स्पर्शाने अनुभवली. त्यालाही खूप भारी वाटलं.
सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या आणि हे दोघे त्यांच्या बाळाबद्दल बोलत होते. आज पहिल्यांदा अभिराजने हा अनुभव घेतला होता, त्याला खूप खूप भारी वाटलं. त्याला खूपच आनंद झाला, अभिज्ञाला डोक्यावर घेऊन नाचायचंच बाकी राहिलेलं होतं. इतका खुश होता तो.

पार्टी संपल्यानंतर सगळे आपापल्या घरी निघून गेले.
स्वानंदही निघून गेला, ऊर्वी अभिराज, अभिज्ञा सोबत त्यांच्या घरी आली. आज ती त्यांच्याकडेच राहणार होती. घरी आले, फ्रेश झाले.

उर्वी मोबाईल बघत बसलेली होती, अभिराज आला.

“उर्वी तु जा अभिज्ञाजवळ, मी इथे झोपतोय.”

“मी इथे कम्फर्ट आहे, तू उगाच तुझी जागा बदलली तर तुला झोप लागणार नाही.”

“अगं नाही नाही तुमच्या दोन मैत्रिणींच्या गप्पा होतील ना. माझ्या चुगल्या सांगायला वेळ मिळेल तुम्हा दोघींना.” असं म्हणून तो हसायला लागला.

“अच्छा म्हणजे आम्ही चुकल्या करतोय तर तुझ्या.” पाठीमागेहुन अभिज्ञा आली.

“अगं तसं नाही ग, आज इतक्या दिवसानंतर ती आपल्याकडे मुक्कामाला आली आहे म्हणून म्हटलं दोघी मैत्रिणी झोपा आरामात, गोष्टी सांगा, गप्पा सांगा, खूप दिवसानंतर तुमची भेट होतीय. मी झोपतो इकडे आरामात.”

“मला चालेल.” अभिज्ञाने पटकन सांगितलं.

“हो पण मला चालणार नाही, तू जा ग तू झोप तुझ्या जागेवर, दिवसभराची थकली आहेस आणि अभि तू पण जा, तू ही दिवसभराचा थकलेला आहेस. उगाच इथे असा झोपू नकोस. मी थोड्यावेळ मोबाईल बघते आणि मग मी झोपते.”

अभि आणि अभिज्ञा त्यांच्या रूम मध्ये गेले, उर्वी सोप्यावर बसून मोबाईल बघत होती. बराच वेळ मोबाईल बघितल्यानंतर ती झोपली.

सकाळी अभिराज लवकर उठला. तो सहज हॉलमध्ये आला.

उर्वी झोपलेली होती, उर्वीच्या मोबाईल मध्ये मेसेज वर मेसेज आले.
अभिराजने सहज म्हणून तिचा मोबाईल घेतला. मोबाईल मधले मेसेज वाचून त्याला आश्चर्य वाटलं.
“उर्वीला जाग आली आणि त्याने तसाच मोबाईल पटकन ठेवून दिला आणि निघून गेला.


थोड्यावेळाने अभिज्ञा उठली, तिने तिघांसाठी छान चहा केला. तिघेही चहा पीत बसले.

“काय मग उर्वी, काय लग्नाचा विचार केलास की नाही?” अभिराजने विषयाला हात घातला.

“नाही अजून इतक्यात तर काही नाही.”

“का ग अजून कोणी भेटला नाही की काय तुला?”

“नाही असं काही नाही पण सध्या लग्नाचा काही विचार नाहीये.”

“तू म्हणत असशील तर मी बघतो ना तुझ्यासाठी मुलगा, अगदी परफेक्ट बघेल मी तुझ्यासाठी मुलगा.”

“लग्नाचा विचार नाहीये सध्या.”

“लग्नाचा विचार नाहीये की आम्हाला मुलगा बघू द्यायचा नाहीये, तू स्वतःच बघितलेला आहेस असं काही नाहीये ना?”

उर्वीच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.

“काही लपवते आहे आमच्यापासून? तुझ्या मनात जर कोणीतरी आहे तर सांग ना, आम्ही तुझी मदतच करू.”

“अभिराज असं काही नाहीये.”

“अभिज्ञा बघ तुझी मैत्रीण किती खोटं बोलतीये ते.” 

“खरंच असं काही नाहीये.”

“काय उर्वी काय लपवतीयेस? अभि बोलतोय म्हणजे काही ना काहीतरी गोष्ट आहे. सांग काय लपवतेस?” अभिज्ञाने विचारलं.

“अग खरच काही लपवत नाहीये. एक मुलगा आहे पण तो माझा बेस्ट फ्रेंड आहे, म्हणजे अजून तसं काही नाहीये.”

“मग बेस्ट फ्रेंड सकाळी सकाळी गुड मॉर्निंग, लव यू बेबी असे मेसेज पाठवतो का.”

“अभि तू चीटिंग केलीस? तू माझा मोबाईल बघितलस?”

“हो तुझा मोबाईल बराच वेळ वाजत होता म्हणून मी बघितला.”

“अभि नॉट फेअर तू चीटिंग केलीस.” असं म्हणून ती रागावून बसली.

क्रमश:

🎭 Series Post

View all