बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 18

Abhidnya abhiraj love bond

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 18


आधीच्या भागात आपण पाहिले की,


कनिका आणि रक्षितचं प्रीप्लॅन झालं होतं. कनिका रोज अभिज्ञाकडे जाऊन तिच्या मोबाईल वरून रक्षितचा नंबर डायल करायची, काही मिनिटे सुरू ठेऊन मग बंद करायची. अभिराजने चेक केलं तेव्हा त्याला सगळं कळलं.

आता पुढे,


दोन-तीन दिवस अभिराज शांत राहिला, दोन-तीन दिवस त्याने बघितलं, घरावर लक्ष ठेवलं. पण त्या दोन-तीन दिवसात काहीच घडलं नाही. त्यानंतर पुन्हा एक दिवस अभिराज बाहेर जायला निघाला.


जाता जाता अचानक त्याचे लक्ष कनिकाकडे गेलं, तो झाडाच्या मागे उभा राहून सगळं बघू लागला. कनिका नेहमीप्रमाणे घरी आली, बसली, काही वेळाने बाहेर आली. ती बाहेर जाताच अभिराज आत गेला.

“अभिज्ञा तुझा मोबाईल दाखव पटकन.”
“अरे तू बाहेर गेला होतास ना?”
“हो ग, तू तुझा मोबाईल दे आधी.”

तिने तिचा मोबाईल दिला.

अभिराजने बघितलं तर खरंच कनिकाने रक्षितचा नंबर डायल केलेला होता. अभि तसाच घरून निघाला, त्याने कनिकाचा पाठलाग केला.

बऱ्याच दूर गेल्यानंतर तिने ऑटो पकडला आणि ती ऑटोने निघून गेली. अभिराजही तिच्या मागे मागे ऑटोने गेला. कनिकाचा ऑटो एका मोठया बिल्डिंगसमोर येऊन थांबला.
कनिका उतरली, मागोमाग अभिराज उतरला.

तिने रिसेप्शनिस्ट कडे विचारपूस केली आणि ती निघून गेली. त्यानंतर अभिराजने रिसेप्शनिष्टला विचारलं,

“एक्सक्युज मी, अभी जो लडकी यहासे गयी, वो कहा गयी मतलब रूम नंबर क्या है?”
“पर आप कौन? और उनके बारेमे क्यु पुछ रहे है.”
“मै उसका दोस्त हु, हम सब आज यहा मिलने वाले थे, पर मै रूम नंबर भूल गया.”

“ओह,सेकंड फ्लोअर 101 नंबर.”

“थँक यु थँक यु सो मच.”


असं म्हणत अभिराज तिच्या मागे पटापट गेला. तो रूम नंबर शोधत शोधत गेला. त्याला 101 रूम नंबर दिसली, त्याने बेल वाजवली. बराच वेळ कुणी दरवाजा उघडला नाही. काही वेळाने अभिराज 

“मॅडम सर्विस” असं म्हणत अभिराजाने दारावर नॉक केलं. तेव्हा दरवाजा उघडण्यात आलं. बघितलं तर समोर कनिका उभी होती.
समोर अभिराजला बघून ती घाबरली, तिने लगेच दरवाजा लावून घेतला. 

“कनिका दरवाजा उघड.”
कनिका खूप घाबरली तसच रक्षितने विचारलं 

“काय ग अशी का घाबरलीस?”
“दा..दा.. ती अडखळत बोलली.

“दातखिळी बसली की काय तुझी?”

“दादा दरवाजा बाहेर उभा आहे.” तिने घाबरत घाबरत सांगितलं.


“काय? काय बोलतेस तू? अभिराज इकडे कशाला येईल? तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. आपण इकडे आहोत हे त्याला कसं कळेल? तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल तू नीट त्याला बघितलेलं नसेल. हो बाजूला, मी बघतो.”

असं म्हणून रक्षित दार उघडायला गेला. बघतो तर काय समोर खरंच अभिराज उभा होता. रक्षितने पुन्हा दार लावला. 

“अगं तुझं खरं आहे, आता काय करायचं? हे बघ तू कुठेतरी लपून रहा, मी दरवाजा उघडतो आणि त्याला मॅनेज करतो.”


“नाही आता काहीच मॅनेज होणार नाही, त्याने आपल्या दोघांना बघितले  आहे.”

“इट्स ओके, मी मॅनेज करतो. तू जा कुठेतरी लप.”

कनिका बाथरूम मध्ये जाऊन लपली. रक्षितने दार उघडला,

“तू इकडे? इकडे कसा काय आलास?”

अभिराजने काही न बोलता रक्षितला धक्का दिला आणि तो आत गेला.

“ये स्टुपिड झाला आहेस का? काय विचारतोय तू इकडे कसा काय?”

“हा प्रश्न मी तुलाही विचारू शकतो.”

“मी इथे मीटिंगसाठी आलोय. मी इथे कशाला आलो काय करायला आलो इट्स नॉट युवर बिझनेस. सो लिव्ह.”

“ये काही लिव्ह वगैरे करणार नाही आहे मी. सगळा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी इथून जाणार तर नाहीच आहे आणि तू कोणत्या मीटिंगसाठी आलायस हे मला चांगलंच कळलं आहे. उठ बाजूला हो.”


“आता काय झळती घेणार आहेस तू माझ्या रूमची?”

“हो घेणार आणि जर तू घेऊ दिली नाहीस ना तर मी पोलिसांना इन्फॉर्म करणार की तू इथे काळे धंदे करतोयस.”
रक्षितला राग आला, त्याने अभिराजवर हात उचलला.
“ये काहीही बोलू नकोस, काही काय बोलतोय.”

“मी काहीही बोलत नाहीये आणि तुला वाटत असेल की मी सगळे करू शकणार नाही सो फरगेट. मी इथे पोलिसांना बोलावलंय. वेट अँड वॉच.”

आता रक्षित थोडा घाबरला, त्याला घाम फुटायला लागला. चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. काय बोलावं त्याला कळेना, तो पलंगावर जाऊन बसला.


“सांग कनिका कुठे आहे?”

“कोण कनिका?”

“अच्छा कोण कनिका? म्हणजे तू कनिकाला ओळखतही नाहीस? कनिका माझी बहीण कुठे आहे ते सांग.”

“एक सेकंद तुझ्या बहिणीला मी का भेटू? मी तर तुझ्या बहिणीला ओळखतही नाही. मी तिला इकडे का बोलवू?”

“ते मला काय माहित नाही, तिला लवकरात लवकर बाहेर काढ. तसही दहा-पंधरा मिनिटात पोलीस येतीलच. ते तर शोध लावतीलच, त्याआधी बऱ्या बोलाने माझ्या बहिणीला बाहेर आण.”

“हे बघ अभिराज, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी कोणत्याही कनिकाला इथे बोलावले नाहीये. मी तर इथे माझ्या मिटींगसाठी आलो होतो. माझी मिटिंग झालीच आहे मी तर निघणारच होतो.”

“अच्छा तर तू आता निघणार, ओके निघ मग. मी रूम लॉक करतो. तसही पोलीस येतील आता. तू इथे नाही राहिलास तरी तुझ्या मागे इथे काय काय राहिलं हे तर पोलीस बघतीलच.”

“तू काय मला धमक्या देतोस?”

“नाही समजावतोय, नीट जर वागला नाहीस ना तर परिणाम वाईट होतील.”

“ये शहाण्या तू काय मला समजावणार? स्वतःला लय शहाणा समजतोय काय? तुझ्यासारखी छप्पन माणसं माझ्या हाताशी आहेत, कळलं.”

“असतील पण त्यात छप्पन मध्ये मी नाही, अंडरस्टँड.. मी युनिक आहे. आणि आता ते तुला थोड्या वेळातच कळेल आहे.”

“म्हणजे? काय करणार आहेस तू?”

“कळेल, थोड्या वेळात तुला सगळं कळेलच.”

रक्षितने अभिराजला ढकललं आणि तो तिथून पळाला.
अभिराजही त्याच्या मागे मागे धावला, बऱ्याच दूर गेल्यानंतरही रक्षित त्याच्या हाताशी लागलेला नव्हता.

‘सुटला पण कितीदा सुटशील तू? कधी ना कधी तर हाती लागशीलच.’ अभि स्वतःशीच बोलू लागला.

अभिराज पुन्हा त्याच हॉटेलमध्ये गेला. रूममध्ये गेला पण आता तिथे कुणीच नव्हतं. कनिका तिथून पळून गेलेली होती.

अभिराज त्याच्या घरी गेला.
“आई कनिका कुठे आहे?”

“ती घरी नाही रे, काय झालं?”

“काही नाही, तिचा फोन लागत नव्हता ना म्हणून घरी आलो. आणि ती घरी नाहीये? कुठे गेली? काही सांगून गेली का?”

“कुठे जाते? काय करते? कुणास ठाऊक.”

“येतो मी.”

“काय रे घाई येतोस घाईत जातोस.”

“आज जरा गडबडीत आहे, येईन पुन्हा कधीतरी. आता थोडा घाईत आहे.” असं म्हणून तो निघून गेला.


अभिज्ञाला घरी त्याच्या काळजीने घोर लागलेला होता. तिला स्वस्थ काही बसवत नव्हतं. इकडून तिकडे तिकडून तिकडे चालणं सुरू होतं. त्यामुळे तिचे पाय दुखायला लागले होते. बराच वेळानंतर अभिराज घरी आला.


तोही दमून सोप्यावर बसला,

“अभि काय रे कधीची वाट बघते मी तुझी.”

“अभिज्ञा पाणी दे ना प्लिज.”

“हो आणते.” अभिज्ञाने त्याला पाणी दिलं. त्याच्या बाजूला बसली.


“काय झालं? इतका का दमलास?”

“कनिकाचा पाठलाग करत गेलो होतो.”
“मग ?”

“मग काय ते दोघे एका हॉटेलमध्ये होते, पण दोघेही पळून गेले. मी रक्षितला पकडण्याचा प्रयत्न केला पण तोही हातून निसटला. कनिका तर कधीच हॉटेलमधून पळाली होती. घरी जाऊन आलो मला वाटलं ती घरी गेली असेल पण ती घरी नव्हती. वाटेत कुठेतरी दोघेजण भेटले असतील. बघू काय होतं. तू टेन्शन घेऊ नको.”

“नाही रे मी टेन्शन घेत नाहीये पण तू असा दिवसभर फिरत राहिलास तर मला खरंच टेन्शन येईल. जाऊ दे रे, तू आता काही करू नको. तू फक्त शांत रहा.” असं म्हणत तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.

क्रमश:

🎭 Series Post

View all