Nov 30, 2022
// rablogging.com_GGINT //
प्रेम

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 16

Read Later
बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 16

बोचणारा पाऊस पर्व  2 रे भाग 16


आधीच्या भागात आपण पाहिले की,

अभिराजने कनिकाबद्दल अभिज्ञाला सगळं सांगितलं. दोघांची त्यावर चर्चा झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अभिराज तयार होऊन ऑफिसला गेला. अभिज्ञा कामे आवरून थोडा वेळ बसली. तिचा डोळा लागला त्यानंतर अभिराजचा फोन आला, अभिज्ञा थोडावेळ बोलली आणि फोन ठेवला.  दारावरची बेल वाजली, बघितलं तर दारात रक्षित उभा होता. अभिज्ञाला अजिबात आवडलेलं नव्हतं. त्यात तिने विचारलं काय काम आहे, फॉर्मॅलिटी म्हणून सगळं विचारून झालं. काही वेळाने बोलता बोलता त्याने तिचा हात पकडला.

आता पुढे,


“रक्षित हात सोड माझा.” अभिज्ञा तिचा हात सोडविण्याचा प्रयत्न करू लागली.

“नाही आता हात काही सुटणार नाही.” रक्षितने तिचा हात घट्ट पकडला.

“रक्षित हात सोड माझा.” आता अभिज्ञाला राहवत नव्हतं.
अभिज्ञाला खूप राग आला. तिने न राहून त्याच्या गालावर एक जोरात थापड मारली. तसा त्याने गालावर हात ठेवला आणि तिरकस नजरेने तिच्यावर कटाक्ष टाकला. त्याच्या चेहऱ्यावर भयंकर राग दिसत होता.  डोळे अगदी ज्वलंत दिसत होते.

 त्याने तिचे केस पकडले,

“माझ्यावर हात उचललास? काय समजतेस तू स्वतःला? माझ्यावर हात उचलून खूप मोठी चूक केली आहेस हे लक्षात ठेव.

आता समोर जे काही घडेल ना त्याला तू आणि फक्त तूच जबाबदार असणार आहेस. कुणाशी पंगा घेतलास माहीत नाही तुला.”


अभिज्ञाच्या केसांची खूप आग होत होती, तिला त्रास होत होता.


रक्षितचं बोलून झाल्यानंतर त्याने तिचे केस सोडले आणि तिला बाजूला ढकललं, काही क्षणात तो तिथून निघून गेला.

अभिज्ञा हळूच जागेवरून उठली आणि रडत रडत सोफ्यावर जाऊन बसली. तिने अभिराजला फोन केला.

“हॅलो अभि.. अभि.” बोलता बोलता ती अजूनच रडायला लागली.

“अभिज्ञा काय झालं? काय झालं बोल ना?”

“अभि तू लवकर घरी ये प्लिज.”

“अग मी येतोय पण तुला काय झाले तू बरी आहेस ना? तुझी तब्येत बरी वाटत नाहीये का? बाळाची हालचाल होत नाहीये का? काय झालं सांग ना.” अभिराज खूप पॅनिक झाला.

“मी सगळं सांगते आधी तू निघून ये प्लिज.” असं म्हणून अभिज्ञाने फोन ठेवला.

काय वेळाने अभिराज घरी आला.
“अभिज्ञा..” त्याने दारातूनच आवाज दिला.
त्याचा आवाज ऐकताच अभिज्ञा जागेवरून उठली. अभिराज आत आला.


अभिज्ञा त्याला बिलगली, त्याला घट्ट मिठी केली.

“अग काय झालं? का अशी रडतेस?”
अभिज्ञा हुमसून हुमसून रडायला लागली.
“अभिज्ञा आधी शांत हो.” अभिने तिला सोफ्यावर बसवलं. तिच्यासाठी पाणी घेऊन आला.
“हे पाणी आधी पी आणि नंतर सांग मला काय झालं.”

अभिज्ञा पाणी प्यायली त्यांनतर बोलायला सुरुवात केली.

रक्षितने काय काय केलं ते सगळं सांगितलं. अभिराजच्या रागाचा पारा वाढला.

“रक्षित असा कसा वागू शकतो? असं कसं केलं त्याने? आता तर मी त्याला सोडणारच नाही, मी आलोच जाऊन.” अभि रागात सोफ्यावरून उठला.

“अभि कुठे चाललास?”

“येतो मी, लगेच जाऊन येतो. सुरुवात त्याने केली आहे ना मग शेवट मी करणार.” तो जायला निघाला.
“अभि..अभि थांब प्लिज, असं काही करू नकोस. मला खूप भीती वाटते आहे, रक्षितचं जे काही रूप मी आज बघितलं ते बघून मला खूप भीती वाटायला लागली आहे. प्लिज तू जाऊ नकोस.” अभिज्ञाने त्याला थांबवलं.


“नाही, आज जर आपण गप्प बसलो तर त्याची हिंमत वाढेल. त्याला काय वाटतं तू एकटी आहेस हा तुझा नवरा तुझ्या सोबत आहे. तू घाबरू नकोस मी जाऊन आलो.”

“अभि एकटा जाऊ नकोस, आता तो ऑफिसला पोहोचला असेल.”

“मी नंदयाला फोन करतो आणि बघतो त्याला कुठे गाठायचं. तू दार आतून लावून घे आणि मी आल्याशिवाय उघडू नकोस.”

अभिराज घरून निघाला. अभिज्ञाने दाराची कडी लावून घेतली आणि ती आत्त जाऊन बसली.

अभिराजने जाता जाता स्वानंदला फोन केला. त्याला फोनवर सगळं सांगितलं आणि रक्षित ऑफिसला आलाय की नाही हे बघायला सांगितलं. 
रक्षित अजून ऑफिसला गेलेला नव्हता.
“तू निघ नंदया तिकडून.” 

अभिने त्याला निघायला सांगितलं. इकडून अभी निघाला तिकडून स्वानंद निघाला. दोघांनी त्याला गाठायचा ठरवलं. त्याचा मोबाईल ट्रॅक वर लावला आणि काही वेळात दोघांनी रक्षितला गाठलं.
दोघ त्याच्या कारला आडवे झाले.
रक्षितने कार थांबवली, 
‘हे काय सुरू आहे.’ विचार करतच तो खाली उतरला.
त्या दोघांकडे बघून,
“अरे तुम्ही दोघे इकडे कशे काय? आज ऑफिस नाही आहे का? ऑफिसला नाही गेलात का? आणि दोघेही अचानक माझ्या कारच्या समोर का आलात?” रक्षितने आश्चर्याने सगळं विचारलं.

“हे बघा सर, जास्त ओव्हर स्मार्ट बनू नका, मला सगळं कळलं तुम्ही काय केलं ते. रक्षित समोर येऊन बोलला.

“काय झालं अभिराज इतका का चिडला आहेस?”

अभि आणखीन समोर गेला, रक्षितची कॉलर पकडली.

“हे बघ जास्त शहाणा बनू नकोस. तू माझ्या घरी जाऊन अभिज्ञाशी जे काही वागला आहेस ना ते मला सगळं कळलं. आज मी आत्ता तुला चांगलं सांगतोय यानंतर माझ्या आणि माझ्या बायकोच्या वाट्याला जायचं नाही. याचे खूप वाईट परिणाम होतील सांगून ठेवतो. रक्षितने अभिराजचा हात सोडला.

“धमकी देतोस मला? तुला माहितीये का याचे परिणाम काय होतील हो माहितीये ना.”

“काय करणार आहेस तू मला नोकरीवरून काढणार आहेस? अरे थु करतो मी तुझ्या नोकरीला. लाथ मारतो तुझ्या नोकरीला.  उद्या येऊन मी माझा राजीनामा देऊन जाईल. पण यानंतर माझ्या घराकडे वाकडी नजर जरी टाकलीस ना तरी माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही.” असं म्हणून अभिराज आणि स्वानंद जाण्यासाठी वळले.
“तुझ्या बायकोनेच बोलवलं होतं मला तुझ्या घरी.” रक्षितच्या तोंडचे बोल ऐकून अभिराज तिथेच थबकला.
त्याने मागे वळून बघितलं आणि तो रक्षितच्या अंगावर धावला.

“माझ्या बायकोवर आरोप करतोस? तुला काय वाटलं तू काहीही सांगशील तरी मी विश्वास ठेवेल. माझा विश्वास आहे तिच्यावर.”

“तुझ्या लाडका बायकोला जाऊन विचार तिने मला फोन करून का बोलावलं होतं? माझ्यावर विश्वास नसेल ना तुझा पण या फोनवर तर आहे.” रक्षितने खिशातून मोबाईल काढला आणि आणि त्यातल्या रिसीव्ह कॉल मधून अभिज्ञाचा नंबर दाखवला. माझ्याकडे व्हॉइस रेकॉर्डिंग नाहीये नाहीतर मी तुला तेही दाखवलं असतं.”

“हे बघ तू व्हॉइस रेकॉर्डिंग जरी मला दाखवलस ना तरी माझा विश्वास बसणार नाहीये तुझ्यावर.”

“ठीक आहे मग जा विचार तुझ्या बायकोला.” रक्षितच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले, तो अगदी तोऱ्यात आला.

स्वानंद आणि अभिराज दोघेही अभिच्या घरी गेले. 

“अभिज्ञा दार उघड मी आलोय.” अभिराजने आवाज दिला.

त्याचा आवाज ऐकतात अभिज्ञाने दार उघडला.

“काय झालं भेटला का तो? काय बोलला? तू काय बोललास? काही मारामारी तर झाली नाही ना?” अभिज्ञाने सगळं विचारलं.

“नाही, तू पॅनिक होऊ नकोस मी बरा आहे. तू बस मी आलोच. अभिज्ञा तुझा मोबाईल कुठे आहे?”

“का ? चार्जिंग वर लावलाय माझा मोबाईल. बोल ना काही काम आहे का? अरे माझा मोबाईल मगाशी स्विच ऑफ झाला होता म्हणून चार्जिंगला लावला.”

अभिने तिचा मोबाईल घेतला, स्विच ऑन करून बघितलं, डायल नंबर चेक केले तर खरंच रक्षितचा नंबर डायल होता. अभिराज विचारात पडला ‘हे कसं काय शक्य आहे. अभिज्ञा असं कधी करू शकत नाही पण हा मोबाईल खोटं बोलणार नाही. नाही असं कसं शक्य आहे अभिज्ञा असं वागू शकत नाही पण या मोबाईल वर जे मी माझ्या डोळ्यांनी बघतोय? काय करू कशावर विश्वास ठेवू?’ अभिराज स्वतःच्याच विचारात गुंतला.
क्रमश:

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing