बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 15

Abhidnya abhiraj love bond

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 15


आधीच्या भागात आपण पाहिले की,


अभिराज ऑफिस मधून त्याच्या आई-वडिलांकडे गेला. त्याच्या आईला खूप आनंद झाला. आईने त्याच्या आवडीचं जेवण बनवलं, त्याला भरवलं. त्याने कनिका बद्दल विचारलं तेव्हा आईने तिच्याबद्दल सगळं काही सांगितलं. काही वेळाने कनिका घरी आली पण ती नको त्या अवस्थेत होती. अभिराजने तीला समजावण्याचा प्रयत्न केला, तर ती त्यालाच काही काही बोलू लागली अभिराजाने तिच्या एक मुस्काटात मारली.

आता पुढे,

“तू आता भानावर नाही आहेस, तुला तुझं तरी कळतंय का तू काय बोलतेस ते? आई हिला आत घेऊन जा तिच्याशी आता बोलून.”

“काही उपयोग नाही.”
त्याची आई कानिकाला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. काही वेळाने ती बाहेर आली.

“बघितलंस अभि कशी वागते ती?”

“आई काळजी करू नकोस सगळं नीट होईल. मी आता निघतो जमलं तर उद्या सकाळी येतो. तोवर तू तिला काही बोलू नकोस, मी बघतो तिचं काय करायचं ते.”

“बाळा नीट जा.” अभि विचार करत करतच तिथून निघाला.

घरी पोहोचल्या पोहोचल्या अभिज्ञा त्याच्यावर चिडली.
“काय अभि कधीची तुला फोन करते आहे फोन का उचलत नाहीयेस? आणि उशीर का केलास? मला किती काळजी लागून होती तुझी.”


“अग थांब थांब जरा शांत हो, मी सांगतो तुला आणि माझा फोन सायलेंट वर असेल म्हणून आवाज आला नाही पण प्लीज तू पॅनिक होऊ नकोस. मी आलोय ना आता घरी, तू शांत हो बस इथे.” अभिने अभिज्ञाला बसवलं.
तिच्यासाठी पाणी घेऊन आला,
“हे घे, आधी पाणी पी शांत हो.” अभिज्ञा शांत झाली.

“अग मी घरी गेलो होतो.”

“घरी म्हणजे?”

“घरी म्हणजे आई-बाबांकडे गेलो होतो.”

“का? ते तिकडे का गेलास? सॉरी म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. कसे आहेत आई बाबा?”

“हो बरे आहेत, खरं तर मी आज दुसऱ्याच विचारत होतो आणि विचार करता करता मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर मला वेगळंच काहीतरी  बघायला मिळालं.”

“म्हणजे?काय झाल?”

“कनिका...” तो बोलता बोलता थांबला.

“कनिका..काय झालं तिला?”

“ती खूप विचित्र वागत आहे. तिचा तिलाच कळत नाहीये. मला या सगळ्यांचा शोध लावावा लागेल कनिका अशी का वागते? ती कुणाकुणाला भेटते? काय करते?कुठे जाते? सगळं मला शोधून काढावे लागेल.”
“अभि, मला खूप चिंता वाटत आहे.”

“चिंतेची बाब तर आहेच.”

“नक्की काय होतंय याचा शोध लावावाच लागेल.”
“काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित.”

“हो ग होईल सगळं नीट, बरं तू जेवलीस का?”

“नाही मी तुझ्याच काळजीत बसूनच होते.”
“सॉरी यार पण तू असं माझ्यासाठी जेवायची वाट बघत जाऊ नकोस, आता तू एकटी नाहीस माहिती आहे ना. मग बाळाला भूक लागते की नाही.”

“सॉरी.”

“अच्छा मी फ्रेश होऊन येतो तू जेवायला घे.”
अभिराज फ्रेश होऊन आला, तोवर अभिज्ञाने जेवण वाढून घेतलं. दोघांनीही बोलता-बोलता जेवण केलं. 
अभिज्ञा झोपायला गेली, अभिराज बालकनीत बसून होता. राहवून राहवून त्याच्या मनात विचार येत होते.

‘कनिका अशी का वागत असेल? तिचा आणि रक्षितचा खरच काही संबंध आहे का? की रक्षित जिच्याशी बोलत होता ती दुसरी कोणीतरी कनिका आहे. कि ती आपलीच बहीण आहे?’ एक ना अनेक प्रश्न त्याला भेडसावत होते.

आता काय करावं त्याला त्याचचं सूचेना, बराच वेळ बसून राहिल्यानंतर त्याला गाढ झोप लागली.

अभि सकाळी उठला तेव्हा उशीर झालेला होता. 
“अभिज्ञा... अभिज्ञा उठवलं का नाहीस मला?”

“सॉरी अभि तू गाड झोपला होतास ना तुला उठवायची इच्छा झाली नाही, तू रात्री उशिरा झोपलास ना?”

“हो गं, बराच वेळ मला झोप लागली नाही.”

“जास्त विचार करू नकोस होईल सगळं नीट.”

“अच्छा ठीक आहे मी फ्रेश होऊन येतो, तू ब्रेकफास्ट बनवून ठेव.”

“हो, अभि माझं सगळं रेडी आहे. तू पटकन फ्रेश होऊन ये.”

अभि फ्रेश व्हायला गेला. अभिज्ञाने त्याचा ब्रेकफास्ट तयार केला.
अभि फ्रेश होऊन डायनिंग वर बसला, समोरच्या प्लेटमध्ये बघून त्रासल्यासारखे केलं.

“अभिज्ञा मला नाही आवडत हे, माहीत आहे ना तुला तरी का बनवतेस?”

“सॉरी अभि डॉक्टरांनी मला खायला सांगितले ना मी माझ्यासाठी बनवलं आणि तुझ्यासाठी वेगळं काय बनवू याचा विचार करून मी तुला तेच दिलं. सॉरी पण आज खाऊन घे प्लीज.”

“ओके.”

अभिराज ऑफिसला जायला तयार झाला. पॉकेट, रुमाल, गाडीची चाबी सगळं घेऊन निघणार तोच अभिज्ञाने त्याला आवाज दिला.

“अभि थांब, तुझा टिफिन राहिला.” त्याच्या हातात टिफिन दिला.

तो घेत अभिने विचारलं,
“यात तरी काही बरं दिलेस ना?”

“हो रे तुझ्या आवडीची भाजी बनवली आहे मी.” तिनेही स्मितहास्य केलं.
“काय रे रोज रोज तुझ्या नावडीचं बनवते का एखाद्या दिवशी तर बनवते.”

“अच्छा चल मला उशीर होतोय मी निघतोय.”

अभि ऑफिसला गेला, त्यानंतर अभिज्ञाने आवरा आवर करायला घेतली. सकाळपासून अभिज्ञाची धावपळ सुरू व्हायची. अभिराजला ऑफिसला जायचं म्हणून त्याच्यासाठी नाश्ता, टिफिन आणि बाकीचे काम सगळं करे पर्यंत तिला खूप उशीर व्हायचा.
तिला दमल्यासारखं वाटत होतं म्हणून ती थोडया वेळ बसली. सोप्यावर बसल्या बसल्या तिला झोप लागली. बराच वेळानंतर तिच्या मोबाईलची रिंग वाजली म्हणून तिला जाग आली. बघितलं तर दुपारचा एक वाजलेला होता. फोनकडे बघितलं तर अभिराजचा फोन होता, तिने उचलला.

“हॅलो अभिज्ञा जेवलीस का?”
“नाही अजून.”

“किती वाजलेत अजून पर्यंत जेवली का नाहीस?”

“सॉरी मी जेवते आता, ऍक्च्युली मला थकल्यासारखं वाटलं म्हणून मी थोडा वेळ बसली तर मला झोपच लागली आणि तुझ्या फोनच्या रिंगने मला जाग आली. तू जेवण केलंस?”

“मी आत्ताच जेवलोय, भाजी खूप छान झाली होती हे सांगायला तुला फोन केला. लव यू डियर चल आता मी ठेवतोय फोन.”

“ओके बाय लव यु टू.”

काही वेळात दारावरची बेल वाजली, ती दार उघडायला गेली. दार उघडताच समोर रक्षित उभा होता. की त्याच्याकडे बघून थोडी आश्चर्यचकित झाली.

हा इथे कसा या प्रश्नचिन्ह हावभावाने तिने त्याच्याकडे बघितले.
“तुम्ही इथे?”

“अभिज्ञा फॉरमॅलिटी नको करूस ग, आता आपण दोघेच आहोत तू म्हटलं तरी चालेल मला.”

रक्षित असा घरी आलेला तिला आवडलेल नव्हतं. तरी ती गप्प राहिली.

“काही काम होतं?” 

“अरे काम असल्याशिवाय यायचं का इथे? नाही तर नाही यायचं का?”

“नाही असं काही नाही.”
“मला माहिती नव्हतं मी तर सहज आलोय तुला भेटायला.”

“हे बघा सर अभिराज आता घरी नाहीये आणि आता यावेळी तुम्ही असं घरी येणं योग्य वाटत नाही. सो तुम्ही नंतर आलात तरी चालेल.”
अभिज्ञा दारात उभी होती आणि रक्षित दाराच्या बाहेरून तिथून जागा नसतानाही तिला धक्का मारून आत गेला, सोफ्यावर जाऊन बसला.
आता मात्र अभिज्ञाला खूप राग आला पण तिने स्वतःच्या रागावर कंट्रोल करत शांतपणे त्याला बोलली.
“सर प्लीज तुम्ही इथून जा, तुम्हाला जर अभिराजशी काम असेल तर तो ऑफिसला गेलाय, माझ्याशी काम असल्याचा तर प्रश्नच येत नाही सो तुम्ही इथे का आलात?”

“असं कसं मला तुझ्याशी काम नाही ग, तुझ्याशी पण काम असू शकत ना. तुझ्या तब्येतीची विचारपूस करायला आलोय. कस आहे ना या  दिवसात खूप काळजी घ्यावी लागते आता तुझी काळजी घ्यायला कमी लोक आहेत. थोडी जास्त लोक हवीत ना? मी पण आता तुझी फॅमिलीच आहे ना, फॅमिली मेंबर... मी तुझी चौकशी करू शकतो.”.
आता मात्र अभिज्ञा संतापली.

“रक्षित तू जा इथून.”
ती जोरात ओरडली.

“अरे वा तू तर एकदम एकेरी शब्दावर आलीस मला वाटलं नव्हतं तू एवढी फास्ट असशील.” रक्षितने अभिज्ञाचा हात पकडला.

क्रमश:

🎭 Series Post

View all