बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 14

Abhidnya abhiraj love bond

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 14


आधीच्या भागात आपण पाहिले की,


अभिराजने रक्षितचं बोलणं ऐकलं, त्याला कनिकाचा आणि रक्षितचा प्लॅन कळला. तो तसाच ऑफिसमधून निघून आला.

आता पुढे,

दोन-तीन दिवसांनी कनिका अभिराजच्या घरी आली. अभिराज आणि अभिज्ञा दोघेही घरीच होते. कनिकाला असं दारात बघून अभिराजला खूप आश्चर्य वाटलं.

‘किती निर्लज्ज मुलगी आहे ही! इतकं सगळं करूनही इथे आली’  तो मनातल्या मनात बोलू लागला.

“कनिका तू इथे?” अभिने तिला लगेच विचारलं.
“हो दादा, तू नोकरी बद्दल काही बोलला नाहीस तर म्हटलं येऊनच बोलावं तुझ्याशी, म्हणून येथे आले.

“कनिका मला ती नोकरी करायची नाहीये, माझा डिसिजन झालाय.”

“अरे हो हो.. पण तुझी बहीण अशी दारात उभी आहे तर तिला दारातच उभा ठेवणार आहेस की आतही बोलवणार आहेस. वहिनी कुठे आहे?”

“आत आहे, आराम करते.”

“ओके मी आज जाते.”
“ती झोपली आहे उगाच तिला डिस्टर्ब होईल. तू बस ना इथे आपण बोलू.”

कनिका सगळं इकडचं तिकडचं बोलू लागली, अभिराज वाट बघत होता की ही रक्षित बद्दल काही बोलेल, काही सांगेल. पण तसं काहीही घडलं नाही. दोघांचे बोलण झाल्यानंतर कनिका तिथून निघून गेली.


दुसऱ्या दिवशी सकाळी अभिराज ऑफिसला गेला. रक्षित सरांशी बोलायचं म्हणून त्याच्या केबिन कडे गेला.

“मे आय कम इन सर.”

“वेलकम मिस्टर अभिराज, कधीची मी तुझी वाट बघतोय.

“सॉरी सर.”

“अरे सॉरी काय त्यात, पण आता येणार आहेस ना रोज ऑफिसला की आजच आला आहेस भेट द्यायला.”


“नाही सर, मी आता डेली येणार आहे.”


“काय म्हणते बायकोची तब्येत?”


“ठीक आहे सर, बरी आहे ती आता.”


“मला असं कळलं की तू दुसरीकडे नोकरी शोधतोयस.”

“नाही सर शोधणार होतो पण नाही शोधली. मी इथे कम्फर्टेबल आहे सो आय डिसाईड दॅट की मी इथे जॉब करेल तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर.”


“अरे मला काय प्रॉब्लेम असणार आहे.

“प्लीज हॅव अ सीट.”

“थँक्यू सर, थँक्यू सो मच.”


“अभिराज ही मेहताची फाईल आहे, चेक करून मला त्यात काय अपडेट कराव लागेल ते कळव. मला आजच्या आज ही फाईल मेल करायची आहे.”
c
“ओके सर.” असं म्हणून अभिराज ती फाईल घेऊन बाहेर गेला.

दिवसभराची कामे आटपून अभिराज घराकडे निघाला. वाटेत एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबला. चहा पीत असताना त्याची नजर इकडे तिकडे भिरभिर करत होती. अचानक त्याचे लक्ष एका पाठमोऱ्या आकृतीकडे गेलं. अभिराज ₹ला काहीतरी वाटलं म्हणून तो उठून त्या दिशेने जायला लागला. जाऊन त्याने पाठीमागे खांद्यावर हात ठेवला. तो व्यक्ती पलटला अभिराजला जो वाटला तो तो नव्हताच.

“सॉरी सॉरी.” असं म्हणून अभिराज पुन्हा त्या टपरीवर येऊन बसला.

‘का कुणास ठाऊक मला तिथे रक्षित सारखा दिसला. तो खरच रक्षित होता का?’ त्याने मनातल्या मनात विचार केला.


खरंच तिथे रक्षित उभा होता. तो कनिकाशी बोलत होता. कनिकाचे लक्ष अभिराजकडे गेलं आणि दोघांनी पटकन त्यांची जागा बदलली.

अभिराज बराच वेळ त्या टपरीवर बसून होता. आज का कुणास ठाऊक त्याची पावली त्याच्या घराकडे वळली. तो त्याच्या घरी त्याच्या आई-वडिलांकडे जायला निघाला. बरीच रात्र झालेली होती. अभिराजाने दाराची कडी ठोठावली. दार त्याच्या आईने उघडले. मुलाला समोर पाहून तिला खूप आनंद झाला. तिचे डोळे अक्षरशः पाणावले.

“अभ्या, माझा अभी.. अहो बघितलेत का कोण आलय?”

“कोण आहे.” आतून आवाज आला.

“आपला अभिराज आहे.” असं म्हणून तिने त्याच्या माथ्याचे चुंबन घेतलं.

मागेहून त्याचे बाबा आले.
“कसा आहेस रे लेका?” बाबा ने विचारलं.

“मी बरा आहे बाबा, तुम्ही दोघे कसे आहात?”

“कसे असणार? आमचा एकुलता एक मुलगा आमच्या जवळ राहत नाही. आम्हाला सोडून गेलाय. अशा आई वडीलाने कसा राहायचं तरी?”


“तुझी लाडकी लेक आहे ना तुझ्याजवळ? ती करते ना तुझ सगळं, काळजी घेते ना आणखी काय हवं? कुठे गेली कनिका?”

“काय सांगू तुला लेका, दिवसभर घरी नसते ती. कुठे काम करायला जाते? काय करते? काही सांगत नाही, आम्ही तिची काळजी करत बसतो आणि ही जी सकाळी निघाली ती रात्रीच घरी येते. आता बघ ना इतकी रात्र झाली तरी अजूनही घरी आलेली नाहीये. आमचा काळजी करण्यातच दिवस जातो. काय करावे काही कळत नाही विचारलं तर काही बोलत नाही. म्हणते तुम्हाला आयत बसून मिळते ना खायला मग झालं, नसते प्रश्न विचारत जाऊ नका असं म्हणून आमच्यावरच रागावते. तिच सोड तू ये बस काय देऊ तुला? जेवलास का बाळा? काय देऊ तुला खायला? तुझ्या आवडीचं बनवू का? वेळ आहे ना तुला?”
आईचं बोलणं त्याला टाळता आलं नाही आणि तो चुपचाप तिथे बसून होता. त्याच्या आईने त्याच्या आवडीचं जेवण बनवलं. त्याच्यासमोर ताट आणून त्याला भरवलं देखील. खरंतर आज अभीराजचे डोळ्यात पाणी आलं होतं. त्याची आई ज्या पद्धतीने त्याच्याशी वागत होती अशी जर आधी वागली असती तर त्याला घर सोडून जाण्याची गरजच नव्हती. पण त्याच्या आईने अभिज्ञाबद्दल एकही शब्द विचारलेला नव्हता. त्याचं त्याला खरंच वाईट वाटलं मग त्यानेच विषय काढला.

“आई आता नातवंडाचे तोंड बघायला यावं लागेल तुला.”
“खरंच खरंच सांगतोयस तू?”

“आई खरंच सांगतोय.”

“पोरा आम्हाला तिथे घेऊन चल किंवा सुनबाईला घेऊन ये. आम्ही चुकलो त्यावेळी आम्ही खूप विचित्र पद्धतीने तिला वागवलं पण आता नाही असं होणार, तिला घेऊन येशील का इकडे?”

“नाही आई आता तरी सध्या शक्य नाहीये, नंतर बघू. आता डॉक्टरांनी तिला आराम सांगितलाय. तिला कुठलाही ताण द्यायचा नाहीये. महिनाभरापहिले तिला बरं नव्हतं ऍडमिट होती. डॉक्टरांनी सांगितले तिला आनंदी ठेवायचं त्यामुळे आता तिच्यासमोर मी हा विषय नाही काढू शकणार. पण तू आणि बाबा नातवंडाच तोंड बघायला नक्की या.”

आईने तोंड भरून मुलाचं कौतुक केलं, त्यांचं बोलणं सुरू असतानाच कनिका तिथे आली. कनिका जरा विचित्र अवस्थेत होती.

“अरे दादा तू इथे? आज तुला कशी आठवण आली इतके महिने तुला आठवण आली नाही, आज कशी काय आठवण आली?” कनिका तिच्याच तालात गलंडत बोलत होती.

“कनिका काय हाल करून ठेवले स्वतःचे?” 

“दादा, आय एम फाईन मी बरी आहे. आय एम ओके.”

“अभि असं वागणं असतं का? मुलीच्या जातीने असं वागायचं असतं का? ही बघ मुलगी असूनही कसं वागते? रात्री उशिरा घरी येते आणि बघ घरी आल्यानंतर तिची अवस्था बघ मी सांगितलं असतं तर तुला खरं वाटलं नसतं पण आज तूच बघ तुझ्या डोळ्यांनी कशी वागते आहे ती?”

“आई तू जरा शांत हो मी बोलतो तिच्याशी.”

“कनिका कुठे होतीस आतापर्यंत आणि इतक्या रात्री घरी का आलीस? ऑफिस तर इतक्या रात्रीपर्यंत राहत नाही कुठे गेली होतीस? कुणाबरोबर होतीस?”


“चील ब्रो, चील डाऊन. मी माझ्या कलिग बरोबर बाहेर गेले होते. आज पार्टी होती आम्ही सगळे बाहेर गेलो होतो. सो जस्ट एन्जॉय.”


“असं कुठलं ऑफिस आहे ग तुझं की तुझ्या ऑफिसमध्ये लेडीजला पण पार्टीसाठी बोलावतात.. तेही इतक्या रात्रीपर्यंत.”

“दादा मी बोलले होते ना, तू आला असतास ना तर तुलाही छान एन्जॉय करायला मिळालं असतं. पण तुला तर यायचं नाही ना तुला असच राहायचं गरीब, नेहमी दुसऱ्यांसमोर हात पसरायचे, आपलं रडगाणं गायचं, तुला हेच हवं असतं ना चीप आहेस तू दादा अगदीच चीप.”  हे एकदाच अभिने तिच्या मुस्काटात मारली.

क्रमश:

🎭 Series Post

View all