बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 12

Abhidnya abhiraj love bond

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 12


आधीच्या भागात आपण पाहिले की,


कनिकाने अभिराजला तिच्या ऑफिसला जॉईन व्हायला सांगितलं. ही गोष्ट अभिज्ञाला कळली पण तिला हे सगळं पटलेलंच नव्हतं. इतक्या महिन्यापासून “जी बहीण बोलतही नव्हती तिला आता तुमचा पुडका कसा काय आला? ती तुमची बाजू कशी काय घेत आहे?” असं तिने अभिराजला विचारलं.

ती कनिकाला जाऊन भेटली. कनिकाने बोलून दाखवलं की रक्षित आणि तुझ्या मध्ये काहीतरी आहे. तिला ते आवडलं नाही तिने अभिराजला सांगितलं पण अभिने यावर काही उत्तर दिले नाही. आता अभिज्ञाला टेन्शन यायला लागलं, तिने सगळा घडलेला प्रकार उर्वीला सांगितला.

उर्वीने तिची समजूत घालून तिथून बाहेर पडली आणि थेट स्वानंदला जाऊन भेटली. घडलेला किस्सा त्यालाही सांगितला. आपण यातून काहीतरी मार्ग काढू असं सांगून त्याने उर्वीला घरी पाठवलं.

आता पुढे, 

दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुट्टी असल्याकारणाने स्वानंद अभिराजच्या घरी गेला. दारावरची बेल वाजली.

“अरे नंद्या, आज सकाळी सकाळी?” अभि

“काय यार तू विसरलास मला, पण मी विसरत नसतो दोस्ताला.” स्वानंद हसून बोलला.

“काय आज इकडे येण्याचा कसं काय?”

“तुझ्याशी बोलायचं होतं यार थोडं म्हणून म्हटलं चला भेटू.”

“बस, बसून बोलूया.”

दोघेही बाल्कनीत जाऊन बसले, अभिज्ञाने गरम गरम कॉफी बनवली दोघांसाठी. दोघेही कॉफी घेत बोलायला सुरुवात केली.

“बोल काय म्हणतो नंद्या?”

“तू ऑफिस जॉईन करणार नाही आहेस का?”

ऑफिसचं नाव निघताच अभिराजच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.

“नंदया तुला जर ऑफिस बद्दल माझ्याशी बोलायचं असेल तर प्लीज यार नको, मला या विषयावर चर्चा नको आहे.”

“तुला इतके दिवस झालेत ऑफिस जॉईन केलेले नाहीयेस, तुला रिझाईन करायचा आहे का? करायचा असेल तर तसं सांग सरांना ते तुझ्यासाठी दुसरा कोणाला अपॉइंट करतील. उगाच त्यांना टांगणीला का लावतोय.”


“मी जात नाही याचा त्यांना त्रास होतोय हे तु सांगायला मला इथे आलायस का?” अभि चिडून बोलला.

“नाही अभ्या, तू ऑफिसला का येत नाहीयेस हे विचारायला आलोय मी तुला.”

अभिराजाने मोकळा श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली.

“हे बघ नंदया, मला आता ते ऑफिस जॉईन करायचं नाहीये. मी दुसरीकडे जॉब शोधतोय इनफॅक्ट कणिकाने मला तिच्या ऑफिसमध्ये ऑफर दिली सो मी तिचा विचार करतोय.”

कनिकाचं नाव ऐकताच स्वानंद हसायला लागला.

“हसायला काय झालं तुला?”

“कनिकाबद्दल बोललास ना म्हणून हसायला आलं. कनिका तुझी बहीण इतके दिवस कुठे होती रे? इतक्या महिन्यात कधी तिला तुझी आठवण आली नाही आणि अचानक ती तुझ्या आयुष्यात आली.”


“तसं नाही आहे नंद्या, मीच घरापासून लांब होतो. मी सगळ्यांशी संपर्क तोडला होता. त्यात तिची काही चूक नाही.” अभि


“तुला आठवते का बोलता बोलता तू कितीतरीदा बोलून जायचास की कनिका तुझी बहीण असून देखील ती अभिज्ञाच्या जास्त जवळ होती तुझ्यापेक्षा ती अभिज्ञासोबत जास्त बोलायची, तिच्याशी जास्त कनेक्ट झाली होती. असं तू सांगायचं ना मला, मग आज अचानक तुझी बहीण तुझ्या बाजूने बोलतीये आणि अभिज्ञाच्या विरोधात गेली. हे कसं काय पॉसिबल आहे? तुला इतके सगळे प्रश्न नाही पडले अभ्या? आणि काय रे ती काही बोलली असेल तुझ्या बायकोला पण तुझा तुझ्या बायकोवर विश्वास असायला हवा ना? तू असा कसा विचार करू शकतो. अभिज्ञाला माझ्यापेक्षा तू जास्त ओळखतोस मी तर आता ओळखतोय तरी मला माहिती आहे ती असं काहीही करणार नाही. तिच्या मनात असं काही नाही आहे. तरी तुम्ही दोघे तिच्याबद्दल असं विचार का करताय?” स्वानंद सगळं बोलून गेला.

“तू काय बोलतोस म्हणजे मला काहीच कळत नाहीये.” अभि

“हे बघ अभिराज इतका भोळा बनू नकोस, तुला काय वाटलं तू ऑफिसला येत नाहीस, मला भेटत नाहीस, मला फोन करत नाहीस म्हणून मला काहीच गोष्टी कळणार नाही. मला सगळं कळलय तू ऑफिसला का येत नाहीयेस. तुझ्या मनात काय सुरू आहे. सगळं सगळं मला माहिती आहे. तू हा जो काही विचार करतोस ना हा विचारच मुळात चुकीचा आहे. तुझी बायको प्रेग्नेंट आहे, तिच्या पोटात तुझं बाळ वाढते आहे. एकदाची एक बाई स्वतःच्या नवऱ्याला सोडून दुसरीकडे जाईल पण एक आई ती असं कधीही करू शकणार नाही. असेल रक्षित तिच्या ओळखीचा, त्याने तिला आधी प्रपोज केलेलं असेल म्हणून त्या दोघात आताही काही नातं आहे असा गैरसमज तू का करून घेतोयस? असा विचार का करतोय? का दोघांच्या नात्यात दुरावा आणतोयस? हे बघ अभि, अभिज्ञाला आता मानसिक शांतता हवी आहे, तिला मानसिक आधाराची गरज आहे. अशा अवस्थेत तू जर तिच्याशी असा वागलास तर ती आनंदात कशी राहू शकेल? या दिवसात तिला आनंद दे, तिच्याशी प्रेमाने वाग. तिला प्रत्येक क्षणभरून जगू दे, आपल्या आयुष्यात कित्येक लोक येतात आणि जातात. नातेवाईक, मित्रमंडळी, प्रत्येकाचा असा विचार करत बसलास ना तर आयुष्य नाही जगता येणार आहे. सध्या तू कुठलाही विचार करू नकोस, तुला ऑफिस जॉईन नाही करायचं नको करू पण एक गोष्ट लक्षात ठेव तू कनिकाचाही ऑफिस जॉईन करणार नाहीयेस. मी तुझ्यासाठी नोकरी शोधेल आणि काही महिने नाही मिळाली ना तर तू काळजी करू नकोस हा मित्र आहे तुला काहीही लागलं तरी तू मला कॉल कर. मी आहे तुझ्यासोबत पण एक गोष्ट लक्षात ठेव अभिज्ञाला तुझी गरज आहे रे तिला मानसिक, भावनिक आधाराची गरज आहे. तिला एकटी पाडू नकोस. ती आनंदी असेल ना तर बाळ आनंदी राहतं. तिला आनंदात ठेव, आता स्वतःचा नाही तर तिचा विचार कर आणि बाळाचा विचार कर. तुला पटतंय का? माझं सांगण्याचा काम होतं तू कर विचार आणि तुझ्या जॉब साठी मी बघतोय कुठे रिक्रुटमेंट असेल तर तिथे अप्लाय करतो. तिथे चालेल ना तुला?” अभिराज ने फक्त होकारार्थी मान हलवली.


स्वानंद तिथून निघून गेला, अभिराज बराच वेळ तसाच विचार करत बसलेला होता. काही वेळाने तो तयार होऊन बाहेर जायला निघाला. अभिज्ञाने बघितलं तिला त्याला विचारावं असं वाटलं पण तिने नाही विचारलं ती तशीच दारात उभी राहून त्याला बघू लागली. तो निघून गेला, काही वेळाने अभिराज परत आला. तोवर अभिज्ञा सोप्यावर बसून त्याची वाट बघत होती. तो जसा दारात आला तशी अभिज्ञा उठून त्याच्याजवळ गेली.

“कुठे गेला होता अभी? काही सांगितलं नाहीस सांगून जायचं ना मला काळजी लागलेली असते.” असं म्हणून ती त्याला ओरडायला लागली.

तोच दोन्ही हात मागे केलेले अभिने समोर आणले, त्याच्या हातात एक क्युटसा टेडी होता. तो त्याने तिच्यासमोर ठेवला. तो क्युट टेडी बियर बघताच अभिज्ञाला खूप आनंद झाला.

“हे तू माझ्यासाठी आणलस?”

“नाही हे मी माझ्या बायकोसाठी आणलं. ही अशी रुसलेली, नाकाचा शेंडा लाल झालेली, डोळ्यातून अश्रू पाडणारी माझी बायको, माझ्या समोर उभी आहे ना तिच्यासाठी आणलं.” असं म्हणून त्याने तिचे डोळे पुसले आणि दोघे हसायला लागले.

“अभिज्ञा आय एम सॉरी, मला खरंच माफ कर. मी तुझ्याबद्दल नको नको तो विचार करत बसलो होतो. मी तुझा विचार केला नाही फक्त माझाच विचार करत राहिलो. मला माफ कर यापुढे असं नाही होणार. यापुढे माझ्याकडून तुला कसलाही त्रास होणार नाही. तू फक्त मला एक प्रॉमिस कर की तु आनंदी राहशील, परिस्थिती कुठली असो फक्त स्वतःला आनंदी .” अभिज्ञाने होकारार्थी मान हलवली आणि तिने त्याला प्रॉमिस दिल.

क्रमश:

🎭 Series Post

View all