बोचणारा पाऊस पर्व2 रे भाग 11

Abhidnya abhiraj love story

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 11


आधीच्या भागात आपण पाहिले की,


अभिज्ञाने अभिराजला रक्षितबद्दल सगळं सांगितलं. आता पर्यंत का नाही सांगितलं याचं कारणही दिलं.
अभिज्ञाला डिस्चार्ज मिळाला, अभि आता तिची जास्त काळजी घ्यायला लागला.
त्याने ऑफिसला जाणेही बंद केले होते, तो घरी राहून तिची काळजी घ्यायचा.
स्वानंदने फोन केला, रक्षितसरांनी विचारलं म्हणून सांगितलं. अभिज्ञाने विचारल्यावर अभि चिडला, त्याने सांगितलं की तो आता ऑफिसला जाणार नाही.

आता पुढे,
काही दिवस असेच निघून गेले.
एक दिवस रक्षित स्वतः अभिराजच्या घरी आला. 

अभि पुस्तक वाचत बसलेला होता. त्याचं रक्षितकडे लक्ष गेलं, त्याला  बघून अभिला आश्चर्य वाटलं. तो पटकन उठून दरवाज्याजवळ गेला.
“सर तुम्ही असं अचानक?” अभिराज

“हो तुझा काही कॉल नाही, काही मॅसेज नाही. येत नाही आहेस ते ऑफिसला कळवायला हव ना.” रक्षित 
“सॉरी सर.” अभिराज
“असं दारातच उभा ठेवणार आहेस की आत बोलावणार आहेस.” रक्षित
“ओह सॉरी, या ना सर आत प्लिज.” अभिराजने आत बोलावलं.
रक्षित आत येऊन बसला.  अभिने त्याला पाणी दिलं, फार्म्यलिटी म्हणून चहा, कॉफी विचारलं.
अभिज्ञा आत आराम करत होती, अभिने  तिला न उठवता स्वतः कॉफी बनवली.
दोघांनी कॉफी घेतली,  दोघेही गप्प होते. रक्षितने बोलायला सुरुवात केली.

“काय झालं अभिराज, काही प्रॉब्लेम आहे का? काही झालंय का?”

“नाही सर, असं काहीच नाही.”
“मग ऑफिसला का येत नाही आहेस? जॉईन का होत नाही आहेस?”

“सर आता अभिज्ञाला माझी  जास्त गरज आहे. मी तिला टाकून ऑफिस जॉईन करू शकत नाही.”

“तुझी काळजी मी समजू शकतो पण म्हणून त्यासाठी तू जॉब सोडणार?”
“नाही सर तस नाही, मी जॉईन करेल पण काही दिवसाने. तुमची काही हरकत नसेल तर.”

“अभिराज ऑफिसचे काही नियम असतात, आपल्याला त्या नियमानुसार चालावं लागतं. पुढील दहा दिवसात जर तू जॉईन झाला नाहीस तर मला इच्छा नसतानाही तुला नोकरीवरून काढून टाकाव लागेल.”
“सर मी कळवतो तुम्हाला.”
“ओके.” म्हणत रक्षित जाण्यासाठी उठला.
अभिने बाय करून त्याला दारापर्यंत सोडलं.
अभि वळला तस त्याला अभिज्ञा दिसली, दाराच्या मागे उभी राहून तिने सगळं ऐकलं होतं.

“का करतोयस हे सगळं.” अभिज्ञा
“आपल्यासाठी.” अभिराज
“मिन्स.” अभिज्ञा

“मी दुसरीकडे नोकरी बघणार आहे आणि राहण्यासाठी फ्लॅट सुद्धा.” अभिराज
“तुला हे सगळं सोपं वाटतं?” अभिज्ञा
“कनिकाच्या ओळखीच्या कंपनीत व्याकन्सी आहे, मी तिथे ट्राय करणार आहे.” अभिराज

“तुला वेड लागलय का अभि? का अस वागतो आहेस?” अभिज्ञा
अभिज्ञा अभिच्या  जवळ गेली. 
त्याला खुर्चीवर बसवलं, ती त्याच्या बाजूला बसली.
“अभि का अस वागतो आहेस. तुला दुसरा जॉब करायचा आहे तू खुशाल कर पण तुला खरं सांगू का,आता माझ्यात तेवढी ताकद नाही. तू घर बघशील रे,पण शिफ्टिंगच काय तेही करावंच लागणार आहे ना. माझ्याने हे सगळं नाही व्हायचं, प्लिज अभि जरा माझाही विचार कर.”

अभिज्ञाचं बोलणं ऐकून अभि थोडा नरमला. दोघांचाही बोलणं सुरू असताना कनिकाचा फोन आला.

“हॅलो दादा, मी तुला जे बोलले  होते. त्याचा विचार केला आहेस का?” कनिका

“नाही कनिका अजून तरी नाही, बघतो.. थोडा विचार करतो.”

“काय झालं वहिनी नाही म्हणते का?”

“नाही ग तसं काही नाही, थोडा विचार करतो आणि तुला कळवतो.” असं म्हणून अभिने फोन ठेवला.

“अभि इतके दिवस तुला कनिकाने फोन केला नाही आणि आज कसा काय केला? तुमच्या भावा बहिणीचं काय सुरू आहे मला तर काही कळतच नाही आहे.”
“काही नाही ग” असं म्हणत अभि खोलीत निघून गेला.

दुसऱ्या दिवशी अभिज्ञा अभिराजला न सांगता कनिकाला भेटायला गेली.

तिने कनिकाला बाहेरच भेटायला बोलावलं होतं. दोघींची भेट झाली, दोघींही एका रेस्टॉरंट मध्ये जाऊन भेटल्या.

“बोल वहिनी, काय झालं? का बोलावलं तू मला इथे?”

“कनिका तुझं काय चाललंय?”

“कुठे काय?”

“तू तुझ्या दादाला का सांगतेस की त्याने तुझ्या ऑफिसमध्ये जॉईन व्हावं आणि त्याने ती नोकरी करावी.”


“असं काही नाही वहिनी, चांगली संधी आहे, पगारही चांगला आहे. म्हणून मी बोलले दादाला. चांगल्या पगाराची नोकरी आहे शिवाय त्याला तिथे जवळ फ्लॅट घेऊन राहता येईल.”


“पण मला आता हे सगळं नको आहे.”

“का वहिनी? काय झालं? तुला नको आहे की रक्षितला नको आहे.”
“कनिका काय बोलतेस? तुझे तुला तरी कळते काय?”

“मला चांगलं कळून चुकलंय तुम्ही काय बोलता ते, दादाने तिथे नोकरी करू नये असं तुला वाटतं ना पण तुझ्या मनासारखं असं काहीही होणार नाहीये, मी दादाला सांगेन दादा तेच करेल.”


“ कनिका तुला काय झालंय? का असं बोलतेस तू? रक्षित आणि माझं काय संबंध आहे? तू का असं बोलतेस?”

“रक्षित आणि तुझा काहीही संबंध नसला तरी तुमच्यामध्ये आधी काय होतं हे मला सगळं मला माहिती आहे. त्यामुळे वहिनी तू खरे असल्याचा, पतीव्रता असल्याच नाटक करू नकोस. दादा जरी तुझ्यावर विश्वास ठेवत असला तरी आता माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. तुझ्या मनात त्याच्याबद्दल काहीही नसलं तरी त्याच्या मनात तुझ्याबद्दल सगळं काही आहे हे तू विसरू नकोस.”
“कनिका किती बदललीस ग तू, आधी फक्त माझ्या बाजूने बोलयचीस आणि आता...”

ती समोर काही बोलणार
कनिका मोठया आवाजात
“बस वहिनी, आता मला तुझं काहीही  ऐकून घ्यायचं नाही आहे.”

कनिका अभिज्ञाला खूप काही बोलली. समोर काहीही न बोलता ती तशीच उठून घरी निघून आली.

घरी येऊन ते ढसाढसा रडायला लागली. अभिराजच्या लक्षात आलं आणि अभिराजने तिला सगळं विचारलं.

“काय झालं अभिज्ञा? अशी का रडतेस?”

अभिज्ञाने घडलेला सगळा प्रकार सांगितला. अभिराज त्यावर काहीच बोलला नाही.

“अभि तू यावर काहीच बोलणार नाहीस का? तुला माहितीये माझ्या मनात असं काहीही नाहीये पण तू असा गप्प बसलास त्यावरून मला असं वाटतंय की तुलाही माझ्यावर शंका आहे. बोल अभि तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का?”

तो काही न बोलता तिथून उठून निघून गेला.

आता मात्र अभिज्ञाला खूप वाईट वाटलं, तिला आणखीनच रडायला आलं. तिला खूप हरल्यासारखं वाटलं.

अभि असा कसा काय वागू शकतो? यावर तिचा विश्वास बसेना.
अभिज्ञा रात्री न जेवता तशीच झोपली. अभिराजला वाटलं तिच्या जवळ जावं, तिला विचारावं, तिला घास भरवावा. पण का कुणास ठाऊक त्याची पावलं समोर सरकतचं नव्हती आणि तोही तसाच झोपी गेला.

पूर्ण दोन दिवस दोघे एकमेकांशी काहीच बोलले नाही. शेवटी अभिज्ञा चिडून बोलली.

“झालं ना? झालं सगळं तुझ्या मनासारखं? तुला हेच हवं होतं ना? कर तुला जे वाटते ते तू कर यानंतर मला काही विचारायचं नाही. मला गृहीत धरायचा नाही. तुझा माझ्यावर विश्वास नाही ना, तुझा तुझ्या बहिणीवर विश्वास जास्त आहे. तुम्ही दोघं बहिण भाऊ मिळून काय करायचं ते करा, मला यात पाडू नका. असं बोलून अभिज्ञा बाहेर गेली.


थोड्या अंतरावर गेल्यानंतर तिने उर्वीला फोन केला. उर्वीला भेटायला बोलावलं. अभिज्ञाने उर्वीला सगळं सांगितलं. तिचाही विश्वास बसेना तिला अभिराज बदल किव यायला लागली. हा माणूस असा कसा काय वागू शकतो? तिने अभिज्ञाला दिलासा दिला आणि मी अभिराजशी बोलेल आणि त्याला समजावेल असा शब्द दिला.
उर्वीने अभिज्ञाला तिची समजूत  काढून तिला घरी पाठवलं. त्यानंतर ती स्वानंदला भेटायला गेली. तिनेच स्वानंदच्या कानावर सगळ्या गोष्टी घातल्या.  

“उर्वी तू टेन्शन घेऊ नको, आपण यातूनही काहीतरी मार्ग काढू तू टेन्शन घेऊ नकोस, तू जा मी बोलतो तुझ्या सरांशी.” असं म्हणून दोघे आपापले निघून गेले.

क्रमश:

🎭 Series Post

View all