Feb 24, 2024
प्रेम

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 10

Read Later
बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 10

बोचणारा पाऊस पर्व 2 रे भाग 10


आधीच्या भागात आपण पाहिले की,


अभिज्ञा आणि अभिराजच्या घरी रक्षित जेवायला आलेला होता. हे दोघे ज्याप्रकारे एकमेकांकडे बघत होते अभिराजला थोडं विचित्र वाटलं. त्याने विचारलं तुम्ही एकमेकांना ओळखता का त्यावर अभिज्ञा काही न बोलता आत गेली.

जेवण झाली, रक्षित तिथून निघून गेला पण अभिराजच्या मनातले विचार जात नव्हते. तो तसाच सोफ्यावर झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जायला निघाला तर अभिज्ञाने त्याला थांबवलं.
मला तुझ्या सोबत घेऊन चल म्हणून आग्रह केला, तो तयार झाला. ती भराभर काम करायला लागली आणि तितक्यात तिचा पाय घसरला, अभि तिला लगेच हॉस्पिटलला घेऊन गेला. ट्रीटमेंट सुरू झाली, आता ती बरी होती.

अभिज्ञाला जाग आली, तिथे कुणीच नव्हतं तिने बॉटल घेण्याचा प्रयत्न केला. तितक्यात तिचा तोल गेला आणि लगेच तिला कोणीतरी अलगद पकडलं.

आता पुढे,

तिला अलगदपणे कुणीतरी पकडलं अभिज्ञा चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव होते. ‘आता मी पडले’ या विचाराने तिने डोळे घट्ट मिटून ठेवले होते. तिने घट्ट मिटलेले डोळे हळूच उघडले, बघते तर काय समोर रक्षित होता. त्याने अलगदपणे तिला बेडवर ठेवलं आणि तिच्याकडे बघत

“कशी आहेस अभिज्ञा?” रक्षित

अभिज्ञाने चेहऱ्यावर हल्क स्मितहास्य आणून

“मी बरी आहे, तुम्ही इथे कसे?”

“स्वानंद कडून कळलं तुझा एक्सीडेंट झालाय म्हणून बघायला आलो.” रक्षित

“आता मी बरी आहे.” अभिज्ञा

“अभिराज कुठे आहे?” रक्षित

“तो बाहेर असेल.” अभिज्ञा

“ओके तू आराम कर मी आलोच.” असं म्हणून रक्षित जायला निघाला.
तेवढ्यात दारात अभिराज आला, रक्षितकडे बघून थोडा दचकला.

“सर तुम्ही इथे?” अभिराजने लगेच विचारलं

“हो स्वानंद कडून मला अभिज्ञाबद्दल कळलं म्हणून भेटायला आलो होतो, विचारपूस झाली माझी आता निघणार होतो.”

“ओके सर.” अभिराजने शेकहॅन्ड केलं आणि रक्षितला क्रॉस करून पुढे आला.

का कुणास ठाऊक पण यावेळी अभिराजला रक्षितशी जास्त काही बोलावसं वाटलं नाही.
अभिराज वळला आणि त्याने चेहऱ्यावर कोरडे हास्य आणून रक्षितला बाय केलं.

खरं तर त्याच्या मनात वेगळंच काहीतरी चाललं होतं.
अभिराज अभिज्ञाजवळ येऊन बसला.
“कसं वाटतय आता?”

“बर वाटतंय, पण आपण घरी कधी जायचंय? मला आता जास्त वेळ इथे राहायचं नाही आहे. तू डॉक्टरशी बोल आणि डिस्चार्ज घे”

“असं नाही करता येणार, डॉक्टर जेव्हा म्हणतील तेव्हाच सुट्टी मिळेल. काय म्हणत होते रक्षित सर?”

“काही नाही, तब्बेतीबद्दल विचारलं आणि निघाले.”

“अभिज्ञा मला तुला काही विचारायचं आहे, खरं खरं सांगशील?” 

“खरं काय रे, मी काय खोटं बोलते तुझ्याशी?”

“तस नाही ग.”
“मग कस? तू माझ्यावर अविश्वास दाखवतो आहेस?”

“नाही ग पण मनात शंकेची पाल चुकचुक करत आहे म्हणून अस म्हणालो.”

यावर अभिज्ञा हसली
“बोल बिनधास्त.”

“तू रक्षित सरांना ओळ्खतेस का?”

“हो.”
“अग पण त्या दिवशी मी तुला विचारलं तेव्हा तू काहीच बोलली नाहीस.”

“खर सांगू अभि मी खूप घाबरले होते. तुला काय आणि कसं सांगू या विचारातच वेळ गेला आणि मग सांगायचं राहूनच गेलं.
“कोण आहे हा? आणि तू कशी ओळ्खतेस?”

“रक्षित आर्यनचा बेस्ट फ्रेंड आहे. आर्यन गेल्यानंतर रक्षितने माझी खूप मदत केली. पण एक दिवस अचानक त्याने मला लग्नाविषयी विचारलं आणि ते मला आवडल नाही म्हणून मी त्याच्याशी बोलणं बंद केलं. त्याने त्याचे प्रयत्न केले आणि त्यानंतर तो कुठेतरी निघून गेला होता. त्या दिवशी त्याला अस अचानक समोर बघून मी भांबावले, काय बोलावं कळेना. म्हणून गप्प होते. आय एम सॉरी अभि मी तुझ्याशी  बोलायला हवं होतं.”

“इट्स ओके ग मी तुझ्यावर रागावलो नव्हतोच.” अभिराजने डोळे मिचकावले आणि अभिज्ञाला मिठी मारली. तिच्या गालाची किस घेतली.

तेवढ्यात नर्स आली.

“मी आहे म्हंटल इकडे.” नर्स पण दोघांना चिडवायला लागली.
तिला पाहताच अभिराज पटकन उठून बाजूला झाला.
अभिज्ञाने लाजून मान खाली घातली.
“काय म्हणतात आमच्या पेशन्ट?” नर्सने बी पी चेक करताना विचारलं.
“मला आता एकदम बरं वाटतय. सुट्टी कधी मिळेल ते सांगा.”

“आजच  सुट्टी देतील तुम्हाला,डॉक्टर येतीलच इतक्यात.”

त्यांचं बोलणं सुरू असतानाच डॉक्टर आले त्यांनी चेक केलं आणि अभिज्ञाला डिस्चार्ज मिळाला.
दोघेही घरी आले,  आता अभिराज अभिज्ञाची जास्त काळजी घ्यायला लागला. त्याला अभिज्ञा आणि त्यांचं बाळ याशिवाय काहीच दिसत नव्हतं. कितीतरी दिवस तो ऑफिसलाही गेलेला नव्हता. या प्रेग्नंनसी मुळे त्यांचं नवरा बायकोच नात फुलत होतं.
म्हणतात ना, नवरा बायकोच्या नात्याची रेशीम गाठ असते नाजूक, पण प्रेमाची कळी फुलायला लागली की नातं आणखी फुलत जातं आणि ही गाठ घट्ट होत जाते. 
अभिराजने सकारात्मक विचार करण्याचं ठरवलं.  कुठलाही प्रसंग असो नकारात्मक विचार करायचा नाही, यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. असं त्याला वाटून गेलं.
आणि सकारात्मक विचार करण्याची सवय लागली की समोरच्याच्या गोष्टी सकारात्मकतेने विचार करण्याची शक्ती मिळते. कुठल्याही प्रसंगात सकारात्मकता बळ देते.
अभिज्ञाचा वेळोवेळी मूड चेंज व्हायचा. कधी कधी अभिलाही कळायचं नाही की काय करावं आणि काय करू नये.

एक दिवस अभिराजने वेगवेगळी पुस्तके वाचण्याचा विचार केला, तो बुकस्टॉलमध्ये गेला आणि दुकानदाराकडे गर्भसंस्कार आणि त्याविषयी डिटेल माहितीचे पुस्तके आणली. तो रोज रात्री पुस्तके वाचायचा.  सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिची काळजी घ्यायचा.
एक दिवस सकाळी सकाळी अभिराजच्या मोबाईलवर कॉल आला.

अभि फ्रेश व्हायला गेला होता म्हणून फोन अभिज्ञाने उचलला.
 स्वानंदचा फोन होता.
“हॅलो.”
“हॅलो अभिज्ञा अभ्या कुठे आहे?”
“फ्रेश होतोय.”

“अग तो ऑफिसला का येत नाही आहे?  बरेच दिवस झाले आता तरी त्याने यायला हवं. सर मला रोज विचारतात.”

“तू त्याच्याशीच बोल, मी फोन करायला सांगते.”

“ओके बाय.”

अभि फ्रेश होऊन आला.

“अभि स्वानंदचा फोन येऊन गेला, तू ऑफिसला का जात नाहीस म्हणून विचारत होता. सर वारंवार तुझ्याबद्दल विचारत आहेत. तू बोलून घे जरा.”

“हम्म”
अभिराज मोबाईल घेऊन बाहेर गेला, काही वेळाने परत आला.
“झालं बोलून? काय म्हणत होता?”

“काही नाही.”
“काही नाही म्हणजे? कधी जॉईन होणार आहेस?”

“तुला काय करायचं आहे? तू यात नाक खुपसू नकोस.” अभिराज चिडून आत गेला.
‘याला एवढं चिडायला काय झालं?’ अभिज्ञा मनोमन विचार करू लागली.
बऱ्याच वेळा नंतर अभि खोलीतुन बाहेर आला.
“अभिज्ञा तुझ्यासाठी कॉफी आणू?”

अभिज्ञा काहीच बोलली नाही, ती बाल्कनीत जाऊन उभी राहिली.
हा तिच्या मागेमागे गेला. तिच्या खांद्यावर हात ठेवला.
“काय झालं अभु?”
“मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. तुझ्या मनात आलं तेव्हा चांगलं वागायचं, मनात आलं तेव्हा वाईट वागायचं. समोरच्याचा मनाचा विचार करायचा नाही.”

ती आणखी काही बोलणार अभिने तिला थांबवलं.

“अग थांब थांब, काय? अग किती बोलणार आहेस? थोडया वेळाआधी तोंड फुगवून बसली होतीस. आणि आता किती बोलते आहेस.”

“अभि तुला खरच काही कळत नाही आहे,की तुला समजून घ्यायच नाही आह. मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही आहे.”

“अग काय झालं?”

“मगाशी कस बोलला माझ्याशी? मला वाईट वाटू शकत याचाही विचार केला नाहीस.”
“ओह, आय एम सॉरी डिअर.” त्याने तिला जवळ घेतलं.
“अग खरच सॉरी. मी थोडा डिस्टर्ब झालो होतो म्हणून असा तुझ्यावर चिडलो पण मला तुला दुखवायचं नव्हतं.”
“चिडायला काय झालं? आणि स्वानंद काय म्हणाला.”
“नाही, काही नाही.”

“काय झालं अभि? बोल ना. कशामुळे डिस्टर्ब झाला आहेस.”
“मी तो जॉब सोडणार आहे.”

अभिज्ञा आश्चर्यचकित होऊन 
“काय?”

क्रमशः

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//