बोचणारा पाऊस...भाग 5

Abhidnya abhiraj love bond

बोचणारा पाऊस भाग 5


आधीच्या भागात आपण पाहिले की,


अभिज्ञा आणि अभिराज दोघेही बाईक राईडवर गेले. त्यांच्या प्रेमाचा साक्षीदार पाऊस त्यांच्यासोबत होताच. अभिज्ञा आणि अभिराज दोघेही ओलेचिंब झालेले होते. काही वेळ सोबत घालवल्यानंतर ते निघून गेले. लग्नाचा दिवस जवळ आला, लग्नाचे सगळे विधी अभिराजच्या घरी होणार होते.

ठरल्याप्रमाणे लग्नाचा विधी संपन्न झाला. पाठवणी झाल्यानंतर अभिराजची गाडी एका दोन मजली इमारती समोर येऊन थांबली. अभिज्ञा गाडीतून उतरली आणि त्या घराकडे बघतच राहिली.

आता पुढे,

अभिज्ञा घराकडे बघतच राहिली. अभिराजने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन गेला. अभिज्ञा आणि अभिराज दारात आले, त्याच्या आईने दोघांचं औक्षण केलं. अभिज्ञाने उखाणा घेतला.

“दाराला लावलंय तोरण, 
दारासमोर घातली रांगोळी
अभिराजची सुखाने
भरू दे झोळी.”

अभिज्ञाचा गृहप्रवेश झाला. त्यांनतर पूजेचे विधी पूर्ण झाले.
अभिज्ञासाठी सगळे चेहरे नवे होते, ती याआधी कुणालाच भेटली नव्हती.

अभिज्ञाच्या सासूने तिला तिची खोली दाखवली.
“आज तुला इथे एकटीलाच झोपावं लागणार आहे, लवकर झोप आणि सकाळी लवकर उठ. सत्यनारायण पूजा आहे, सकाळी लवकर तयार होऊन बाहेर ये.” असं म्हणून ती बाहेर गेली.

अभिज्ञा फ्रेश झाली, तिने लग्नाचे कपडे बदलले.  दुसरी साधी साडी घातली. थोडा वेळ बाल्कनीत जाऊन बसली. अभिज्ञाला एकटं एकटं  वाटत होतं.

तिला सगळ्या गोष्टींच नवल वाटलं. हे घर, इथली माणसे सगळं खूप वेगळं होतं.


अभिज्ञा विचारांच्या गर्तेत गेली,


‘मी जिथे  गेले होते तो बंगला होता ना अभिराजचा, मी  त्यावेळी घरच्यांबद्दल विचारलं तेव्हा तो बोलला होता की ते सगळे बाहेर गेलेत. अभिराज खोटं का बोलला. त्याने कधीच माझी आणि त्याच्या घरच्यांची भेट करून दिली नाही, मला शॉपिंगलाही घेवून गेला नाही.’


अभिज्ञा बसलेली असताना अभिराज तिथे आला.

“हाय डिअर.” 
अभिज्ञाचं लक्षच नव्हतं, ती तिच्याच विचारात गुंतली होती.
त्याने मागेहून तिच्या गळयात हात घातला.


“काय डिअर, अश्या कुठल्या विचारात गुंतली आहेस की नवरा बाजूला येऊन उभाही राहिला तरी तुला कळलं नाही.”

“नाही, काही नाही.” अभिज्ञा

“काय झालं मला सांगणार नाहीस का? तुला एकटं वाटतय का? मी तुझ्यासोबत आहे,तू काळजी करू नकोस.” अभिराज
तिने  स्मितहास्य केलं.


“एक विचारू का?” अभिज्ञा
“अग बोल ना, त्यात विचारायचं काय आहे?” अभिराज

“तुला आठवत का, पहिल्यांदा आपली भेट झालेली, मी ओलिचिंब भिजलेली असताना तू मला तुझ्या घरी घेऊन आला होतास.”
ती समोर बोलणार तोच अभिराज बोलला.

“अग तो बंगला तर माझ्या मित्राचा आहे.”  अभिराज

“पण मग मी विचारलं की घरचे कुठे गेले तेव्हा सांगितलं होतं ना,की बाहेर गेले आहेत. मग ते सगळं काय होतं?” अभिज्ञा
“अग हो, त्याची फॅमिली बाहेर गेली होती ना त्यावेळी.” अभिराज
“काय झालं पण तू आता हे सगळं का विचारत आहेस.” अभिराज

अभिज्ञाला काय बोलावं कळत नव्हतं. ती गप्पच राहिली.
“अग बोल ना.” 
अभिराजची आई खोलीत आली.
“अभिराज सांगितलं होतं ना आज इथे नाही यायचं.”

अभिराज काहीही न बोलता रूम मधून निघून गेला.
“अभिज्ञा ये बाळा झोपायला.”
अभिज्ञा उठली आणि पलंगावर एका बाजूने झोपली. बाजूला तिची सासू झोपली.


‘माझाच गैरसमज झाला, मीच  समजून घ्यायल हवं. पण हा गैरसमज महागात पडू शकतो. काय करू आता? काहीच कळत नाही.’ अभिज्ञा पुन्हा विचारात पडली.


बराच वेळ तिला झोप लागली नव्हती. पहाटे पहाटे झोप लागली तेच सासूने आवाज दिला.

“अभिज्ञा उठ, पूजा आहे आज घरी.”
अभिज्ञा उठली,पटकन रेडी झाली. खाली गेली, सगळे पाहुणे त्यांच्या त्यांच्या कामात होते. 
काही वेळाने पूजेची तयारी झाली,पूजा सुरू झाली. 

दोघेही पूजेवर बसले. श्रद्धा आणि आस्थेने पूजा संपन्न झाली.
जेवण झाली, पाहुणे त्यांच्या त्यांच्या घरी परतले. आता फक्त घरचे होते. 


अभिज्ञा खोलीत आली, विचार करू लागली, घरात किती मेम्बर त्याची जोडणी करायला लागली.
अभिराजचे आई बाबा, त्याचे मोठे भाऊ वहिनी, एक लहान बहीण, आणि त्याचे काका काकू, त्यांचा एक मुलगा एवढी मोठी फॅमिली होती अभिराजची.

थोडया वेळाने अभिराजची बहीण कनिका खोलीत आली.
“वहिनी ही साडी घे, आता तुला ही साडी नेसायची आहे. छान तयार हो."
अभिज्ञाने हातात साडी घेतली आणि वळली तर कनिका बोलली.
“अग वहिनी माझ्या रूममध्ये चल.”


दोघीही कनिकाच्या रूममध्ये आल्या, अभिज्ञा तयार झाली. काही वेळाने कनिकाने तिला तिच्या रूमपर्यंत सोडलं आणि ती परतली.


अभिज्ञा रूममध्ये गेली, संपुर्ण रूम कडे नजर फिरवली. तिला खूप आश्चर्य वाटलं, मगाशी काहीच नव्हतं आणि आता संपुर्ण रूम फुलांनी सजवली होती. सगळीकडे केंडल्स लावलेली होती. ती आता गेली, बेड वर बसली. बेडवरही फुलांनी हार्ट शेप बनवलेला होता.

फुलांमुळे अभिज्ञाला प्रसन्न वाटत होतं. काही क्षणानंतर अभिराज खोलीत आला. त्याने दाराची कडी लावून घेतली. आणि तो तिच्या बाजूला जाऊन बसला.


त्याने तिचा हात हातात घेऊन


“आय लव यु अभिज्ञा.”
अभिज्ञा गप्प
“अभिज्ञा आय लव यु.”
तरीही अभिज्ञा गप्पच

त्याने तिची मान स्वतःकडे वळवली,


“काय झालं? काहीच का बोलत नाही आहेस? काहीतरी बोल. काल आल्यापासून बघतोय तू काहीतरी वेगळीच  वाटत आहेस. अभिज्ञा मी तुला कालही विचारलं, तेव्हाही तू बोलली नाहीस. आता तरी बोल.”

“तू माझ्यापासून काही लपवलस की माझा काही गैरसमज झाला, माझं मलाच काही कळत नाही आहे.”
“म्हणजे मी काही समजलो नाही.”

“तू ज्या बंगल्यावर मला नेलं होतंस, मला वाटलं तो तुझा बंगला आहे. म्हणून काल मी हे घर बघितलं तर मला धक्का बसला.”

“अभिज्ञा तू काय बोलतेस?”

“अभिराज तू माझ्यापासून लपवलस ना?”
“अभिज्ञा मी अस का करेन?”
“मला माहित नाही.”
अभिराजने अभिज्ञाला खुप समजावलं. पण ती ऐकायला तयार नव्हती.
त्यांची पहिली रात्र असूनही ती भांडणात गेली. दोघेही रात्रभर भांडत होते.


दुसऱ्या दिवशी सकाळी अभिज्ञा लवकर उठली.
ती फ्रेश झाली. सगळी साफसफाई केली. समोरच अंगण,  मागची रिकामी जागा सगळं सगळं साफ केलं.


अंघोळ करून पूजा केली, सगळ्यांसाठी नाश्ता बनवला. नाश्त्याला सगळे सोबत बसले तेव्हा अभिराजने विषय काढला.
“बाबा आम्ही फिरायला जाण्याचा विचार करत आहोत.”
बाबा काही बोलले नाही पण उत्साहात काका बोलले.


“अरे वा, खुप छान. मस्त फिरून या,एन्जॉय करा. कधी निघाताय? ,कुठे जाताय? किती दिवसासाठी जात आहात?”

“काका अजून काही ठरलेलं नाही आहे, आम्ही दोघे ठरवतो आणि सांगतो.”


त्याने मिश्कीलपणे अभिज्ञाकडे बघितलं.


नाश्ता झाल्यानंतर अभिराज अभिज्ञाला खोलीत घेऊन गेला.
“डार्लिंग कुठे जायचं फिरायला?”
“अभि तुझं ऑफिस असेल ना,आता कुठे एवढ्या सुट्ट्या घेतल्या आणि आता.”

“अभिज्ञा डोन्ट वरी, सगळं व्यवस्थित होईल.”

“तुला कुठे जायचं आहे, ते नाव सांग.”

“उटी, कश्मीर?”
“सध्या कुठेच नाही, मला सुट्ट्या नाहीत. काही दिवस आपण आपल्या कामावर लक्ष देऊया त्यांनतर जाऊयाना आपण. चालेल?”

“ओके, ठीक आहे. पण आपण इथे तर बाहेर जाऊच शकतो. आज मंदिरात जाऊन येऊ.”

संध्याकाळी दोघेही तयार झाले. 

“आई आम्ही मंदिरात जात आहोत.”

घरी सांगून दोघेही मंदिरात गेले,तिथे दोघांनी आशीर्वाद घेतला, तिथून निघाले.
“अभिराज उर्वीकडे जायचं? मला तिची आठवण येत आहे?”

“ठीक आहे.”
दोघेही उर्वीकडे गेले.
अभिज्ञाला उर्वीशी सोबत बोलायचं होतं.

दोघे गेले.
“हाय उर्वी..”
“हाय, काय ग कशी आहेस?”

“मी मस्त.”
अभिराज फोनवर बोलता होता हे बघून अभिज्ञा उर्वीशी बोलली.
तिने  उर्वीला सगळं सांगितलं.
हे सगळं ऐकून उर्वी पण विचारात पडली.


क्रमशः

🎭 Series Post

View all