बोचणारा पाऊस... भाग 4

Abhidnya abhiraj love bond

बोचणारा पाऊस...भाग 4


आधीच्या भागात आपण पाहिले की,


अभिराजने अभिज्ञाला लग्नाची मागणी घातली, अभिज्ञाने  आधी लग्नाला नकार दिला होता, उर्वीने तिला खुप समजावलं तेव्हा ती लग्नाला तयार झाली. अभिराज त्याच्या घरच्यांशी बोलला आणि दोघांचं लग्न ठरलं, थोडी फार शॉपिंग झाली.

आता पुढे,


अभिराज अभिज्ञाला ऑफिसमध्ये घ्यायला आला, तो ऑफिसच्या बाहेर उभा होता.


काही वेळाने अभिज्ञा बाहेर आली.
“हाय अभिज्ञा.”

“अभिराज व्हॉट अ प्लिझंट सरप्राईज.?” अभिज्ञा
“हम्म म्हटलं तुला सरप्राईज द्यावं.” त्याने तिला गुलाबाचं फुल दिलं.

“थँक यु.” अभिज्ञाने ते हसतमुखाने घेतलं.
“चल बस बाईक वर.” अभिराज
“बाईक?” अभिज्ञा
“हो आज लॉंग ड्राइव्हला जाऊया.” 


अभिज्ञा थोडी उदास झाली, तिच्या चेहऱ्याकडे बघून अभिराज

“काय झालं? तुझी इच्छा नाही का?”

“नाही तस काहीच नाही, चल निघुया.”
अभिराजने बाईक स्टार्ट केली. अभिज्ञा मागे बसली. तिला थोडं ओकॅवर्ड वाटत होतं, ती थोडी मागे सरकून बसली.
तिने सीटला मागे हात पकडला.


बाईकची राईड सुरू झाली. अभिराज सुसाट वेगाने चालवत होता. स्पीड ब्रेकर मुळे अभिज्ञा समोर सरकल्या जात होती. आता अगदी ती त्याच्या जवळ आली. तिला आधी थोडं कसंस वाटलं पण नंतर ती रिलॅक्स झाली. त्यांच्यातलं अंतर कमी झालं.

अभिज्ञाने तिचा डावा हात त्याच्या खांद्यावर ठेवला. तिचा स्पर्श त्याला भावला तो अजून सुसाट वेगाने चालवू लागला. अभिज्ञा गाडीच्या मिरर मधून त्यालाच बघत होती,  तिने हळूच उजवा हात अभिराजच्या मांडीवर ठेवला. 

अभिराजच्या चेहऱ्यावर स्माईल आली. मिरर मध्ये दोघांची नजरानजर झाली. काही क्षण दोघेही एकमेकांकडे बघत राहिले, अचानक हॉर्नच्या आवाजाने अभिज्ञाची लिंक तुटली.


“अभिराज समोर बघ.”
अभिराजने बाईक स्लो केली. आता तो हळु चालवू लागला.

 बाहेर वातावरण थंड झालं होतं, झुळझुळ थंड वारा शरीराला भेदून जात होता. मनात प्रेमाचा थंड गारवा साठत होता.


त्या गारव्यात दोघे आणखी जवळ आले. आता हवाही जाणार नाही एवढे जवळ आले होते. गाडीवरून वाऱ्याने अभिज्ञाचे केस हवेत उडत होते आणि त्याच्या गालाभोवती रेंगाळत होते. त्याला तिच्या केसांचा स्पर्श मोहरून टाकत होता.

त्यांच्या ह्या गोड, प्रेमळ सहवासात पावसानेही हजेरी लावली, पावसांच्या श्रावणसरी बरसल्या. अभिज्ञाच्या आयुष्यात सुखाचे क्षण असो वा दुःखाचे क्षण असो पाऊस हा तिच्या सोबतीला असायचाच. कधी कधी हवा हवासा वाटणारा पाऊस नकोसाही वाटायचा. पावसाने जोर धरला म्हणून अभिराजने एका टी पॉईंट वर गाडी थांबवली.


थोडे ओले झाल्यामुळे ते स्वतःचे कपडे हाताने झटकायला लागले. अभिज्ञाने नॅपकिनने चेहरा आणि केस कोरडे केले. दोघेही आधी थोडे अंतरावर उभे होते, हळूहळू जवळ आले. दोघांनी गरमागरम कडक चहा घेतला. त्या दोघांना बघून चहावाला म्हातारा बोलला,


“आपकी जोडी सलामत रहे, बहोत खुश रहो.” 
दोघेही एकमेकांकडे बघून हसले.

पावसाचा वेग आणखीनच वाढला. वाऱ्याने पावसाची दिशाही बदलत होती. चहा घेताना दोघांची नजरानजर झाली.
न बोलताही दोघांचे डोळे सगळं बोलून गेले.

“या रिमझिम झिलमील पाऊसधारा
तनमन फुलवून  जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा
गंध सुखाचा हाती
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे.."

अभिराजने पावसाचं पाणी तिच्या चेहऱ्यावर उडवलं, तशी तिने मान फिरवली. केस हलवले , अंगावरची ओढणी कमरेला बांधली.


आणि पावसात  रस्त्यावर आली. अभिज्ञा ओलिचिंब झाली, तिने  अभिराजला इशाऱ्याने बोलावलं. त्याने नकारार्थी मान हलवली. तिने पुन्हा त्याला हातवारे केले, तरी तो तिथेच उभा होता. तिने त्याला हात पकडून पाण्यात आणलं.


दोघेही चिंब चिंब भिजले तनाने आणि मनानेही. त्याने तिला अगदी मिठीत घेतलं. त्याच्या स्पर्शाने ती शहारली.


“अभिराज कुणीतरी बघतंय.”
“बघू दे.”
“अभिराज तो चहावाला बघतोय.”
“बघू दे.”


तिने त्याला दूर लोटलं आणि वळून ती थोडया समोर गेली.
अभिराजने मागेहून तिच्या कमरेत हात घातला.


तिने डोळे घट्ट मिटले. हळूहळू त्याचे हात तिच्या पोटावर फिरू लागले. तिचं संपूर्ण अंग शहारलं. तिच्या हृदयाची स्पंदने वाढली. तिने वळून त्याला घट्ट मिठी मारली. त्याचीही पकड घट्ट झाली. काही क्षण सगळं तसच थांबल्यासारखं झालं. 
गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने दोघेही भानावर आले.

एकमेकांपासून दूर झाले. तिने लगेच स्वतःला सावरलं, अंगावर ओढणी घेतली. हातात पर्स घेतली आणि
“अभिराज  निघायचं का?”


त्याने होकारार्थी मान हलवली आणि दोघेही निघाले. अभिराजने अभिज्ञाला तिच्या घरी सोडलं आणि तो निघाला.

दोघेही एकमेकांसोबतची स्वप्न रंगवू लागले.
दुसऱ्या दिवशी सकाळी अभिराजने फोन केला.
“हाय अभिज्ञा, गुडमॉर्निंग.”


“गुडमॉर्निंग..”
“आज लग्नाची तारीख काढायला गुरुजी येणार आहेत. तुला कुठलीही तारीख चालेल ना?” अभिराज
“हो चालेल.” अभिज्ञा

“ओके,बाय.” अभिराजने फोन ठेवला.


अभिज्ञा ऑफिसला गेली, आज दुपारनंतर ती उर्वी सोबत मार्केटला जाणार होती. तिने ऑफिसचं काम संपवलं. आणि बॉस कडून सुट्टी मागितली.


ठरल्याप्रमाणे उर्वी तिला घ्यायला आली, दोघीही मार्केटमध्ये गेल्या. खरेदी केली आणि  निघाल्या.


वाटेत दोघींनी मनसोक्त त्यांच्या आवडीची भेळ खाल्ली, अननस ज्यूस प्यायल्या.

थोडावेळ तिथे फेरफटका मारला.


तिथून आज सनसेट खूप छान दिसत होतं. आज त्यांना खूप बरं वाटलं , कितीतरी  दिवसांनी त्या अश्या मनसोक्त फिरल्या होत्या. आज स्वयंपाकाला सुट्टी म्हणून दोघींनी बाहेरच जेवण केलं आणि घरी गेल्या.


अभिराजचा फोन आला.
“हाय डिअर..” 
“हाय.”अभिज्ञा लाजून
“आठ दिवसानंतरची तारीख निघाली.”


“हम्म”
“हम्म काय ? इतक्या थंडपणे का बोलत आहेस.?”
“मी आताच बाहेरून आले,थोडी थकली आहे म्हणून , बाकी काही नाही.”


“अच्छा ठीक आहे, ठेवतो मग मी..  भेटू उद्या.” 
अभिज्ञा लगेच झोपली.
..................….....


लग्नाची संपूर्ण तयारी झालेली होती. लग्नाचे सगळे कार्यक्रम हॉल मध्ये होणार होते. बघता बघता लग्न दोन दिवसांवर आलं.


अभिराज अभिज्ञाला घ्यायला आला. अभिज्ञा आणि उर्वी दोघ्याही त्याच्यासोबत हॉल वर गेल्या. खूप मोठा हॉल आणि लॉन होता.

संपूर्ण हॉल फुलांनी सजवला होता. छान डेकोरेशन केलं होतं. तिथे पोहोचल्यावर मेहंदीचा कार्यक्रम सुरू होणार होता. अभिज्ञा तयार झाली, अभिराजही तयार होऊन आला. दोघांच्या मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला. 


एका बाजूने मेहंदी काढणाऱ्या वयस्कर बाया बसल्या होत्या, तरुण मुली त्यांच्यावर हसत होत्या. पण त्यांना हे कळत नव्हतं की त्या आता जरी वयस्कर असतील  तरी त्यांच्यातली कला ही जन्मताच आहे.


दुसऱ्या बाजूने अभिराजच्या हातावर मेहंदी काढणं सुरू होत.

मधात मोकळ्या जागेत मुली डान्स करत होत्या. एकंदरीत सगळं छान सूरु होत.


मेहंदी, संगीतचा कार्यक्रम झाला, रात्री खूप उशीर झाला असल्यामुळे  सगळे लवकर झोपून गेले. 


दुसऱ्या दिवशी सकाळी साखरपुड्याचा कार्यक्रम ठरलेला होता. अभिज्ञा सकाळी लवकर  उठून तयार झाली.
साखरपूड्यासाठी  छान गुलाबी रंगाची साडी नेसली होती. सगळे पाहुणे जमले आणि कार्यक्रमाला सुरुवात केली.
अभिज्ञाच्या अंगावर भरपुर दागिने चढवले. अभिज्ञाला खुप वाईट वाटत होतं. ती अभिराजसाठी काहीच करू शकली नव्हती.


त्यांच्याच घरच्यांनी अभिराजसाठी दागिने बनवले होते.
सगळे कार्यक्रम पार पडले.


लग्नाचा दिवस उजाडला. सकाळी हॉल मध्ये लगबग सुरू झाली. अभिज्ञा तयार झाली. अभिराजही तयार झाला. दोघांचं फोटोसेशन झालं त्यांनतर मंगलाष्टकाला सुरुवात झाली.
दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातला.


सगळ्यांनी आशीर्वाद दिले. सप्तपदीचा कार्यक्रम झाला.
सगळे विधी पार पडले. अभिज्ञाची पाठवणीची वेळ झाली.
सगळे गाडीत बसले गाडी निघाली. अर्ध्याएका तासात गाडी पोहोचली.


अभिज्ञा आणि अभिराज गाडीतून बाहेर आले. एका दोन मजली घरासमोर येऊन गाडी थांबली होती, क्षणभर ती त्याच्या बघतच राहिली.

“वेलकम तू माय हाऊस डिअर.”
अभिज्ञा त्या घराकडे  बघतच राहिली.

क्रमशः

🎭 Series Post

View all