बोबडे बोल....तिथे विषय खोल......(लघुकथा स्पर्धा-विनोदी)

लहान मुलं... म्हणजे देवघरची फुलं... लहान आहेत तो पर्यंत प्रत्येक दिवस छान जगून घ्या.


"मम्मा... काय कलतेश.."

"काम करते."

"हो काय? खलचं."(खरचं)

"हो."

"मम्मा.. काय काम कलतेश?"

"लाडू बनवते मेथीचे....."

"हो काय..कोनाला?"

"माझ्या पिल्लुला."

"माझ्या साठी बनवतेस... हॉ.... खलचं."

"हो रे बाबा..."

"मम्मा.... तू लालू अशे बनवतेश."

"हम्मम."

"हम्म नको बोलू ना."

"मग काय बोलू?"

"हा रे बाबा बोल."

"हा रे बाबा....."

"खुश पन बोल...."

"हा रे बाबा...खुश."

"हा." मम्मा.... तू काय बनवतेश?"

"एकदा सांगितलं ना तुला लाडू बनवते.सारखं सारखं तेच तेच विचारून डोकं नको फिरवू.जा तू काकू कडे जाऊन खेळ."

"मी काकू कले जाऊ?"

"हा जा."

(दारातूनच परत मागे येऊन.)

"मम्मा....तू किती प्लश्न विचालतेश...माझं डोकं खलाब कलतेश..."

"तू आता जातोस की देऊ एक धपाटा."

"नको...मी जातो."

"मम्मा... तू मला का धपाटा देनाल?"

"तू आगावगिरी करतोस ना म्हणून."

"मी नाय कलत आ...गावगिली...दिदू कलते. आपण दीदी ला अशी झोलायची(झोडायची)ना..."

"तिला का?"

" लय... मशती कलते दिदू..."


"बरं..."

(आतमधून काठी घेऊन.)

"मम्मा.. ही बग मी काती(काठी) आनली. दिदुला झोलायला."

"अरे....नालायका......ठेव ती काठी...आधी ठेव ती नाय तर तुलाच झोडेन मी बघ.....नुसता दिवसभर मस्ती करत असतो आणि दुसऱ्यांची नाव सांगतो.ठेव ती पहिले."

(काठी ठेवून रडायची ऍक्शन करताना.)

"तू मला का ओलदलिश?"(ओरडलीस)

"का म्हणजे...नुसती मस्ती करायची. जरा शांत म्हणून नाही बसणार. इथे बसून बघ ना,कसे लाडू बनवते मी. ते नाय होणार. उगाच आपलं....हे का केलं, नि ते का केलं."

(पुन्हा खोटा खोटा हुंदका देत.)

"मी तुझा बाबू हाये ना,म तू मला का शालखी मालतेश."

"खोटारड्या मी तुला हात तरी लावला का?"

"आत्ता मालिश(मारलीस) ना मला."

"कधी रे नालायका....परत खोटं बोललास ना तर खरचं एक धपाटाचं देईन"

"मी नाय खोत बोलत मम्मा..... काकू बोलते."

"हो का?"

"हां."

"ठीक आहे मी काकुला ओरडते नंतर."

"आपन तिचं घल(घर) उनात बांनदायच काय?"

"नको पप्पा ओरडतील आपल्याला."

(एवढ्यात माझ्या फोनची रिंग होते.)

"हां बोला."

"मी बोलतो ना पप्पाशी."

"हा देते...एक मिनिटं. हां हॅलो....याच्याशी बोला."(फोन स्पीकर वर ठेऊन.)

"हॅलो पप्पा....काय कलताय..."

"मी काम करतोय सोनी."

"तुम्ही काम कलताय?"

"हां.. तू काय करतोस?"

"मी लालू (लाडू) बनवतो लालू...."

"अरे वा...छान छान.तू जेवलास का?"

"मी नाय जेवला.....मम्मा नि मला मालल(मारलं) आनी नाय दिल जेवायला."

"का? मम्मा नि का नाय दिल जेवायला आणि का मारलं माझ्या सोनीला?."

"अशच नाय दिल. हॅलो पप्पा...मम्मा नि मला ओलडली पण"

"का ओरडली? तू काय केलं."

"मी काय नाय केलं..दिदू मशती कलत होती ना म्हनून."

"दिदू मस्ती करत होती म्हणून तुला मम्मा ओरडली."

"हां..... तुम्ही मम्माला माला."(मारा)

"नको साल्या...मम्मा दोघांना पण मारेल ना मग."

"हो काय?" खलचं.. तुमी घाबलतात मम्मा ला?"

"मी कशाला घाबरू आणि तू जेवला का नाही अजून....?"

"जेवला मी."

"मग मगाशी नाय जेवला का बोललास."


"मी नाय बोलला...खोटालड्या...."


"मग कोण बोलला."

"आई बोलली."

"चूप."

"हॅलो पप्पा....तुम्ही कुते हाय...?"

"कामाला आलोय सोनी."

"हो काय.. तुम्ही काम कलताय?"

"हो काम करतोय."

"तुम्ही काय काम कलताय."

"अहो कुठे याच्या नादी लागताय...... डोकं मॅड करून ठेवतो नुसता प्रश्न विचारून.मगापासून दहा वेळा मम्मा काय करतेस विचारून झालाय..एरव्ही घरात बस सांगते तेंव्हा याला बसायचं नसतं आणि आता जा सांगते काकू कडे तर माझं डोकं खात बसलाय."

"मी कदी डोकं खाल्ल तुज, तूच माज डोकं खाते. सालख माज डोकं खलाब कलते."

"बघा..ऐकलात. हा असा नुसता बडबड करतोय."

"अच्छा...... सोनू....मम्मा ला असा त्रास नाय द्यायचा..तू गुड बॉय आहे ना."


"नो नो....आय एम अ बॅड बॉय..."

(धूम ठोकून पळून जाताना.)

"काय रे काय बोलला हा?"

"आय एम अ बॅड बॉय...काय तरी गाणं आहे की काय माहीत नाही मला. दिदू नी शिकवलंय. जिथे तीथे डायलॉग मारत असतो नुसता.आता गेलाय ना बाहेर, लगेच येईल बघा दोन मिनिटात आणि परत विचारेल मम्मा...तू काय करतेस."

(परत धावत धावत घरात येऊन.)

"मम्मा...तू काय कलतेश?"

"घ्या...ऐकलत... काय नाय भीका मागते."

"काय बोलतेश काय... खलचं...."

"हो "

"हो काय?? किती लुपये?"(रुपये)

"अजून जमले नाहीत."

"हजाल(हजार) लुपये."

"नाही दहा हजार."

"हो काय...(पैसे मोजायची ऍक्शन करतांना)
हे घे दहा हजाल."

"हम्मम घ्या, तुमचा लेक दहा हजार देऊन गेलाय."


"ही ही ही.."

"ही ही काय करताय....एक अक्खा दिवस काढा त्याच्या सोबत मग समजेल कसं डोकं फिरवतो ते."

"तुला डोकं आहे?"

"नाही बिना डोक्याची आहे मी ठेवा फोन लाडू बनऊद्या. पन्नास लाडू पण नसतील बनवायचे पण याच्या पाठी पाठी नाचून लाडू बनायला चार तास लागले."

"हा रे बाबा ठेवतो फोन बनव तू लाडू."

"हॅलो पप्पा......"

"घ्या.....आला परत."

"हॅलो पप्पा.....मला चिकन लोल्लीपोप घेऊन या,आनी फालुदा आनी,वलापाव."

"काय आणू?"

"व...ला....पा....व."

"तू खाणार वडापाव?"

"हा नक्की खानाल. मला लय म्हनजे लय म्हनजे लय आवलतो."

"ओके...डन..... घेऊन येतो वडापाव."

"ओके पप्पा....बाय.......मी कत(कट)कलतो मी कत कलतो."(फोन कट करायला खूप आवडतं)

(संध्याकाळी पप्पा घरी आल्यावर)

"पप्पा......तुमी कुते गेले होते."

"कामाला गेलो होतो."

"मला का नाय नेली."(खोटं खोटं रडतांना)

"तू झोपला होता ना."

"हो काय....खलचं."

"हा खरचं."

"आग....बाय माजे..... काय बोलताय काय???"


(लेकाच्या या वाक्यावर पप्पाना हसू आवरेना)

"हे कोणी शिकवलं."

"काकोनी....."

"अच्छा...."

"तुमी मला वलापाव घेऊन आलात."

"हो आणलाय ना...मम्मा कडे माग."

"मम्मा नाय देत.मम्मा लय...कुस्की हाय."

"गप नाय तर मार खाशील."

"मम्मा.....पप्पा तुला कुस्की बोलले."


"ओय.....मी कधी बोललो?"

"आत्ताच....." (पप्पाचं नाव सांगून मम्माच्या पाठी जाऊन लपतो आणि हळूच वाकून बघतो पप्पा कुठे आहेत ते.)

"बघितलं अशीच मस्ती करत असतो बदमाश...खूप डॅम्बीस झालाय"


"हां..... माझाच लेक आहे ना."

" हो का? बरं....चहा सोबत काय देऊ?"


"दे काही पण....."


"मेथीचा लाडू देऊ का?"

"नको....."

"का? आत्ताचं तर बोललात लेक तुमच्यासारखा आहे, मग मेथीचे लाडू आवडत असतील ना तुम्हाला. नाही म्हणजे तुमचा लेक खातो ना म्हणून विचारलं हो."(तोंड वाकड करून)

(रात्री जेऊन भांडी आटोपल्यावर)

"पिल्लू...त्या बॉटलला हात लावू नको."

"का?"

"खराब होईल ती... तुटेल ना म्हणून."

"हो काय..."

"हां."
(परत त्याच बॉटल ला हात लावल्यावर.)

"पिल्लू....एकदा सांगितलं ना तिकडे बस एका बाजूला.....आणि बघ."

(एका बाजूला उभं राहून.)

"आता काय झालं असा का घुम्या सारखा उभा आहेस?"

"तूच बोलली ना मला..... उबा लाऊन(राहून) बग,म्हनून उबा लाऊन बघतोय तुला."

"अरे देवा.....काय करू तुझं? जा आत जाऊन बस जा."

"मम्मा.....कुते बसू?"

"सोफ्यावर बस रे..."

"मम्मा....कुतल्या देवाशालका बशु.."

"हे देवा......तू फक्त गप्प बस.....नुसता प्रश्न विचारून हैराण करतोस."

(परत किचन मध्ये येऊन.)

"मम्मा.....कुते बशु?"

(मम्मा काहीच उत्तर देत नाही.)

"मम्मा.....इकले बग ना...."

"काय रे?"

"कुते बशु मी?"

"बस माझ्या डोक्यावर.....पण गप्प रहा जरा."
(मम्मा कडे बराच उशीर एकटक बघत राहिल्यावर पुन्हा एकदा आवाज देतो. मम्मा..)

"आता काय झालं?"

"तू खाली बश ना...."

"का?"

"तुज्या डोक्यावल कशा बशु? मी लय शोता(छोटा) हाय ना."


"ए बाबा..... तू जा ना आतमध्ये....पप्पा आहेत ना,त्यांच्या सोबत खेळ जा."

"नको नको..मी झोपलो."


तर मग मित्र मैत्रिणींनो.....या माझ्या घरातला एका दिवसाचा प्रवास यावरून रोजच्या दिवसाचा अंदाज काढू शकता.ही आमच्या घरात घडणारी रोजची विनोदी कथा...तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि ही कथा वाचून थोडं जरी हसू आलं तर कमेंट मध्ये नक्की कळवा सोबत तुमच्या मुलांचे निरागस प्रश्न आणि रोजची बडबड सुद्धा सांगा.खरंतर विनोदी कथा लिहिणं जमतच नव्हतं.कसतरी सगळं जमवलं आहे मी आणि विनोदी कथा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.?