देव तारी त्याला कोण मारी..

पहाटे 4 वाजता सर्व डोंगराच्या पायथ्याशी आले, वाटेत मिळालेल्या प्रचीतीसाठी देवीचे आभार मानले, पुन्हा कळसाला दंडवत केला आणि शेवटी उरलेल्या पैशांनी मुक्कामाच्या ठिकाणी सुखरूप पोहोचले. म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी...

साधारतः १४ -१५ वर्षां पूर्वीची गोष्ट आहे. मी माझ्या घरच्यांसोबत उत्तर भारत फिरायला गेलें होते. आग्रा, शिमला, कुलू- मानली, डलहौसी, वैष्णव देवी, असा बरच काही करून परत दिल्ली असा सुमारे १५ दिवसांचा प्रवास होता. मी, माझे आई – वडील, बहिण, आणि साधारण अडीच वर्षांची भाची, म्हणजे भावाची मुलगी असे सगळे प्रवासाला निघालो. सगळेच अगदी प्रवास प्रेमी आणि मजेशीर असल्याने प्रवासात मस्त एन्जॉय करत जात होतो. प्रत्येक क्षण जगणं कोणी त्यांच्याकडून शिकावं. जेमतेम 5 जणांसाठी सुद्धा स्कॉर्पिओ गाडी बुक केली होती, ज्यामुळे प्रवास सुखकर झाला. त्यात ड्रायव्हर पण छान होता त्यामुळे अजूनच आरामात प्रवास सुरू होता. हॉटेल्सचे बुकिंग आधीच झाले होते त्यामुळे अगदी वेळेनुसार सगळं सुरू होतं.

म्हणता म्हणता आम्ही वैष्णव देवीला जायला निघालो, तेव्हा जम्मुहून पोलिसांनी आमच्या पुढच्या गाड्यांना परत जा असं संगण्यातले, कारण काहीतरी दहशतवदी हल्ला झाला होता काश्मीर मध्ये, पण दैवाची इच्छा होती त्यामुळे आमच्या गाडीला कटराला जातं आले, मुक्काम कटरालाच होता.

दुसऱ्यादिवशी सकाळीच लवकर अवरून सगळे दर्शनासाठी निघाले. लवकर निघाल्यामुळे खाण्यासाठी कोणताच हॉटेल उघडलं नव्हतं, त्यात इतका पहाड चढणार तर मिळेल रस्त्यात काही असा विचार करून आम्ही प्रवास सुरू केला. काही चालत काही घोड्यावर असं करत दुपारी उशिरा पर्यंत वर पोहोचलो. त्यानंतर दर्शनाच्या रांगेत लागलो पण रात्र झाली तरी आमचाचा नंबर काही लागेना, शेवटी भुकेने कावळे कोकल्याला लागलेत, कसं बस रांगेतून निघून वडिलां नी पाव भाजीचं parcel मिळवल. गर्दी खूप होती त्यामुळे खायला काही मिळत नव्हतं. सोबत काही होत थोडफार ते लहानग्या भाचीसाठी लाऊन ठेवलं होतं. रस्त्यात येताना फक्त कॉफी मिळाली होती त्यावरच चौघे तग धरून उभे होते.

पावभाजी मिळाली आता ती उघडून खाणार तितक्यात आमच्या रांगेला आता सोडण्याचा फर्माना आला. मग काय घेतलेलं जेवण बाजूच्या रांगेतील लोकांना दिलं आणि दर्शनासाठी पुढे सरकले, कारण असत काहीच नेऊ देत नाहीत. त्यानिमित्ताने अन्नदान झालं. साधारण रात्री 11 वाजता दर्शन झालं. बाहेर येई पर्यंत परत सगळं बंद झालं होतं, त्यामुळे त्या दिवशी कड्क उपवास घडला.

आता परतीचा प्रवास सुरू करू म्हणजे लवकर जाऊन आराम करता येईल कडाक्याच्या थंडीत लहान मुलीला घेऊन वर पहाडावर कुठे बसणार? म्हणून लगेच प्रवास सुरू केला, सुरवातीला 5 कि. मि घोडा मिळणार नाही तिथून पुढे मिळेल असं समजलं, मग चालत 5 की. मी जाऊ, आणि तिथून घोडा करू असं ठरलं. त्यानुसार घोडे मिळतात त्या ठिकाणी आलो, पण गंमत तर आता येणार होती. मिळालेल्या माहिती नुसार घोडेवाले 800 रुपये घेतात, ह्यानुसर वडिलांनी मोजकेच पैसे घेतले होते की गर्दीत कोणी पाकीट मारूनये. सकाळी त्याचं किंमतीत घोडे मिळाले. पण रात्री मात्र त्यांची किंमत वाढली 2000 रू. मानसी, आणि खिशात होते 5000 रुपये, आता कसं करायचं म्हणून मी आणि भाची एका घोड्यावर आणि आई दुसऱ्या असं जाऊदेत , मी आणि ताई चालत येतो असं बाबा म्हणालेत, पण मी आणि आई एकटं जायला तयार नव्हतो. मग देवीचा नाव घेत तसच सगळे चालत निघाले, कडाक्याची थंडी होती. थोडं पुढे गेल्यावर एक घोडेवाला दिसला, त्यांनी स्वतःहून 1000 रुपये मानसी या प्रमाणे आम्हाला नेण्याची तयारी दर्शवली. सगळे घोड्यावर बसले, भाचीला माझ्या सोबत बसवलं. कारण वजनाने मी कमी होते. उतारावर बॅलन्स जाऊनाये म्हणून मे जेमतेम २० वर्षाची, भाचीला ओढणीने कमरेला बांधून घेतले. घोड्यावर दोघी झाशीच्या राणी सारख्या दिसत होतो.

घोडे निघाले, पण आता जास्तच थंडी जानऊ लागली. लहान भाचीच्या अंगावरचे स्वेटर पण ऊब देऊ शकत नव्हते, तेव्हा प्रसादात मिळालेली देवीची ओढणीच मी भाचीच्या अंगावर घातली, आणि चक्क नेटच्या त्या ओढणीने माझ्या भाचीची थंडी थांबली, तिला ऊब मिळू लागली.

पहाटे 4 वाजता सर्व डोंगराच्या पायथ्याशी आले, वाटेत मिळालेल्या प्रचीतीसाठी देवीचे आभार मानले, पुन्हा कळसाला दंडवत केला आणि शेवटी उरलेल्या पैशांनी मुक्कामाच्या ठिकाणी सुखरूप पोहोचले. म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी...



धन्यवाद...

वाचक मित्रांनो ही घटना सत्य आहे.  माझा स्वानुभव आहे. आज तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला.