Login

समलिंगी त्या दोघीची गोष्ट

This story was my real life incident... I have no any idea such type of LGBT groups...

आज वर्तमानपत्रात वाचले.  एका पुरुषाचे त्याच्या साथीदारासोबतच संबंध होते आणि त्याच्या पत्नीला ही गोष्ट कळताच त्यांने पत्नीला मारून टाकले.

समलैंगिक संबंध आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. कलम 377ने या संबंधाना गुन्हा ठरवलं होतं. हे कलम काढून टाका, अशी मागणी LGBT कार्यकर्ते अनेक वर्षांपासून करत होते. तस झालही. परंतु आपण समलिंगी आहोत हे त्या व्यक्तीने नाकारून कसे चालेल? त्याने ही गोष्ट कुणापासुन लपवून ठेवून  त्या व्यक्तीला अंधारात ठेऊ नये.  विवाह करायला निघालेली अनेक जोडपी आपण समाजात बघतो.  होणाऱ्या भावी पतीला किंवा पत्नीला कुठला रोग आहे का म्हणून प्रत्येक टेस्टचे रिपोर्ट मागवतात. पण एखाद्याचा मनातलं कोण सांगेल? तो स्वतः ह्याची  कबुली देऊ शकेल का ❓

समलिंगी हे नैसर्गिक समजल्या जातं हे त्या व्यक्तीने स्विकारलं  . आणि  भिन्नलिंगी सोबत लग्न न करता त्याच्या जीवनात ते सुखी राहिले तर गुन्हेगारी घडणार नाही.  आपल्या होणाऱ्या जीवनसाथीला आधीच त्याची खबर दिलेलं योग्य. कारण असं करून कोणीच सुखी राहणार नाही.
प्रत्येक ढगात इंद्रधूनचे रंग शोधूया आणि मुखवट्यांशिवाय आयुष्य जगूया. असं झालच तर......

माझ्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग. पुर्व आयुष्यात जेव्हा ह्या विषयी मला काहीच द्यात नव्हतं तेव्हा हा विषय मला पण समजून घेणं अवघड होतं.

होस्टेलवरचे दिवस होते ते. नुकतच होस्टेल जॉईन करून चार, पाच महिने झाली असावीत . माझ्यारूम मधल्या दोघी सिनियर रूम सोडून समोरच्या बिल्डिंगला जिथे जॉब वर्किंग मुली राहतात तिथे शिफ्ट झाल्या. मग मी रूम मध्ये एकटीच! माझ्या समोरचा रूम मध्ये तीन मुली रहायचा.  एक नवीन मुलगी राहायला आली, ती पण त्याच रूममध्ये गेली.

रोशनी  माझ्या समोरच्या रूममधली मुलगी. तिच्या सोबत जवळ जवळ माझी चांगली ओळख झालेली. एक दिवस मी कॉलेज मधून आल्यावर रोशनी माझ्या रूममध्ये आली,  खुप तणावाखाली वाटतं होती ती त्याचं नेमकं कारण मलाही ठाऊक नव्हतं... ती विनंतीच्याच स्वरात म्हणाली, " कोमल यार मी तुझ्या रूममध्ये येऊ का राहायला.... तुझ्या रूममध्ये तर तू एकटीच आहेस, आमच्या रूममध्ये आम्ही चौघी  आहोत. "
कोणी नवीन मुलगी आल्यावर तिला माझ्या रूममध्ये शिफ्ट केलच  असतं . मी कसलाही विचार न करता तिला.... चालेल म्हटलं! ती खुप खुश झाली. पण लगेच म्हणाली, " पण..... माझी एक मैत्रीण आहे सेजल बारावीला.... " , " तिच काय? " रोशनीचा मनात काय चालू होत मला ठाऊक नव्हतं, " ती खाली रहाते, ज्युनियर फ्लोअरवर ती रात्री आपल्या रूममध्ये झोपायला आली तर तुला चालेल का? "
मला वाटलं असेल खुप जिवलग मैत्रीण. मला तिच्यापासून काही अडचण नव्हती. मी रोशनीला म्हटलं, "आपल्याकडे दोन बेड पण आहेतच खाली.... "
रोशनी आली तिचं सामान घेऊन त्याच दिवशी. 
मी माझं पहिलं लेक्चर साडेआठचं असल्याने  आठ वाजताच हॉस्टेलवरून निघून जायची. रोशनी बीएससी करत होती पण ती रेग्युलर कॉलेजला जायची नाही.  मी चार वाजता कॉलेज मधून आल्यावर सेजल रूम मध्येच असायची. दोघींच्या गप्पा रंगलेल्या असायचा.
मी रूममध्ये येताच सेजल रूम मधून निघून जायची.
माझ्या येण्याने तिला निघून जायला काय व्हायचं कळायचं नाही.
चार वाजता कॉलेजवरून आल्यानंतर मी झोपायची तर रात्री जेवन करायला दहालाच  उठायची. तेव्हापर्यंत सेजल रूममध्ये यायची नाही. दहा नंतर मी माझे बुक्स घेऊन आमच्याच फ्लोअरवर लायब्ररी होती तिथे जाऊन बसायची. मी लायब्ररी मध्ये गेल्यानंतर ती रूममध्ये यायची.
ती माझ्या सोबत फार बोलायची नाही. का? माहिती नाही.   एकदा मी कॉलेज मधून आल्यानंतर सेजल रूममध्येच बसलेली होती. मी तिला म्हटलं, "सेजल तू बारावीत आहे ना? अभ्यास करत नाही का? क्लास लावले असणार ना?"
माझ्या प्रश्नांना ती भांबावून जात  उतरली,
" अगं ताई माझे क्लास सकाळी असतात, मी कॉलेजला नाही जात... आणि रात्री करतेच ना स्टडी! " असं बोलून ती रूममधून निघून गेली.
सेजलचा  रूममध्ये येण्याचा नित्य दिनक्रम  चालू होतो. मी रूममध्ये दोन वाजता आल्यानंतर त्या दोघीपण  लाईट  बंद करून झोपलेल्या असायचा.

दिवाळीच्या मध्ये सुट्या आल्या, सेजल आणि रोशनी पाच, सहा दिवसांसाठी घरी गेल्यात. माझे पेपर व्हायचे असल्याने मी घरी जाऊ शकत नव्हते. 
मी समोरच्या रूममध्ये सिनियर सोबत गप्पा करत बसले होते, ज्या रूममध्ये आधी रोशनी राहायची.
आसावरी ताई  मला म्हणाली, " काय म्हणतेय रोशनी? आता तर मज्जा असेल तिची तुझ्या रूममध्ये. "
आसावरी ताई अशी का बोलली असावी कळतं नव्हतं, " हो.... असते ती . " मी एवढचं बोलले.
रजनी तिच्या कानात काहीतरी कुजबुजत होती. तसच आसावरी ताई परत मला म्हटली, " सेजल काय म्हणते गं? येते का रोज झोपायला.... "
मी म्हटलं , "हो... येते ती रोज "
आसावरी ताईच आणि रज्जूच खोचक बोलणं मला कळतं नव्हतं.  मला असं वाटायला लागलं ह्या काहीतरी लपवत आहेत माझ्या पासून. तोच संदेह मनात ठेऊन , " काय झालं आशू ताई,  तुम्ही काही लपवताय माझ्यापासून? " ह्यावर  आसावरी ताई काही बोलणार शर्वरी रोशनीची  आधीची जिवलग मैत्रीण तिला मध्येच थांबवत , " अगं तुझ्या रूममध्ये कपल्स राहातात. " म्हणून खळखळून  हसायला लागली.
मी, " कपल्स...... कोण? रोशनी आणि सेजल. काय बोलताय, अगं त्या जिवलग मैत्रीणी आहेत. कपल्स का म्हणता.... " झालं क्षणभर रूममध्ये शांतता.
कोणी कुणाशीच बोलत नव्हतं  , " सांगेल का कुणी काही? "
शर्वरी ताईने आधी तर माझ्याकडून वचन घेतलं , आम्ही सांगितलय हे तू रोशनीला बोलू नको म्हणून.... " रोशनी आणि सेजल दोघी रात्री एक बेड शेअर करतात. " शर्वरी ताईच्या  ह्या बोलण्याचं मला जरा आश्चर्य वाटलं, " तर काय झालं..... जिवलग मैत्रीणी आहेत ना त्या....गैर काय त्यात. " ,
" त्या दोघी ते........." आसावरी ताईचा  तोंडून शब्द बाहेर पडत नव्हते. " आम्ही कॉलेजवरून आल्यानंतर त्यांना कितीतरी वेळा एका बेडवर बघितलेलं.. " ऐकून मला धक्काच बसला.
" आम्हाला रूममध्ये यायची लाज वाटायची.... तर आम्ही कितीतरी वेळ बाहेर गॅलरीत उभं राहायचो एक दुसरीची  वाट बघत.... " मला ह्या काय बोलत आहेत कळत होतं पण ऐकून डोकं बधिर झालं होतं, आणि मी आसावरी ताईला म्हटलं, " फालतू वाटतात यार ह्या गोष्टी असं कसं होऊ शकतं..... मुली मुलीच..... "
मी तर जाम हसले पण माझ्या हसण्यात शामिल होतं, " लेस्बियन आहेत त्या दोघी..... " हे वाक्य शर्वरी पुटपुटली.
तेव्हा लेस्बियन हा शब्द पहिल्यांदा माझ्या कानावर पडला. आता लेस्बियन म्हणजे काय असतं काय नाही मला काहीच कळतं नव्हतं. कारण तेव्हा नुकतच माझं बारावी झालं होत. मी आसावरी ताईकडे  बघत म्हटलं, " काय होतं गं ताई लेस्बियन म्हणजे??" माझा प्रश्नाचं उत्तर टाळीत आसावरी ताई बोलली, " समय के साथ साथ  सब बाते अपने आप समझ में आएगी तू अभी बच्ची है.... बेटा!"  आसावरी ताईचा ह्या बोलण्यावर हसावं की रडावं तेच समजत नव्हतं पण मी म्हटलं, " जाऊदे मोठ्या आहात म्हणून भाव खाता तुम्ही नका सांगू.... "
रजनी लगेच उत्तरली " अगं स्री स्री.... समज"
तरी काही डोक्याला पटत नव्हतं, नंतर जेव्हा लोकसंख्या ह्या विषयावर  LGBT  चा समावेश होतो आणि ह्याचे जेव्हा अर्थ मी शोधायला गेले तेव्हा कुठे विषय ध्यानात आला.

" आम्हाला त्या दोघीच असं वागणं आवडत नव्हतं म्हणून आम्हीच रोशनीला म्हटलं की सेजलला इथे बोलवायचे नाही. " रजनीच एका अर्थाने बरोबर होतं... " पण रोशनी सेजल शिवाय राहू शकत नव्हती. म्हणून तिने माझ्या रूममध्ये यायचा निर्णय घेतला होता. शर्वरीचा संवाद आजही आठवतो मला, " काय यार ह्या दोघी गेल्या अगदी कामातून.... चांगलं नाही असं करणं. " तिचं बोलणं पुर्ण होताच, " शरीरातले हॉर्मोनस उसळतात. डोपामिनच सिक्रेशन होतं. हवं ते भेटत नाही आणि हव्या असलेल्या गोष्टींचा नादात रोज रोज  स्वतः ला भ्रमिष्ट करून घेण्यात काय अर्थ. " रजनीच्या  ह्या वाक्यावर आसावरी ताईची  प्रतिक्रिया, " त्यांना मिळत ना सुख.... त्यांना पुरुषाची गरज नसतेच अनैसर्गिक कृत्याला मौज समजतात त्या.... "वाद प्रतिवाद उफाळला होता त्या दोघीत.हा संवाद झाल्यावर थेट माझ्याकडे त्यांचा मोर्चा " का गं तुला कधीच त्या काही करतांना आढळल्या नाही का?दिवसभर त्या रूममध्येच तर असतात पडून..." आता मी काय बोलावं  , " मी कॉलेज मध्ये असते त्या दोघीच दिवसभर रूममध्ये.... मला असा कधी संशय पण आला नाही.... आणि त्यांना मी बघितलं पण नाही. ", " तुझ्या बेडचा मागे आहे ना त्यांचा बेड तुला कसं कळणार मग...पण लक्षात यायला हवं होतं तुझ्या आम्हाला वाटलं तुला माहिती झालं असणारं.... " आसावरी ताईच बोलणं खरं होतं पण मला ह्याची काहीच जाणीव झाली नाही. त्या दिवशी रूममध्ये शिरताच मला घरची आठवण येऊ लागली. डोकं जड झालं होतं. वासना ह्या थराला जाऊन पोहचू शकते का? हा प्रश्न मी स्वतःलाच विचारत होते.

पाच, सहा दिवसांनी रोशनी आली. ती नॉर्मल आधी सारखीच माझ्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करायची. पण मी टाळत होते तिला.  आता आमच्यात खटके उडू लागले..... लहानसहान गोष्टीवरून.  ती सरळ बोलायला गेली की मी उलट उत्तर द्यायचे. रात्री मी  आता लायब्ररीत जाऊन बसणं बंद केलं.... रोशनीने अभ्यासासाठी  लाईट लावलाच  रात्री मध्ये उठून तर मी तिला चिडून म्हणायचे, " यार दिवसभर काय करते तू रूममध्येच तर असते,  तुला तेव्हा अभ्यास नाही करता येत का ? " एव्हाना मी तिला सांगितलं. सेजल ह्या रूममध्ये दिसायला नको.  रोशनीला संशय आलाच मला खरं काय ते कळल्याचं  . " काय झालं तुला, अशी का वागते माझ्या सोबत.... मी काही चुकीचं वागले का तुझ्यासोबत. " ती कधीच माझ्यासोबत चुकीच  वागली नाही. मग कशाची शिक्षा देतेय मी तिला? मी खुप दिवस कुणाशी वाईट वागू शकत नाही. मला पण तिचा सोबत वाईट वागल्याचं  दुख: व्हायचं.  कधी तर वाटायचं डायरेक्ट बोलावं का रोशनी सोबत ह्या विषयी.... पण मग नको वाटायचं तिची पर्सनल लाईफ. आपण का  ढवळाढवळ करायची? आता सेजलच रात्री रूममध्ये येणं पण बंद झालं होतं. मी रूममध्ये असताना ती कधीच रूममध्ये आली नाही. तिला रोशनी सोबत काही काम असलं तर ती बाहेरून बोलून निघून जायची.

त्याच दिवसात..... मला कॉलेजमधून लवकर सुट्टी झाली . मी हॉस्टेलवर आले. खुप वेळ बाहेरून रोशनीला दार उघडण्यासाठी आवाज देत होते. पण रोशनीचा काहीच प्रतिसाद नाही.  मी परत दोन, चार वेळा आवाज दिल्या नंतर रोशनीचा "हो आली थांब...." अशी भेदरलेल्या आवाजात प्रतिक्रिया मिळाली.

रूमचा दार उघडताच बेड अस्ताव्यस्त मी काय समजायचे ते समजून गेले.  मी काहीच बोलले नाही. रागाच्या भरात माझ्या तोंडून काही अपशब्द बाहेर पडण्यापेक्षा शांत रहाणं ठिक होतं.  केसाला रबरबॅड
बांधत सेजल मला म्हणाली, " सॉरी ताई.......... " मी तावातावाने बॅग टेबलवर ठेवत..... " वाटोळं करणार आहे तू तुझ्या आयुष्याचं सेजल! " असं म्हणतच बाहेर पडले.......... काही दिवसातच रोशनीने माझी रूमखाली करून  खालच्या माळ्यावर दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट झाली. जाताना काहीच बोलली नाही ती माझ्यासोबत मी पण नाही....

बारावी बोर्डचे पेपर झाल्यावर  सेजल हॉस्टेल सोडून घरी जाणार होती तेव्हा ती माझ्या रूममध्ये आली.
माझ्या रूममध्ये नवीन मुली आल्या होत्या, ती बाहेरूनच म्हणाली, " ताई तुझ्यासोबत बोलायचं होतं.. " मी म्हटलं, " बोल ना मग.... " ती, "इथे नको खाली चल ना गार्डन मध्ये बसून बोलू.... " खर तर मला तिच्या सोबत बोलायची इच्छा नव्हती .  पण तिला माझ्यासोबत बोलायचं होतं ,
आम्ही गार्डन मध्ये येऊन एका बाकावर बसलो.
" बोल सेजल.....काय सांगायचं होतं तुला. "
मला बघून रूममधून पाय काढता घेणारी सेजल , आज खरचं माझ्यासोबत बोलत होती ह्याच आश्चर्य वाटतं होतं. का आणलं असावं तिने मला इथे,
" तू त्यादिवशी रूममधून जातांना  बोलून गेली मला, सेजल तू तुझ्या आयुष्याचं वाटोळं करणार आहे. केलय गं वाटोळं मी..... तुला माहिती आहे बोर्डात दहावीत टॉप केलं होतं.... पण ताई अकरावीत इथे आले सायन्स कॉलेज मिळालं चांगलं. मी कधीच लेक्चर केले नाही....  मला रोशनीचा सहवास आवडू लागला.... तिच्या जाळ्यात फसत गेले ती म्हणेल  ते करायला लागली. भरकटत गेले मी........ " ती न थांबता बोलत होती... मी ऐकत होते, " सुरूवातीला मला पण छान वाटायला लागलं पण खरं सांगू मला आता इथून बाहेर पडायचे आहे.... रोशनीसाठी तर मी गरज झाले तिला अजूनही वाटतं मी नको जायला पाहिजे. मी गावाला गेल्यावर ती मला परत बोलावून घेईल. काय करू कुठे जाऊ मी? अशा जगात  जायचयं  मला जिथे रोशनी माझा मागे येणार नाही. "
मला काय बोलावं सुचत नव्हतं, " हे बघ  चुका होतात प्रत्येकाकडून जे झालं ते जाऊ दे.... घरी जा तिच्या संपर्कात राहू नको..... " तिने पटल्यासारखं मानेनं होकार दिला.  आणि आता परत आपली कधी कुठे भेट होईल का? म्हणत निघून गेली.

बारावीचा निकाल जाहीर झाला तो दिवस, मी हॉस्टेल सोडून घरी आली होती. त्या दिवशी संध्याकाळी आठ वाजता मला आसावरी ताईचा फोन आला... पाऊस खुप असल्याने रेंज नव्हत्या तिचा आवाज ऐकू येत होता, " हॅलो...... हॅलो कोमल..... अगं आवाज येतोय का? " पण माझा आवाज तिला जात नव्हता.
तिने परत कॉल केला,  " आता रिसिव्हर कानाला लावताच दोघींचा पण आवाज ऐकू  यायला लागला.
" कोमल यार...... सेजल..... तिने आत्महत्या केली. " ही बातमी ऐकताच मला धक्का बसला, " का? तू खरं सांगतेय..... " , " अगं खरं सांगतेय... आज बारावीचा निकाल लागला ती नापास झाली होती काही विषयात.... "  मी अजून काही बोलणार एवढ्यात रिसिव्हर कट झाला....

सेजलचा  निरागस चेहरा आजही डोळ्यासमोर येतो. खरचं ती चुकली , वाट भरकटली..... ह्यात जिंकलं कोण वासना जी क्षणभंगुर असते??? सेजल..... सेजल  ती उध्वस्त झाली होती आयुष्यातून कायमचीच! दोष कुणाचा होता ह्यात? निसर्गाने तिच्यात निर्माण केलेल्या त्या समलिंगी वृत्तीचा??

त्या रात्री  बाहेर मुसळधार पाऊस पडत होता....
आणि माझ्या मनात विचाराचं  चक्री वादळ घोंगावत होतं.....