बिस्कीटची खिर

My recipes

 साहित्य:-

पाच ते सहा बिस्किट,( बिस्किट क्रीमचे नसावे) दुसरे कुठलेही बिस्कीट चालेल. चार चमचे साखर, काजू , बदाम, पिस्त्याचे काप, तीन चमचे साजूक तूप, पाव लिटर दूध, केसर काड्या दोन-तीन

कृती:-

प्रथम बिस्किट्स दुधामध्ये भिजवून घ्यावेत त्याचे बेटर तयार करावे त्यानंतर गॅसवर पातेले ठेवून त्यात साजूक तूप घालावे तूप गरम झाल्यावर त्यामध्ये कापलेले सुक्या मेव्याचे काप घालावे चांगले प्रकारे परतून घ्यावे सुकामेवा परतून झाल्यानंतर अर्धी वाटी पाणी घालून उकळी काढावी पाण्याला उकळी आल्यानंतर दूध घालावे दूध घालून चांगले उकळून घ्यावे दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये बिस्कीटचे बॅटर घालून घ्यावे चांगल्या प्रकारे ढवळून बेटर मिक्स करावे बॅटर पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यावे व त्यानंतर साखर घालून परत तीन ते चार मिनिट शिजवून घ्यावे शेवटी केसर घालून गॅस बंद करावा

.

टिप:-ही खीर फ्रिजमध्ये थंड करून खाल्ल्यानंतर अगदी मार्केटमध्ये मिळणाऱ्या मावा कुल्फी सारखी चव देते

पोस्ट आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा कॉपी करू नये नावासकट शेअर केल्यास हरकत नाही     

धन्यवाद