वाढदिवस

Birthday Celebration
वाढदिवस म्हणजे आपले वयवर्ष वाढण्याचा  दिवस...

मागील वर्षापेक्षा आपण अजून एक वर्षाने मोठे होण्याचा दिवस...

आपल्या भावी आयुष्यातील राहिलेल्या वर्षांपैंकी एका नवीन वर्षात पदार्पण करण्याचा दिवस...

वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक खास दिवस..

लहान मुलांना वाढदिवस म्हटल की आनंद झालाचं समजा.मग birthday आपला स्वतःचा असो की इतरांचा.cake, birthday party ,gifts, chocolates यामुळे मुलांना वाढदिवस साजरा करण्याचा मनापासून आनंद घेतात.

आपल्या मुलांच्या आनंदासाठी पालक ही मुलांचे वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने ,हौसेने साजरे करतात. काही पालक अनाथाश्रम,वृद्धाश्रम येथे जाऊन तेथील व्यक्तींना आवश्यक ती मदत करून  मुलांचे वाढदिवस साजरे करतात.काही पालक पूजापाठ, दानधर्म वगैरे करून आपल्या मुलांना वाढदिवसाचा आनंद देतात. 

लहान मुलांप्रमाणेच घरातील जेष्ठ व्यक्तींचे ही वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना ही आयुष्यातील सुखाचे क्षण अनुभवण्यास मिळत असते.

आता तर social media मुळे birthday wish करणे सोपे झाले.messages,phone याद्वारे शुभेच्छा दिल्या जातात.

नातलगं,मित्रमंडळी, परिचयातील लोक अशा सर्वांना आपण शुभेच्छा देत असतो.

आपल्या वाढदिवशी ही आपल्याला अनेकांकडून शुभेच्छा मिळत असतात. मिळणाऱ्या शुभेच्छांमुळे आपल्याला आनंद होत असतो.

आपण आपल्या वाढदिवसाचा दिवस आनंदात,मजेत जावा यासाठी प्रयत्न करीत असतो.

वाढदिवस कसाही साजरा केला तरी त्यातून आनंद घेणे महत्त्वाचे!

आपल्या आयुष्यातील इतकी वर्षे कशी निघून गेली ? हा ही विचार येऊन जातो.आता यापुढचे आयुष्य छान,मजेत जगू असा निश्चय ही करतो.

जरी प्रत्येक वाढदिवस आपल्याला आपल्या आयुष्यापेक्षा एक वर्ष कमी असल्याची आठवण करून देतो.तरीही आपण तो साजरा करतो आणि तो एक विशेष दिवस बनवण्याचा प्रयत्न करतो.

वर्षे संपतात तसे वय ही वाढते,शारीरिक बदल होतात तसेच विचार, ध्येय,स्वप्ने, उद्दिष्टे ही बदलतात आणि त्या दिशेने आपण आयुष्याची वाटचाल करीत असतो....



वाढदिवस येतो

जीवलगांचे प्रेम देतो

एक नवीन स्वप्न घेऊन येतो

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो

आयुष्याला योग्य दिशा देतो

जीवन किती सुंदर आहे असे हळूच सांगून जातो.

भावी आयुष्य जगण्याची नवी उमेद देवून जातो.....