वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi)

Heart Touching Birthday Wishes In Marathi

Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Heart Touching Birthday Wishes In Marathi | मनाला स्पर्शून जाणाऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy birthday to Aai baba Mama Mavshi aaji aajoba dada tai husband wife. 


प्रत्येकाचा वाढदिवस हा स्पेशल दिवस असतो आणि त्या दिवशी शुभेच्छा म्हणजे आपल्या जवळच्या माणसांकडून मिळालेले प्रेम
तसं बघायला गेलं तर काही दिवसांतून आपल्या जवळच्या कुटुंबातील, मित्र-मैत्रिणींपैकी किंवा नातेवाईकांपैकी कुणाचा तरी वाढदिवस असतोच.#Happy birthday
आणि मग त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल यावी म्हणून सुंदर शुभेच्छा लिहिण्याच्या आपण प्रयत्न करतो तर इथे तुमचा प्रयत्न यशस्वी ठरणार आहे या ब्लॉगच्या माध्यमातून.
तुमच्या प्रत्येक नात्यासाठी तुम्हाला हव्या असणाऱ्या शुभेच्छा इथे तुम्हाला भेटतील Birthday Wishes In Marathi


★प्रत्येकाला देता येतील अशा शुभेच्छा ||Birthday Wishes In Marathi for all ★

  • बाप्पा तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करो ,तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ‌!!
  • तुमच्यासारख्या गोड माणसांची सोबत आम्हाला मिळाली हे आमचे भाग्यच, पृथ्वीतलावर तुमच्या आगमन झाले तो आजचा हा खास दिवस ... ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य प्रदान करो .

जन्मदिनाच्या आभाळभर शुभेच्छा.

  • तुमच्या स्वभावातील गोडवा सगळीकडे पसरत राहो.

तुम्हाला चॉकलेट सारखी प्रसिद्ध मिळो प्रत्येकाच्या ओठावर मनात आणि हृदयात फक्त तुमच नाव असो.... तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ओठांवर येण्याअगोदर पूर्ण होवो.
हा वाढदिवस तुमच्या आयुष्यात एका नवीन आशेची किरण असो ...वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
 

  • आजचा हा दिवस आहे सर्वात खास

 वर्षानुवर्ष येत राहो पुन्हा पुन्हा ही आहे मनाची आस
आयुष्य बनव तुमचं आणखी रंगतदार
आणि प्रत्येक पार्ट असो आयुष्याचे तितकच बहारदार
तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी या आमच्याकडून सदिच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
 

  • या जगात फार कमी असतात अशी माणसं जे इतरांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधतात अशाच लोकांपैकी तुम्ही एक.. आकाशातल्या चंद्र तार्यां इतक तुमचा आयुष्य असो आणि तुमच्या आयुष्यात कधीच कुठलंच दुःख नसो

हॅपी बर्थडे टू यू माय डियर
 

  • तसा वाढदिवस म्हणजे आयुष्यातला कमी झालेला एका वर्षाचा काळ

पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या आयुष्यात  हा दिवस घेऊन येतो समृद्धीची नवी सकाळ
कमी होणाऱ्या गोष्टींचाही तुम्हाला दुःख नको कदाचित हाच असावा या मागचा संदेश
गपचूप शुभेच्छा देऊन आम्ही होतो मोकळे, नको वाढदिवसाच्या दिवशी आमचे फुकटचे उपदेश
मस्तीखोर मंडळीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
 

  • छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक लढाईत यशस्वी होण्याचा बळ देवो

आई भवानीचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी असो
आणि मासाहेबांच्या संस्कारांची तुम्हाला नेहमी जाणीव असो हीच वाढदिवसाच्या दिवशी अपेक्षा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
 

  • जन्मदिवस प्रत्येकाचा खास असतो पण प्रत्येकाच्या जन्माचा सोहळा होत नसतो

तुमच्या आयुष्याला सार्थकतेचा नवा उजाळा मिळो
प्रत्येक सुखाची चव तुम्हाला ह्याच आयुष्यात कळो
जन्मदिनाच्या आभाळभर शुभेच्छा आयुष्य नेहमी तुमचा प्रगतीच्या पथावर असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!
 

  • काही लोकांचं नुसतं अवतीभोवती असंणच एका वेगळ्याच प्रकारची ऊर्जा आणि आनंद देऊन जातात उसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!★आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा || Birthday Wishes In Marathi for Mother / aai★


खरं तर मला जन्म देणारी तू
तुला तुझ्या वाढदिवसाच्या काय शुभेच्छा देऊ ?
माझ्या अस्तित्वाच एक मात्र कारण आहेस आई
माझ्या येण्याची सुरुवात होते तो आरंभ आहेस तू
कळत नकळत माझ्या आयुष्याच्या शिल्पाचा प्रारंभ आहेस तू
आजचा दिवस माझ्यासाठी या जगातील सगळ्यात सुंदर दिवस आहे कारण या दिवशी या जगाने माझ्या आईला स्वतःमध्ये स्थान दिलं होतं.
तुला तुझ्या ह्या बाळाकडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !!

कधी घरातील कामांमध्ये कधी नको नको त्या जबाबदाऱ्यांमध्ये तू नेहमी गुंतलेली असतेस
आमच्या अभ्यासात तर कधी ,आमच्या आजारपणात तू नेहमी सोबत असतेस
आमच्या प्रत्येक आनंदाची सहभागी होतेस तू आणि आमचं प्रत्येक दुःख आमच्या जवळ येण्याअगोदर पेलतेस तू
पण आजचा हा दिवस म्हणजे तुझा वाढदिवस हे सांगण्याचा दिवस की आम्हाला तुझे सगळे एफर्ट्स दिसतात आणि आम्ही त्यांची खूप खूप रिस्पेक्ट करतो तुझ्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही आई ही वाढदिवसाच्या दिवशी प्रॉमिस रुपये भेट तुला आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

★ बाबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा || Birthday Wishes In Marathi for Father /Baba /Papa★


माझी प्रत्येक इच्छा ओठांवर येण्याअगोदर पूर्ण करणारा बाबा
माझ्यासाठी दिवस रात्र झटणारा बाबा
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी शक्य तितक्या जोमाने तयारी करणारा बाबा
आणि स्वतःचा वाढदिवस साधा आठवणीतही न ठेवणारा बाबा
खरंच माझ्यासाठी तुम्ही काय आहात हे शब्दात सांगता येण्यासारखं नाही
आजचा हा दिवस माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्या कुटुंबासाठी खूप खूप खास आहे कारण ह्या दिवशी माझ्या बाबांचा जन्म झाला होता
जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा तुमचं प्रेम आमच्या सोबत नेहमी असंच राहू द्या!


ज्याच्या छत्रछायेत कधी आजूबाजूच्या उन्हाची जाणीवही होत नाही अशा बाबांचा सहवास आम्हाला लाभला हे खरंच आमचं भाग्य आहे
तुम्ही दिलेले संस्कार आणि तुमच्या शिकवणी आम्ही कायम आठवणीत ठेव बाबा आणि तुमच्या वाढदिवसाची भेट म्हणून एक वचन देतो की तुम्ही दिलेल्या संस्कारांसोबत कधीच दगाबाजी करणार नाही
जसे तुम्ही या समाजासाठी आहात तसेच एक आदर्श नागरिक म्हणून आम्ही या जगात वावरू
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा तुमच्या असण्याने आमचं सगळं जग सुंदर आहे


★ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा || Birthday Wishes In Marathi for sister/ tai /didi★

विनाकारण भांडणारी पण सगळे नखरे सहन करणारी
नको नको त्या कारणांवरून खोड काढणारी
पण प्रसंगी योद्धा होऊन माझ्या रक्षणासाठी समोर उभी राहणारी
आई नंतर जिच्यावर पूर्ण विश्वास ठेवता येईल ती एक मात्र माझी तायडी
जे आई सारखीच माया लावते प्रेम करते आणि प्रसंगी चुका सांगून दुरुस्तही करते
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई


मोठी बहीण म्हणजे सगळ्यात पहिली मैत्रीण नसते
नंतर वाढत्या वयाबरोबर स्कूल पार्टनर टिफिन पार्टनर एवढेच काय तर रूम पार्टनर
आणि या सगळ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी आई-बाबांकडून मिळणाऱ्या शिक्षेतही पार्टनर
थोडक्यात सांगायचं झालं तर माझ्या अगोदर माझ्या रक्षणासाठी देवदूत म्हणून पाठवलेली परी आहेस ताई तू तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत

★दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा || Birthday Wishes In Marathi for brother /dada ★


कधी माझ्या खेळण्यातला सुपरमॅन आहेस तू
कधी माझ्या इच्छांसाठी आहेस रॉबिन हूड तू
माझ्या लहानपणीच्या खेळण्यातील सगळ्यात सुंदर बाहूला तू
अगदी मनापासून शुभेच्छा देते तुला हॅपी बर्थडे टू यू
Many Many happy returns of the dayप्रत्येक मुलीसाठी भाऊ म्हणजे बाबा नंतर सगळ्यात जवळचा पुरुष असतो
आणि त्याने स्थापित केलेले सगळे गुण ती तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक मुलांमध्ये शोधत असते
माझ्यासाठी दि परफेक्ट मॅन असणारा माझा दादा तुला जगात हवं ते मिळवते तुझी प्रत्येक इच्छा मनात येण्याअगोदर पूर्ण होऊ दे
तुला जन्मदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा दादा !!★मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा ||Birthday Wishes In Marathi for Mavashi ★


मावशी म्हणजे आईसारखे
जिच्या उद्यानातून जन्म घेतला नसता तरीसुद्धा जिच्या जवळ मनातली प्रत्येक गोष्ट सांगता येते
जिच्या सोबत विनाकारण वाढता येत आणि स्वतःची प्रत्येक इच्छा न करता व्यक्त करता येते
जिच्यात एक मोठी बहीण मैत्रीण आणि आई तिन्ही रूपांना पाहू शकतो अशा मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


आईवर ओरडून जिच्या पदरा मागे लपता येत ती मावशी
जिच्याकडे हवं ते हव्या त्या वेळी निर्धास्त मागता येतो ती मावशी
जिच्यात सोबत भांडणानंतर लगेच बोलता येतं ती मावशी
स्वतःच्या ताई पेक्षा तिच्या लेकीवर जास्त प्रेम करणारी मावशी अशा माझ्या प्रेमा मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही आनंदी रहा आणि नेहमी माझ्यासोबत राहा★मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ||Birthday Wishes In Marathi for Mama★


लाल लाल एसटी थांब ना जरा च्या गाण्यापासून...
प्रत्येक खोडीनंतर लपण्याच्या बहाण्यापासून...
प्रत्येक संकटात हाक मारणे असो की प्रत्येक हट्ट पूर्ण करण्यासाठी च्या हक्कापर्यंत...!!
तुम्ही नेहमी सोबत होतात मामा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाप्पा तुम्हाला उदंड आयुष्य भरपूर सुखदेव हीच आजच्या दिवशी प्रार्थना.★आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ||Birthday Wishes In Marathi for Grandmother /aaji★


लहानपणीच्या कहाण्यांमधून माझ्यासमोर कधी चंद्रकांतर्यांच जग उभ करणारी आजी
तर कधी कधी माझ्यासोबत चॉकलेटच्या बंगल्यातून पऱ्यांच्या जगात सैर करणारी आजी
पंचतंत्र च्या छोट्या छोट्या गोष्टींमधून कानिमात्रांवर दया करायला शिकवणार याची ते खऱ्या खऱ्या आयुष्यात प्रत्येक संकटाला सामोरे जायला हिम्मत देणारी आजी
तू माझी सगळ्यात पहिली मैत्रीण आहेस आणि गुरु देखील तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्या आशीर्वाद नेहमी सोबत असू दे ‌


जिच्या पदरात आईसारखाच ओलावा असतो
तिच्या कुशीत आई सारख्याच हक्काने दुमडून बसता येतं
जिच्याकडे आई-बाबांविषयी सुद्धा राग सांगता येतो
जिच्या समोर प्रत्येक चूक मान्य करता येते अशी आजी तुला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आजी तू माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहेस


★आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा|| Birthday Wishes In Marathi for Grandfather /aajoba ★

इतरांसाठी कठोर असणारे माझ्या आजोबा माझ्यावर मात्र खूप खूप प्रेम करतात
कधी लाडाने कान पकडतात तर कधी हौशीने मलाच आजीबाई म्हणतात
त्यांचा प्रत्येक काम करून देताना मनाला समाधान भेटतं आणि त्यांच्याकडून नवीन काही शिकताना स्वतःचा भाग्य थोर वाटतं
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा तुमच्या आशीर्वाद नेहमी पाठीशी असू द्या आजोबा


ज्या लोकांना त्यांच्या आजी-आजोबांचा सहवास प्राप्त होतो ते खरच खूप भाग्यवान असतात हे मी अनुभवले तुमच्या सोबतच्या आजपर्यंतच्या प्रवासातून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजोबा !!★मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा || Birthday Wishes In Marathi for friend ★


रक्ताचं नसलं तरी त्यापेक्षाही स्ट्रॉंग नात असणारी
माझ्या प्रत्येक सिक्रेटची शेअरिंग पार्टनर असणारी
माझ्यासोबत मनमुराद भंडणारी आणि प्रसंगी माझ्यासाठी रडणारी,
प्रत्येक सुखदुःखात मग काय माझ्यासोबत असणारी माझ्या हक्काची सखी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!


★ बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ||
Birthday Wishes In Marathi for wife★

सप्तपदीच्या सातवचनांसोबत नेहमीसाठी माझी अर्धांगिनी झालेली
आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखात माझ्यासोबत उभी राहिलेली
मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की मला बायको म्हणून तू मिळाली तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या कर्तव्यपथावर आपण एक आदर्श जोडपं म्हणून जगासमोर येऊ !!


माझ्या आई बाबा माझी मुलं माझं घर माझं काम आणि मी स्वतः या सगळ्यांना सांभाळून घेण्यासाठी माझ्या लाईफ पार्टनर ला मनापासून धन्यवाद तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कायम आनंदी राहा


★ नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !! Birthday Wishes In Marathi for Husband★

लग्न बंधनात सोडला गेल्यापासून अशा प्रत्येक इच्छेला तुमच्या गरजां अगोदर मान देण्यासाठी थँक्यू अहो
तुमच्या कुटुंबाच्या रुपाने मला माझा हक्काचा एक घर देण्यासाठी थँक्यू अहो
तुमच्यासारखा काळजी करणारा नवरा प्रत्येकाला मिळो
आजच्या खास दिवशी तुम्हाला धन्यवाद माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि तुमच्या आई-बाबांना धन्यवाद माझ्या अहो ना जन्म देण्यासाठी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


माझ्या स्त्रीत्वाला ज्यांच्यामुळे पूर्णत्व मिळालं अशा माझ्या अहो ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ईश्वर तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो आणि तुम्हाला आयुष्यात हवं ते मिळो ||आई बाबा आजी आजोबा मामा मावशी मैत्रीण दादा ताई नवरा बायको अशा सगळ्या नात्यांना खास फील करून देण्यासाठी वाढदिवसाच्या स्पेशल शुभेच्छा|| Birthday Wishes In Marathiby Anjali Autkar | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाHappy birthday to Aai baba Mama Mavshi aaji aajoba dada tai husband wife

©®Anjali Autkar