Feb 24, 2024
मराठीमध्ये शुभेच्छा

वाढदिवस शुभेच्छा आई

Read Later
वाढदिवस शुभेच्छा आई

                                                आई म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषय कारण आपलं जीवनच मुळात तिच्यापासूनच सुरु होते. आपला पहिला श्वास हा तिचाच असतो. आपल्यावर निःस्वार्थ प्रेम करणारी ती पहिली व्यक्ती असते आणि बहुदा शेवटची सुद्धा. तीला तिच्या प्रेमाच्या मोबदल्यात आपल्याकडून कशाचीच अपेक्षा नसते. आपल्या सर्व चुका माफ करून, आपले सर्व हट्ट पूर्ण करणारी देखील तीच असते. सर्वांना वाटतं की आपण तिच्या प्रेमाचं कौतुक करावं, आपल्या मनातल्या भावना तिच्याजवळ व्यक्त कराव्या आणि ती संधी देणारा दिवस म्हणजे आईचा वाढदिवस! माझ्या देहातील श्वास असणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझा वात्सल्यपूर्ण आशिर्वाद आमच्यावर कायम राहूदे. तुला उदंड आयुष्य लाभू दे आणि तू शतायुषी हो. आई तुझे पुढील आयुष्य निरोगी आणि आनंदमय जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Adv. Shraddha Magar

Advocate

Happily life .. आयुष्य एकदाच आहे आनंदाने जगते... जिथे जाऊ तिथे स्वतः ची छोटी ओळख निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न...

//