जन्म..

It's. all about mind and feelings, feelings are most important to be a person kind of a writer, poet.

जन्म...! हा  शब्द खूप काई सूचवितो ! फक्त माणसांनचाच जन्म नाहीं, तर प्रत्येक गोष्टींचा जन्म.

एकादयाच्या आठवणीत दोन-तिन शब्द लिहावे आणी मग त्या मागोमाग दोन-तिन ओळी जन्मास य़ाव्या! आणी बघता बघता एकादया कवितेचे वा कथेचे जन्म व्हावे, त्याच रुपी नकळताचं एकाध्या कवी अथवा लेखकाने सुद्धा जन्म घ्यावा, किती सहज आणी सुंदर रीत्या हा जन्म व्हावा आणी गमंत अशी की हे सग़ळ अश्या स्थितित उदयास य़ाव, ज्याक्षणी माणसाचा मेंदू ठप्प. "मनाला तर काई समझतच नाही,त्याला कुठे काई ठाऊक. मेंदू चे एकावे" - आणि मग अशी भामटी कल्पना इथे रास पावते. मला वाटते मोठ-मोठी कवी/लेखक मनातुनच जन्मास येतात .(त्यात मेंदू चा थोड़ा फार हात हवा बर.)
कलाकार जन्मास , येण्यासाठी जातं, वर्ण अथवा धर्म नको ,त्याला हव ते फक्त मन( आणि ते सुद्धाथोड़ चंचल बर का.! )
क्षीतिजाच्या काठी ज़ात असलेल्या सूर्याला पाहुनं काई तरी सुंदर सूचावे मग त्यासाठी मनाचा मुजरा हवाना!
पावसात मनसोक्त नाचल्या नंतर, आनंदात डोलनाऱ्या झाडानां पाहण्यासाठी फक्त डोळेच नको, तर मनानी भरलेले डोळे असायला नको का ?

मेंदू शांत नव्हता तरी पण मनाला काई तरी सुचलं, तेच मांडल.

-- सागर सु. गांगडे