हजरजबाबी बिरबल

Birbal's Presence Of Mind
हजरजवाबी बिरबल.


अकबर बादशहाला विविध प्रदेशातले चविष्ट आणि वेगवेगळे पदार्थ खाण्याची खूप आवड होती. राजमहालाच्या शाही बागेमध्ये तर कधी जेवणाच्या महालात नेहमीच अकबर बादशहा विविध मेजवान्या सरदारांना देत असे. स्वतः अकबर बादशाह सर्व सरदारांबरोबर बसून निरनिराळी पकवांनी खात असे आणि मेजवानीचा आनंद लुटत असे. या मेजवान्यांमध्ये जर बिरबल सोबत असेल तर मग थट्टा विनोद आला तर अगदी उदाहरण आलेले असे.


एकदा अशीच एक मेजवानी बादशहाने सर्व सरदारांना दिली होती. जेवणानंतर सगळ्यांसमोर खजुराच्या वाट्या आल्या. अकबर आणि बिरबल खजूर खात होते आणि बिया खुर्च्यांच्या खाली टाकत होते.

थोड्यावेळाने खुर्च्यांच्या खाली बियांचे छोटे छोटे ढीग जमा झाले. हे बघून अकबर आणि मनाशी ठरवले,"मी आज बिरबलाची चांगलीच फिरकी घेतो." बादशहालय आपल्या खुर्ची खालच्या बिया पायाने हळूच बिरबलाच्या खुर्ची खाली सरकवल्या. बिरबल इतर सरदारांशी गप्पागोष्टी करण्यात गुंग असल्याने त्याला याची काहीच कल्पना आली नाही.

नंतर एकाएकी अकबर उभा राहिला. सर्व सरदारांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात तो बिरबलाला म्हणाला,"अरे बिरबल तू किती कसूर खाल्लेस? तू इतका खादाड होशील हे मला माहीतच नव्हतं."

सर्व सरदार बिरबलाच्या खुर्चीच्या खाली असलेल्या बियांचा ढीग पाहू लागले. बिरबला ला बादशहाची चला की समजून आली. बिरबल पण फार चतुर होता. त्याची मस्करी होत असताना तो कसा गप्प बसेल?

बिरबल लगेच अकबराला म्हणाला, "महाराज तुमचं म्हणणं अगदी खरं आहे. मी खूपच खादाड आहे हे तर शंभर टक्के खरं आहे. मी पुष्कळ खजूर खाल्ले हे सुद्धा खरच आहे. पण तुम्ही सर्व खजूर बियांसहित कसे काय खाल्लेत? मला या गोष्टीचा फार आश्चर्य वाटतंय."

बिरबलाच्या या वाक्यानंतर सर्व सरदार अकबराच्या खुर्ची खाली बघायला लागले. आणि सरदारांना तिथे एकही दिसली नाही ते बघून सर्व सरदार असा लागले आणि चारही बाजूने एकच खसखस पिकली. अकबर बिरबलाची मस्करी करायला गेला; पण त्याचीच मस्करी झाली.


अकबराला फारच ओशाळल्या सारखे वाटले, परंतु बिरबलाचा हजर जबाबीपणा पाहून बादशाह परत एकदा बिरबलावर खुश झाला आणि त्याने बिरबलाला शाबासकी दिली आणि मेजवानी पुढे सुरू ठेवली.

*********************************************


एका संध्याकाळी अकबर आणि बिरबल शाही बागेत शतपावली करत होते. अचानकबराला बिरबलाची चेष्टा करण्याची लहर आली. तो बिरबलाला म्हणाला,"काल रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं होतं. पण ते तुला सांगण्यासारखा नाही."

बिरबल समजून चुकला की अकबराला त्याची मस्करी करायची आहे. तरीसुद्धा तो नम्रतेने म्हणाला,"महाराज हे तर स्वप्न आहे. स्वप्न थोडंच खरं होतंय. तुम्हाला जे स्वप्न पडलं असेल, ते सांगून टाका."

"नाही, नाही बिरबला, तुला वाईट वाटेल स्वप्न इतके विचित्र आहे की तू तुला ऐकायला आवडणार नाही."अकबर बिरबलाची उत्सुकता ताणण्याचा प्रयत्न करत म्हणाला.


बिरबल म्हणाला, "महाराज मी आपल्या कोणत्याही गोष्टीचा कधीही वाईट वाटून घेतलं नाही. तरीसुद्धा तुम्हाला जर सांगायचं नसेल तर ठीक आहे तुमची मर्जी."

"अरे तसं नाही ऐक! आता तर मला ते स्वप्न तुला सांगावच लागेल. बादशहाने विचार केला, बिरबलाने जर स्वप्न ऐकायला नकार दिला तर हाती आलेली ना मी संधी निघून जाईल आणि त्याने सांगायला सुरुवात केली.

"काल रात्री मी स्वप्नात पाहिलं की, संध्याकाळच्या वेळी आपण दोघं सहलीला गेलो होतो. तिथे रस्त्याच्या एका बाजूला दोन मोठे-मोठे हौद होते. एकात मध होतं आणि दुसऱ्यात चिखल. अचानक आपल्या दोघांचे पाय घसरले, त्यामुळे मी मध असलेल्या हौदात पडलो आणि तू चिखल भरलेल्या हौदामध्ये…"

बिरबल आणि उत्सुकतेने अकबराला विचारले, "मग काय झालं?"

अकबर म्हणाला, "मग काय होणार? मी जागा झालो स्वप्न तर पूर्ण झालं."

बिरबल म्हणाला, "अरे वा कमाल आहे! मला सुद्धा काल रात्री असं स्वप्न पडलं होतं पण माझं स्वप्न थोडा वेळ अधिक चालू राहिलं होतं."

अकबराला बिरबल चे स्वप्न विकण्याची उत्सुकता वाटू लागली. तो म्हणाला, "अस्सं? तर त्या स्वप्नात पुढे काय झालं ते लवकर सांग."

बिरबल म्हणाला, "महाराज, स्वप्न ते स्वप्नच असतं. त्याला कशाला महत्त्व देता? ते थोडंच खरं असतं?"

हे ऐकून बादशहाची बिरबलाचे स्वप्न जाणून घ्यायची उत्सुकता अधिकच वाढली. "नाही नाही तू सांग तर खरं, पुढे काय झालं?"

बिरबल म्हणाला,"आपण दोघं त्या हौदा मधून मोठ्या मुश्किलीने बाहेर पडलो. तुमचं संपूर्ण शरीर मधनं माखलं होतं आणि माझ्या संपूर्ण शरीरावर चिखल लागला होता."

हे ऐकून अकबर खुश होऊन म्हणाला, "बरोबर आहे असंच झालं होतं. इथं तुझं स्वप्न पूर्ण झालं असेल."

बिरबल म्हणाला, "नाही ना! यातली खास गोष्ट तर यापुढेच आहे. हौदातून बाहेर पडल्यावर तुम्ही मला चाटू लागलात आणि मी तुम्हाला चाटू लागलो. बस्सं इतकच. मग माझं स्वप्न पूर्ण झालं. पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हे तर स्वप्न होतं ते थोडंच खरं असतं?"

बादशहाला बिरबलाची चेष्टा करायची होती पण ती चेष्टा त्याला फारच महागात पडली.


************************************************


एका संध्याकाळी शाहीबागेत अकबर आणि बिरबल सहजच फेरफटका मारत होते. अकबर बिरबलाच्या बुद्धीच्यातुर्याने फार प्रभावित झाला होता. याशिवाय बादशहाला बिरबलाचा हजरजबाबीपणही फार आवडत असे.

बागेत फिरता फिरता अकबर सहजच बिरबलाला म्हणाला, "बिरबला तू इतका हुशार आहेस आणि हजरजबाबी आहेस तर तुझे वडील किती हुशार असतील रे! मला एकदा त्यांना भेटायचं आहे. एक काम कर उद्या तू त्यांना माझ्या महालात पाठवून दे. मला काही शंका आहेत त्यांचे निरसन ते करतील."

बिरबलाने अकबराला ठीक आहे असं म्हटलं आणि त्यांची रजा घरी आल्यावर बिरबलाने घडलेली हकीकत स्वतःच्या वडिलांना सांगितली. बिरबलाचे वडील हे संपूर्णपणे जाणून होते की बिरबलाची जी काही बुद्धिमत्ता आहे ती त्याची उपजत आहे त्याचा हजर जबाबी पणा आणि वाक्चातुर्य ही त्याला दैवी देणगी आहे. पण आता आलेल्या प्रसंगाला सामोरे जाणे तर भाग होते. स्वतःच्या वडिलांच्या मनातली ही घालमेल आणि चलबीचल बघून बिरबल म्हणाला,"बाबा तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही फक्त बादशहाच्या महालात जा आणि त्यांची भेट घ्या. बाकीचं पुढचं मी बघतो आणि बिरबल त्याच्या वडिलांच्या कानात काहीतरी पुटपुटला."

दुसऱ्या दिवशी बिरबलाचे वडील बादशहाच्या महालात गेले. भाच्याला भेटले आणि परत आले. तेवढ्यात लगेच बादशहाकडून बिरबलाला आमंत्रण आले.

बिरबल बादशहाच्या समोर हजर झाला.

बादशहा मात्र फारच वैतागलेले होते ते बिरबलाला म्हणाले, "बिरबल तुझ्या वडिलांना मी अनेक प्रश्न विचारले, अनेक शंका विचारल्या पण ते काहीही बोलले नाहीत, नुसतं शांतपणे उभे होते. कधी माझ्याकडे बघत होते, तर कधी आकाशाकडे. त्यांच्या या कृतीचा मला काही अर्थ होत नाहीये तूच तो आता समजावून सांग."

बिरबल म्हणाला, "महाराज माझे वडील फार ज्ञानी आहेत. तुमच्या प्रश्नांची उत्तरही त्यांनी दिली असती, पण कदाचित तुमचे प्रश्न त्यांना फारच बाळबोध वाटले असावेत आणि इतर कठीण प्रश्नांची उत्तरं ते देणार होते पण कदाचित त्यांना तुमच्या समजूतदारीवर शंका आली असावी की, एकाच वेळी हा माणूस इतके गहन प्रश्न विचारतो आहे आणि दुसऱ्या वेळी इतके बाळबोध. म्हणून तुमच्या शंकांचे निरसन करायला मी इथे हजर आहे."

बादशहा अकबराला कळून चुकले की बिरबल हा बुद्धिमत्तेची आणि हजरजबाबीपणाची दैवी देणगी घेऊन आलेला आहे.




लोककथांवर आधारित

©® राखी भावसार भांडेकर.
नागपूर.

🎭 Series Post

View all