Jan 29, 2022
नारीवादी

बिनबुडाचा पुरूषार्थ

Read Later
बिनबुडाचा पुरूषार्थ

बिनबुडाचा पुरुषार्थ ….


     आपलं मन किती चंचल असतं ना , ते वेगळं कोणाला सांगायला नको … आपण एका जाग्यावर स्तब्ध जरी असलो तरी ते कुठे भरकटेल याचा नेम नाही … एका क्षणात चंद्रावर जाऊन येईल तर एका क्षणात , कोणी कुठल्या रंगाची कपडे घातली असतील अगदी इथपर्यंत …
      माझं मन ही असंच .. भरकटत असतं कुठे कुठे सारखं .. हे ,ते , ते ,हे …
        पण एक गोष्ट मात्र एवढी गंभीर , मनात जरी आला तो विषय तरी अंगावर काटा येतो  .. वाटतं मग ठीक आहे , आम्ही स्त्रिया , मुली घरात एक प्रकारे कैद आहोत तेचं बरं आहे ..बाहेर जाऊन शरीराच्या चिथड्या … नि अब्रूची लक्तरं उडणार असतील तर ठीक आहे मग हे बंधन चं ठीक आहे आमच्यासाठी … नको मग आम्हाला मोकळा श्वास , नको ते स्वच्छंदी जगणे .. नको ती स्वतःच्या पायावर उभे रहायची , काहीतरी करून दाखवायची धमक ..
     अगदी रस्त्यात येता जाता जर अशी कृत्य होणार असतील तर मग , बेड्या घालून घरात राहिलेलं बरं … म्हणजे ती काही ठराविक मोकाट पिसाळलेली पुरुषरुपी श्वापदं , निदान कोणाच्या इज्जतीचे लचके तर ओरबडणार नाहीत … 

              नाष्टा बनवायची तयारी चालू होती , पीठ मळत असताना विचार आला मनात , बरं झालं .. हा कोरोना आला ,बाकी काही नाही .. चांगलं घडो न घडो .. पण निदान त्या निष्पाप पोरींवर होणारे अत्याचार तर थांबलेत … बलात्कार झाल्याची बातमी नाहीचं जणू काही .. बरं झालं म्हणलं ..  नासक्या मेंदूची निदान कोरोनाच्या भीतीने तरी .. गप्प पडलीत .. वाचल्या .. पोरी वाचल्या .. हा विचार करत करतच स्वयंपाक चालू होता … 
             नाष्टा बनवून झाल्यावर , छोटीचा अभ्यास घायचा म्हणून बसले .. फोन घेतला अभ्यास काय आला बघण्यासाठी .. अभ्यास लिहून दिला .. म्हणलं जरा फ़ोन बघते , tv बघायला वेळ मिळत नाही , इथे बघते काय नवीन जुनी खबर .. तोवर समोर आली बातमी … अजून एका निरपराध निर्भया चा जगण्यासाठीचा जिद्दोजहद प्रयत्न करून अखेर मृत्यू … 
       जीभ कापलेली .. मणका मोडलेला .. पायात जीव नाही .. अखेरीस मृत्यू … मेंदू सुन्न झाला हे वाचून … 
        अरे कुठली श्वापदं तुम्ही … एवढं हाल त्या पोरीचं … माणुसकी जाते कुठं यांची … घरची आई , बहीण  , बायको नाही की आठवत यांना … कुठल्या थराची असते यांची मनस्थिती सांगायला मार्ग नाही राव … 
           अंगावर काटा येतो , फक्त मनात हा विचार आणून की काय अवस्था झाली असेल तिची , किती त्रास ,किती यातना सोसल्या असतील तिने … यांची दोन मिनिटांची मजा .. एका पोरीचं आयुष्य उध्वस्त …. बरं  यात तिची चुकी काय तर तर ती मुलगी … एकटी सापडली ...म्हणून …

हेचं नव्हे अशी कितीतरी प्रकरणं झाली , जीव मुलींचाचं गेला ...एक प्रकरण तर , ती त्यांच्या विरुद्ध साक्ष द्यायला जाते .. म्हणून जीवंत पेट्रोल टाकून जाळली जाते तिला …
      म्हणजे " ती "म्हणजे कोणी नव्हेच का ...ही " ती " तिचं आहे जिच्या उदरातून तुम्ही जन्म घेता .. म्हणून या भूतलावर येता 
.." ती " आहे म्हणून सृष्टी आहे ...आणि तिचीच अशी अवहेलना … कुठे फेडतील हे पाप असली लोकं… 

 

म्हणून मग माझ्या मनात सारखे विचार येतात … बरं झालं , लग्न लवकर झालं … नको ते कॉलेज , नको ती शाळा ..  निदान हे भोग तर नशिबी नाहीत … निदान माझा जीव तर वाचला …  पण असं कुठवर , कितपत लपवून ठेवायचं स्वतःला , दुसऱ्यांच्या भीतीने …  दुष्कर्म करनारे  मोकळ्या ताठ मानेने हिंडतील … आणि ती या दुनियेत देखील नसेल ….तसंही नाही शिकली एकजण ,म्हणून तुम्हाला थोडीचं फरक पडणार आहे ..  
      घरातली स्त्री म्हणजे प्रत्येक पुरुषाची जहांगीर एवढंच समजत आलेत आजवर तिला … स्त्री म्हणजे मालकी हक्क, असं वाग 
.. हे कर .. ते नको करू ...असं नको बोलू ..असलं नको घालू … सगळी बंधन तिच्यावर … आणि तिच्यावर बंधन लादणारे मात्र मोकाट ...मनमर्जीचे मालक .. मनाला हवं ते करणार …,हवं तसं वागणारं …
          खरंतर आदी ही प्रथा बंद व्हायला पाहिजे ...पुरुषांच्याही मर्यादा ठरवून दिल्या पाहिजेत ..त्याही अगदी कडक शिस्तीच्या .. मगच हे एखादं गैरवर्तन करणाऱ्याची हिम्मत नाही होणार .. दुष्ट वर्तन करण्याआधी दहादा विचार करतील …
       नाहितर मग एकच पर्याय … झाला गुन्हा सिद्ध बलात्काराचा ...निकालाची वाट बघायचीच नाही सरळ फाशी ...आणि हे ही जमणार नसेल तर दगडाने ठेचून मारलेलं बरं …
  
   ती तरी कुठे जिवंत राहिली … मग हा मेला तरी तेवढ्याने एवढा काही फरक नक्कीच नाही पडणार …


#एक_संतप्त_स्त्री   #अन्यायाला_वाचा_फुटली_पाहिजे 

धन्यवाद ...

©vaishu patil

( या लेखाद्वारे कोणाच्याही भावना दुखविण्याचा मुळीच हेतू नाही , सत्यता आहे ही आजच्या समाजाची , तरीही लिखाणात काही आक्षेपार्ह असल्यास क्षमस्व ... )

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now