भुतकाळात डोकावतांना ( भाग ६)

कथा मालिका


भुतकाळात डोकावतांना भाग ६

अर्चनाला गाढ झोप लागली होती. त्यामुळे आपण कुठे चाललो. याची काहीही माहिती नव्हती. पाहुया पुढे....

अचानक अर्चनाला जाग आली तेव्हा ती एका खोलीत होती. खूपच सुंदर खोली होती. पण, खोलीत ले दृश्य बघून ती घाबरली. दोन अनोळखी चेहरे तिच्या समोर होते.

"कोण आहात तुम्ही? प्रविण कुठे आहे?"

"प्रविण, प्रविण"

प्रविणला आवाज देत ती उठू लागली.

पण, त्या दोघांनी तिला धरून ठेवले. इतक्या सहजासहजी तुला जाऊ थोडी देणार.

त्या दोघांच्या समोर तिचा निभाव लागला नाही. ती हतबल झाली. त्यांनी तिचा पुरेपूर वापर करून घेतला आणि काम झाल्यावर कचऱ्याप्रमाणे फेकून दिले आणि निघून गेले.

ती त्या खोलीच्या कोपऱ्यात रडत बसली. काही वेळानंतर प्रविण तिला घ्यायला आला.
"तिच्यासमोर पैशांची गड्डी हातात घेऊन चला आज जरा चांगली किंमत मिळाली. येथून पुढे अशीच काम करत जा. तरच तुला पोटभर खायला मिळेल आणि आम्हांला चैन करायला मजा येईल कळलं."
तिला केसांना धरून तो उठवू लागला.

"चल आवर. आपल्याला घरी जायचं आहे. उद्या असेच फिरायला यायचे आहे बरं. त्यामुळे रोज छान तयार व्हायचं."

तो तिच्या गालावरून हात फिरवत कुत्सितपणे हसत बोलू लागला.

तो तिला जबरदस्तीने ओढत बाहेर घेऊन गेला. परत तिच गाडी तयार होती. तिला गाडीत बसवून गाडी परत निघाली. परत तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली आणि बेशुद्ध केले. म्हणजे तिला कुठे नेण्यात आले याची माहिती तिला होऊ नये.

परत हीच गोष्ट आता रोज घडू लागली. पण, आता गोड बोलून नाही तर आता धमक्या देऊन मारझोड करून तिला तयार केले जात होते. काहीही न बोलता फक्त सहन करत होती.
पण , अचानक ऐके दिवशी तिची तब्येत बिघडली. सतत चकरा येणं, उलट्या होणे चालूच होतं. प्रविण आणि मायाला शंका आली म्हणून त्यांनी तिला दवाखान्यात नेले. तर तिला दिवस गेले. ही बातमी ऐकून प्रविणने तिला परत मारले. आधीच वय कमी त्यात तब्येतही जरा नाजुक होती. त्यात आता ती आई होणार हे कळल्यावर प्रविण आणि माया तिला आणखीनच त्रास देऊ लागले.
अर्चना सारखं सावज आपल्या हातून जाऊ नये. म्हणून त्या दोघांनी तिला दवाखान्यात नेले. तिचा गर्भपात करण्यासाठी. पण, तिथे कोणाशीही बोलू देत नव्हते. अगदी धाकात ठेवले होते. पण, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिला दोन महिने झाले होते. नीट जेवण जात नसल्याने अशक्तपणा आला होता. त्यामुळे
डॉक्टरांनी गर्भपातासाठी नकार दिला. शिवाय कायद्याच्या चौकटीत राहून असा गर्भपात आम्ही करू शकत नाही हे देखील सांगितले.

डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट केल्या. तेव्हा हिमोग्लोबीन कमी आहे. शिवाय रक्ताचे प्रमाणही कमी आहे आणि नाजुक तब्येतीमुळे दोन तीन दिवस तिला दवाखान्यात ठेवावे लागणार असे सांगितले. आता अर्चनाला आयतीच संधी मिळाली होती.
अर्चनाच्या मनात काहीतरी प्लॅनिंग सुरू होते आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा ती तिथे कोणालातरी सांगणार होती. पण, कधी प्रविण तर कधी माया सोबतच असायचे. त्यामुळे योग्य वेळेची ती वाट बघत होती.
आपल्या हातात आणखी दोन तीन दिवस आहेत. तेव्हा तिने मनाशी निश्चय केला. दुसऱ्याच दिवशी सकाळी अर्चानाला ही संधी मिळाली. एक नर्स स्पंजिंग करण्यासाठी आली. तिने प्रविण आणि मायाला बाहेर थांबायला सांगितले. प्रविण लगेच बाहेर गेला. पण, माया मात्र बाहेर जायला तयार नव्हती. कारण, अर्चना काही वेडंवाकडं बोलू शकते. याची त्या दोघांनाही भिती वाटत होती.

पण, नर्सने कसेबसे समजावून मायाला बाहेर थांबायला भाग पाडले.

अर्चना नर्स जवळ काय सांगते. तिची सुटका होते की नाही. पाहुया पुढच्या भागात....


©® अश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all